मुंबई, २० एप्रिल २०२६: आज सकाळी ८.०९ वाजता डोंबिवली स्थानकावर एका रिकाम्या लोकल रेकचा एक डबा रुळांवरून घसरल्याची घटना घडली. कळवा कार शेडवरून कल्याणकडे जाणाऱ्या या रिकाम्या रेकमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या थांबल्या.
अपघात तात्काळ हाताळण्यासाठी तंत्रज्ञांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मध्य रेल्वेने दिवा ते कल्याणदरम्यान डाउन स्लो लाईनवरील सेवांना फास्ट लाईनवरून वळवल्या आहेत. परिणामी, या मार्गावर प्रवासी सेवांवर परिणाम झाला असून, काही गाड्या उशिराने धावत आहेत. सद्यस्थितीत रुळांवरून घसरलेला डबा उचलण्याचे काम सुरू असून, लवकरच सामान्य वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
View this post on Instagram


