सीएसएमटी-खोपोली लोकलमध्ये रेल्वे प्रवाशावर चाकू हल्ला करणारा चोरटा जेरबंद

   Follow us on        

अंबरनाथ: मुंबई-खोपोली लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर चाकूने हल्ला करणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. जेव्हा ट्रेन विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात आली, तेव्हा एका चोरट्याने सामानाच्या डब्यात चढून नितीशकुमार नावाच्या व्यावसायिकाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरीचा हा प्रयत्न अश्लील ठरल्याने संतप्त झालेल्या चोरट्याने नितीशकुमार यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि झटापटीनंतर उल्हासनगर स्थानकात उतरून पळ काढला.

​या घटनेची तक्रार प्राप्त होताच आरपीएफ उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जीआरपीच्या मदतीने तांत्रिक तपास करून अवघ्या दोन दिवसांत आरोपीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. जोगिंदर अवतार सिंग लबाना (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जखमी प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी तत्काळ प्राथमिक उपचार देऊन त्यांची रीतसर तक्रार नोंदवून घेतली होती. पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search