कल्याणम: ध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शन ते कसारा स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी (प्री-नॉन इंटरलॉकिंग) ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला असून, प्रामुख्याने १२६१७ एर्नाकुलम जंक्शन ते निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी ही गाडी तिच्या नियमित मार्गाऐवजी आता पनवेल, वसई रोड आणि सुरत मार्गे वळवण्यात आली आहे.
या बदलामुळे मंगला एक्सप्रेस कल्याण जंक्शनवर थांबणार नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गाडीला भिवंडी रोड स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने, विशेषतः उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक आणि गाडीचा मार्ग तपासून घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


