Follow us on![]()
![]()
विशेष वृत्त: घोलवड ते उमरगाव रोड दरम्यान असलेल्या पुलावरील (पूल क्र. २०३) पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल (Divert) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
या बदलांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:
रद्द करण्यात आलेली गाडी:
गाडी क्र. २०९१० (पोरबंदर – कोच्युवेली एक्सप्रेस): दिनांक २३/०७/२०२६ रोजी सुरू होणारी ही फेरी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या (Diversion):
१. गाडी क्र. १२२१८ (चंडीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)
नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.
२. गाडी क्र. २२९०८ (हापा – मडगाव जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)
नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.
३. गाडी क्र. १२४८३ (तिरुवनंतपुरम सेंट्रल – अमृतसर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)
नवीन मार्ग: रोहा – पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – सुरत.
४. गाडी क्र. २२४७५ (हिसार – कोइम्बतूर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)
नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.
५. गाडी क्र. १६३३८ (एरनाकुलम जंक्शन – ओखा एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)
नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.
६. गाडी क्र. २२६५५ (एरनाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)
नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.
७. गाडी क्र. १६३३३ (वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस): (दि. २३/०७/२०२६)
नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.
प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या या नव्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


