Konkan Railway Updates:
कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Stoppage) व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळालेल्या गाड्या, त्यांच्या वेळा आणि सुरू होण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
१. मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (दररोज)
गाडी क्र. १२१३३ (मुंबई सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शन):
स्थानक: सावंतवाडी
वेळ: सकाळी ०७:०२ / ०७:०४
सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून
गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ):
स्थानक: सावंतवाडी रोड
वेळ: रात्री २३:३० / २३:३२
सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून
२. हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – ह. निजामुद्दीन ‘राजधानी’ एक्स्प्रेस (आवड्यातून ३ दिवस)
गाडी क्र. १२४३२ (ह. निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल):
स्थानक: सावंतवाडी
वेळ: सकाळी ०६:१८ / ०६:२०
सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून
गाडी क्र. १२४३१ (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते ह. निजामुद्दीन):
स्थानक: सावंतवाडी रोड
वेळ: सकाळी ०९:४४ / ०९:४६
सुरुवात: २८ जुलै २०२६ पासून
३. लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम नॉर्थ – एलटीटी ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (आवड्यातून २ दिवस)
गाडी क्र. १२२०१ (लोकमान्य टिळक (ट) ते तिरुवनंतपुरम नॉर्थ):
स्थानक: सावंतवाडी
वेळ: पहाटे ०२:०२ / ०२:०४
सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून
गाडी क्र. १२२०२ (तिरुवनंतपुरम नॉर्थ ते लोकमान्य टिळक (ट)):
स्थानक: सावंतवाडी
वेळ: पहाटे ०३:२८ / ०३:३०
सुरुवात: ३० जुलै २०२६ पासून
प्रवाशांनी या बदलांची आणि सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी (सुनील बी. नारकर) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी.


