Author Archives: Kokanai Digital

२३ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 16:46:54 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 12:08:56 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:46:54 पर्यंत, भाव – 27:46:12 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुक्ल – 18:50:40 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 27:30:00
  • चंद्रास्त- 14:31:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय सहलीचा दिवस International Picnic Day
  • इंग्रजी भाषा दिन English Language Day
  • जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन World Book & Copyright Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1635 : बोस्टन लॅटिन स्कूल, अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा, स्थापन झाली.
  • 1818 : ब्रिटीश अधिकारी मेजर हॉल यांना कर्नल प्रायर यांनी रायगड किल्ल्यावर गस्त घालण्यासाठी पाठवले.
  • 1984 : वैज्ञानिकांना एड्सचा विषाणू सापडला.
  • 1990 : नामिबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1995 : जागतिक पुस्तक दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 2005 : मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1564 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचा जन्म. (निधन: 23 एप्रिल 1616)
  • 1791 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1868)
  • 1858 : ‘मॅक्स प्लँक’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1947)
  • 1858 : ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ – समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1922)
  • 1873 : ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1944)
  • 1897 : ‘लेस्टर बी. पिअर्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे 14 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 डिसेंबर 1972)
  • 1938 : ‘एस. जानकी’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
  • 1968 : ‘किशोरी शहाणे’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1969 : ‘मनोज बाजपेयी’ – अभिनेते मनोज बाजपेयी यांचा जन्म.
  • 1977 : ‘काल पेन’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1616 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1564)
  • 1850 : ‘विल्यम वर्डस्वर्थ’ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी यांचे निधन. (जन्म: 7 एप्रिल 1770)
  • 1926 : ‘हेन्री बी. गुप्पी’ – ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 डिसेंबर 2854)
  • 1958 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1871)
  • 1968 : पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1902)
  • 1986 : ‘जिम लेकर’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1922)
  • 1992 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 2 मे 1921)
  • 1997 : ‘डेनिस कॉम्पटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 मे 1918)
  • 2000 : ‘बाबासाहेब भोपटकर’ – 40 वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे यांचे निधन.
  • 2001 : ‘जयंतराव टिळक’ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती यांचे निधन. (जन्म: 12 ऑक्टोबर 1921)
  • 2007 : ‘बोरिस येलत्सिन’ – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1931)
  • 2013 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1919)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

मोठी बातमी! पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय स्थगित

   Follow us on        

मुंबई:राज्य सरकारनं मंगळवारी शाळेत हिंदी भाषा शिकवण्याच्या प्रस्तावावर मोठा निर्णय घेतला होता. राज्यातील शाळेत हिंदी शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं रद्द केला आहे. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याचा प्रस्ताव यापूर्वी मान्य करण्यात आला होता. तो निर्णय सरकारनं स्थगित केला आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. याबाबत यापूर्वी सादर केलेल्या अध्यादेशावर स्थगिती आणल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जीजीआर-3 भाषा फॉर्म्युल्यानुसार पहिली ते पाचवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकणे अनिवार्य करण्यात आले होते. पण, या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर सरकारनं हा निर्णय स्थगित केला आहे.

यापूर्वी राज्य सरकारने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केला होता. तसेच, समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

मालवण – राजकोट किल्ला येथे उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी?

   Follow us on        
मालवण :राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे.

चिपी विमानतळ संबंधित महत्वाचे निर्णय; विमानसेवेला पुनर्जीवित करण्यासाठी नितेश राणे यांचे प्रयत्न

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळा बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाच्या विकासास आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांत चिपी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी परवानगी मिळणार असून, या विमानतळावरून मुंबई सेवाही अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

नुकतीच मंत्रालयात चिपी विमानतळासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, विमानतळ विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुविधांच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी DPDC (District Planning and Development Council) मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “मुंबई ते चिपी दरम्यानची सेवा कुठल्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. विमानतळाच्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. खास करून रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी”

चिपी विमानतळासंदर्भात लवकरच विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार

तसेच, विमानसेवा अधिक सुलभ आणि नियमित करण्यासाठी नवीन मार्ग आणि कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही लवकरच होणार आहे. या अनुषंगाने विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.

 

Amrit Bharat Express: मुंबईला मिळणार पहिली अमृत भारत एक्सप्रेस

   Follow us on        

Mumbai Amrit Bharat Express : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, देशाच्या आर्थिक राजधानीला अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन येत्या काही महिन्यांनी मुंबईवरून सुरू होणार आहे. मुंबई ते बिहार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून यामुळे बिहार मधून मुंबईला आणि मुंबईमधून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून बिहार ते मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा बिहारला भेट देतील तेव्हा ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.

दरम्यान ही नवीन अमृत भारत ट्रेन सहरसा आणि मुंबई दरम्यान धावणार आहे. यामुळे मुंबई ते सहरसा हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर बिहारला या आधी सुद्धा अमृतभारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.

बिहार मधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (ANVT) या मार्गावर धावत आहे. आता या मार्गानंतर, मुंबई ते सहरसा या मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून ही बिहारची दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.

 

२२ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 18:16:32 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 12:45:22 पर्यंत
  • करण-तैतुल – 06:44:50 पर्यंत, गर – 18:16:32 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुभ – 21:12:40 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-मकर – 24:32:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:49:59
  • चंद्रास्त- 13:33:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन
  • राष्ट्रीय आयटी सेवा प्रदाता दिन National IT Service Provider Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1056 : क्रॅब नेब्युलामध्ये सुपरनोव्हा स्फोट.
  • 1948 : अरब-इस्त्रायली युद्ध – अरबांनी हैफा हे प्रमुख इस्रायली बंदर काबीज केले.
  • 1970 : पृथ्वी दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 1977 : टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी ऑप्टिकल फायबरचा प्रथम वापर.
  • 1997 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील ओमप्रकाश भसीन पुरस्काराने घोषित करण्यात आले.
  • 2006 : कौटुंबिक वादातून प्रवीण महाजन यांनी भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावर गोळी झाडली.
  • 2016 : पॅरिस करारावर स्वाक्षरी झाली, ग्लोबल वार्मिंगशी लढा देण्यासाठी एक करार.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1698 : ‘शिवदिननाथ’ – नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष यांचा जन्म.
  • 1724 : ‘एमॅन्युएल कांट’ – जर्मन तत्त्ववेत्ता यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 1804)
  • 1812 : भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1860)
  • 1870 : ‘व्लादिमीर लेनिन’ – रशियन क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जानेवारी 1924)
  • 1904 : ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर’ – अणुबॉम्बचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 1967)
  • 1914 : ‘बलदेव राज चोपडा’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 5 नोव्हेंबर 2008)
  • 1916 : ‘काननदेवी’ – अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1992)
  • 1916 : व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: 12 मार्च 1999)
  • 1929 : चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ ‘उषा किरण’ यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 2000)
  • 1929 : ‘प्रा. अशोक केळकर’ – भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक यांचा जन्म.
  • 1935 : ‘भामा श्रीनिवासन’ – भारतीय-अमेरिकन गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘गोपाळकृष्ण गांधी’ – भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1971 : ‘सुमित राघवन’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1933 : ‘हेन्री रॉयस’ – रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1863)
  • 1980 : ‘फ्रिट्झ स्ट्रासमान’ – जर्मन भौतिकशात्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1902)
  • 1994 : ‘आचार्य सुशीलमुनी महाराज’ – विचारवंत, समाजसुधारक यांचे निधन.
  • 1994 : ‘रिचर्ड निक्सन’ – अमेरिकेचे 37 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 9 जानेवारी 1913)
  • 2003 : ‘बळवंत गार्गी’ – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1916)
  • 2013 : ‘लालगुडी जयरामन’ – व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1930)
  • 2013 : ‘जगदीश शरण वर्मा’ – भारताचे 27 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म: 18 जानेवारी 1933)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

….तोपर्यंत आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोधच! आंबोली ग्रामस्थांचा निर्धार

   Follow us on        
आंबोली: आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्ग ला विरोध करण्यासंदर्भात बैठक आज असून जमिनींचा 7/12 तयार झाल्याशिवाय आणि  ग्रामस्थांना जमीन वाटप होईपर्यंत या महामार्गाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे एकमत आहे.
फणसवडे येथून घाटात बोगदा मारून पारपोली हद्दीतून आंबोली तांबुळगे खुळ्याची ढोल,मलई,नारायण गड,सतीची वाडी वरचा डोंगर,कावळेसाद तेथून कितवडे मार्गे कोल्हापूर असा रस्ता जात आहे.हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असा सहा पदरी रस्ता जात आहे. आंबोली गेळे येथील कबुलायतदार प्रश्न गेली २५ वर्षे महाराष्ट्र शासन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.इथे भूमिपुत्र उपरे ठरत असून अतिक्रमन शासनाच्या आशीर्वादानेच होत आहे.वन खात्याचा प्रश्न सांगून हिरण्यकेशी चा रस्ता देखील होत नाही.तर दुसरीकडे बिल्डर लॉबी ला सगळं रान मोकळ आहे. त्यामुळे इथले स्थानिक हे वर्षानुवर्षे भूमी पासून वंचित राहिले.त्यात एक पिढी जमिनीची प्रतीक्षा करता करता संपली.पुढे भविष्यात देखील कठीन परिस्थिती आहे.
वन  खात्याच्या जमिनी शक्तीपीठ हायवे साठी घेण्यात येतील मात्र आंबोलीतील वन खात्याच्या स्थानिकांच्या जमिनी बाबत निर्णय कधी? शासन आणि लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना फक्त आश्वासनावर ठेवता २५ वर्षे संपली. त्यामुळे आता शासनाने आंबोली जमिनीबाबत निर्णय घ्यावा.अन्यथा शक्तीपीठ महामार्ग ला ग्रामस्थांचा विरोध करण्याचा एकमुखी ठराव आंबोली ग्रामस्थांनी केला आहे.शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने याची दखल घ्यावी आणि येथील प्रश्नाबाबत शासनाचे डोळे उघडावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.२५ वर्षे इथला जमीन प्रश्न शासन सोडवत नसल्यामुळे भूमिपुत्र वंचित राहिले आहेत.त्या मुळे आता ठोस निर्णयाची आवश्यकता असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

चिपळूण: अखेर प्रतीक्षा संपली! वाशिष्ठी दाभोळ खाडीत पहिली हाऊसबोट दाखल

   Follow us on        

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आता पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात खाडी सफारीचा आनंद घेता येणार आहे. शासनाच्या पर्यटन प्रोत्साहन उपक्रमांतर्गत मालदोली येथील अग्निपंख महिला विभाग संघास देण्यात आलेली हाऊसबोट चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. गोळकोट येथे तिचे आवश्यक जोडणीचे काम सुरू असून, लवकरच ती खाडीत सोडण्यात येणार आहे.या उपक्रमामागचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यटन उद्योगातून महिला बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी हाउसबोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे. या खाडीतील जैवविविधता, मगर सफारी, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळवणाची बेटे, नारळी पोफळीच्या बागा या निसर्गरम्य परिसराचा अनुभव या हाउसबोटीतून घेता येईल. एक कोटी खर्चाच्या या हाउसबोटमध्ये दोन वातानुकूलित खोल्या असून, त्यात प्रशस्त बेड, सोफा, बाथरूमची व्यवस्था आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी ३६ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.सर्वसाधारण हाउस बोटिंगमध्ये पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. वर्षाकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या अधिकाऱ्यांनी, तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाउस बोट प्रकल्पाची पाहणी केली आहे.

मालदोली येथील अग्निपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रभाग संघात ३५५ स्वयंसाहाय्यता समूह १८ ग्रामसंघ, तर ३,८४७ महिला सहभागी आहेत. सिंधुरत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन, देखरेख, विपणन, लेखा अशा चार समित्यांच्या स्थापना केल्या आहेत.

वाशिष्ठी दाभोळखाडीत नयनरम्य असा निसर्ग परिसर आहे. पर्यटकांनी हाउस बोटमधून निसर्गाची पाहणी केल्यास पुन्हा ते सातत्याने इकडे आकर्षित होतील, अशी निसर्गाची उधळण येथे पाहायला मिळते. हा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबवू, असा आम्हाला विश्वास आहे. – दीपिका कुळे, अध्यक्ष, अग्निपंख महिला प्रभाग संघ, मालदोली

२१ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 19:03:51 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:48:59 पर्यंत
  • करण-विष्टि – 06:49:12 पर्यंत, भाव – 19:03:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्ध – 24:11:26 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-धनु – 18:05:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:22:59
  • चंद्रास्त- 11:35:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • भारतीय नागरी सेवा दिन
  • जागतिक क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दिन World Creativity And Innovation Day
महत्त्वाच्या घटना :
  • 753 : ईसा पूर्व: रोमची स्थापना रोम्युलसने केली.
  • 1944 : फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
  • 1960: ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरोचे उद्घाटन झाले.
  • 1972: अपोलो 16 अमेरिकन अंतराळवीर जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक चंद्रावर उतरले.
  • 1997: भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी पदभार स्वीकारला
  • 2000: सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आश्रित विधवांना देखील पालकांच्या मालमत्तेचा हक्क आहे.
  • 2019 : श्रीलंकेतील चर्च, हॉटेल आणि इतर ठिकाणी आठ बॉम्बस्फोट; 250 हून अधिक लोक मारले गेले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1864 : ‘मॅक्स वेबर’ – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 जून 1920)
  • 1922 : ‘अ‍ॅलिएस्टर मॅकलिन’ – स्कॉटिश साहसकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1987)
  • 1926 : ‘एलिझाबेथ (दुसरी)’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म.
  • 1934 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचा जन्म.
  • 1945 : ‘श्रीनिवासराघवन वेंकटराघवन’ – भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर यांचा जन्म.
  • 1950 : ‘शिवाजी साटम’ – हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1509 : ‘हेन्‍री (सातवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1457)
  • 1910 : ‘मार्क ट्वेन’ – अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1835)
  • 1938 : ‘सर मुहम्मद इक्बाल’ – पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1877)
  • 1946 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 जून 1883)
  • 1952 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1889)
  • 2013 : ‘शकुंतलादेवी’ – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘मान्सून वेळापत्रक’ नकोच!

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गेल्या दोन दशकांपासून पावसाळ्यात म्हणजेच 10 जून ते 30 ऑक्टोबर दरम्यान मान्सून वेळापत्रक अंगिकारले जाते. मात्र या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू ठेवण्यामागील तर्कावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नेटवर्कमधील रेल्वे प्रवासी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरी वेळापत्रकामुळे गाड्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि जनतेचे तसेच रेल्वेचे नुकसान होते असा दावा त्यांनी केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर  २२ जून २००३ रोजी वैभववाडी येथे आणि १६ जून २००४ रोजी करंजडी येथे भूस्खलनामुळे झालेल्या दोन अपघातांनंतर, कोकण रेल्वे प्रशासनाने १० जून २००५ पासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये गाड्या कमी वेगाने धावतात. दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू केले जाते.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे CRS चे निर्देश
मुंबईस्थित वेस्टर्न इंडिया पॅसेंजर असोसिएशनचे सरचिटणीस थॉमस सायमन म्हणाले की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) केआरसीएलला कायमस्वरूपी उपाययोजना लागू होईपर्यंत फक्त मुसळधार पावसात काही वेगाचे निर्बंध लादण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर महामंडळाने भूस्खलन रोखण्यासाठी व्यापक भू-तांत्रिक कामे करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या मेलमध्ये, श्री. सायमन म्हणाले की, मुंबई येथील सेंट्रल सर्कलच्या CRS ने २०१८ मध्ये WIPA प्रतिनिधींना सांगितले होते की आयुक्तांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन KRCL किंवा इतर संस्थांना मान्सून वेळापत्रक कायम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले नव्हते, तरीपण हे मान्सून वेळापत्रक कोकण रेल्वेमार्गावर अंगिकारले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर दुहेरी वेळापत्रक न अंगिकारता एकच वेळापत्रक कायम ठेवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्री. सायमन यांच्या मते मान्सून वेळापत्रक केआर नेटवर्कवरील प्रत्येक ट्रेनसाठी दोन मार्ग आणि वेळेचे संच तयार करते ज्यामुळे गाड्यांची कृत्रिम कमतरता निर्माण होते, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि रेल्वेचे नुकसान होते. केआरसीएलवरील प्रत्येक ट्रेनला मान्सून आणि मान्सून नसलेल्या कालावधीसाठी दोन वेगवेगळे मार्ग दिले पाहिजेत ज्यामुळे एक स्लॉट कायमचा रिकामा राहील. कोकण रेल्वे २४ तासांच्या दिवसात सुमारे २४ गाड्या चालवते. प्रत्यक्षात जर मान्सून वेळापत्रक नसेल तर ते दर १० मिनिटांनी एक ट्रेन चालवू शकते.
मान्सून वेळापत्रक रद्द केल्यास, कोकण रेल्वे (केआर) नेटवर्कद्वारे अधिक गाड्या चालवता येतील; १२० किमी प्रतितास वेगाची परवानगी, मुंबई ते तिरुवनंतपुरम पर्यंत पूर्ण विद्युतीकरण आणि मुंबई एलटीटी ते वीर दरम्यान १७१ किमी दुहेरी ट्रॅकसह, तिप्पट जास्त गाड्या धावू शकतात, असा त्यांनी युक्तिवाद केला आहे. गेल्या काही वर्षांत केआर नेटवर्कवर कोणतेही मोठे भूस्खलन झालेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर तिरुअनंतपुरम ते नवी दिल्ली या नेटवर्क दरम्यानच्या  गाड्या चालविण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरी वेळापत्रकाचा परिणाम संपूर्ण भारतात  होतो असेही  ते म्हणालेत.
वेग निर्बंध
WIPA ने वारंवार असे सुचवले होते की गरज पडल्यास रत्नागिरी आणि आडवली दरम्यान गाड्या कायमस्वरूपी गतीने चालवता येतील. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जवळजवळ दरवर्षी भूस्खलन, पूर इत्यादी घटना घडतात मात्र तरीही तिथे पावसाळ्याचे वेगळे वेळापत्रक नाही आहे. कुंडापुरा रेल्वे प्रयत्न समितीचे गौतम शेट्टी म्हणाले की, उत्तर भारतात दरवर्षी दाट धुके पडत असले तरी तिथे हिवाळ्यातील वेळापत्रक नाही आहे.
पावसाळ्याचे वेळापत्रक अनावश्यकपणे संसाधने वाया जात आहेत. केवळ जेथे धोका जास्त आहे अशा  ठिकाणी मुसळधार पावसातच हे निर्बंध लादले जावेत असे मत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्राचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी मांडले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search