Author Archives: Kokanai Digital
१) गाडी क्रमांक ०६०७५ मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन वन वे सुपरफास्ट स्पेशल :
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 15:26:27 पर्यंत
- नक्षत्र-ज्येष्ठा – पूर्ण रात्र पर्यंत
- करण-बालव – 15:26:27 पर्यंत, कौलव – 28:21:40 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वरियान – 24:48:48 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:22
- सूर्यास्त- 18:55
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 22:48:00
- चंद्रास्त- 08:54:59
- ऋतु- वसंत
- विश्व हीमोफीलिया दिवस
- आंतरराष्ट्रीय वटवाघुळ दिन
- 1941 : दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीला शरणागती पत्करली.
- 1946 : सीरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1950 : बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
- 1952 : पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
- 1970 : अपोलो प्रोग्राम: खराब झालेले अपोलो 13 अंतराळयान सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
- 1971 : द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
- 1975: ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह ताब्यात घेतली
- 1983: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने उपग्रह प्रक्षेपण वाहन (रॉकेट) ‘SLV3’ प्रक्षेपित केले.
- 2001 : अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- 2014 : नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपने दुसऱ्या ताऱ्याच्या राहण्यायोग्य क्षेत्रामध्ये पृथ्वीच्या आकाराचा पहिला ग्रह शोधल्याची पुष्टी केली.
- 1478 : ‘आचार्य संत सूरदास’ – हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे यांचा जन्म.
- 1820 : ‘अलेक्झांडर कार्टराईट’ – बेसबॉल चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 जुलै 1892)
- 1837 : ‘जे. पी. मॉर्गन’ – अमेरिकन सावकार यांचा जन्म. (मृत्यू: 31 मार्च 1913)
- 1891 : कोशकार यशवंत रामकृष्ण दाते – यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1973)
- 1897 : ‘निसर्गदत्त महाराज’ – अद्वैत तत्त्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1981)
- 1916 : ‘सिरिमाओ बंदरनायके’ – जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या 6 व्या पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2000)
- 1951 : ‘बिंदू’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
- 1961 : ‘गीत सेठी’ – बिलियर्डसपटू यांचा जन्म.
- 1972 : ‘मुथय्या मुरलीधरन’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1977 : ‘दिनेश मोंगिया’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1790 : ‘बेंजामिन फ्रँकलिन’ – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1706)
- 1882 : ‘जॉर्ज जेनिंग्स’ – फ्लश टॉयलेट चे शोधक यांचे निधन. (जन्म: 10 नोव्हेंबर 1810)
- 1946 : ‘व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री’ – भारत सेवक समाजाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 22 सप्टेंबर 1869)
- 1975 : ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ – भारताचे दुसरे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1888)
- 1997 : ‘बिजू पटनायक’ – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री यांचे निधन.
- 1998 : ‘विजय सिप्पी’ – चित्रपट निर्माते यांचा मृत्यू.
- 2001 : ‘डॉ. वा. द. वर्तक’ – वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 19 ऑक्टोबर 1925)
- 2004 : ‘सौंदर्या’ – कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1972)
- 2011 : ‘वि.आ. बुवा’ – विनोदी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 4 जुलै 1926)
- 2012 : ‘नित्यानंद महापात्रा’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 17 जुन 1912)




मुंबईः (१६ एप्रिल, २०२५)-लांब पल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरु असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत.
या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.




दोडामार्ग: झाड तोडण्यासाठी चढलेल्या युवकाच्या पायाला वुड कटर लागून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साटेली-भेडशी येथे मंगळवारी दुपारी घडली. नागेश लाडू मयेकर (वय 40, रा. साटेली-भेडशी) असे या युवकाचे नाव आहे.
नागेश मयेकर हा साटेली-भेडशी शेजारील घोटगे गावात सहकार्यांसोबत झाड तोडण्यासाठी गेला होता. प्रथम झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो वुड कटर घेऊन झाडावर चढला. दरम्यान फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना अचानक कटर त्याचा पायाला लागला. यात त्याच्या मांडीची रक्तवाहिनी कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच परिस्थितीत त्याला साटेली-भेडशी प्राथ. रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी माहिती घेतली असता नागेश याचा अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असे सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नागेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, विवाहित बहीण असा परिवार आहे.




Atm in Railway : मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा उपलब्ध झाली असून, अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे. त्यामुळे आता प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. या कल्पनेला प्रतिसाद देत, बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण 22 डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता 2032 असून दररोज सुमारे 2200 प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली. हे एटीएम ‘एक्स्प्रेस’ सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरळीतपणे कार्यरत राहावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हा संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवला जात आहे. या ऑनबोर्ड एटीएम सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होणार आहे. एटीएमची सुविधा ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे.
आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 13:20:06 पर्यंत
- नक्षत्र-अनुराधा – 29:55:40 पर्यंत
- करण-विष्टि – 13:20:06 पर्यंत, भाव – 26:25:38 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-व्यतापता – 24:16:49 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:23
- सूर्यास्त- 18:54
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 21:53:59
- चंद्रास्त- 08:09:59
- ऋतु- वसंत
- हत्ती वाचवा दिवस Save the Elephant Day
- जागतिक आवाज दिवस World Voice Day
- 1853 : बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली प्रवासी रेल्वे सेवा भारतात सुरू झाली.
- 1910 : 21 व्या शतकात खेळासाठी वापरला जाणारा सर्वात जुना विद्यमान इनडोअर आइस हॉकी रिंगण, बोस्टन अरेना, प्रथमच उघडला.
- 1912 : हॅरिएट क्विम्बी इंग्रजी चॅनेल ओलांडून विमान उडवणारी पहिली महिला ठरली.
- 1922 : मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
- 1948 : राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
- 1972 : अपोलो 16 केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित झाले.
- 1995 : निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 1999 : चालकरहित ‘निशांत’ विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चांदीपूर येथे चाचणी करण्यात आली.
- 2003 : वयाच्या 40 व्या वर्षी, बास्केटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकेल जॉर्डनने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये शेवटचा खेळ खेळला.
- 2013 : इराणच्या सिस्तान आणि बलुचेस्तान प्रांतात 7.8 तीव्रतेच्या भूकंपात किमान 35 लोक ठार आणि 117 जण जखमी झाले.
- 2016 : इक्वाडोरच्या 40 वर्षांतील सर्वात भीषण भूकंपात 676 ठार आणि 6,274 जखमी झाले.
- 1867 : ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1912)
- 1889 : विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म. (मृत्यू: 25 डिसेंबर 1977)
- 1896 : मद्रास विद्यापीठातील पुरातत्व शास्त्राचे माजी प्राध्यापक विष्णमपेट आर. रामचंद्र दीक्षित यांचा जन्मदिन.
- 1924 : भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.
- 1934 : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.
- 1942 : विल्यम्स एफ-1 रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.
- 1961 : भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.
- 1963 : पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म.
- 1972 : स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ यांचा जन्म.
- 1978 : मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म.
- 1991 : चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे यांचा जन्म.
- 1753 : फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1677)
- 1850 : मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन. (जन्म: 1 डिसेंबर 1761)
- 1966 : शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन. (जन्म: 3 डिसेंबर 1882)
- 1995 : अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर यांचे निधन.
- 2000 : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.




मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचे काम यावर्षी जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते.
गडकरी यांनी पुढील दोन वर्षात नॅशनल हायवेचे रस्ते जाळे अमेरिकेपेक्षा चांगले होईल, असा आशावाद व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळाकडे वॉटर टॅक्सी जाणार
मुंबईमधील कोणत्याही दिशेकडून जलमार्गाने १७मिनिटात नवी मुंबई विमानतळाकडे जाता यावे यासाठी वॉटर टॅक्सीची योजना तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
वसई विरारपासून ते गेटवे ऑफ इंडिया या कोणत्याही ठिकाणाहून या नवी मुंबई विमानतळाकडे जाता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
तसेच वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी नवे १०८ जलमार्ग तयार केले जाणार असून, त्यातील दोन जलमार्ग सुरू झाले आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.
१५ दिवसांत टोलचे नवे धोरण
‘एनएचएआय’च्या टोलनाक्यांबाबत पुढील पंधरा दिवसांत नवे धोरण आणले जाणार आहे. त्यातून या टोलनाक्यांबाबत वाहनचालकांची कोणतीही तक्रार राहणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.
तसेच भविष्यात सॅटेलाइट बेस टोलवसुली केली जाणार असून त्यातून नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
अटल सेतूवरून बंगळुरूपर्यंत महामार्ग
अटल सेतूपासून पुण्याच्या रिंग रोडपर्यंत जाणारा नवा महामार्ग उभारला जाणार आहे. हा महामार्ग पुणे-मुंबई एक्सप्रेसपेक्षा रुंदीने तीन पट असेल. पुढे पुण्यापासून बंगळुरुपर्यंत नवा मार्ग उभारला जात आहे. त्यामुळे मुंबईपासून बंगळुरुला ५ तासांत जाता येईल.
आजचे पंचांग
- तिथि-द्वितीया – 10:58:19 पर्यंत
- नक्षत्र-विशाखा – 27:10:52 पर्यंत
- करण-गर – 10:58:19 पर्यंत, वणिज – 24:10:42 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सिद्वि – 23:31:06 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 06:24
- सूर्यास्त- 18:54
- चन्द्र-राशि-तुळ – 20:27:31 पर्यंत
- चंद्रोदय- 21:00:00
- चंद्रास्त- 07:29:00
- ऋतु- वसंत
- जागतिक कला दिवस
- 1673 : मराठा साम्राज्याचे सरदार प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.
- 1892 : जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
- 1912 : आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
- 1923 : मधुमेह असलेल्या लोकांसाठी इन्सुलिन सामान्यतः वापरण्यासाठी उपलब्ध झाली.
- 1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्विक शहरावर हल्ला केला.
- 1955 : डेस प्लेन्स, इलिनॉय येथे पहिले मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट उघडले.
- 1994 : भारताची दर आणि व्यापारावरील सामान्य करार ( GATT ) प्रस्तावावर स्वाक्षरी झाली
- 1452 : ‘लिओनार्डो डा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1519)
- 1469 : ‘गुरू नानक देव’ – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1539)
- 1707 : ‘लिओनार्ड ऑयलर’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 1783)
- 1741 : चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: 22 फेब्रुवारी 1827)
- 1893 : नरहर रघुनाथ तथा ‘न. र. फाटक’ – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 डिसेंबर 1979)
- 1894 : ‘निकिता क्रूश्चेव्ह’ – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1971)
- 1901 : ‘अजय मुखर्जी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
- 1912 : ‘मल्हार सदाशिव’ तथा ‘बाबूराव पारखे’ – उद्योजक व वेदाभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 1997)
- 1912 : ‘किम सुंग’ (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जुलै 1994)
- 1922 : ‘हसरत जयपुरी’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 सप्टेंबर 1999)
- 1932 : ‘सुरेश भट’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 2003)
- 1963 : ‘मनोज प्रभाकर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1794 : ‘मोरेश्वर रामचंद्र पराडकर’ उर्फ मोरोपंत – पंडीतकवी यांचे निधन.
- 1864 : ‘अब्राहम लिंकन’ – अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: 12 फेब्रुवारी 1809)
- 1912 : ‘कप्तान एडवर्ड जे. स्मिथ’ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान यांचे निधन. (जन्म: 27 जानेवारी 1850)
- 1980 : ‘जेआँ-पॉल सार्त्र’ – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म: 21 जून 1905)
- 1990 : ‘ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन’ ऊर्फ ‘ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1905)
- 1995 : ‘पंडित लीलाधर जोशी’ – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन.
- 1998 : ‘पॉल पॉट’ – कंबोडियातील 20 लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता यांचे निधन. (जन्म: 19 मे 1925)
- 2013 : ‘वि. रा. करंदीकर’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1919)




चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव गावातील पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत आदिमाया आदिशक्ती श्री भवानी देवी आहे. श्री कालकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे.
रामवरदायिनी मंदिर मजरे दादर येथे दसपटकर शिंदे कदम मोकाशी यांची एकच जत्रा होत असे. परंतु अंदाजे एका शतकापासून रामवरदायिनी मंदिर दादर आणि श्री कुलस्वामी भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव अशा दोन वेगवेगळ्या जत्रांचे आयोजन चैत्रपौर्णिमेस केले जाते. या जत्रेविषयी एक दंतकथा आहे, एक वेळ कदम मोकाशी टेरकर यांच्या काही मनाबद्दल थोडी चूक झाली होती. त्यामुळे त्याच रात्री श्री रामवरदायिनी मंदिर दादर येथून निघून टेरवकरांनी आपल्या टेरव गावी जत्रा भरविली. एकमेकांची समजूत घालण्यात आली व पूर्वीप्रमाणे एकोप्याने वागू लागले, परंतु देवीचे कार्य सुरू केल्यामुळे ते चालू ठेवावे लागले, यावरून दसपटकरांचे एकमेकांवरचे प्रेम व सौख्य दिसून येते.
शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या संकटमोचक महाबली श्री हनुमान जन्मोत्सव शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सुर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकऱ्यानी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवून गाऱ्हाणे (आर्जव) घालून पुजाऱ्यानी ते श्रीफळ वाढवून प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप केले. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे-मागणे देवून उपस्थित ग्रामस्थ, भाविकांना पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या – मागण्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. रुढी परंपरेनुसार सर्व पुजाविधी पार पडल्यावर पालखीमध्ये कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रुपी लावण्यात आली.
शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा श्री क्षेत्र टेरव गावचा चैत्रपोर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस होय. माहेरवाशिणी, सगे सोयरे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकानी या जत्रोत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्य ग्रामस्थांप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे, सुरत इ. शहरात स्थायिक झालेले टेरकर आपल्या मायभूमीला विसरलेले नाहीत, ही गावासाठी जमेची बाजू होय.
जत्रेनिमित्त घराघरात उल्हासाचे व आनंदाचे वातावरण होते. अंगणात, रस्त्यावर, पाय वाटेवर रांगोळ्या घालून विद्युतरोषणाईची आरास करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या आवारात कुरमुऱ्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, चिक्की, मिठाई, सरबत, आईस्क्रीम, कलिंगड इ. तसेच पिपाणी, भिंगरी, भिरभिरे, मोटार, बॅट-बॉल अशी नाना तर्हेची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच या वर्षी बाल गोपालांसाठी जंपिंग झपाक, मिकी माऊस, रिंग गेम या खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.
संध्यकाळी ५ वाजता देवीना परिधान केलेल्या साड्या व पालखीस अर्पण केलेल्या पासोड्यांचा (वस्त्रांचा) रंगमंचावर लिलाव करण्यात आला.
चैत्र पौर्णिमा जत्रेस मोठ्या प्रमाणावर धार्मिक स्वरुप यावे आणि जत्रेची शोभा वाढावी यासाठी पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्या वाजतगाजत मिरवणुकीने टेरव येथे रात्रौ १० वाजता पोहचल्या होत्या. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. रूढी परंपरे प्रमाणे चिंचघरीची पालखी श्री शिवराम गुरव यांच्या अंगणात तर कामथे गावची पालखी श्री संतोष म्हालीम यांच्याअंगणात थांबली होती. कामथेच्या पालखीचे स्वागत टेरवच्या पालखीने भारतीवाडीच्या होळीवर करून तेथून या दोन्ही पालख्या श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळ चिंचघरीच्या पालखीस भेटल्या. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळून मंदिराकडे मार्गस्थ झाली. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटवितानाचे दृश्य विलोभनीय, मनमोहक व नयनरम्य होते, ते पाहून असंख्य भाविक आनंदाने बेभान झाले व तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. या तीन पालख्यांची भेट पाहून मन अगदी भरुन आले होते. पालख्यांची भेट झाल्यावर प्रथम कामथे नंतर चिंचघरी व शेवटी टेरवची पालखी छबेना काढून मंदिरात स्थानापन्न झाली. मंदिरात ओटी भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. कोकणातील प्रति तुळजापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेरवच्या श्री भवानी वाघजाई देवीच्या दर्शनासाठी तसेच वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहण्यासाठी भाविकांचा महापूर श्री क्षेत्र टेरव येथे लोटला होता. या वार्षिक जत्रोत्सवास चैत्रावली असेही संबोधले जाते. ग्रामदेवतांच्या पालख्या, करमणुकीची साधने, खाद्य व प्रसादाची दुकाने, आणि विविध खेळांचे प्रदर्शन ही या जत्रेची विशेषता होय.
तिन्ही पालख्या मंदिरात स्थानापन्न झाल्यावर रात्रौ कोल्हापुर येथील एका पेक्षा एक अप्सरा ह्या मराठी लोकधरेने सजलेल्या आणि महाराष्ट्राच्या लावणीने बहरलेला मराठी व हिंदी गीतांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ झाल्या, त्यावेळी श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेण्यात आली आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. हनुमान जन्मोत्सवा दिनी वार्षिक जत्रोत्सव उत्साहात व आनंदाने संपन्न झाला.