Author Archives: Kokanai Digital

२७ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 23:06:16 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 24:34:30 पर्यंत
  • करण-गर – 12:30:16 पर्यंत, वणिज – 23:06:16 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-साघ्य – 09:24:22 पर्यंत, शुभ – 29:55:51 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:39
  • सूर्यास्त- 18:50
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 29:38:59
  • चंद्रास्त- 16:51:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक रंगभूमी दिवस

महत्त्वाच्या घटना :
  • 1794 : अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
  • 1854 : क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1958 : निकिता ख्रुश्चेव्ह सोव्हिएत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • 1966 : 20 मार्च रोजी दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला चोरी गेलेली विश्वचषक फुटबॉल ट्रॉफी सापडली. परुंतु त्यानंतर 1983 मध्ये पुन्हा कप चोरीला गेला.
  • 1977 : टेनेरिफ बेटावरील धावपट्टीवर पॅन ॲम आणि के.एल.एम. या दोन बोईंग 747 विमानांची टक्कर होऊन 583 लोकांचा मृत्यू झाला होता.
  • 1992 : पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार प्रदान केला.
  • 2000 : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ‘बी. आर. चोप्रा’ यांना फाय फाउंडेशनतर्फे ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ जाहीर.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1785 : ‘लुई’ (सतरावा) – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 8 जून 1795)
  • 1845 : ‘विलहेम राँटजेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1923)
  • 1863 : ‘हेन्री रॉयस’ – रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 22 एप्रिल 1933)
  • 1901 : ‘कार्ल बार्क्स’ – डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 2000)
  • 1922 : ‘स्टेफन वल’ – फ्रांसचे लेखक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1898 : सर ‘सय्यद अहमद खान’ – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1817)
  • 1952 : ‘काइचिरो टोयोटा’ – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 11 जून 1894)
  • 1967 : ‘जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की’ – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1890)
  • 1968 : ‘यूरी गगारिन’ – पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1934)
  • 1992 : ‘प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले’ – साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे निधन.
  • 1997 : ‘भार्गवराम आचरेकर’ – संगीत नाटकातील अभिनेते व गायक यांचे निधन.
  • 2000 : ‘प्रिया राजवंश’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सावंतवाडी:चराठा येथे २ लाख ३८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी शहर ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांसहित एक लाख रुपये किमतीची अल्टो कार मिळून सुमारे ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. बाबाजी विजय नाईक (४२, रा. खासकीलवाडा सावंतवाडी) व उमेश रघुनाथ सावंत (५०, रा. वायंगणी तालुका मालवण) अशी संशयतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.

ओटवणे ते चराठा अशी कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पाळत ठेवून मंगळवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या संशयित अल्टो कारला थांबवून त्याची पाहणी केली असता या गाडीत अवैध गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हा सर्व मुद्देमाल तसेच अल्टो कार ताब्यात घेण्यात आली तर या अवैध वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.

या दोघांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम, जयेश करमळकर यांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

२६ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 25:46:01 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 26:30:48 पर्यंत
  • करण-कौलव – 14:52:32 पर्यंत, तैतुल – 25:46:01 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्ध – 12:25:05 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:40
  • सूर्यास्त- 18:49
  • चन्द्र-राशि-मकर – 15:15:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 28:57:59
  • चंद्रास्त- 15:48:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक पर्पल दिवस (World Purple Day)
महत्त्वाच्या घटना :
  • 1552 : गुरू अमर दास हे शिखांचे तिसरे गुरू बनले.
  • 1902 : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
  • 1910 : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध मधील कुंडल रोडवर रेल्वे स्थानकाजवळ कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
  • 1942 : ऑश्विझ छळछावणी (Concentration Camp) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती येथे पहिल्या महिला कैदी दाखल झाल्या.
  • 1971 : बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन
  • 1972 : नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पहिली जागतिक संस्कृत परिषद सुरू झाली.
  • 1974 : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलन सुरू झाले.
  • 1979 : अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
  • 2000 : व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • 2013 : त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1874 : ‘रॉबर्ट फ्रॉस्ट’ – अमेरिकन कवी यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1963)
  • 1875 : ‘सिंगमन र्‍ही’ – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 19 जुलै 1965)
  • 1879: ‘ओथमर अम्मांन’ (Othmar Hermann Ammann) – जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ( यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1965)
  • 1881 : ‘गुच्चियो गुच्ची’ – गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1953)
  • 1898: ‘रुडॉल्फ दास्स्लेर’ – पुमा से कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1974)
  • 1907 : ‘महादेवी वर्मा’ – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1987)
  • 1909 : ‘बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर’ – साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 2000)
  • 1930 : ‘सांड्रा डे ओ’कॉनोर’ – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ( मृत्यू : 1 डिसेंबर 2023)
  • 1933 : ‘कुबेरनाथ राय’ – भारतीय लेखक व हिन्दी निबंधकार. ( मृत्यू: 5 जून 1996)
  • 1973 : ‘लॅरी पेज’ – गुगल चे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1985 : ‘प्रॉस्पर उत्सेया’ – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1827 : ‘लुडविग व्हान बेथोव्हेन’ – अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1770)
  • 1885 : ‘अंसन स्तागेर’(Anson Stager) – वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 एप्रिल 1825)
  • 1932 : ‘हेनरी मार्टिन लेलैंड’ – कैडिलैक आणि लिंकन कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1843)
  • 1945 : ‘डेविड लॉयड जॉर्ज’ – यूनाइटेड किंगडम चे प्रधानमंत्री यांचे निधन ( जन्म: 17 जानेवारी 1863)
  • 1996 : ‘के. के. हेब्बर’ – चित्रकार यांचे निधन.
  • 1996 : ‘डेव्हिड पॅकार्ड’ – हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1912)
  • 1997 : ‘नवलमल फिरोदिया’ – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 9 सप्टेंबर 1910)
  • 1999: ‘आनंद शंकर’ – प्रयोगशील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1942)
  • 2003 : ‘हरेन पंड्या’ – गुजरातचे माजी गृह मंत्री यांचे निधन. (जन्म: 25 जून 1950)
  • 2008 : ‘बाबुराव बागूल’ – दलित साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1930)
  • 2009 : ‘ग्रिसेल्डा अल्वारेझ’ – मेक्सिकोतील पहिल्या महिला गव्हर्नर यांचे निधन (जन्म: 5 एप्रिल 1913)
  • 2012 : ‘माणिकराव गोडघाटे‘ – प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी यांचे निधन. (जन्म: 10 मे 1940)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा ओव्हरहेड वायर तुटली; दोन गाड्या रखडल्या

🔘 आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने सुटणार

   Follow us on        

Konkan Railway :ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे मार्गावर विघ्न निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे ओव्हरहेड वायर आज मंगळवारी संध्याकाळी ६-६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटली. यामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर परिणाम झाला. दोन्ही गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत . मात्र याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ उपाय योजना सुरु करण्यात आल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले आहे. मात्र अन्यथा उर्वरित गाड्या नियमित वेळेत धावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून आहे तर गोव्याच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ला रोहा स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.

आजची मुंबई – मडगाव कोकणकन्या उशिराने

गोव्या वरून मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस उशिरा धावत असल्याने आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने म्हणजे रात्री एक वाजून तीस मिनिटाने सुटणार आहे.

२५ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 27:48:57 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 27:50:47 पर्यंत
  • करण-भाव – 16:34:31 पर्यंत, बालव – 27:48:57 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शिव – 14:52:46 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:41
  • सूर्यास्त- 18:49
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 28:15:59
  • चंद्रास्त- 14:48:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन (International Day of Remembrance of the Victims of Slavery and the Transatlantic Slave Trade )
  • न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of the Unborn Child)
महत्त्वाच्या घटना :
  • 1655 : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनीचा सर्वात मोठा चंद्र, टायटन शोधला.
  • 1807 : गुलाम व्यापार कायद्याद्वारे ब्रिटीश साम्राज्यात गुलाम व्यापार बंद करण्यात आला.
  • 1885 : पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
  • 1898 : शिवरामपंत परांजपे यांचे ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.
  • 1929 : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
  • 1997 : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे 27 वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार स्वीकारला.
  • 2000: 17 वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळेने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड बे (खाडी) पार केले. या खाडीत पोहणारी ती सर्वात तरुण जलतरणपटू आहे.
  • 2013 : मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 2013 : मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1932 : वसंत पुरुषोत्तम काळे ऊर्फ ‘व. पु. काळे’ – लेखक व कथाकथनकार यांचा जन्म.
  • 1933 : ‘वसंत गोवारीकर’ – शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1937 : ‘टॉम मोनाघन’ – डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते यांचा जन्म.
  • 1947 : सर ‘एल्ट्न जॉन इंग्लिश’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
  • 1956 : ‘मुकूल शिवपुत्र ग्वाल्हेर’ – घराण्याचे गायक यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1931 : ‘गणेश शंकर विद्यार्थी’ – भारतीय पत्रकार, राजकारणी व स्वतंत्रता आंदोलन कार्यकर्ता यांचे निधन. (जन्म: 26 ऑक्टोबर 1890)
  • 1940 : रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, उपन्यास सम्राट यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1867)
  • 1975 : ‘फैसल’ – सौदी अरेबियाचा राजा यांचे निधन.
  • 1991 : ‘वामनराव सडोलीकर’ – जयपूर अत्रौली घराण्याचे गायक यांचे निधन. (जन्म: 16 सप्टेंबर 1907)
  • 1993 : ‘मधुकर केचे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1932)
  • 2014 : भारतीय चित्रपट अभिनेत्री नंदा यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1939)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

MP Salary Hike: खासदारांचा पगार वाढला; इतर भत्ते आणि पेन्शनमध्येही कमालीची वाढ

   Follow us on        

नवी दिल्ली: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात वाढ केली आहे. खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे.

संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक नोटिफिकेशन काढले. या नोटिफिकेशननुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना झाला आहे. त्याचबरोबर, दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २,५०० रुपये झाला आहे.

खासदारांच्या पगारात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती, ती आता ३१,००० रुपये प्रति महिना मिळणार आहे. ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे, त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपये झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. याआधी,एप्रिल २०१८ मध्ये खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये बदल करण्यात आला होता.

 

Mumbai Local: मुंबई लोकलसेवेच्या जाळ्याचा विस्तार होणार

   Follow us on        
मुंबई :मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३ ब’मध्ये पनवेल-वसई उपनगरी रेल्वे प्रकल्पाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बोरिवली- विरारपर्यंत करणे शक्य होणार आहे. बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता थेट मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ‘एमयूटीपी ३ ब’ प्रकल्पसंचामध्ये नवीन पनवेल-वसई उपनगरी रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. वसईपासून पुढे बोरिवली आणि विरार अशा दोन्ही दिशांना याची जोडणी असणार आहे, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले  आहे.
‘एमयूटीपी’अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पात राज्य आणि केंद्र सरकारकडून ५०:५० प्रमाणे निधी दिला जातो. नवीन पनवेल-वसई लोकल मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी प्राथमिक बैठका पार पडल्या आहेत. महामुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद करणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले.

Loading

Block at CSMT: कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांचा प्रवास ठाणे-दादरपर्यंतच

   Follow us on        

Konkan Railway: मुंबई सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉक च्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या वाढीव ब्लॉक मुळे काही गाड्यांचा प्रवास अलीकडच्या स्थानकांवर संपवण्यात येणार (Short termination) आहे. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे

गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत ठाणे स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Loading

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन

   Follow us on        

ठाणे, दि.23:-

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. पल्लवी सरोदे (वय 37 वर्ष) यांचे आज सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावून गेली.

सौ.पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात 2012 रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च 2024 मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या.

ठाणे जिल्हा प्रशासनासाठी अत्यंत दुर्दैवी घटना..

ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या, सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्ह्यातील इतर महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि ठाणे जिल्हा प्रशासनातील अन्य विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

स्व. सरोदे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पती, सासू- सासरे आणि मुलगा (वय 13 वर्ष) असा त्यांचा परिवार आहे.

 

Loading

२४ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 29:08:40 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 28:28:06 पर्यंत
  • करण-वणिज – 17:31:01 पर्यंत, विष्टि – 29:08:40 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – 16:43:58 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:42
  • सूर्यास्त- 18:49
  • चन्द्र-राशि-धनु – 10:25:52 पर्यंत
  • चंद्रोदय- 27:30:59
  • चंद्रास्त- 13:46:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • World Tuberculosis Day जागतिक क्षयरोग दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1836: कॅनडाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
  • 1855 : आग्रा आणि कलकत्ता शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
  • 1883 : शिकागो आणि न्यूयॉर्क यांच्यात पहिले दूरध्वनी संभाषण झाले.
  • 1896 : ए.एस. पोपोव्हने इतिहासात प्रथमच रेडिओ सिग्नल प्रसारित केला.
  • 1923 : ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
  • 1929 : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
  • 1962 : जागतिक क्षय रोग दिन
  • 1977 : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
  • 1993: धूमकेतू शूमाकर-लेव्ही-9 चा शोध लागला. हा धूमकेतू जुलै महिन्यात गुरू ग्रहावर आदळला होता.
  • 1998 : टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले.
  • 2008: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले आणि प्रथमच निवडणुका झाल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1775 : ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ – तामिळ कवी व संगीतकार यांचा जन्म.
  • 1901 : ‘अनब्लॉक आय्व्रेक्स’ – अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते यांचा जन्म.
  • 1951 : ‘टॉमी हिल्फिगर’ – अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
  • 1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
  • 1979 : ‘इमरान हाशमी’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्मदिन.
  • 1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1603 : ‘एलिझाबेथ पहिली’ – इंग्लंडची व आयर्लंडची राणी
  • 1849 : ‘योहान वुल्फगँग डोबेरायनर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1780)
  • 1882 : ‘एच. डब्ल्यू. लाँगफेलो’ – अमेरिकन नाटककार व कवी यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1807)
  • 1905 : ‘ज्यूल्स व्हर्न’ – फ्रेन्च लेखक यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1828)
  • 2007 : ‘श्रीपाद नारायण पेंडसे’ – मराठी कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search