Author Archives: Kokanai Digital
क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग
साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले
आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु जाणाऱ्या खालील गाड्या पूर्णतः रद्द काण्यात आल्या आहेत.
- गाडी क्र. २०११२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकण कन्या” एक्सप्रेस
- गाडी क्र. ११००४ सावंतवाडी रोड – दादर – “तुतारी” एक्स्प्रेस
- गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर .
- गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेस
- गाडी क्र. २२२३० मडगाव जं. – सीएसएमटी “वंदे भारत” एक्सप्रेस
- गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – सीएसएमटी एक्सप्रेस
- दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११ श्री गंगानगर – कोचुवेली एक्स्प्रेस दिनांक १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्रीगंगानगर या स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “तेजस” एक्स्प्रेस दिनांक १६ जुलै रोजी सकाळी 9 वाजता या सीएसएमटी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस तिरुनेलवेलीवरून आज सकाळी ०७:३५ वाजता प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १८०४७ शालीमार – वास्को दा गामा एक्सप्रेस शालिमार येथून आज सकाळी ( दिनांक १६ जुलै रोजी) ०५:३० वाजता प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस २४० मिनिटे उशिराने धावत आहे.
- दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस ७४५ मिनिटे उशिराने धावत आहे.
- दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११४ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस प्रवास 845 मिनिटे उशिराने धावत आहे
- ६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.
- १९४५: अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी
- १९५१: ब्रिटन देशाने नेपाल देशाला स्वतंत्र घोषित केलं.
- १९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.
- १९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणार्या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण
- १९८१: भारताने अणुबॉम्ब ची चाचणी केली.
- १९९२: भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
- १९९८: गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.
- २००६: संयुक्त राष्ट्र परिषदेने कोरिया राष्ट्रावर बंदी घालण्याच्या ठरावास मंजूरी दिली.
- २००७: बांगलादेशाच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना वाजीद यांना भ्रष्ट्राचार प्रकरणी कैद करण्यात आलं.
- १७२३: सुप्रसिद्ध युरोपियन चित्रकार व रॉयल अकॅडमीच पहिले अध्यक्ष व्यंगचित्रकार सर जोशुवा रेनाल्ड्स(Joshua Reynolds ) यांचा जन्मदिन.
- १७७३: सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)
- १८९६: नॉर्वे देशांतील प्रसिद्ध राजकीय राजकारणी, कामगार नेते सरकारी अधिकरी व लेखक तसचं, संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले सरचिटणीस ट्रिग्वे हलवदान ली यांचा जन्मदिन.
- १९०९: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६)
- १९२३: के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
- १९१३: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
- १९१४: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
- १९१७: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (मृत्यू: १४ मे १९७८)
- १९४३: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
- १९६८: धनराज पिल्ले – हॉकी पटू
- १९७३: शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू
- १९८३: ब्रिटीश वंशीय भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्मदिन.
- १९८४: कतरिना कैफ – चित्रपट कलाकार
- अरुणा असफ अली
- १३४२: चार्ल्स (पहिला) – हंगेरीचा राजा (जन्म: ? ? १२८८)
- १८८२: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन(Abraham Lincoln) यांच्या पत्नी मेरी टॉड लिंकन(Mary Todd Lincoln) यांचे निधन.
- १९८६: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
- १९९३: उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: ? ? १९०९)
- १९९४: नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियन श्विन्गर(Julian Schwinger) यांचे निधन.
- २००५: रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेता प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक नाटककार आणि निनासम धर्म संस्था संस्थेचे संस्थापक के. वी. सुबन्ना यांचे निधन.
- २००९: पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कर्नाटिक संगीतकार व तमिळ चित्रपट पार्श्वगायिका दमल कृष्णस्वामी पट्टममल यांचे निधन.
- २०१३: प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व प्राध्यापक तसचं, सोशल सेंटर फॉर स्टडीज इन सोशलचे संस्थापक-संचालक बरुण डी यांचे निधन.
Follow us on
सावंतवाडी, दि. १५ जुलै :काल नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांत कित्येक प्रवासी अडकून पडले होते. १२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते, अशातच कोकण रेल्वे प्रवासी संघटना त्यांच्या मदतीला आली.
कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावंतवाडी स्थानकावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. लगेचच त्यांनी कोकण रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याला फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मधे पाणी भरायला लावले. लगेच अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. आणि सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले, त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन जेमतेम रक्कम १०,००० रुपये जमा झाले.या रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी ६०० पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स (१ लिटर), बिस्किटे, आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावर जाऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केले, त्यावेळी प्रवाशांना धीर देण्यात आला, संघटनेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, खजिनदार विहंग गोठोसकर,राज पवार आदी उपस्थित होते.
Track Fit Certificate (TFC) issued at 16:30hrs for Km 79/4-6 between Diwankhavati – Vinhere section of Ratnagiri region. @RailMinIndia
— Konkan Railway (@KonkanRailway) July 15, 2024
Follow us on
रायगड दि. १५ जुलै : अलिबागहून पनवेलला जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस उलटली. बसमध्ये 45 ते 50 प्रवासी होते. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, लोकांना बाहेर काढण्यात आले.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. एसटी बसचा एस्केल तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.
आज दिनांक – १५ जुलै २०२४
महत्त्वाच्या घटना:
- १६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना
- १६७४: मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटिची लूट रायगडावर जमा झाली.
- १९१६: जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंग ची स्थापना करण्यात आली.
- १९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.
- १९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
- १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
- १९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ
- १९७९: भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- १९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
- १९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
- २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
- २०११: भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्हीद्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह जीसॅट-१२ अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.
- २०१४: जागतिक युवा कौशल्य दिन
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
- १६०६: रेंब्राँ – डच चित्रकार (मृत्यू: ४ आक्टोबर १६६९)
- १६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
- १७८३: पर्शियन भारतीय व्यापारी व दानवीर जमशेदजी जीजाभाई यांचा जन्मदिन.
- १८४०: स्कॉटिश इतिहासकार, सांखिकीतज्ञ, संकलक आणि भारतीय नागरी सेवेचा सदस्य विलियम विलसन हन्टर (William Wilson Hunter) यांचा जन्मदिन.
- १९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५)
- १९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
- १९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
- १९०९: भारतीय स्वतंत्रता सेनानी, मुत्सदी, वकील व आंध्रप्रदेश राज्याच्या पहिल्या महिला राजनेता दुर्गाबाई देशमुख यांचा जन्मदिन.
- १९१७: नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)
- १९२७: प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१०)
- १९२२: नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ लिओन एम. लेडर मैन (Leon M. Lederman) यांचा जन्मदिन.
- १९३२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
- १९३३: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.
- १९३६: भारतीय हिंदी पत्रकारिता, लेखक आणि राजकीय विश्लेषक प्रभास जोशी यांचा जन्मदिन.
- १९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९
- १९४९: माधव कोंडविलकर – दलित साहित्यिक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १२९१: रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा (जन्म: १ मे १२१८)
- १५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)
- १९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (जन्म: २९ जानेवारी १८६०)
- १९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२)
- १९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८८२)
- १९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ – गायक व नट (जन्म: २६ जून १८८८)
- १९७९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.
- १९९१: जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: ? ? १९२०)
- १९९८: ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)
- १९९९: इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
- १९९९: जगदीश गोडबोले – पर्यावरणवादी लेखक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
- २००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
रत्नागिरी दि. १५ जुलै, 11:30AM:
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर झालेल्या भुरस्सलनामुळे बंद झालेली वाहतूक अजून पर्यन्त पूर्वपदावर आली नसून. अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द, पुनर्नियोजित आणि पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे. या मार्गातील अडथळा संपूर्णपणे दूर करण्यासाठी अजून किमान ३ तास लागतील असे कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईच्या दिशेने राज्य परिवहनच्या मदतीने सावंतवाडी, चिपळूण, रत्नागिरी आदी स्थानकावरून बसेस सोडल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “वंदे भारत” एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१९ लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 22120 मडगाव जं. – मुंबई CSMT “तेजस” एक्स्प्रेस
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 11004 सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस
-
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास खेड स्थानकाकडे संपविण्यात आला असून तो खेड – दिवा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आला.
-
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. – मुंबई CSMT “मांडवी” एक्सप्रेसचा प्रवास चिपळूण स्थानकावर संपविण्यात आला असून तो चिपळूण – मुंबई CSMT दरम्यान अंशतः रद्द करण्यात आला आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२४१३ मडगाव जं. – H. निजामुद्दीन “राजधानी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ८ वाजता न सुटता संध्याकाळी १६:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १११०० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ११:३० वाजता न सुटता संध्याकाळी १८:३० मडगाव स्थानकावरून
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत दुपारी १२:०० वाजता न सुटता संध्याकाळी ०८:०० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १७:५५ वाजता न सुटता रात्री २२:३० वाजता सावंतवाडी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 00847 हटिया – मडगाव “भारत गौरव” FTR विशेष प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 20909 कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२९७७ एर्नाकुलम जं. – अजमेर जं. प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
रत्नागिरी दि. १५ जुलै, 08:00AM: कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर आलेल्या मातीच्या भल्या मोठ्या भरावामुळे कोकण रेल्वेचे ठप्प झालेली वाहतूक अजूनही पूर्वपदावर आली नाही आहे. रेल्वे मार्गावरील अडथळा हटवण्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसून मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या रद्द, पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १२ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३३५ गांधीधाम- नगरकोइल जं. एक्स्प्रेसआता विन्हेरे येथून मागे फिरवण्यात आली असून ती कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन मार्गे वळवली जाईल.
दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२२८४ – एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२७४२ – वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र.१६३४५ – नेत्रावती एक्स्प्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र ०९०५७ – मंगळुरु. विशेष भाडे उन्हाळी विशेष ट्रेन
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२४३२ – तिरुवनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्स्प्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१८ – मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जं.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ११००३ दादर – सावंतवाडी रोड “तुतारी” एक्स्प्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी” एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी मांडवी
एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई CSMT एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ५०१०८ मडगाव – सावंतवाडी रोड
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस