Author Archives: Kokanai Digital

आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर! संपूर्ण माहिती येथे पाहा

   Follow us on        
IPL 2025 Schedule :क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडूंची आणि क्रिकेट चाहत्यांची अखेर अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने या 18 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
कधी होणार पहिला सामना? 
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी 23 मार्चला या स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचं (एकाच दिवशी 2 सामने) आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने असतील, तर दुसरा सामना हा महामुकाबला असणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई असा असणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामात एकूण 65 दिवसांत 74 सामने खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. केकेआर हा 3 जेतेपदे जिंकणारा तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. यंदा एकूण 13 ठिकाणी हे सामने पार पडणार आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलुरु, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंडीगड, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे सामने खेळवण्यात येणार आहेत.
दरम्यान यंदाच्या हंगामात एकूण 12 डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि गुजरात हे 4 संघ दुपारी प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. तर उर्वरित 6 संघ दुपारी प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहेत.
ग्रुप A – कोलकाता, बंगळुरु, राजस्थान, चेन्नई आणि पंजाब
ग्रुप B – मुंबई, दिल्ली, गुजरात, लखनऊ आणि हैदराबाद
कधी होणार अंतिम सामना?
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. क्वालिफायर-1 20 मे रोजी आणि एलिमिनेटर 21 मे रोजी खेळवला जाईल. क्वालिफायर-2 सामना 23 मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे.

 

नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदेभारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा

   Follow us on        
Konkan Railway: नागपूर -सिकंदराबाद  दरम्यान चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक २०१०१ /२०१०२ नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या ही गाडी  वंदे भारत एक्सप्रेसच्या २० डब्यांचा रेकसहित चालविण्यात येत आहे. मात्र त्याप्रमाणात प्रवासी संख्या नसल्याने ही गाडी ८ डब्यांच्या रेकसह चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनांतर्फे  करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे विकास समितीच्या वतीने जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे ई-मेल द्वारे ही मागणी केली आहे. तर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने ‘एक्स’ माध्यमातून ही मागणी नोंदवली आहे.
मुंबई मडगाव दम्यान सुरु करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. देशातील आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेस च्या यादीत या गाडीची गणना होत आहे. या गाडीची आरक्षण स्थिती नेहमीच फुल्ल आणि प्रतीक्षा यादीत असते कारण ही  गाडी ८ रेकसह चालविण्यात येते. या मात्र गाडीची या मार्गावरील लोकप्रियता आणि गरज पाहता ही गाडी जास्त डब्यांसह चालविणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस  १६ किंवा २० रेकसह चालविण्यात यावी अशी  मागणी होत आहे.

कोकण रेल्वेच्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण; आता थेट सेवा मिळणार

RORO Service on Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर्फे देण्यात येत असलेल्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन १९९९ रोजी ही सेवा सुरु करण्यात आली  होती. कोलाड -वेर्णा-  सुरतकल दरम्यान ही सेवा देण्यात येत आहे. या सेवेच्या विपणन आणि संचालनासाठी मेसर्स अंजना ट्रेड आणि एजन्सीला दिलेला आऊटसोर्सिंग करार १४/०२/२०२५ रोजी संपुष्टात आला असल्याने आता ट्रक वाहतूक व्यायसायिकांनी  थेट कोकण रेल्वे च्या कोलाड आणि सुरथकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आव्हान कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सुविधा म्हणजे दूसरे तिसरे कांही नसून रेल्वेच्या ओपन फ्लॕट वॕगन्सवर (ज्याला रेल्वेत BNR वॕगन्स म्हणतात) मालाने भरलेल्या ट्रक्सची रोड ऐवजी मालगाडीवरून एका गावापासून दूस-या गावी केलेली वाहतूक होय. या सेवा मुंबई(कोलाड)-गोवा(वेर्णा) अशी ४१७ किमी तर मुंबई(कोलाड)-सूरतकल(कर्नाटक) 721 किमी या मार्गावर सुरू आहे. वरील अंतर रोडमार्गे अनुक्रमे २४ तास व ४० तास घेते. पण RORO मुळे ते अंतर अनुक्रमे १२ ते २२ तासात कापले जाते.

रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेचे फायदे 

या योजनेमुळे केन्द्र सरकारच्या ‘Operation Green’ ला चांगलाच फायदा होत आहे. डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होते  व सरकारचे इम्पोर्ट बिलही कमी होते  त्यामुळे देशातून डाॕलर्सचा बाहेर जाणारा प्रवाह थांबतो. जलद वाहतूक झाल्याने वेळेचा अपव्यय टळतो. रस्त्यावर होणारे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होते आणि प्रदूषणही कमी  होते. ट्रक चालकांना लांबच्या ड्रायविंगचा त्रास व होणारा टोल, आदिचा खर्चही वाचतो. ट्रकच्या टायर व इंजनचा वापर कमी झाल्याने त्याचा घसारा कमी होतो .अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या सेवेमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात सुद्धा मोठी भर पडली आहे.

या सेवेचे दर खालीलप्रमाणे

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; १८ जणांचा मृत्यू 

   Follow us on        

Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.

ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर झाली. ही घटना, रात्री ९:५५ वाजता घडली. खरंतर, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.”

१५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 26:19:19 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 28:32:25 पर्यंत
  • करण-भाव – 13:05:07 पर्यंत, बालव – 26:19:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 08:05:19 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:06:37
  • सूर्यास्त- 18:38:54
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 21:49:59
  • चंद्रास्त- 09:13:59
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • नवकल्पना दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1659: जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला
  • 1918: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • 1930: रोमानियन फुटबॉल फेडरेशन फिफामध्ये सामील झाले.
  • 1934: ऑस्ट्रियन गृहयुद्ध सोशल डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकनिशर शुत्झबंड यांच्या पराभवाने संपले.
  • 1959: फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष झाले.
  • 1960: अमेरिकन अणुऊर्जा पाणबुडी ट्रायटन पाण्याखाली जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली.
  • 1978: पहिली संगणक बुलेटिन बोर्ड प्रणाली तयार करण्यात आली.
  • 2005: रशियाने मान्यता दिल्यानंतर क्योटो प्रोटोकॉल अंमलात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1745: ‘थोरले माधवराव पेशवे’ – मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा यांचा जन्म (मृत्यू : 18 नोव्हेंबर 1772)
  • 1814: ‘तात्या टोपे’ – स्वातंत्रवीर सेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 1859)
  • 1843: ‘हेन्री एम. लेलंड’ – कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1932)
  • 1866: ‘हर्बर्ट डाऊ’ – डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1930)
  • 1876: ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1966)
  • 1909: ‘रिचर्ड मॅकडोनाल्ड’ – मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 1998)
  • 1920: ‘ऍना मे हेस’ – अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल यांचा जन्म.(मृत्यू : 7 जानेवारी 2018)
  • 1964: ‘बेबेटो’ – ब्राझीलचा फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1978: ‘वासिम जाफर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1944: ‘धुंडिराज गोविंद फाळके’ – भारतीय चित्रपटाचे जनक यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1870)
  • 1956: ‘मेघनाथ साहा’ – खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1893)
  • 1968: ‘नारायणराव सोपानराव बोरावके’ – कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1892)
  • 1970: ‘फ्रान्सिस पेटन राऊस’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म: 5 ऑक्टोबर 1879)
  • 1992: ‘जॅनियो क्वाड्रोस’ – ब्राझील देशाचे 22वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 25 जानेवारी 1917)
  • 1994: ‘पं. निवृत्तीबुवा सरनाईक’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचे निधन. (जन्म: 4 जुलै1912)
  • 1996: ‘आर. डी. आगा’ – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक यांचे निधन.
  • 2000: ‘बेल्लारी शामण्णा केशवान’ – सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ यांचे निधन.
  • 2001: ‘रंजन साळवी’ – मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक यांचे निधन.
  • 2015: ‘राजिंदर पुरी’ – भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचे निधन (जन्म: 20 सप्टेंबर 1934)
  • 2015: ‘आर. आर. पाटील’ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचे निधन (जन्म: 16 ऑगस्ट 1957)
  • 2021: ‘गुस्तावो नोबोआ’ – इक्वेडोर देशाचे 51वे अध्यक्ष यांचे निधन (जन्म: 21 ऑगस्ट 1937)
  • 2023: ‘तुलसीदास बलराम’ – भारतीय फुटबॉलपटू यांचे निधन.(जन्म: 30 नोव्हेंबर 1936)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Raiwlay: रेल्वे प्रशासनाचा पुन्हा ‘दुजाभाव’

   Follow us on        
Konkan Railway: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक जात आहेत. भाविकांना या प्रवित्र स्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनाने देशातील सर्व रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सेवा चालविल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरसुद्धा महाकुंभमेळा विशेष २ गाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या गाड्या फक्त गोवा आणि दक्षिणेकडील भाविकांच्या सोयीसाठी  चालविण्यात आल्या असून कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागातील भाविकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करून गोवा राज्यातील भाविकांना महाकुंभमेळ्यात सहभागी व्हावे याकरिता एक विशेष गाडी चालवली आहे. ही गाडी पूर्णपणे गोवा राज्यातील भाविकांसाठी चालविण्यात आली असल्याने इतर भागातील प्रवाशांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. तर  उडुपी-चिकमंगळुरूचे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या मागणीनुसार उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष दुसऱ्या गाडीची  घोषणा झाली. मात्र या गाडीला कोकण रेल्वे मार्गाच्या महाराष्ट्र विभागात थांबे देताना कंजुषी केली आहे. या गाडीला फक्त रत्नागिरी, चिपळूण आणि रोहा येथे थांबा देण्यात आला आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा देण्यात आलेला नाही. देण्यात आलेले थांबे हे पाणी  भरण्यासाठी आणि तांत्रिक थांबे असल्याने ही गाडी सुद्धा कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागासाठी नसल्याचे सिद्ध झाले आहे.

मागणी करूनही गाडी नाही. 

महाकुंभ मेळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालविण्यात यावी आणि तिला कोकण रेल्वे मार्गावरील सर्व महत्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले होते. मात्र त्याची दखल गेली नसल्याने समितीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीलाही केराची टोपली

गोवा सरकारने महाकुंभमेळ्यासाठी सोडलेल्या विशेष गाडीला कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागात थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे पत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी  केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पाठविले होते. मात्र या मागणीची दखल अजूनपर्यंत रेल्वे मंत्र्यांनी घेतली नसल्याचे दिसते. एकीकडे इतर राज्यातील लोकप्रतिनिधींची विशेष गाड्यांची मागणी सहज मान्य होताना या विशेष गाडयांना महाराष्ट्रात  साधे थांबे देण्याच्या साध्या मागणीकडे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न पडताना दिसत आहे.
या सर्व प्रकारामुळे कोकण रेल्वे नक्की कोणासाठी, कोकण रेल्वेवर कोणाचे वर्चस्व हे प्रश्न पडत आहेत.

१५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 23:55:46 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 25:40:37 पर्यंत
  • करण-वणिज – 10:52:22 पर्यंत, विष्टि – 23:55:46 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 07:32:13 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:37
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 21:03:00
  • चंद्रास्त- 08:43:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • उत्पादकता आठवड्याचा चौथा दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • ३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.
  • १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
  • १९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
  • १९६७: आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.
  • १९७६: मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.
  • २०००: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
  • २०१०: आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी १६४२)
  • १७१०: लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० मे १७७४)
  • १८२४: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू: २६ जुलै १८९१)
  • १९२१: ला प्रसिद्ध इतिहासकार तसेच लेखक राधाकृष्ण चौधरी यांचा जन्म.
  • १९२४: आजच्या दिवशी प्रसिद्ध चित्रकार के.जी. सुब्रह्मण्यम यांचा जन्म.
  • १९३४: स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.
  • १९४७: भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म.
  • १९४९: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)
  • १९४९: प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी यांचा जन्म.
  • १९५२: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा जन्म.
  • १९५६: डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
  • १९५४: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल यांचे जन्म.
  • १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवरिकर यांचा जन्म.
  • १९७९: हामिश मार्शल – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
  • १९८१: भारतीय अभिनेत्री कविता कौशिक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५५३: शास्त्रीय संगीतकार सुरेशबाबू माने यांचे निधन.
  • १८६९: मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
  • १९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)
  • १९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म: ? ? १९०२)
  • १९८०: मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय (जन्म: ? ? ????) १९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
  • १९८८: रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८)
  • २००८: भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: महाकुंभमेळ्यासाठी दुसऱ्या विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        
Special Train on Konkan Railway:प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी भाविकांना जाणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालविणार आहे. ही गाडी उडपी आणि टुंडला जंक्शन दरम्यान चालविण्यात येणार असून या गाडीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी एक अशा एकूण दोन फेऱ्या होणार आहेत. उडुपी-चिकमंगळुरूचे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांनी या गाडीची मागणी केली होती. महाकुंभमेळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही दुसरी गाडी ठरणार आहे. या आधी गोवा सरकारने राज्यातील भक्तासाठी गोव्यावरून महाकुंभ विशेष गाडी चालवली आहे.
या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. ०११९२ / ०११९१  उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष
गाडी क्र. ०११९२ उडुपी – टुंडला जं. महाकुंभ विशेष ही गाडी सोमवार, १७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून  सुटेल आणि टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी १३:००  वाजता  (बुधवार)  पोहोचेल.
गाडी क्र. ०११९१  तुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष गाडी तुंडला जंक्शन येथून  गुरुवार, २०/०२/२०२५ रोजी सकाळी ०९:३० रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १८:१० वाजता (शनिवार) उडुपीला पोहोचेल.
ही गाडी बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वरा, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जंयपुरी, माणिकपूर, मणिकपूर, मणिकपूर प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
या गाडीच्या डब्यांची रचना : एकूण 20 कोच : दोन टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 10 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.

14 फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 21:55:45 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 23:10:40 पर्यंत
  • करण-तैतुल – 09:06:32 पर्यंत, गर – 21:55:45 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 07:19:55 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:36
  • चन्द्र-राशि-सिंह – 29:45:43 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:14:00
  • चंद्रास्त- 08:11:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • माता-पिता पूजन दिवस
  • अंतर्राष्ट्रीय पुस्तक दान दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • 1876: अलेक्झांडर ग्राहम बेल आणि एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोन पेटंटसाठी अर्ज केला.
  • 1859: ओरेगॉनला अमेरिकेचे 33 वे राज्य म्हणून मान्यता देण्यात आली.
  • 1881: भारतातील पहिले होमिओपॅथिक कॉलेज कोलकाता येथे स्थापन झाले.
  • 1924: आयबीएम या संगणक कंपनीची स्थापना झाली.
  • 1945: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील ड्रेस्डेनवर बॉम्बहल्ला करून ते उद्ध्वस्त केले.
  • 1945: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे आणि पेरू संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1946: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • 1963: अणुक्रमांक 103 असलेल्या लॉरेन्सियम या मूलद्रव्याचे प्रथम संश्लेषण करण्यात आले.
  • 2005: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने YouTube लाँच केले, जे अखेर जगातील सर्वात मोठी व्हिडिओ शेअरिंग वेबसाइट आणि व्हायरल व्हिडिओंसाठी एक मुख्य स्रोत बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1483: ‘बाबर’ – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1530)
  • 1745: ‘माधवराव पहिले’ – पेशवे यांचा जन्म.
  • 1914: ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1976)
  • 1916: ‘संजीवनी मराठे’ – कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2000)
  • 1925: ‘मोहन धारिया’ – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 2013)
  • 1933: ‘मधुबाला’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1969 – मुंबई)
  • 1950: ‘कपिल सिबल’ – वकील आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1952: ‘सुषमा स्वराज’ – पद्म विभूषण, दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 2019)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1405: ‘तैमूरलंग’ – मंगोलियाचा राजा यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1336)
  • 1744: ‘जॉन हॅडली’ – गणितज्ञ, परावर्तित ऑक्टनचे संशोधक, यांचे निधन.  (जन्म: 16 एप्रिल 1682)
  • 1974: ‘श्रीकृष्ण नारायण रातंजनकर’ – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1900)
  • 1975: ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 जून 1887)
  • 2023: ‘शोइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1925)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सिंधुदुर्ग: अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ३७१ पदांची लवकरच भरती; तालुकानिहाय पदांची संख्या अशी असेल

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये सेवकांची ५९ तर मदतनिसांची ३१३ पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील या रिक्त पदांची भरती २८ मार्च पूर्वी पुर्ण करायची आहे. जिल्ह्यातील महिला उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तालुक्यांच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज करता येणार आहे. यासाठी पात्र महिला उमेदवारानी मुदतीमध्ये अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या शंभर कलमी कार्यक्रमात राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांचे सुमारे दहा हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही भारतीय प्रक्रिया सुरू होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध असून सात प्रकल्पा अंतर्गत प्रत्येक तालुक्यात रिक्त असलेल्या सेविका व मदतनीस पदांची माहिती. उपलब्ध आहे. पात्र महिला उमेदवारांनी त्या कार्यालयात संपर्क साधावा व परिपूर्ण कागदपत्रासह दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत व या भारतीय प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जि प प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.

 

तालुकानिहाय पदे किती? 

सावंतवाडी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 50,

कणकवली प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका 10 व मदतनीस 58,

मालवण अंगणवाडी सेविका 15 व मदतनीस 45,

कुडाळ अंगणवाडी सेविका 11 व मदतनीस 76,

वैभववाडी अंगणवाडी सेविका 7 व मदतनीस 14,

देवगड अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 44,

दोडामार्ग अंगणवाडी सेविका 3 व प्रकल्प मदतनीस 25

अशी भरती भरती केली जाणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search