Author Archives: Kokanai Digital
दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज खातेवाटपाला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती. त्यानुसार नितीन गडकरी, अमित शाह, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालय मिळालं आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
अमित शाह – गृहमंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना कोणती खाती?
नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल – वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री
महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस गेले 9 वर्ष प्रतीक्षेत आहे. टर्मिनस झाल्यास त्याठिकाणी मुबलक पाणी असणे अत्यंत गरजचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन येथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यासाठी असलेल्या शक्यतांवर विचार करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गेल्या डिसेंबर मध्ये एक योजना सुचवली होती. तसेच ही योजना मंजूर करून घेऊन योजनेस अर्थपुरवठा करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र ही योजना गेल्या 6 महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पावर आधारित मणेरी ते वेंगुर्ले या नळपाणी पुरवठा योजनेवर दांडेली ते मळगाव कोकण रेल्वेसह 3 गावांना पुरक नळपाणी योजना 8 कोटी 50 लाख रुपयांचा आराखडा तयार करून मंजूरीसाठी पाठवला गेला आहे.
रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विकास अंतर्गत निधी अपेक्षित धरण्यात आला आहे. मात्र शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकार्यांनी योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याची तयारी दर्शवली नाही तर आपण सिंधुरत्न योजनेतून आर्थिक तरतूद करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते. दरम्यान डिसेंबर महिन्यापासून या योजनेचा आराखडा मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे मार्गावरील मळगाव रेल्वे स्थानकावर पाणी पुरवठा होईल आणि सर्व गाड्या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर थांबतील यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.