Author Archives: Kokanai Digital
“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी, उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावाचे नामनिर्देशन व शिक्कामोर्तब करण्यासाठी ६७३ पानांचा प्रस्ताव सादर.
Follow us on



मुंबई: कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र, प्रशासकीय स्वराज्य घडविण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक चळवळ राबवून अविरतपणे ज्ञानदान करणारे, प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा व्याख्याते, उच्चविद्याविभूषित, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांची *समाजसेवा, कला व शिक्षण या क्षेत्रात* उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी *“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने, श्री. सचिन यशवंत रेडकर, अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे यांनी राज्यपाल कार्यालयास दिनांक १९/११/२०२४ रोजी निवेदनासोबत शोधप्रबंध स्वरूपातील दस्तावेजांप्रमाणे भाग I, II, III, IV स्वरूपात ६७३ पानांचा प्रस्ताव सादर केला.* या प्रस्तावासोबत महाराष्ट्र व कोकणातील सर्वच घटकातील इच्छुक सामाजिक संस्था/मंडळांनी राज्यपालांना संबोधित केलेले शिफारस सह पाठिंबा पत्र सुद्धा संलग्न केले आहेत अशी माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम 171 (5) खंड (3) च्या उपखंड (ई) अंतर्गत राज्यपालांनी नामनिर्देशित केले जाणारे सदस्य खालीलप्रमाणे अशा बाबींच्या संदर्भात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल, म्हणजे: साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा असे नमूद आहे. कार्यकारी प्रमुख या नात्याने माननीय राज्यपाल आपल्या स्वविवेकाधीन (डिस्क्रेशनरी) अधिकारांचा वापर करून, सदर प्रस्तावातील संलग्न दस्तावेजांचे अवलोकन करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन, कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमधील इच्छुक पक्ष सुद्धा आपल्या माध्यमातून, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, उच्चशिक्षित व्यक्तिच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा व विधानपरिषदेत सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी नवीन मंत्रिमंडळात नक्कीच चर्चेद्वारे शिफारस करून नामनिर्देशन यादीत नाव समाविष्ट करतील असा आम्हाला व समस्त कोकणवासियांना, हितचिंतकांना एक मतदार व सुजाण नागरिक स्वरूपात आत्मविश्वास आहे, उच्चशिक्षित तरूण व्यक्तींनी विधानपरिषदेत येणे व सत्ताधारी पक्षांनी अशा व्यक्तींना संधी देणे ही लोकशाही च्या अनुषंगाने काळाची गरज आहे, तरच समाजात आमुलाग्र बदल घडू शकतील असे मत “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर यांनी व्यक्त केले.
“வேண்டாம் விபரீதம்…..” 2 வாரமாக நிறுத்தப்பட்டுள்ள விரைவு ரயிலால் ஆபத்தான முறையில் தண்டவாளத்தை கடந்து செல்லும் பயணிகள்….!#Chennai | #Avadi | #Train | #RailwayTrack | #Passengers | #PolimerNews pic.twitter.com/g5sXfCglJf
— Polimer News (@polimernews) November 21, 2024
आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 17:05:53 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – 15:36:12 पर्यंत
- करण-वणिज – 17:05:53 पर्यंत, विष्टि – 29:32:15 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-शुक्ल – 12:00:19 पर्यंत
- वार-गुरूवार
- सूर्योदय-06:52
- सूर्यास्त- 17:57
- चन्द्र राशि-कर्क
- चंद्रोदय- 23:18:59
- चंद्रास्त-11:56:59
- ऋतु-हेमंत
- महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन
- सेना दिवस (बांगला देश)
- सेना दिवस (ग्रीस)
- World Television Day
- १८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
- १९०६: चीन ने आजच्याच दिवशी १९०६ साली अफिम च्या व्यापारावर बंदी घातली होती.
- १९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
- १९४२: राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
- १९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
- १९५६: एकमताने आजच्याच दिवशी प्रस्ताव पारित करून शिक्षक दिनाला मान्यता देण्यात आली होती.
- १९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
- १९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
- १९६३: केरळ येथील थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून आजच्याच दिवशी अग्निबाण सोडून भारतीय अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
- १९७१: बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
- १९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
- १९८६: मध्य आफ्रिकी गणराज्याने आजच्याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता.
- २००२: आजच्याच दिवशी जफर उल्ला खान जमाली हे पाकिस्तान चे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते.
- २००५: आजच्याच दिवशी श्रीलंका या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून रत्नसिरी विक्रमनायके यांना नियुक्त करण्यात आले होते.
- २००७: तत्कालीन पेप्सिको कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांना अमेरिका भारत व्यापार परिषद मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
- २००८: आजच्याच दिवशी भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जागतिक महामंदीच्या परिस्थितीत भारत ८ टक्के इतका विकास दर गाठेल असा विश्वास व्यक्त केला होता.
- १६९४: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८)
- १८७२: प्रसिध्द राजस्थानी कवी व स्वंतत्रता सेनानी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
- १८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)
- १९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.
- १९१६: परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक यदुनाथ सिंह यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता.
- १९२६: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)
- १९२७: शं. ना. नवरे – लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)
- १९३३: हिंदी भाषेचे प्रमुख कथाकार ज्ञान रंजन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.
- १९४१: गुजरात राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.
- १९८७: ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
- १५१७: सिकंदर शाह लोधी याचे आजच्या दिवशी निधन झाले.
- १९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.
- १९२१: राजनीती चे ज्ञाते व स्वतंत्रता सेनानी अविनाशलिंगम चेट्टीयार यांचे आजच्या दिवशी निधन झाले.
- १९६३: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (जन्म: १९ जानेवारी १८९२)
- १९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)
- १९९६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)
- १९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
- २०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 17:30:18 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 14:56:05 पर्यंत
- करण-बालव – 17:30:18 पर्यंत, कौलव – 29:04:38 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-साघ्य – 14:54:42 पर्यंत
- वार-मंगळवार
- सूर्योदय- 06:48:27
- सूर्यास्त- 17:59:24
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 21:21:00
- चंद्रास्त- 10:16:59
- ऋतु- हेमंत
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 17:30:18 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 14:56:05 पर्यंत
- करण-बालव – 17:30:18 पर्यंत, कौलव – 29:04:38 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-साघ्य – 14:54:42 पर्यंत
- वार-मंगळवार
- सूर्योदय- 06:48:27
- सूर्यास्त- 17:59:24
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 21:21:00
- चंद्रास्त- 10:16:59
- ऋतु- हेमंत
- आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
- World Toilet Day
- १८२४: तत्कालीन रशिया मध्ये आलेल्या भीषण पुरात जवळपास दहा हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
- १९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
- १९५२: स्पेन ह्या देशाला युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले होते.
- १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना
- १९६९: फूटबॉलपटू पेलेने आपला १,००० वा गोल केला.
- १९६९: ’अपोलो-१२’ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
- १९८२: आजच्याच दिवशी नवव्या आशियाई खेळांची भारतात दिल्ली येथे सुरुवात झाली होती.
- १९८६: पर्यावरण संबधी सुरक्षा कायदा आजच्याच दिवशी लागू करण्यात आला होता.
- १९९४: ऐश्वर्या रॉयला आजच्याच दिवशी जागतिक सुंदरी म्हणून निवडण्यात आले होते.
- १९९५: कर्नम्मा मल्लेश्वरी ने आजच्याच दिवशी भारोत्त लन स्पर्धेत विश्वकिर्तीमान स्थापित केला होता.
- १९९७: आजच्याच दिवशी कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनली होती.
- १९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे ’द पोर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड’ हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
- १९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
- १९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
- २०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान
- २००६: आजच्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया या देशाला परमाणु उर्जा व युरेनियम पुरवण्या संबधी समर्थन मागितले होते.
- २०१३: राष्ट्रीय एकत्मता दिन.
- १८२८: मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी (मृत्यू: १८ जून १८५८)
- १८३१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)
- १८३८: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)
- १८७५: देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: १३ मे १९५०)
- १८८८: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (मृत्यू: ८ मार्च १९४२)
- १८९७: स. आ. जोगळेकर – चतुरस्त्र साहित्यिक (मृत्यू: ? ? ????)
- १९०९: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)
- १९१४: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)
- १९१७: इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्या पंतप्रधान (मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)
- १९२२: सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ – मुंबई)
- १९२३: हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिध्द संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म झाला होता.
- १९२४: हिंदी व भोजपुरी भाषेचे प्रसिध्द साहित्यकार विवेकी राय यांचा जन्म झाला होता.
- १९२८: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१२)
- १९५१: झीनत अमान – अभिनेत्री, मिस एशिया-पॅसिफिक-१९७०
- १९७५: सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४
- १८८३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (जन्म: ४ एप्रिल १८२३)
- १९७१: कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्या डासांवर अभ्यास करुन त्यांनी ’डास तो काय?’ अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती. (जन्म: ? ? ????)
- १९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)
- १९८०: प्रसिध्द उपन्यासकार वाचस्पती पाठक यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
- १९९९: रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (जन्म: ????)
- २००८: समाजसुधारक व सर्वोदय आश्रम या संस्थेचे संस्थापक रमेशभाई यांचे निधन झाले होते.




मुंबई, दि. 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय- मजकूर दिला गेला असल्यास त्याबाबत संबंधित प्रकाशकाचे नाव आणि पत्ता, तसेच संबंधित आशय – मजकूर / जाहिरातीवर नमूद करावा. या निर्देशांसोबतच आयोगाने भारतीय दंड संहितेच्या कलम 171 एच विचारात घेण्याबाबतही निर्देशित केले आहे. या कलमाअंतर्गत उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीचा प्रचार किंवा निवडणुकीसाठी खर्च करण्याच्या हेतूने इतर सर्व गोष्टींसह जाहिराती, प्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली गेली आहे.
निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.
राजकीय जाहिरातीसाठी पूर्व-प्रमाणीकरणाबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या दि.24 ऑगस्ट, 2023 च्या आदेशान्वये देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रचाराच्या शांतता कालावधीतील मुद्रित माध्यमे आणि त्यापूर्वीच्या कालावधीसाठी दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) ह्यावरील राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.
पूर्व प्रमाणीकरणासाठीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने किंवा केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, 1995 मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यास, असे उल्लंघन करणाऱ्याने आपली उल्लंघन करणारी कृती तात्काळ थांबवावी. निवडणूक आयोगामार्फत असे उल्लंघन करणाऱ्याच्या उपकरणांची थेट जप्तीही केली जाऊ शकते. यासंदर्भात दिल्या गेलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरतो व तसे न्यायालयीन प्रकरण दाखल होऊ शकते.
सर्व केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातीचे प्रमाणीकरण असल्याचे खातरजमा करणे आवश्यक आहे. जाहिरातीचे प्रमाणिकरण असल्याशिवाय राजकीय जाहिराती प्रसारीत करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष किंवा छुप्या पद्धतीने राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण नसल्यास या जाहिराती प्रसारित न करण्याची दक्षता घेण्यात यावी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ग्राह्य धरून कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.