Author Archives: Kokanai Digital

कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातला जाणार

सिंधुदुर्ग: कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असून, पुढील महिन्यात होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारविरुद्ध संतप्त भावना आहे.
गुजरात सरकारने माझगाव डॉकसोबत यासाठी करार केला आहे. यानुसार 35 टन वजनाची आणि 24 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित केली जाणार आहे. या पाणबुडीमध्ये 24 प्रवासी दोन रांगेत बसतील. प्रत्येक सीटला काचेची विंडो असेल. त्यामुळे समुद्रातील 300 फूट खाली असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल. दरम्यान, माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी 2018च्या अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार होता.
केंद्राने अलीकडेच मालवणमध्ये ‘नौदल दिन’ साजरा केला. त्यातून सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न दाखवले. मात्र काही दिवसांतच या आनंदावर पाणी फेरले. पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसेच 100 ते 150 कोटींची उलाढाल करण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हिसकावण्यात आला.
कोकणात रिफायनरी सारखे निसर्गाला हानिकारक प्रकल्प लादले जात आहेत असे प्रकल्पाला विरोधकांचे म्हणणे आहे. कोकणाला  विध्वंसकारी प्रकल्प न देता पर्यटनाला चालना देतील असे प्रकल्प देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. मात्र प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात येत असल्याने कोकणवासीय नाराज झाले आहेत.

Loading

देवगड: एसटीवरचा ताबा सुटून अपघात; चालक ठार, तिघेजण जखमी

मुणगे : आचऱ्याहून देवगडला (Devgad) जाणाऱ्या बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात (Bus Accident) चालक बापू लक्ष्मण काळे (वय ५४, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात काल (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी : आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.

मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव व प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (वय २१) व मिताली प्रवीण मुणगेकर (१९, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.

Loading

Accident: ताम्हिणी घाटात खाजगी बसला मोठा अपघात, २ महिलांचा मृत्यू; ५५ प्रवासी जखमी

रायगड: पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत, तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला आहे.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Loading

कोकणकरांच्या सहनशक्तीचा अंत? मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यास अजून एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार

Mumbai Goa Highway: गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम नेमके पूर्ण होणार कधी आणि प्रकल्पपूर्तीच्या डेडलाइन नेमक्या संपणार कधी? या प्रश्नाने सर्व कोकणवासीयांना भंडावून सोडले आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे वारंवार डेडलाइन बदलल्या जात असून, आता नवीन ”डेडलाइन” ३१ डिसेंबर २०२४ अशी देण्यात आली आहे.
पनवेल ते झाराप-पत्रादेवी अशा सुमारे ४५० किमी लांबीच्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरू आहे. या प्रकल्पाच्या रखडपट्टी विरोधात जनहित याचिका करून अॅड. पेचकर यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. एकूण ११ टप्प्यांतील या कामापैकी दहा टप्प्यांची (८४ किमी ते ४५० किमीचा मार्ग) जबाबदारी ही राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. शून्य ते ८४ किमी (पनवेल ते इंदापूर) या टप्प्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर (एनएचएआय) आहे. या महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने न्यायालयाने काही वर्षांपूर्वी अत्यंत गंभीर दखल घेतली होती. त्या वेळी ”एनएचएआय”ने जून २०१९ पर्यंत, तर ”पीडब्ल्यूडी”ने ३१ जानेवारी २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी हमी न्यायालयात दिली होती. ती हमी दोन्ही प्रशासनांना पाळता आली नाही. त्यामुळे पेचकर यांनी २०२१ मध्ये अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर ”एनएचएआय”ने प्रकल्पपूर्तीसाठी ३१ मार्च २०२२ तर पीडब्ल्यूडी”ने ३१ डिसेंबर २०२२ अशा नव्या ”डेडलाइन”ची हमी दिली; मात्र ती हमीही दोन्ही प्रशासनांना पाळता आली नाही. इतकेच नव्हे, तर लेखी हमीचे पालन करता आले नसतानाही मुदत वाढवून मिळण्यासाठी या प्रशासनांनी न्यायालयात रितसर अर्जही केला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने ५ जुलै २०२३ ला या दोन्ही प्रशासनांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही लावला होता. आता २१ डिसेंबर २०२३ ला दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पुन्हा ”डेडलाइन” बदलण्यात आली असून, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची हमी न्यायालयात देण्यात आली आहे. शिवाय आजही आरवली ते कांटे या टप्प्याचे काम अवघे ३५.१४ टक्के आणि कांटे ते वाकेड या टप्प्याचे काम केवळ ३०.९५ टक्क्यांपर्यंत झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यःस्थिती
पनवेल (पळस्पे ) ते इंदापूर (शून्य ते ८४ कि.मी.)- ६८ टक्के
इंदापूर ते वडपाळे (८४ ते १०८ कि.मी.)- ६८ टक्के
वडपाळे ते भोगाव खुर्द (१०८ ते १४८ कि.मी.)- ९९ टक्के
भोगाव खुर्द ते खवटी (१४८ ते १६१ कि.मी.)- ८८ टक्के
कशेडी ते परशुराम घाट (१६१ ते २०५ कि.मी.)- ९९ टक्के
परशुराम घाट ते आरवली (२०५ ते २४१ कि.मी.)- ९३ टक्के

Loading

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाच्या प्रक्रियेस आरंभ…

कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.

वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

Loading

आंगणेवाडी: श्री भराडी देवी वार्षिकोत्सवाची तारीख ठरली…

सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक ०२ मार्च २०२४ या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. 

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार शनिवार ०२ मार्च २०२४ हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.

दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या जत्रेत दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते. रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्‍या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते.  

 

 

 

Loading

वैद्यकीय उपचारासाठी बांबुळीला जावे लागणार नाही; सिंधुदुर्ग वासियांना मिळणार आता जवळचा पर्याय

गोवा वार्ता : गोवा-बांबुळीच्या धर्तीवर पेडणे-तूये येथे उभारण्यात आलेल्या शंभर बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. हे हॉस्पिटल जानेवारीपासून रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. याचा विशेष करून फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होणार आहे, असे मत पेडणे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केला. या हॉस्पिटलमध्ये गोवा मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर उपचार होणार आहेत. त्यामुळे गोवा-बांबुळी “सेकंड पार्ट” असा दर्जा त्या हाॅस्पिटलला देण्यात आला आहे. त्यामुळे बांबुळीला होणारे सर्व उपचार या ठिकाणी होणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पणजी-गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते. सावंतवाडी पत्रकार संघाच्या कार्यक्रमा दरम्यान आरोलकर दीड वर्षांपूर्वी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. याबाबत श्री. आरोलकर यांना विचारले असता ते म्हणाले पेडणे तुये येथे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. गोवा-बांबुळीच्या धर्तीवर त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना हे अत्यंत जवळचे हॉस्पिटल ठरणार आहे. त्यामुळे आता उपचारासाठी त्यांना गोवा-बांबुळीत जावे लागणार नाही. या हॉस्पिटलचा शुभारंभ जानेवारी अखेरपर्यंत होणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या प्रवासीसेवा गाडीची दयनीय अवस्था; प्रवाशांकडून नाराजी

Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी पहिली प्रवासीसेवा गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  मत्स्यगंधा एक्सप्रेसने याच वर्षी आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले आहे. ट्रेन क्रमांक १२६१९/६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ए.बी. वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती.
मात्र जो रेक या गाडीसाठी चालवला जात आहे तो तिच्या गौरवाला साजेशा वाटत नाही आहे. तिच्या रेकची स्थिती बिघडत चालली असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेसला या आधुनिक रेक मध्ये LBH रेक मध्ये अपग्रेड करण्याची नितांत गरज आहे अशा मागणीचा एक ई-मेल रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय म्हापदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वेबोर्ड आणि संबंधित आस्थापनांना केला आहे. असे केल्याने या लांब पल्ल्याच्या गाडीचा प्रवास आरामदायक होईलच आणि सुरक्षित सुद्धा होईल. आशा आहे त्यांच्या या मागणीची दखल घेतली जाऊन लवकरच या गाडीला अत्याधुनिक LHB रेक दिला जाईल.
Copy of Letter 
To:ADRM,ADRMTVC SR,DD/PG SR,GM SR,[email protected],Ashwini Vaishnaw,EDPGMR RailwayBoard,[email protected]
Sun, 24 Dec at 1:57 pm
Dear Sir, 
I hope this email finds you well. I am writing to express my concern and disappointment regarding the current state of the 12619/12620 Matsyagandha Express, a prestigious service along the West Coast and an integral part of the transportation network in Coastal Karnataka. 
Despite its significance, the condition of the train’s rakes has been deteriorating, causing inconvenience to passengers and raising safety concerns. The Matsyagandha Express has been a lifeline for commuters, tourists, and traders in the region for many years. However, the train’s current rolling stock, which has served faithfully but is now showing signs of wear and tear, is in dire need of an upgrade. 
The introduction of modern Linke Hofmann Busch (LHB) rakes is long overdue, and I urge you to expedite the process of allocating brand new LHB rakes for this vital service. The benefits of LHB rakes, including enhanced passenger comfort, improved safety features, and reduced maintenance costs, are well-documented. 
Upgrading the Matsyagandha Express with these modern rakes will not only enhance the overall travel experience but also contribute to the safety and efficiency of this critical service. I kindly request that Southern Railway take immediate action to prioritize the allocation of new LHB rakes for the Matsyagandha Express. This would not only demonstrate your commitment to passenger satisfaction but also boost the reputation of the Southern Railway as a forward-thinking and customer-centric organization. 
I understand that the process of acquiring new rakes can be complex, but I urge you to expedite it as much as possible to ensure that the Matsyagandha Express continues to serve the people of Coastal Karnataka effectively and safely. 
Thank you for your attention to this matter, and I look forward to hearing about the progress in this endeavor. 
Regards,

Akshay Mahapadi

 Kalwa, Thane
 +91 8097167987

Loading

Mumbai Goa Highway | बांदा-पत्रादेवी येथे लवकरच टोल ‘वसुली’…….

Mumbai Goa Highway: गोव्यात जाणे आता महागणार आहे. गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल देणे बंधनकारक होणार आहे. गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना. नितीन गडकरी यांनी पणजी (गोवा) येथे दिले. तीन राज्यांचे प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये हे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. त्यामुळे आता गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

पणजी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार असून हा टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटवर बसविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव गोवा शासनाकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. ना. नितीन गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे आरटीओ विभागाचा टोलनाका सुमारे ३२ एकर जागा संपादन करून याआधीच उभारण्यात आलेला आहे. मात्र कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार, कोणाला या टोल मधून सवलत असेल, टोलचे दर काय असतिल याची अद्याप निश्चिती झालेली नाही.

Loading

नवीन वर्षात गोव्यात पर्यटनासाठी जात असाल तर ही बातमी वाचाच; गोव्यातील मंदिर समित्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Goa News:गोव्यात पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येतात. गोव्यातील समुद्रे किनारे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच येथील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. या मंदिरांना सुद्धा लाखो पर्यटक भेट देताना दिसतात. मात्र पर्यटकांच्या कपड्यांवरून मंदिर समित्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या 1 जानेवारीपासून गोव्यातील मंदिरांमध्ये कडेकोट ड्रेस कोड लागू होणार आहे. मात्र लहान मुलांना यातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर हे फॅशन दाखवण्याचे ठिकाण नाही, असे व्यवस्थापनाचे मत आहे. अनेक पर्यटक येथे आधुनिक कपडे घालून येतात ज्यामुळे प्रतिष्ठा राखली जात नाही. त्यामुळे लहान कपड्यांमध्ये कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
गोव्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानने म्हटले आहे की, मंदिराचे पावित्र्य आणि आदर राखण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व पर्यटकांसाठी कठोर ड्रेस कोड लागू केला जाईल. शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडी, स्लीव्हलेस टॉप, लो-राईज जीन्स आणि शॉर्ट टी-शर्ट परिधान केलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गोव्यातील सुप्रसिद्ध श्री मंगेश देवस्थाननेही नवीन वर्षापासून अतिशय कडक ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाविकांनी योग्य कपडे घालूनच मंदिरात यावे.
मंदिर समिती देणार कपडे
अयोग्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्यांना मंदिर समितीतर्फे छाती, पोट, पाय झाकण्यासाठी लुंगी किंवा कापड दिले जाईल. त्यामुळे आत्तापर्यंत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
श्री रामनाथ देवस्थानचे अध्यक्ष फोंडा म्हणाले की, आम्ही 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू करणार आहोत. यासाठी आम्ही एक सूचना जारी केली असून मंदिर परिसरात फलकही लावला आहे. पर्यटकांना जागरूक करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटक अनेकदा सभ्य कपडे घालून येतात. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी लहान कपडे घालून कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
मंदिरांनी म्हटले आहे की 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या ड्रेस कोडमधून सूट दिली जाईल, परंतु 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आणि प्रौढांना ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. जर कोणी लहान कपडे घालून आले तर त्याला स्मोक आणि लुंगी दिली जाईल. हे परिधान करून तुम्ही मंदिराला भेट देऊ शकाल. यापूर्वीही या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नव्हते. आता आम्ही ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करू.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search