नागपूर: मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ”मनातले गडकरी” या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते.
“मुंबई गोवा मार्ग पहिले महाराष्ट्र सरकारला काम दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली 1380 किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही. नागपुरात बाराशे कोटीचा मल्टी मॉडेल हब स्टेशन होतं ते एकदा मी रद्द केलं. पण आता ते स्टेशन रेल्वे बांधत असून 1200 कोटी लॉजिस्टिक कॅपिटल साठी भारत सरकारने दिले. भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार करत आहे वादाचे मुद्दे सोडवले भारतातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनवण्याचा ते स्वप्न आहे ते पूर्ण करेल,” असेही नितीन गडकरी म्हणाले.
गोवा वार्ता: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 17000 लोक गोव्यात येणार आहेत. यात सुमारे 12000 खेळाडूंचांच समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षक, टेक्निकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य आणि व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.त्यासाठी राज्यातील 100 हून अधिक हॉटेल्स स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे बूक करण्यात आली आहेत. त्यामुळे गोव्यात रूम्सची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एकीकडे नॅशनल स्पर्धा सुरू झालेली असताना गोव्यात पर्यटन हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांचा ओघ देखील गोव्याकडे सुरू आहे. तसेच ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
या कारणाने आता जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकवेळ आपल्या बजेट चा विचार करून तसा प्लॅन करा. हॉटेल रूमच्या जास्त मागणीमुळे त्यांचे भाव वाढून तुमची ट्रिप महागडी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई :आज माजी भारतीय क्रिकेटवीर वीरेंद्र सेहवाग याचा वाढदिवस. या निमित्ताने वीरेंद्र सेहवाग अर्थात वीरू ला सर्व त्याच्या चाहत्यांनी विविध माध्यमातून शुभेच्छाच पाऊस पाडला आहे. मात्र विरुचा क्रिकेट पार्टनर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंट वर विरूला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पोस्ट केले की
“जेव्हा मी त्याला हळू खेळ आणि क्रीजवर राहण्यास सांगितले त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे” आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रहार करून चौकार मारला. माझ्या सल्ल्याचा अगदी विरुद्ध वागायला आवडणाऱ्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध वागतो म्हणून मी त्याला मी म्हणणार आहे……हॅव अ बोरिंग बर्थडे,वीरू”
When I once told him to go slow and stay on the crease, he said, “ok” and then smashed the very next ball for four. Happy birthday to the man who likes to do exactly the opposite of what I say. So, I am going to say, please have a boring birthday, Viru. 🙃 pic.twitter.com/i45fSXvvtV
Mice in Train’s Pantry: मुंबई-गोवा ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पॅन्ट्रीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ उंदीर खात असल्याचा व्हिडीओ एका रेल्वे प्रवाशाने शूट केला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर रेल्वेतील कॅटरिंग सेवांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रविवारी एलटीटी-मडगाव ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. मध्य रेल्वेने देखील या व्हिडीओची पुष्टी केली आहे. मात्र, ट्रेनमधील खानपान सेवा हाताळणाऱ्या आयआरसीटीसीच्या एजन्सीने मध्य रेल्वेवर ठपका ठेवत लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथील रेल्वे यार्डमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याचा आरोप केला आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली. पण, रेल्वे डब्यांमध्ये आणि रेल्वे यार्डमध्ये उंदीर नियंत्रणाचे उपाय नियमितपणे केले जातात, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.
मुंबई : अलीकडेच सुरु झालेल्या मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या वेग १ नोव्हेंबर २०२३ पासून वाढणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवास कालावधीत दहा तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाचा वेळ दोन तासांनी वाचणार आहे.
त्याच बरोबर या गाड्याच्या फेऱ्याही पूर्ववत करण्यात येणार आहेत. दिनांक ०१ नोव्हेंबर पासून ही गाडी शुक्रवार वगळता दररोज चालविण्यात येणार आहे.
पावसाळयात अपघात टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालविल्या जातात. या वेळापत्रकामुळे पावसाळ्यात वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा वेगही कमी करण्यात आला होता. तसेच फेऱ्याही कमी करून ही गाडी आठवड्यातून फक्त ३ दिवस चालविण्यात येत होती.
सध्या मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघते आणि मडगावला दुपारी ३. ३० वाजता पोहोचते. साधरणात मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासाच्या वेळ १० तास लागत आहे.
मात्र, १ नोव्हेंबर २०२३ पासून नॉन मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला दुपारी १ वाजून १० मिनिटात पोहचणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाच्या वेळ साधारणता दोन तास वाचणार आहे.
असे असणार नॉन मान्सून वेळापत्रक-
२२२२९/२२२३०मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्याचे ६ दिवस) शुक्रवार वगळता.
२२२२९ सीएसएमटी मुंबईहून ०५.२५वाजता निघेल आणि मडगावला दुपारी १.१० वाजता पोहोचेल.
२२२३० मडगावहून दुपारी २.४० वाजता निघेल आणि रात्री १०. २५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
मुंबई : बळवली – पत्रादेवी ग्रीनफिल्ड सहापदरी द्रुतगती महामार्गासंबधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरवात झाली असून भूधारकांना तशा नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत.
सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.
हा कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे. महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि एकूण ४ टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल.
या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.
Big update on 389 Km 6 Lane Access Controlled Greenfield Balavli-Patradevi Konkan #Expressway.
Land acquisition notices have been finally issued by the #Maharashtra Government.
रायगड: माणगाव वासियांना कोकण रेल्वे कडून एक चांगली बातमी येत आहे. रेल्वे प्रशासनाने माणगाव स्थानकावर लांब पल्ल्याच्या तीन गाडयांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीस हे थांबे प्रायोगिक तत्वावर असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्यांना कायम करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 16333 वेरावल- तिरुवानंतपुरम सेंट्रल ही गाडी दिनांक 19 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16334 तिरुवानंतपुरम – वेरावल सेंट्रल ही गाडी दिनांक 23 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी 07:00 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 19259 कोचुवेली – भावनगर वीकली एक्सप्रेस ही गाडी दिनांक 19 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी 07:00 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 19260 भावनगर – कोचुवेली वीकली एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16335 गांधीधाम – नागरकोईल एक्सप्रेस ही गाडी दिनांक 20 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16336 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी 07:00 अशी असणार आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजन बाबल्या डांगे (40, रा. हातखंबा, रत्नागिरी ) हा लाद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोच्या हौद्यात बसलेला होता. या अपघातामुळे त्याच्या अंगावर लाद्या पडून त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.या अपघातामुळे वाहतूक खोळंबली असून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होते.
Konkan Railway News: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पावसाळी हंगामात काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात केली गेली होती. या गाड्यांच्या फेऱ्या दिनांक ०१ नोव्हेंबर पासून पूर्ववत करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार खालील गाड्यांच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात येणार आहेत.
या दोन्ही गाड्या दिनांक ०३ नोव्हेंबर पासून आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे. पावसाळी हंगामात मान्सून वेळापत्रकानुसार या गाड्या आठवड्यातून फक्त दोन दिवस चालविण्यात येत होत्या.
या गाड्या दिनांक ०१ नोव्हेंबर पासून सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस चालविण्यात येणार आहेत. पावसाळी हंगामात या गाड्या मान्सून वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त तीनच दिवस धावत होत्या.
रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल ), आर. के.हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागातउल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित भ करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने गेल्या १२-१८ महिन्यांत मिळवलेल्या कामगिरीची माहिती खालीलप्रमाणे दिली
माननीय पंतप्रधानांनी 27 जून 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोवा – मुंबई CSMT वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
26 मार्च 2023 रोजी माननीय रेल्वेमंत्र्यांनी नव्याने पूर्ण झालेल्या प्रतिष्ठित चिनाब पुलाची पाहणी केली.
जुलै 2023 मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत योजनेत मडगाव रेल्वे स्थानकाच्या विकासाचा समावेश करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेने आपल्या मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले आहे.
कोकण रेल्वेने खालील क्षेत्रात आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे.
आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासी महसूल – ₹962.43 कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल – ₹736.47 कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक प्रकल्प महसूल – ₹3274. 70 कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण महसूल – ₹५१५२.२३ कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा – ₹२७८.९३ कोटी
रत्नागिरी येथे कोल्ड स्टोरेज आणि एकात्मिक पॅक हाऊसचे बांधकाम करण्यासाठी महाप्रीटसोबत करार करण्यात आला.
मे 2023 मध्ये, BSNL सोबत एक करार करण्यात आला, ज्या अंतर्गत BSNL ने 31 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जी फायबर ऑप्टिक लाईनच्या नूतनीकरणासाठी राखून ठेवली जात आहे.