मुंबई : 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईत ठेवण्याचा बेत होता. मात्र वानखेडे स्टेडियम च्या कमी प्रेक्षक संख्येचे कारण देवून तो सामना गुजरात राज्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला. क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना याचे मोठे दुःख झाले होते. मात्र आता मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. हे स्टेडियम आसन क्षमते बाबतीत राज्यातील पाहिले तर देशातील दुसर्या क्रमांकाचे स्टेडियम ठरणार आहे.
पाहिल्या मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी.वाय.पाटील ही आंतरराष्ट्रीय स्डेटियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि 1 लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून 68 किमी अंतरावर आणि ठाण्यापासून 26 किमी अंतरावर हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. कल्याणच्या जवळ अमाने गावामध्ये हे स्टेडियम उभारलं जाईल. 50 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारलं जाईल.
ही जमीन विकत घेण्यासाठी एमसीएने एमएसआरडीसीने काढलेली खुली निविदा भरली आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्टेडियम उभारणीला परवानगी मिळावी, याची एमसीए वाट पाहत आहे. मुंबईमध्ये एवढं मोठं स्टेडियम उभारण्याचं दिवंगत एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांचं स्वप्न होतं. मागच्याच महिन्यात अमोल काळे यांचं 47व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
सिंधुदुर्ग: सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रवेशद्वारावर “सांवतवाडी टर्मिनस” असा बोर्ड न लावता “सावंतवाडी रोड” असा बोर्ड लावल्याने तळकोकणातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदविला आहे. प्रशासनाने त्वरीत हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र मा. सुरेश प्रभू यांचा केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार होताच हे काम रखडले ते आजतायगत पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरम्यान कित्येकदा आवाज उठवला, मात्र त्याच्या हाती पोकळ आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून “टर्मिनस” हा शब्द कायमचा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले होते तेच सरकार आता सत्तेत असताना हा प्रकार होत असल्याने तळकोकणातील प्रवाशांच्या मनात सरकारविषयी आणि लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण होत आहे.
टर्मिनस समस्त कोकणकरांसाठी फायद्याचे
सावंतवाडी टर्मिनस होणे हे फक्त सावंतवाडी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठीच नाही तर समस्त कोकण प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण हे टर्मिनस झाले तर वसई/बोरिवली – सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे . त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुरं ढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगल्या प्रमाणात सुखकर झाला असता. Follow us on
मुंबई: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळांवर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या ४ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. आज सकाळी सीएसएमटी वरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर झाला आहे.
सीएसएमटी वरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे ४ तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे २ ते अडीच तास उशिराने धावत आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवांधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून आंबोलीत धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. वाढत्या प्रवाहामुळे आज येथील आलेल्या पर्यटकांना खबरदारी म्हणून खाली उतरविण्यात आले आणि प्रवेश बंद करण्यात आला. वेंगुर्ला बेळगाव मार्गावर माडखोल बाजारात चार फूट पाणी आल्याने येथील रस्ताही काही कालावधी साठी बंद होता.
हवामान खात्याने आज सिंधदुर्गला दक्षतेचा ‘रेड’ अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंधुदुर्गात आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि तसेच बाजारात पाणी साचल्याने येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. सावंतवाडी शहरातही मुसळधार पाऊस झाल्याने बाजारपेठ तसेच रस्ते पाण्याने भरले आहेत. खारबारदारी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात उद्याही पावसाचा जोर कायम
हवामान खात्याने पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.
Indian Railway News:भारतीय रेल्वे अपग्रेड करण्याच्या आणि उत्त्पन्न वाढविण्याच्या नादात प्रशासनाला सामान्य वर्गातील प्रवाशांचा विसर पडला होता. मात्र उशिरा का होईना सरकारला आपली चूक उमजली आहे. रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नॉन एसी कोच निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी आणि जनरल कोचची कमी असलेली संख्या यामुळे सामान्य वर्गातील प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्या लक्षात घेता यातील ५३०० कोच जनरल राहणार आहेत, हे विशेष !गेल्या वर्षभरात सर्वच मार्गावर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रेल्वेकडून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमधील जनरल कोचची संख्या कमी केल्याने गरिब वर्गाच्या रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. एसीचे तिकिट काढून प्रवास करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते जनरलच्या तिकिटा घेऊन गाडीत चढतात. जागा मिळेल तेथे बसून, उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे गाड्यात वाद होतात. त्याच्या तक्रारीही होतात अन् अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला जातो. हा सर्व प्रकार प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही मनस्तापाचा विषय ठरला आहे. तो लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नवीन कोच निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. त्यात ५३०० कोच जनरलचे राहणार आहेत. असा आहे कोच निर्मितीचा आराखडा२०२४ -२५ मध्ये अमृत भारत जनरल कोच सह एकूण २६०५ कोच, १४७० स्लीपर आणि नॉन एसी कोच, ३२३ एसएलआर कोच, ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे २०२५-२६ मध्ये अमृत भारत जनरल कोचसह २७१० कोचची निर्मिती केली जाणार असून, १९१० नॉन एसी स्लीपर, ५१४ एसएलआर कोच, उच्च क्षमतेच्या २०० पार्सल व्हॅन आणि ११० पॅन्ट्री कार निर्माण करण्याची योजना रेल्वेने बनविली आहे.
कोकण रेल्वे सांतरण हॉल्ट ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले असल्याचे उत्तर एका निवेदनाला उत्तर देताना कोकण रेल्वेने सांगितले आहे.
Follow us on
Konkan Railway:कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक 01139/40 नागपूर मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला कोकण रेल्वे मार्गावर दिलेल्या थांब्याव्यतिरिक्त अन्य स्थानकांवर थांबे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. ही गाडी कायमस्वरूपी करावी तसेच वाढीव थांबे मिळावेत अशी मागणी कोकण रेल्वेकडे आली होती. मात्र या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
खान्देश, विदर्भ व कोकणाला जोडणाऱ्या या विशेष गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या गाडीला अतिरिक्त थांबे देवून ती कायमस्वरूपी करावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगांव यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान, केंदीय रेल्वे मंत्री, कोकण रेल्वे, रेल्वे बोर्ड तसेच संबधित लोकप्रतिनिधींना पोस्टल निवेदनातून केली होती. कोकण रेल्वे मार्गावरील वीर, आडवली, विलवडे, वैभववाडी रोड, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी टर्मिनस येथे थांबेही देण्याची मागणी या निवेदनात केली होती. या निवेदनाचे उत्तर कोकण रेल्वेने दिले असून त्यात या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
कोकण रेल्वे ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. आपण विनंती केलेल्या स्थानकात गरजेप्रमाणे थांबे या आधीच देण्यात आले आहेत. तसेच गणेश चतुर्थी, होळी आणि इतर हंगामात चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडयांना या स्थानकांवर थांबे देत येत असल्याचेही या उत्तरात कोकण रेल्वेने नमूद केले आहे.
सावंतवाडीचा थांबा अजूनही पूर्ववत नाही.
या गाडीला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र या गाडीला प्रवासीसंख्या Footfall जास्त असुनही या गाडीचा थांबा काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही गाडी महत्वाची मानली जात आहे. कारण विदर्भातील आणि खान्देशातील पर्यटक या गाडीने कोकणात उतरत आहे. सावंतवाडी तालुका येथील लाकडी खेळण्यांसाठी तसेच रेडी, आंबोली या सारख्या पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध मानला जात असताना या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा असणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग: जेएसडब्लू कंपनीने तळकोकणातील आजगाव ग्रामपंचायतीला पत्र देऊन खनिज उत्खननाच्या सोमवारपासून गावातील ८४० हेक्टर भागात सोमवार पासून ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आजगाव ग्रामपंचायत कडे गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी सहा वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले होते. त्यांनी आपण सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्रामपंचायत ला कळवीत आहोत असे सांगितले. सदरील पत्रात ८४० हेक्टर एवढी आजगाव ब्लॉक मधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनी ला मायनींग साठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबत चे हे पत्र आहे. त्या पत्रात असे नमूद आहे की, मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत. मात्र या सर्व्हे साठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.
याआधीही येथे मायनींग विषयक चाचणी करण्याचे प्रयत्न झाले होते मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांकडून त्याला विरोध केला गेला होता. मायनिंग मुळे या क्षेत्रातील जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर संबंधित खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला त्यावेळी होता. आता पुन्हा मायनिंगसाठी प्रयत्न चालू झाल्याने येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणुन ओळखला जाणारा गणेशचतुर्थी सण अवघ्या दोन महिन्यांवर आला. यंदा गणेश भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः एसटीचे आरक्षण एक महिना अगोदर सुरू होते, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
अॅप किंवा वेबसाईटवरुनही करता येईल बुकींग कोकणातील अनेक चाकरमानी हे गावी जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांचे एकत्रित आरक्षण करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाईल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठी नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.
मुंबई:कोकणरेल्वेच्या सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण करावे या कोकणकरांच्या मागणीला महाराष्ट्र शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या स्थानकाचे लवकरच नामकरण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
या स्थानकाच्या नामांतराची मागणी झाली तेव्हा एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावरून मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण केल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.
मुंबई:राज्यातल्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे.
या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली होती त्यामध्ये आता काहीसा बदल केला गेला आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत.
नव्या नियमा नुसार कोणात्या महिला पात्र?
आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. जा महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्यांदा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात आता बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पर्यंता आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवी तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे. जमिनीबाबतची अट आता वगळण्यात आली आहे. या योजनेत पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
सदर योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होता. आता हा कालावधी 2 महिने केला असून दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.