चिपळूण – माझ्या जमिनीत अतिक्रमण झाले आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार असे म्हणत एका प्रकल्पग्रस्त शेतकर्यांने मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे चक्क लोळण घातली आणि महामार्ग अर्धा तास अडविला. भर उन्हात काल सकाळी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे तो रस्त्यावर झोपून होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.
चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नैनीश दळी नामक त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला.
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर ब्राउन हेरॉईन ची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली, त्याच्याकडून 12.8 ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमदलार शहरातील विविध भागांमध्ये पेट्रो लिंग करत होते.तेव्हा रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नं.1 वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे एक तरुण जाताना त्यांना दिसून आला.त्याच्या पाठीवर एक सॅक होती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली.तेव्हा त्याच्या जिन्स पॅन्टच्या उजव्या खिशात 5 पारदर्शक प्लास्टिक पिशव्या ज्यात 450 टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या मिळून आल्या.त्याच्याकडील सर्व मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात एन.डी.पी .एस अॅक्ट कलम 8 (क),22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपिनिरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हेड काँस्टेबल प्रसाद घोसाळे,गणेश सावंत,प्रविण बर्गे,अमोल भोसले,पोलिस नाईक आशिष भालेकर,विनय मनवाल आणि रत्नकांत शिंदे यांनी केली असून अधिक तपास सुरु आहे.
Road Accident News – राज्यातील खेड्यापाड्यात वाहतुकीची सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सोय, खिशाला न परवडणारे खाजगी वाहतुकीचे पर्याय यामुळे तेथे सर्रास नियम मोडून क्षमते पेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवण्यात येतात, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. अशाच एका प्रकारामुळे रत्नागिरी येथील खेड येथे एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या काल मंगळवारी 9 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खेड शिवतर मार्गावर मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला जात असताना एक रिक्षा नातवडी धरणाच्या कॅनलमध्ये कोसळली.यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.अपघात मुरडे शिंदेवाडी येथून जाणाऱ्या कॅनॉलमध्ये घडला.माहितीनुसार खेडमधील एकाच कुटुंबातील काही लोक ऑटो रिक्षा मधून मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात होते. नातूवाडी धरणाच्या कॅनॉलच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या चढावर रिक्षा चढली नाही व रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा उलटी खाली येऊन थेट आठ ते दहा फूट खोल असणाऱ्या कॅनॉलमध्ये पडली. या रिक्षात 7 ते 8 प्रवासी बसले होते.
Konkan Railway News | उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रशांसाठी एक रेल्वेकडून महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचा फायदा होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित समोर दिलेल्या तारखांना चालविण्यात येतील.
Janaakrosh Committee’s bike Rally: दिनांक ७ मे २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता कामोठे टोल नाका ते खारपाडा टोल नाका दुचाकी (बाईक) रॅलीचे आयोजन मुंबई गोवा जन आक्रोश समिती तर्फे करण्यात आले होते . मुंबई गोवा महामार्गाचे काम १२ वर्षे रखडलेले असून मंत्रीमहोद यांची आश्वासने , न्यायालयाचे आदेश याना प्रशासनाने हरताळ फासला आहे . या दिरंगाई आणि ढिसाळपणामुळे अपघातात ३००० पेक्षा जास्त कोकणकर मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण कायमचे जायबंदी झालेले आहेत . या निषेधार्थ काढलेल्या या दुचाकी रॅलीला कोकणकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिस्तबद्धपणे यशस्वीरित्या पार पडला.
रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून दुपारी ४.०० वाजता झाली . वाहतूक उपायुक्त यांनी रॅलीच्या सूचना दिल्यानंतर समितीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नागरिक श्री. देवरुखकर काका यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून Flag off करण्यात आले . वाहतूक पोलिसांच्या आणि समितीच्या पायलट व्हॅन रॅलीचा मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने जाऊन खारपाडा टोलनाका येथे रॅली ची सांगता झाली .
खारपाडा टोल येथे हॉटेल वैष्णवीच्या पटांगणात रॅलीची समारोप सभा झाली .
या सभेला संबोधित करताना समितीचे पनवेल विभागाचे प्रमुख डॉ. अमित चव्हाण यांनी रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा कोकणावरील अन्याय असून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समितीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कुठल्याही अपघातग्रस्ता साठी पहिला 1 तास अत्यंत महत्वाचा असतो,वैद्यकीय भाषेत त्याला “गोल्डन अवर”(golden hour) असे म्हणतात ,या वेळेत जर पेशंट वर योग्य उपचार झाले तर ,मेंदूतील रक्तस्त्राव वैगरे कारण मुळे होणारे मृत्यू चे प्रमाण कमी होते. दुर्दैवाने अगदी पोलादपूर -महाड पासून पनवेल पर्यंत कुठंही अद्यावत ट्रॅमा सेंटर(trauma centre) नाही , त्यात च रस्त्या ची अवस्था बिकट,त्यामुळे पेशंट वेळेवर डॉक्टर पर्यंत पोहचत नाही व मृत्यू चे प्रमाण वाढते.१२ वर्षात या महामार्गावर सुमारे ३३०० लोक मृत्युमुखी पडले आणि १०,००० पेक्षा जास्त लोकांना कायम चे अपंगत्व आले. महामार्ग वर आद्यवत ट्रामा सेंटर असावे ही एक जनाअक्रोश समिती ची प्रमुख मागणी आहे,तसेच रस्त्यावरील खड्ड्यामूळे अगदी तरुण लोकांना स्लिप डिस्क सारखे मणक्यांचे आजर बाळवत आहेत त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे . कोकणावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवण्यासाठीच मी या समितीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम करत आहे आणि यापुढेही करत राहीन असे सांगितले . खारपाडा येथील सक्रिय कार्यकर्ते संतोष ठाकूर हे देखील या रॅलीमध्ये आपल्या दुचाकीस्वारांच्या समूहाला घेऊन सामील झाले होते . याबाबतीत आपले विचार मांडताना श्री. संतोष ठाकूर यांनी यापुढे मुंबई गोवा महामार्गाच्या निमित्ताने झालेला अन्याय सहन केला जाणार नाही आणि समितीच्या पुढच्या प्रत्येक आंदोलनात माझे किमान ५०० कार्यकर्ते घेऊन सहभागी होईन असे जाहीर केले . कोकण विकास युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजय यादव यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश समिती या महामार्गासाठी जे काही आंदोलन करत आहे ते कौतुकास्पद आहे आणि सर्व कोकणकरांनी स्वतःहून यात लाखोंच्या संख्येने सामील व्हायला हवे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच सर्व कोकणकरांनी यापुढे सामील व्हावे असं आवाहन केलं . महामार्गाचे काम पूर्ण न होण्यास कंत्राटदाराबरोबरच अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांना जाब न विचारणारे त्यांच्यावर अंकुश न ठेवणारे राजकीय नेतृत्व जबाबदार आहेत . राजकीय नेत्यांना आपण निवडून देतो आणि म्हणूनच त्यांच्यावर या कामासाठी दबाव ठेवण्याची जबाबदारी अप्लाय सर्वांची आहे . अलिबाग न्यायालयात वकिली करणारे अॅडव्होकेट अजय उपाध्ये हे देखील आपले विचार मांडताना म्हणाले की , मी 2016 पासून महामार्ग संदर्भात अलिबाग न्यायालयात मी लढा देत आहे ज्यावेळेस शासनाच्या वतीने एक अहवाल येतोय की मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः प्रवासासाठी योग्य आहे व कोणते खड्डे नाहीत परंतु प्रत्यक्षात आपण कोकण करांनी पाहिले तर महामार्गाला रस्ताच नाही अशी अवस्था आहे यासाठी समस्त कोकणकर अराजकीय अजेंडा घेऊन जे काही करत आहेत त्याला आमचा पूर्णता पाठिंबा राहून आम्ही समस्त कोकणकरांसोबत तीव्र आंदोलनात सामील होऊ.
समितीचे सचिव श्री . रुपेश दर्गे यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश आंदोलन ही सर्वसामान्य कोकणकरांची एक समिती म्हणून महामार्गासाठी काम करीत आहे.कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता किंवा कोणत्याही राजकीय अजेंडा न घेता महामार्गासाठी लढत आहेत. जर शासन, प्रशासन व ठेकेदार यांनी दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत एक मार्गी काम पूर्ण न केल्यास शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांचे आशीर्वाद घेऊन आम्ही समस्त कोकणकर आणि समस्त कोकणातील सर्व संघटना एकत्रित निर्णय घेऊन एकाच दिवशी एकाच वेळेस संपूर्ण कोकणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे जाहीर केले.
खारपाडा गावकज सरपंच श्री . दयानंद भगत यांनी महामार्गाच्या लगतच्या सर्व गावात ग्रामपंचायतीत जनजागृती केल्यास त्यासाठी समितीला सर्व सहकार्य करू आणि समितीच्या यापुढील उपक्रमात आम्ही सर्व सहभागी होऊन पाठिंबा देऊ असे जाहीर केले.
सभेच्या समारोपाच्या वेळी समितीचे कार्याध्यक्ष Adv. सुभाष सुर्वे यांनी मागील १३ वर्षे महामार्गाचे काम रखडले याला जबाबदार कोण ? कोकणाचा विकास त्यामुळे रखडला त्या जबाबदार कोण ? अपघातात ३३०० लोकांचा मृत्यू आणि ११००० लोक अपंग झाले त्याला जबाबदार कोण ? महाराष्ट्रात इतर ठिकाणी अपघात झाला तर त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि महामार्गावरील अपघातात मृत्यू पडले त्यांना भरपाई दिली जात नाही याला जबाबदार कोण ? हजारो झाडांची कत्तल झाली आणि नवीन झाडे लावली गेली नाहीत याला जबाबदार कोण ? कंत्राटदार काम अर्धवट टाकून पळून गेले त्यांना नोकर्यादेश द्यायला जबाबदार कोण ? रस्ता आता होईल तेव्हा होईल पण या सगळ्यांना जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचं खटला दाखल करण्यात यावा व त्यासाठी चौकशी समिती नेमून जबाबदार कोण हे निश्चित करण्यात यावे . समितीची पुढची वाटचाल करताना पळस्पे ते झाराप या महामार्गावरील सर्व ग्रामपंचायतीमधून जन-जागृती करून या सामाजिक जनचळवळीला सर्वसमावेशक व्यापक स्वरूप येईल आणि त्यातून मग पुढचा लढा आखण्यात येईल असे जाहीर केले.
मुंबई गोवा जन आक्रोश समितीतर्फे या बाईक रॅलीचे चांगल्या पद्धतीने नियोजन अन् आयोजन करण्यात आले. या रॅलीला सहकार्य करणाऱ्या वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांचे जाहीर आभार मानण्यात आले . या रॅलीच्या आयोजनासाठी समितीचे कार्याध्यक्ष ॲड. सुभाष सुर्वे सचिव रुपेश दर्गे, ॲड. संदीप विचारे, डॉ. अमित चव्हाण, श्री. संजय सावंत , सी. ए. संदेश चव्हाण , सौ. सोनल सुर्वे व इतर मान्यवरांनी रांत्रदिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम समितीच्या सदस्यांना सोबत घेऊन यशस्वी केला.
Konkan Railway News: दिनांक ११ मे २०२३ रोजी कोंकण रेल्वे मार्गावर इंदोर ते मंगळुरु दरम्यान एक एकमार्गी स्पेशल One Way गाडी चालविण्यात येणार आहे. ही गाडी वेस्टर्न रेल्वेच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे.
Train no. 09302 Indore – Mangaluru Jn. One Way Special:
ही गाडी दिनांक ११ मे रोजी (गुरुवार) सकाळी ११:१५ वाजता इंदोर या स्थानकावरून सुटेल ती मंगुळुरु स्थानकावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १६:१५ वाजता पोहचेल.
Mumba Goa Highway Accident – मुंबई – गोवा महामार्गावर डंपर आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. महाडजवळ एसटी बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये एसटी बस मधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
हा अपघात आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड नातेखिंडजवळ हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई महाबळेश्वर बस आणि डंपर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. एसटी बस मुंबई दिशेकडून महाडकडे येत असताना आणि डंपर महाड दिशेकडून जात असताना दोघांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातामध्ये एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून डंपर चालक देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत.या अपघतामध्ये ST बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे. घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.
Barsu Refinery Protest – समर्थक आणि विरोधक नेत्यांच्या सभा, मोर्चा या मुळे बारसूतील वातावरण पुन्हा तापणार असा अंदाज बांधला जात होता मात्र आज बारसू सड्यावर आंदोलक फारसे फिरकलेले नसल्याने बारसू परिसराचा सडा शांत राहिलेला होता. दरम्यान गेल्या सुमारे १२ते१३ दिवसांपासून सुरु असलेले माती परीक्षणाचे काम आजही सुरु होते. या परिसरात मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मात्र दुसरीकडे गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ आज सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरु असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांनी केला. त्या विरोधात गोवळ येथील श्री नवलादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे.त्या विरोधात आता गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. सुमारे २००-३०० स्थानिक प्रकल्प विरोधक उपोषणस्थळी उपस्थित आहे.
Old Memories MSRTC – सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या ‘भक्ती दर्शन’ या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते. आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला ‘भक्ती दर्शन’ असे ब्रँडिंग करून ही बस पर्यटकांना मार्लेश्वर, कृष्णेश्वर मंदिर, संभाजी स्मारक समाधी, परशुराम मंदिर, चिपळूण, डेरवण येथील प्रति शिवसृष्टी आणि थिबा पॉईंट येथील अरबी समुद्रातील नयनरम्य सुर्यास्ताचे दर्शन घडवत असे.
सकाळी ८ ते संध्याकाळी साडे ६ पर्यंत, एवढी सर्व प्रेक्षणीय स्थळे अगदी माफक दरात दाखवल्यामुळे, वेळ न मिळणाऱ्या मुंबईकरांना आपल्या गावी आल्यावर या बसचा प्रवास म्हणजे फार मोठी पर्वणीच होती. संगीताचा आस्वाद घेत प्रवास घेत करणे, चालक/वाहकांचे सौजन्यपूर्ण वर्तन तसेच प्रवासात मिळणारी वृत्तपत्रे यावर प्रवासी बेहद खुश होता. कालांतराने महाराष्ट्रात अश्या अनेक दर्शन फेऱ्यांचे एसटीने नियोजन केले आणि या फेऱ्यांना प्रवाश्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.
आज पर्यटनाच्या व्याख्या बदलल्या असून, अनेक नवनवीन ठिकाणांची भर यात पडत आहे, तसेच पर्यटकांची संख्या देखील प्रचंड वाढली असून, एसटीने पुन्हा एकदा पर्यटनाची संधी पाहता याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
बाहेर फिरायला आलेला व्यक्ती हा प्रवासी भूमिकेत नसून, तो पर्यटक भूमिकेत असल्याने यासाठी नेमकं आपल्याला काय काय करावे लागेल, नियोजन कसे करावे लागेल, यासाठी एसटीने एक स्वतंत्र विभाग तयार केला, तर एसटीच्या आर्थिक स्रोतात अधिकची भर पडून, प्रवाश्यांना देखील किफायतशीर पर्यटनाचा आनंद घेता येईल, यात तिळमात्र शंका वाटत नाही.
लेखक – रोहित धेंडे.
भक्ती दर्शन : एक अनोखी संकल्पना 🌸 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या 'भक्ती दर्शन' या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते.
आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला 'भक्ती दर्शन' असे ब्रँडिंग करून (१/६) pic.twitter.com/B9eTedWb5b
Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी मागील काही दिवसांपासून निर्बंध आणण्यात आले होते. चौपदरीकरणा अंतर्गत घाटात तयार करण्यात आलेल्या मार्गिकेच्या भरावाचे बहुतांश काम पूर्ण झाल्यामुळे हा घाट नियमित वाहतुकीसाठी 11 मे पासून खुला करण्यात येणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परशुराम घाटातील अवघड वळणावरील काम वाहतूक सुरू असताना पूर्ण करणे कठीण जाऊ लागल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी 25 एप्रिल ते 10 मे 2023 या कालावधीसाठी अंशतः बंद करण्यात आला होता. या कालावधीत दुपारी बारा ते पाच यावेळी हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. वाहतूक बंदी असलेल्या कालावधीत महामार्गावरील वाहतूक खेड तालुक्यामधील चिरणी -लोटे मार्गे वळवण्यात आली होती.