चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे
काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.
या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्याने दुखापत झाली आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.
Holi Special Train | 02/03/2023 : कोकण रेल्वेमार्गावर होळीसाठी एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no.01592 Madgaon Jn.- Lokmanya Tilak (T ) One Way Special
ही गाडी मंगळवारी दिनांक 07/03/2023 रोजी मडगाव या स्थानकावरून सकाळी 08:45वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनला त्याच दिवशी रात्री 21:50 वाजता पोहोचेल.
Holi Special Trains News |01 Mar 2023 | शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणार्या भाविकांना एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वे च्या सहाय्याने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक ०२/०३/२०२३ व ०९/०३/२०२३ (गुरुवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01188 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०३/०३/२०२३ व १०/०३/२०२३ (शुक्रवार) या दिवशी ही गाडी करमाळी टर्मिनस या स्थानकावरुन संध्याकाळी १६:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता मंगळूरु या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी मंगळूरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल..
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी रोहा या स्थानकावरुन सकाळी ११:०५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:२० वाजता चिपळूण या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01598 Chiplun – Roha MEMU Special
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी चिपळूण या स्थानकावरुन दुपारी १३:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता रोहा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, विन्हेरे, आणि खेड
डब्यांची संरचना
12 मेमू कोच
प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
मुंबई | वरील फोटो गुजराथ मधील नसून मुंबई मधील एका रेल्वे स्थानकाच्या लिफ्ट मधील आहे . एकीकडे मुंबईमध्ये मराठी टक्का कमी होत असताना आता इथे मराठी भाषा पण हद्दपार करण्याचे असे धक्कायदायक प्रकार घडताना दिसत आहेत. कांदिवली रेल्वे स्थानकाच्या एका लिफ्ट मध्ये सूचना पाटीवर मराठी भाषेच्या जागी चक्क गुजराथी भाषा वापरली गेली आहे.
ही सूचना अनुक्रमे गुजराथी, हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये छापून चिटकवली गेली आहे. या सूचनेमध्ये मराठी भाषेला अजिबात स्थान देण्यात आले नाही. कांदिवली स्थानकाच्या बोरिवली दिशेने असणाऱ्या लिफ्ट मध्ये ही सूचना लावण्यात आली आहे.
मुंबईकरांच्या बोलण्यातून तडीपार होणारी मराठी भाषा आता सरकारी सूचना, माहितीपत्रके आणि इतर माध्यमातून तडीपार होताना दिसणे हे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला धक्कादायक असे आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी कोकणचा हापूस व इतर राज्यातील मिळून ११०४३ पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ४०० ते १ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये या वर्षी आंब्याचे पीक मुबलक आले आहे. प्रत्येक वर्षी मार्चपासून नियमित आवक सुरू होत असते. परंतु, या वर्षी फेब्रुवारीमध्येच आवक सुरू झाली आहे. सोमवारी देवगड व इतर ठिकाणांवरून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ४ ते ८ डझन पेटीची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल अशी चिन्हे आहेत. आवक वाढू लागली आहे. मार्चमध्ये आवक अजून वाढून दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई |बेलापूरहून खारकोपर स्टेशनला जाणाऱ्या लोकल ट्रेनचे 3 डब्बे खारकोपर स्टेशनमध्ये प्रवेश करताना रुळावरून घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही इजा नाही. रिलीफ ट्रेन घटनास्थळी पोहचल्या असून गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
फक्त बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील वाहतूक बंद आहे. हार्बर , मेन लाईन आणि इतर मार्गांवरील वाहतूक सुरुळीत चालू आहे
मुंबई, दि. २७: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावे
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
तसेच हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेसाठी प्रयत्न
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मंत्रिमंडळ पातळीवर विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असं उत्तर केंद्राने दिलेलं आहे. त्यामुळे मराठीला कधीपर्यंत अभिजात दर्जा मिळेल हे चित्र अजूनही अस्पष्टच आहे.
रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल.
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात. बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
रत्नागिरी : झरेवाडी नजीक टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. अज्ञात वाहनाने हुल दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी येथून बारामती कडे जाणाऱ्या मच्छी वाहतुकीचा बोलेरो टेम्पो मोठ्या वाहनाने हूल दिल्याने अवघड वळणावर सकाळी साडे सहाच्या सुमारास कठड्यावर आदळला. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पुणे येथून रत्नागिरी येथे मच्छी घेऊन आलेला बोलेरो टेम्पो कंपनीमध्ये मच्छी उतरवून परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. यावेळी स्थानिकांनी मदत करत बोलेरो गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.