बोरिवली – सावंतवाडी गाडीचे थांबे निश्चित करताना ‘या’ बाबींचा विचार करण्यात यावा – कोकण विकास समिती

   Follow us on        

केंद्रीयमंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी बोरिवलीतून कोकणात जाणारी रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी ही गाडी दिनांक २४ ऑगस्ट पासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . यासाठी कोकण विकास समितीने ईमेलद्वारे पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <!-- new display --> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="8284357421" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>

पाश्चिम उपनगरीय रेल्वे क्षेत्रातील प्रवाशांसाठी या गाडीने कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र या गाडीचे थांबे निश्चित करताना या क्षेत्रातील सर्व कोकणवासियांचा विचार करणे गरजेचे आहे. 10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसच्या च्या धर्तीवर या गाडीला थांबे मिळाल्यास या गाडीचा मोठा फायदा प्रवाशांना होऊ शकतो. गरज असलेल्या स्थानकांवर नंतर थांबे मिळविण्यास खूप अडचणीचे जाते, त्यामुळे या स्थानकांवर सुरवातीलाच थांबे देण्याचा विचार करावा आशयाचे निवेदन कोकण रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना ईमेलद्वारे दिले आहे.

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-format="fluid" data-ad-layout-key="-64+c2-1f-2z+tg" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="4639791735"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>

10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसचे थांबे 

  • दिवा
  • कळंबोली
  • पनवेल जंक्शन
  • आपटा
  • जिते
  • रोहे
  • माणगांव
  • गोरेगांव रोड
  • वीर
  • सापेवामणे
  • करंजाड़ी
  • विन्हेरे
  • खेड़
  • चिपळूण
  • सावर्डा
  • आरवली रोड
  • संगमेश्वर रोड
  • रत्नागिरी
  • निवसर
  • आडवली
  • वेरावली
  • विलवडे
  • सौंदल
  • राजापुर रोड
  • खारेपाटण रोड
  • वैभववाडी रोड
  • अचिर्णे
  • नांदगाव रोड
  • कणकवली
  • सिंधुदुर्ग
  • कुडाळ
  • झाराप
  • सावंतवाडी रोड
Facebook Comments Box

आचरा समुद्रात नौका बुडाली; तिघांचा मृत्यू

   Follow us on        

मालवण: मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे काल रविवारी मध्यरात्री नौका समुद्रात पलटी होऊन तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक मच्छिमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने सुदैवाने बचावला आहे. ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत (53) रा. मोर्वे देवगड हे पोहत किनार्‍यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे व्यांगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले.

Facebook Comments Box

कोकणकरांनो ही संधी गमावू नका, कोकणरेल्वेत विविध पदांसाठी मोठी भरती, भूमिपुत्रांना प्राधान्य मिळणार 




KRCL Recruitment: कोकण रेल्वेत नोकरी करण्याची ईच्छा असणाऱ्या कोकणकरांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि  एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य 
 या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि  कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
.
अधिक माहितीकरिता खालील जाहिरात वाचावी



Facebook Comments Box

मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या डब्यांची स्थिती धोकादायक; छताचे पत्रे दरवाज्यात कोसळले, विडिओ व्हायरल

   Follow us on        
Konkan Railway:  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसचे डबे कालबाह्य झाल्याने प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या गाडीचा जुना रेक बदलून ही गाडी नवीन एलएचबी LHB रेकसह चालविण्यात यावी अशी मागणी रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी इमेलद्वारे तसेच एक्स X च्या माध्यमातून रेल्वे प्रशासन तसेच संबधीत आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना  केली आहे.
दिनांक ५ ऑगस्ट रोजी या गाडीतून प्रवास करणाऱ्या चिन्मय कोले नावाच्या प्रवाशाला प्रवासादरम्यान आलेल्या भयानक अनुभवाकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ३ टायर एसी मधून प्रवास करणारे चिन्मय कोले चिपळूण स्थानकावर गाडी थांबल्याने बाहेर गेले होते, मात्र गाडीत परत चढत असताना दाराज्याजवळील छताचे सर्वच पत्रे खाली कोसळले, सुदैवाने ते थोडक्याच बचावले. मात्र ही घटना या गाडीतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना धोक्याची सूचना देऊन गेली. चिन्मय कोले यांनीही ही घटना विडिओसकट सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गेली दैनिक स्वरूपात 25 वर्षे धावणाऱ्या मत्य्सगंधा एक्सप्रेसचे डबे आता कालबाह्य झाले आहेत. हेच डबे आता वापरणे चालू ठेवले तर एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याचीही  शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर ही गाडी LHB डब्यांसह चालविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. कर्नाटक राज्यातील लोकसभा खासदार कोटा श्रीनिवासा पुजारी यांनीही गेल्याच महिन्यात या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिले होते.

 

Facebook Comments Box

रेल्वे पुन्हा घसरली; साबरमती एक्सप्रेसला अपघात

   Follow us on        

Train Derailment: मागच्या काही दिवसांपासून ट्रेनचे अपघात किंवा दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेन रुळ सोडून पुढे गेली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं असून घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.

19168 वाराणसी अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरले. 22 डबे डिरेल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून अशा घटना वाढत आहेत. या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलं नाही

कानपूर भीमसेन सेक्शनदरम्यान ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहेमहत्त्वाची बाब म्हणजे अजून तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.

प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात भयंकर होता. मात्र थोडक्यात जीवितहानी टळली आहे.

इंजिनला बोल्डर आदळल्याने इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाल्याचं लोको पायलनं सांगितलं आहे. त्यामुळे ट्रेन डिरेल झाली असावी असा अंदाज आहे.

 

 

 

Facebook Comments Box

रविवारी दिवा स्थानकावर मेगाब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
Konkan Railway: रविवार दिनांक 18/08/2024 रोजी ठाणे – दिवा स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार
दिनांक १६ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास १८ ऑगस्ट रोजी पनवेल स्थानकावर सुरू होणार आहे.
दिनांक १८ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. ५०१०४  रत्नागिरी – दिवा पॅसेंजरचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त करण्यात येणार आहे.
Facebook Comments Box

Konkan Railway: बोरिवली – सावंतवाडी नियमित ट्रेन येत्या २४ ऑगस्टपासून चालू होणार?

मुंबई: बोरिवली येथून कोकणात जाण्यासाठी एक नियमित रेल्वे गाडी असावी असे स्वप्न पाहणाऱ्या कोकणकरांसाठी एक आशा निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नाने बोरिवली ते सावंतवाडी अशी गाडी येत्या २४ ऑगस्ट रोजी चालू होणार असल्याची माहिती उत्तर मुंबईच्या कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुमेश आंब्रे यांनी दिली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बोरिवली तुन कोकणात जाणारी नियमित रेल्वे चालू करणार अशी ग्वाही दिली होती. त्यांनी आपला शब्द खरा केला असून ही गाडी सोडण्यासाठी सर्व तजवीज केली आहे. या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती दिनांक २३ ऑगस्टपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बोरिवली-दहिसर, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकर जनतेची वस्ती आहे. कोकणात जाण्यास गाडी पकडण्यासाठी त्यांना दादर किंवा वसई या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे बोरिवली येथून कोकणसाठी नियमित स्वरूपात गाडी चालविण्यात यावी यासाठी खूप वर्षांपासून मागणी होत आहे. खासदार पियुष गोयल यांनी बोरिवली येथून कोकणसाठी गाडी चालविण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
मुंबई:
Facebook Comments Box

रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ आयोजित ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न.

   Follow us on        
मुंबई:- रायझिंग सन क्रीडा  उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक आयोजित ७८ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम बाळ-गोपाळ, भगिनी व रहिवाश्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन जल्लोषात व उत्साहात पार पाडला. ध्वजारोहण सुधाकर कदम, विषश कार्यकारी अधिकारी व संचालक सरस्वती कोचिंग क्लासेस यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न  झाल्यावर राष्ट्रध्वजाला सलामी देवून राष्ट्रगीत गाण्यात आले.
उत्सव मंडळाच्या वतीने  वर्षभरात विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सल्लागार डॉ. मकरंद गावडे, राजेश सोनवणे, अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष  सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस  राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार  निलेश धावडे, व्यवस्थापक  प्रशांत प्रिदांवनकर यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले तर सुधाकर वस्त यांनी समस्त रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार व्यक्त केले.
Facebook Comments Box

Revas Reddy Coastal Highway: बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठीची निविदा NCC Ltd ने जिंकली

   Follow us on        
Revas Reddy Coastal Highway: रेवस रेड्डी सागरी महामार्गाविषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या सागरी महामार्गावरील 1.7 किमीच्या बाणकोट खाडी वरील EPC मोडवर असलेल्या पुलाच्या नागरी बांधकामासाठी NCC Ltd या कंपनीला सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सावित्री नदीवरील हा नवीन पूल रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट (वेसवी बंदराजवळ) आणि रायगड जिल्ह्यातील बागमांडला (हरिहरेश्वरजवळ) जोडणार आहे. रेवस – रेड्डी कोस्टल महामार्गावरील बाणकोट पूल हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर  बांधण्यात येणाऱ्या ८ नवीन पुलांच्या मालिकेचा एक भाग आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने मार्च 2024 मध्ये या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजित रु. 272.88 कोटी आणि बांधकाम कालावधी अवधी ३ वर्षे साठी निविदा मागवल्या होत्या. एकूण 4 बोलीदारांच्या बोली दिनांक 2 जुलै रोजी तांत्रिक बोली आल्या होत्या. या बोलींत सर्वात कमी बोली रुपये NCC Ltd ची रुपये  355.99 या रकमेची होती.  तर टी आणि टी इन्फ्रा (359.92 कोटी रुपये), अशोका बिल्डकॉन (363.47 कोटी रुपये), रेल विकास निगम लिमिटेड RVNL (380.70 कोटी रुपये) या बोलीदारांनी बोली लावली होती.
एनसीसीची 355.99 कोटी रु.ची बोली MSRDC च्या 272.88 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा 30.45% जास्त होते त्यामुळे त्यामुळे MSRDC आणि  बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन या पुलाचे कंत्राट अंतिम करण्याबाबत बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे.
Facebook Comments Box

सावंतवाडी स्थानकावरील घंटानाद आंदोलन दिपक केसरकर यांच्या आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित

   Follow us on        

सावंतवाडी-सावंतवाडी येथील अपूर्ण रेल्वेचे टर्मिनस मार्गी लागावे, येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळण्याबरोबरच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करावे आदी मागण्यांसाठी आज  १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे पुकारण्यात आलेले घंटानाद आंदोलन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार श्री दिपक भाई केसरकर यांचा आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित करण्यात आले.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे गेल्या २.५ वर्षात सावंतवाडी स्थानकातील अपूर्ण प्रवासी सुविधा आणि रेल्वेचे अपूर्ण असणारे टर्मिनस पूर्ण करण्यात यावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. २६ जानेवारी २०२४ ला प्रवासी संघटना सावंतवाडी ने आपल्या सलग्न संस्थांना सोबत घेऊन हजारो लोकांचा उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. तरी देखील शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल व हालचाल केली गेली नव्हती. परंतु पुन्हा संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर लगेच सावंतवाडी स्थानकातील PRS सुविधा ही १२ तास करण्यात आली.
आज झालेल्या या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीसावंतवाडी टर्मिनसला लागणारे पाणी हे तिलारी धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत मिळेल त्यासाठी  ७ कोटी मंजूर आहेत तसेच येथील प्रस्तावित रेलोटेल लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि टर्मिनस साठी लागणाऱ्या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून ३ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती दिली. तसेच येथील रेल्वे थांब्यासाठी पुढील आठवड्यात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्याशी आपल्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लावू असे सांगितले.या वेळी त्यांचा सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, गजानन नाटेकर, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर श्री राजन तेली तसेच रुपेश जी राऊळ, मायकल डिसोझा यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची बाजू समजून आपण आपल्या परीने पाठपुरावा करू असे सांगितले.
याला प्रतिसाद म्हणून संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी जर कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली नाही आणि आमच्या मागण्या केल्या नाहीत तर गणेशोत्सवाच्या तोंडावर सावंतवाडी स्थानकावर हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावर बसून आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे सल्लागार बबन साळगावकर, बाळासाहेब बोर्डेकर, सचिव मिहिर मठकर, ॲड नकुल पार्सेकर, नरेंद्र तारी, माजी पंचायत सदस्य शांताराम गावडे, गुणाजी गावडे, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर,सुधीर राऊळ,सागर नानोसकर,गणेश चमणकर, प्रथमेश पाडगावकर, विनोद नाईक, अभिषेक शिंदे आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search