Mumbai -Goa Vande Bharat Express | बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन दिनांक २७ जून रोजी होणार आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सोबत बेंगळुरू-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या पाच वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून धावणार आहेत.
वेळापत्रक
मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्थानकावर दुपारी १.१५ वा. पोहोचेल.
मडगावहून दुपारी २.३५ वाजता सुटेल ती मुंबईत ‘सीएसटी’वर रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.
वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल प्रमुख थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी.
Prime Minister Modi to flag off five new Vande Bharat trains on June 27
Konkan Railway Track Doubling | कोकण रेल्वे यंदा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ०१ मे १९९८ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी कोकण रेल्वे राष्ट्राला समर्पित केली होती. या २५ वर्षात मुंबई ते आपले गाव या प्रवासासाठी कोकणवासीयांची नेहमीच कोकण रेल्वेला नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. कोकणरेल्वेने सुद्धा आपल्या सेवेत खूप चांगल्या सुधारणा केल्या आहेत.
सुरवातीच्या काळात प्रत्येक दिवशी सरासरी १७ गाड्या या मार्गावर धावत होत्या. आता प्रवाशांची संख्या वाढली त्यामुळे गाड्यांची संख्याही वाढली त्यामुळे ही सरासरी वाढून प्रत्येक दिवशी ५० एवढी झाली आहे. त्याबरोबर १७ मालगाड्या रोज धावतात. स्थानकांची संख्याही वाढून ४९ ची ६८ एवढी झाली आहे.
एवढ्या गाड्या वाढवूनसुद्धा अजून गाड्यांची मागणी होत आहे. कारण या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. हंगामाच तर सोडाच तर पावसाचे एक दोन महिने सोडले बाकीच्या दिवशी आरक्षित तिकीट मिळविण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त या मुळे आरक्षणात संधीसाधू दलालांचा सुळसुळाट आहे. मजबुरी असल्याने या दलालांकडून दुप्पट भावात तिकीटे खरेदी करावी लागतात.
जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुःख तर विचारूच नका. या कोच मधून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. सीट भेटली ते नशीबवान म्हंटले तरीही खचाखच भरलेल्या डब्यातून टॉयलेट ला जाणे पण अशक्य होते. त्यात जागेसाठी आणि इतर कारणांसाठी होणारी भांडणे पण सहन करावी लागतात. अशा परिस्थितीत ८/१० तास प्रवास करताना जीव नकोसा होतो. हंगामात तर आरक्षित डब्यांची स्थिती अशीच जनरल डब्यांसारखी होते.
या कारणांनी या मार्गावर नवीन गाड्या सोडण्यासाठी नेहमीच मागणी होत आहे. मात्र नेहमीच या मागणीला लाल कंदील दाखवला गेला आहे. कारण त्यांच्यामते कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत असून या मार्गावर आता कोणतीही नवीन गाडी सुरू करता येणे शक्य नाही.
रेल्वे रूळ दुहेरीकरण – एक काळाची गरज
कोकण रेल्वे वर गेल्या २५ वर्षात गाड्या वाढल्यात, स्थानके वाढली आणि प्रवासी संख्या पण वाढली. मात्र रेल्वे रूळ दुहेरीकरणाचा प्रश्नावर रेल्वे प्रशासनाने प्राधान्य दिले नसल्याचे दिसत आहे. मुंबई ते रोहा या मार्गावर आधीच रेल्वे रूळ दुहेरीकरण झाले आहे. मात्र हा मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. तर रोहा या स्थानकापासून पुढे कोकण रेल्वेमार्ग चालू होतो. गेल्या २५ वर्षात फक्त ४९ किलोमीटर कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण झाले आहे. रोहा ते वीर या स्थानकांदरम्यान हे दुहेरीकरण ऑगस्ट २०२१ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाला एकूण ५५० कोटी एवढा खर्च आला होता. मात्र त्यापुढील रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाबाबत अजूनही काही वाच्यता रेल्वे प्रशासनाकडून केली जात नाही आहे.
दिवा सावंतवाडी या गाडीप्रमाणे वसई – सावंतवाडी अशी गाडी चालू करावी अशी मागणी होत आहे. ही मागणी रास्त आहे. कारण सध्या या मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यांत तुफान गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी जनरल गाडीची गरज आहे. अनेक स्थानके अशीही आहेत जेथे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असूनही तेथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले नाही आहेत. दुहेरीकरण झाल्यास नवीन गाड्या सोडून अशा स्थानकांना प्राधान्य देता येईल.
पर्यटनवृद्धी साठी
कोकणाला लाभलेल्या निसर्गसंपन्नतेमुळे कोकण भाग पर्यटनासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून या अगोदरच मान्यता मिळाली आहे. विस्टाडोम कोच सारख्या सुविधा देऊन रेल्वे प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे यावर वाद नाही. मात्र येथे पर्यटनासाठी येण्यासाठी रेल्वेची तिकिटे भेटणे मुश्किल होत असल्याने त्याचा पर्यटनावर परिणाम होत आहे.
पुण्यातील कोंकणासीयांसाठी
कोकण रेल्वेचा फायदा पुण्यातील कोंकणवासीयांना पाहिजे तसा झाला नाही आहे. सध्या काही मोजक्याच लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यावरून कोकण रेल्वे मार्गावरून धावतात. या गाड्या कोकणातील मोजकेच थांबे घेत असल्याने आणि या गाडयांना होणाऱ्या गर्दीमुळे या गाड्या पुणेकरांसाठी असूनही नसल्यासारख्या आहेत. पुण्यावरून सावंतवाडी पर्यंत एका गाडीची प्रतीक्षा पुणेकरांना आहे. मागेच हुजूर साहिब नांदेड पनवेल एक्सप्रेसचा विस्तार रत्नागिरी पर्यंत करण्याची मागणी प्रवाशांकडून झाली होती. रेल्वे रूळ दुहेरीकरणामुळेच अशा मागण्या पूर्ण करणे शक्य होणार आहे.
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता कोकणरेल्वे पूर्ण क्षमतेने कार्यरत करायची असेल तर रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे सिद्ध होत आहे. हे काम सोपे नसून मोठ्या प्रमाणात निधी मिळवणे आवश्यक आहे, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरजही आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने त्यात रस दाखविला गेला पाहिजे. कोकणातील जनतेने सुद्धा सरकारवर यासाठी दबाव टाकणे आवश्यक आहे.
Barsu Refinery | बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला होणारे आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. येत्या २० जुलैला विधान भवनावर मोर्चा काढण्याची योजना बारसू रिफायनरी विरोधी समितीने आखली आहे . यासंबंधी समितीचे एक महत्वाची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली आहे. या समितीबरोबर राज्यातील आणि देशातील काही संघटना देखील या मोर्चात सामील होणार आहेत. या मोर्चाला १ लाखापेक्षा जास्त विरोधक एकत्र जमवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
असा असणार हा मोर्चा
दिनांक २० जुलै रोजी राणीची बाग ते आझाद मैदान या दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विधानभवनावर कूच करून सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला पर्यावरण घातक प्रकल्प म्हणून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा विरोध झुगारून येथे माती परीक्षण करण्यात आले असून सरकारतर्फे आपली मनमानी करताना दिसत आहे, मात्र ‘एकाच जिद्द; रिफायनरी रद्द’ या घोषवाक्याखाली समितीने आंदोलन घडले असून जोपर्यत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी समितीची भूमिका आहे.
गोवा | राज्यात मुघल बादशाह औरंगजेबचे स्टेटस मोबाईल वर ठेल्यामुळे वातावरण तापले असताना गोवा राज्यात एक याच नावासंबंधी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोव्याच्या कोंकणी भाषेच्या एका अंकलिपीत प्रकाशकाने औरंगजेब नावाचा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या अंकलिपीत ‘औ’ या मुळाक्षरा समोर औरंगजेबचा उल्लेख केला गेला आहे. या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण होऊन प्रकाशक अडचणीत येणार आहे. मुलांना शिकवताना आपले आदर्श कोण आणि शत्रू कोण याचा फरक समजत नसल्याचे या प्रकारातून दिसत आहे.
गोवा राज्य शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले कि हा प्रकार धक्कादायक असून ही अंकलिपी ज्या प्रकाशकाने छापली आहे त्या प्रकाशकाचा आम्ही घेत असून
Konkan Railway | प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन उन्हाळी हंगामासाठी सोडलेल्या दोन विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.या गाडयांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याने गणेशचतुर्थी दरम्यान गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
1) 01139/01140 Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly)
आठवड्यातून दोन दिवशी धावणारी ही विशेष रेल्वे गाडी जून-२०२३ अखेरपर्यंत चालविण्यात येणार होती तिला मुदतवाढ देण्यात आली आहे.
01139 Nagpur – Madgaon Jn. Special – या गाडीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
01140 Madgaon Jn. – Nagpur Special – या गाडीला 01 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
2) Train no. 02198 / 02197 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातुन एकदा धावणारी ही विशेष रेल्वे गाडी जून-२०२३ अखेरपर्यंत चालविण्यात येणार होती तिला मुदतवाढ देण्यात आली आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Special – या गाडीला 29 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
02197 Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Special – या गाडीला 02 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या दोन्ही गाड्या या आधी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार (पावसाळी), स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहेत
नवी दिल्ली :सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास ३० जून २०२३ ही शेवटची तारीख आहे. ३० जून २०२३ पर्यंत आधार – पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही. असे पॅन कार्ड पुनः कार्यरत करण्यासाठी पुढील एक महिन्यासाठी अवधी भेटू शकतो मात्र मोठ्या रकमेचा दंड बसू शकतो. त्यामुळे आजच आपले आधार – पॅन लिंक करून निश्चित व्हा.
आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दरम्यान, PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.
रत्नागिरी :दापोली पालगडमध्ये एका व्यक्तीकडे 20 गावठी बॉम्ब पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, घाडगे, बांगर, एएसआय मिलिंद चव्हाण, विकास पवार यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचून गावठी बॉम्ब घेऊन निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव रमेश पवार असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे.
बॉम्ब बनविण्याचे रॅकेट सक्रिय?
या आधी दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते त्यामुळे तालुक्यात गावठी बॉम्ब बनवणारे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईमुळे हे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
रत्नागिरी – प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाला फायद्यापेक्षा तोटाच होणार आहे, कोकणातील पर्यावरणाची हानी होणार आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या कोकणावरील होणाऱ्या दुष्परिणामाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी Swaru Entertainment मधील कलाकार टीम एक समाजप्रबोधन पथनाट्य घेऊन आले आहे.
हे पथनाट्य शक्य तिथे सादर करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करून त्याद्वारे कोकणात होणाऱ्या घातक रिफायनरी विरोधी समाजप्रबोधन केले जाईल असे या टीमचे म्हणणे आहे.
Konkan Railway Updates | सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या जामनगर तिरुनेवेली एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबा वाढवण्यात आला आहे.
जामनगर ते तिरुनेवेली दरम्यान धावणाऱ्या 19578 Jamnagar – Tirunelveli Express या गाडीला दि. 16 आणि 17 जून 2023 रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 19577 Tirunelveli – Jamnagar Express या गाडीला दिनांक 19 आणि 20 जून 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.
Vande Bharat Express | सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक धक्कादायक विडिओ सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या छताला गळती लागली असून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गाडीत शिरत आहे आणि रेल्वेचे कर्मचारी हे पाणी भरून बाहेर टाकत असल्याचा एक विडिओ ट्विटर वर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे केरळ कोन्ग्रेस च्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर हा विडिओ पोस्ट केला गेला आहे.