Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Konkan Blog - Page 156 of 171 - Kokanai

BEST ची ‘BEST’ ऑफर १९ रुपयांमध्ये १० फेऱ्यांचा प्रवास..

मुंबई: बेस्टकडून विशेष दसरा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. केवळ १९ रुपये भरून ९ दिवसांत १० प्रवास फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे. नव्या आणि जुन्या ‘चलो अँपधारकांना या सुविधेचा केवळ एकदाच लाभ घेता येणार असून अधिकाधिक मुंबईकर प्रवाशांनी सुलभ अशा डिजिटल प्रवासाचा लाभ घ्यावा, या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे.

ऑफर कशी मिळवाल
बेस्ट ‘चलो ॲप’ डाऊनलोड करून बस पास सेक्शनमध्ये जाऊन ‘दसरा ऑफर’ निवडून तपशील भरून १९ रुपये ऑनलाईन भरून ही ऑफर खरेदी करू शकता. बसमध्ये चढल्यावर ‘स्टार्ट अ ट्रिप’वर टॅप करून मोबाईल फोन बसवाहकाच्या मशीनसमोर धरून तिकीट वैध करावे. त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी डिजिटल पावती अँपवर मिळेल. संपूर्ण प्रक्रिया रोख रक्कमविरहित आणि कागदविरहित असेल. ही योजना २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये उपलब्ध आहे.

योजनेचे लाभ
या योजनेद्वारे कोणत्याही बस मार्गावर ९ दिवसांच्या कालावधीदरम्यान विमानतळ, हॉप ऑन-टॉप ऑफ अशा विशेष बससेवा वगळता वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित बसगाड्यांद्वारे प्रवास करता येऊ शकतो.

 

Loading

Facebook Comments Box

शिंदे-फडणवीस सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जाणून घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. 

कोकणात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. उदय सामंत हे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहतील. तर दीपक केसरकर यांची मुंबई शहर आणि कोल्हापूर ह्या दोन राज्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी

देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया 
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
 दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
 सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

 

भाजपकडे 21 जिल्हे
भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली

15 जिल्हे शिंदे गटाकडे – 
15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे.  सातारा, ठाणे, मुंबई शहर ,  कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत. 

 

Loading

Facebook Comments Box

आता मुंबई उपनगरीय रेल्वेचे फर्स्टक्लास पासधारक करू शकणार एसी लोकलने प्रवास ….पासमध्ये ‘हा’ बदल करणे आवश्यक

मुंबई : आता मुंबई उपनगरीय रेल्वे लोकल्सच्या फर्स्ट क्लास श्रेणीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी फर्स्ट क्लास चा त्रैमासिक आणि सहामाही आणि वार्षिक पास काढला आहे ते प्रवासी AC लोकल आणि फर्स्ट क्लास श्रेणीच्या भाड्याचा फरक भरून एसी लोकल ने प्रवास करू शकतात.

दिनांक २४.०९.२०२२ पासून रेल्वेच्या उपनगिरीय टिकेट्स खिडक्यांवर हा फरक भरून प्रवाशांना आपला पास अपग्रेड करता येईल.दिनांक ह्या निर्णयामुळे त्रैमासिक आणि सहामाही आणि वार्षिक पासधारक एसी लोकलकडे वळतील असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Loading

Facebook Comments Box

० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार?

मुंबई:  शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत?संबंधित शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरु आहे? याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणाची शक्यता आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाला पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यावेळी मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने याबाबतचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

शिक्षण हक्क कायदा काय सांगतो?

शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या शाळा या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटर अंतरावर असाव्यात तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा तीन किलोमीटर अंतरावर असाव्यात असा आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आणि शाळा जवळ असावी असा शिक्षण हक्क कायदा सांगतो, त्यामुळे अशा प्रकारच्या शाळा बंद झाल्यास शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होईल असं तज्ञांचा म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा एकदा अशा शाळा बंद करायला विरोध केला जाण्याची शक्यता आहे.

सरकारद्वारे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना जवळपासच्या शाळांपर्यंत चांगली वाहतूक सुविधा देता येईल का याचा पूर्ण आढावा कदाचित घेऊन काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

Loading

Facebook Comments Box

वेदांता पाठोपाठ अजून एक कंपनी महाराष्ट्रातून बाहेर

मुंबई: अधून मधून कंपनी मध्ये जात जा, नाहीतर तुम्ही असाल वर्क फ्रॉम होम मध्ये आणि कंपनी गेली असेल दुसर्‍या राज्यामध्ये. अशा आशयाचा एक जोक अलीकडे सोशल नेटवर्किंग मेडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरात मध्ये गेल्याने लोक ह्या प्रकारचे जोक्स करताना दिसत होते. पण ही गोष्ट आता गंभीर होत चालली आहे. कारण अजून एक कंपनी महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.

‘फोनपे’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही आपले मुख्य कार्यालय मुंबई वरून चेन्नई येथे नेण्याच्या तयारीत आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नोटिस एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे.

कंपनीच्या नोटीसमध्ये काय आहे?
‘फोनपे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्या वतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, “कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे,” अशी माहिती दिली आहे.तसेच, “कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-२१ वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते,” असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

   

Loading

Facebook Comments Box

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा पुणे येथे पार पडला

पुणे :आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती निमित्त मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर चाैक, मंगळवार पेठ,पुणे, महाराष्ट्र येथे  महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित “आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमात शाहीर श्रीकांत रेणके आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला,गणेशवंदना,तालवाद्य वादन,उमाजी नाईक यांच्यावर आधारीत गीत आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जिवनपटावर आधारीत अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर झाला कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली,ढोलकी – राहूल कुलकर्णी सिंथेसायझर- दिपक पवार भरत शर्मा,राहूल पवार यांनी साथसंगत केली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर शिंदे यांच्या कडून झाले.

आलेले पाहुणे श्री.संदीप ओव्हाळअॅड. राजेश म्हामुणकर रोहिदास दादा मदने,गंगाराम जाधव,सुभाष जाधव,शेखर गोरगले ,सुरेश चव्हाण,शांताराम गोपने,प्रशांत गोपने,महेश म्हसुडगे,आरती ताई साठे, हिरा जी बुवा , संदीप शेळके, भूषण कांबळे, राजाराम निकम, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरां कडून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करून त्यांना पुषपगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.विकास सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी संत असंख्य रसिक गणांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे संयोजन आरयन देसाई यांनी केले.

Loading

Facebook Comments Box

सणासुदीच्या हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाडी… आरक्षण 22 सप्टेंबर पासून.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी आता 30 ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.

 

ह्या गाडीच्या वेळा पत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीसे बदलही करण्यात आलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल.

 

मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल.

 

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

ह्या गाडीला 2 Tier AC – 01,  3 Tier AC – 04,  Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत. 

एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

 

ह्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण 22/09/2022 पासून रेल्वेच्या टीकेट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल.

 

   

Loading

Facebook Comments Box

लालबाग गणेशोत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपये दंड

मुंबई : पालिकेच्या भायखळा ‘ई’ विभागाने लालबाग गणेशोत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. मंडळाने गणेशभक्तांसाठी दर्शनाच्या रांगांसाठी बॅरिकेड्स उभारताना रस्त्यावर खड्डे पाडल्यामुळे मंडळाने रस्त्यावर १८३ खड्डे खोदल्याने त्याची भरपाई म्हणून हा दंड आकारला गेला आहे.

महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा दंड मंडळाच्या महापालिके कडे जमा असलेल्या निधीतून वसूल केला जातो.

भायखळा ‘ई’ विभागाच्या हद्दीमधील टी. बी. कदम मार्गावर (दत्ताराम लाड मार्ग जंक्शन ते नेकजात मराठा बिल्डिंगपर्यंत) पालिकेची परवानगी न घेता दर्शन रांगेसाठी मार्गिका उभारण्यात आली. या मार्गिकेला बॅरिकेड्स लावण्यासाठी खड्डे पाडण्यात आले. पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार रुपये याप्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. ही रक्कम ‘ई’ विभाग कार्यालयात तातडीने भरण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आले आहेत.

 

या पूर्वीपण अशा प्रकारचा दंड महापालिकेकडून
आकारला गेला होता. सन 2012 साली 23.56 लाख, 2013 साली 5.60 लाख, 2014 साली 5.56 लाख तर 2015 ह्या वर्षी 3.36 लाख ह्या कारणास्तव मंडळातून दंड वसूल करण्यात आला होता.

 

 

Loading

Facebook Comments Box

दहावी – बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. पूर्ण वेळापत्रक ईथे पहा

मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी आज दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारी-मार्च२०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी -बारावीच्या परीक्षांचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहे.

 

मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे वेळा पत्रक अंतिम नसेल त्यामध्ये काही प्रमाणात बदल केले जातील. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना परीक्षे संदर्भात कल्पना दिली तर ते त्या प्रमाणे नियोजन करू शकतात आणि ताण कमी करू शकतात ह्या हेतूने हे प्राथमिक स्वरूपाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले गेले आहे असे मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पूर्ण वेळापत्रक 👇🏻

TIMETABLE-SSC-MAR-23 TIMETABLEHSCFEB23GEN

Loading

Facebook Comments Box

कोकणकन्या एक्सप्रेस आता होणार सुपरफास्ट, कमी वेळात जास्त अंतर कापणार

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना एक खुशखबर आहे.  सर्व कोकणकरांची आवडती आणि सर्वांची पहिली पसंती असणारी कोकणकन्या एक्सप्रेस 10112 / 10111 आता “सुपरफास्ट” कॅटेगरी मध्ये येणार आहे. ह्या गाडीचा नंबर सुद्धा बदलणार आहे. हि गाडी आता 20112 / 20111 Madgoan Jn – Mumbai CSMT -Madgoan Jn Konkan Kanya Superfast Express  ह्या नावाने चालविण्यात येणार आहे. दिनांक २० जानेवारी २०२३ पासून हा बदल अमलात आणला जाणार आहे.

“सुपरफास्ट” कॅटेगरी मध्ये आल्याने हि गाडी मुंबई ते मडगाव हे अंतर कमी वेळात कापणार आहे. 20111 Mumbai CSMT -Madgoan Jn Konkan Kanya Superfast हि गाडी मुंबई सीएसमटी स्थानकावरून रात्री २३:०५ वाजता सुटून मडगावला  सकाळी ९:४६ ला पोहोचेल. 20112 Madgoan Jn – Mumbai CSMT Konkan Kanya Superfast हि गाडी मडगाव स्टेशन वरून संध्याकाळी ७ वाजता सुटून मुंबई सीएसमटी स्टेशन ला सकाळी ५.४० ला पोहोचेल. ह्या गाडीच्या स्थानकामध्ये काही बदल करण्यात आलेली नाही आहे.

   

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search