कुडाळ :मराठी माणसं व्यवसाय करत नाहीत, व्यवसायात करण्यात कमी पडतात. मागे पडतात आणि म्हणुन दुसर्या राज्यातील लोक ईथे येऊन उद्योगधंदे करतात हे कुठे तरी थांबले पाहीजे म्हणुन सगळेच बोलतात, लिहीतात आणि जोरदार टिका पण करतात पण ह्यात बदल घडवून आणायचा असेल तर फक्त बोलून लिहून नाही चालणार तर गरज आहे प्रत्यक्षात कृती करण्याची आणि आपल्या मातीतल्या उद्योजकांना साथ देण्याची.
आपल्या मालवणी, कोकणी, मराठी माणसांना व्यावसायिक बनवण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला प्रसिद्धी देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सतत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.
गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर अभिनवच्या टीमने कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांचा भव्य शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केला आहे.
कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल परिसरात हा शॉपिंग फेस्टिव्हल 26-27-28-29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत असणार आहे.
ह्या परीसरातील प्रत्येकाने या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या स्थानिक लोकांकडून खरेदी करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे