Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Konkan Blog - Page 161 of 171 - Kokanai

मध्य रेल्वेच्या ‘ह्या’ गाड्या AC Locals मध्ये परावर्तित होणार.

मुंबई: मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील एकूण 10 गाड्या वातानुकूलित (AC locals) मध्ये परावृत्त करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आज एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

AC locals ना वाढता प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला काहीसे महाग असलेले तिकीट कमी केल्याने ह्या गाड्यांच्या प्रतिसादात वाढ झाली आहे, त्यामुळे ह्या वातानुकूलित गाड्यांचा फेर्‍यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.

दिनांक 19 ऑगस्ट 2022 पासून खालील गाड्या AC locals म्हणुन चालविण्यात येतील.

 

 

 ह्या वाढलेल्या 10 लोकल्स पकडून आता मध्य उपनगरीय मार्गावर चालणार्‍या AC लोकल्सची संख्या एकूण 66 एवढी झाली आहे. पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून pdf फाइल डाऊनलोड करा. 

Mumbai-AC-Main-Line-Suburban-Time-Table-19.08.2022

 

Loading

Facebook Comments Box

विनायक मेटे यांचा ड्रायवर “रोड हिप्नोसिस” चा शिकार…”रोड हिप्नोसिस” पासून होणारे अपघात टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्याच्या ड्रायवरची चौकशी केली असता तो प्रत्येक वेळी वेगळी स्टेटमेंट देत होता. त्यामुळे एका बाजूला संशय घातपाताचा संशय वाढत होता. पण दुसऱ्या बाजूने पाहता तो “रोड हिप्नोसिस” ह्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला बळी पडला हे अधिका अधिक स्पष्ट होत होते.

काय आहे हे “रोड हिप्नोसिस” किंवा रोड संमोहन? निष्णात ड्रायव्हिंग असतानाहि अपघात का होतात? ह्यावर काय उपाय आहेत हे सांगण्याचा आमचा एक हा प्रयत्न. हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून ह्या कारणाने होणारे अपघात टाळून जीव वाचतील.

“रोड हिप्नोसिस” म्हणजे काय?

रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते.

रस्त्यावर वाहन चालवतांना साधारणपणे २.५ तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते.

संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात,पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही,परिणाम ” रोड हिप्नोसिस ” !

हेच तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे…

‘ रोड हिप्नोसिस ‘ असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही.तो कोणत्या वेगाने जात आहे,किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही,किंवा सविस्तर स्पष्टीकरण देवु शकत नाही. सहसा टक्कर १४० किमी पेक्षा जास्त वेगाने असते.

“रोड हिप्नोसिस” कसा टाळता येईल.

रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर २.५ तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी,
थोडी विश्रांती घ्यावी, ५/६ मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.

तसेच वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या १५ मिनिटांतील काहीही आठवत नसेल,
तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सहप्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.

‘ रोड संमोहन ‘ हे सहसा रात्रीच्या वेळी घडते आणि अशावेळी प्रवासी झोपलेले असतांना परिस्थिती खूप गंभीर होते.

डोळे लागले तर अपघात अटळ आहे,पण डोळे उघडे असतांना मेंदू क्रियाशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे…

खूप वेळा पुरेशी झोप झालेली नसेल…आपण खूप थकलेले असु…ड्रायव्हिंग सतत करणं…अश्या वेळी या स्टेजची अनुभूती खूप वेळा मलाही आलेली आहे…

अश्या वेळी थोडावेळ थांबणे…गाडीतच थोडीशी हालचाल करणे…चहा किंवा पाणी पीणे..काहीच नाही तर स्वतःला करकचून चिमटा काढणे….असं केल्याने आपण सावध होऊ शकतो.गाणं ऐकणे किंवा सोबतच्या व्यक्ती सोबत गप्पा मारल्या तरी अशे प्रसंग टाळता येतात.

कधीतरी दिवस भर किंवा रात्रभर आराम न करता एकटाच गाडी चालवताना आपली गाडी चालू असते पुढे जात असते पण रोजचा रस्ता आपण विसरलेलो असतो…

नेमकी वळण, खड्डे , स्पीड ब्रेकर दिसतात पण लक्षात येत नाहीत,अश्या वेळी समजावं कि हि आपल्यासाठी यावेळी धोक्याची सुचना आहे.वरील उपाय करून आपण स्वतःला व आपल्या गाडीला वाचवू शकतो.

परवा अचानक एका emergency कामासाठी दिवसभर विश्रांती न घेता रात्री बारा वाजता झोपून दोन वाजता उठलो व पहाटे तीनला गाडी घराबाहेर काढली व सकाळी अकरा पर्यंत विनाथांबा सतत आठ तास ड्रायव्हिंग केलं.

त्या वेळी जवळपास तिन चार वेळा हा अनुभव आला..
पैकी दोन वेळा दिवसा अनुभव आला.

स्वतःला सावरलं ,रस्त्यावर खुपच तुरळक गाड्या होत्या.
पण अनुभव आला हे नाकारुन चालणार नाही.

आपणही जरा डोक्याला ताण द्या…लक्षात येईल प्रत्येक गाडी चालवणारा या स्टेजमधुन नक्कीच एकदा तरी गेलेला असतो.

फक्त हि स्टेज म्हणजे ” यमाची वेळ ” असते हे आपल्याला माहित नसतं किंवा माहिती असुनही आपण गांभीर्याने घेत नसतो व गाडी पळवतराहतो,मेंदूच्या निष्क्रिय अवस्थेत…आपल्याच बेधुंद अवस्थेत!

परिणामी भयंकर परिस्थितीला सामोर जाण्याची शक्यता कधीही येऊ शकते !

म्हणजे सावध तो सुखी 

डॉ. संजीव लिंगवत, सिंधुदुर्ग.

Loading

Facebook Comments Box

मंत्र्यांची नाराजी, एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत वाढ

अपेक्षित खाती न मिळाल्याने शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची चर्चा आता चालू झाली आहे. दीपक केसरकर, दादा भुसे आणि संदीपान भुमरे त्यांना मिळालेल्या खात्यांबाबत नाराज असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

पुन्हा जुनेच खाते मिळाल्याने संदीपान भुमरे नाराज असल्याचे समजते. दीपक केसरकर यांना पर्यटन व पर्यावरण खाते मिळण्याची अपेक्षा होती, तसे त्यांनी बोलून पण दाखवले होते. पण त्यांना  शालेय शिक्षण खात्याची धुरा दिल्याने ते पण नाराज असल्याचे समजते. कोकणसाठी पर्यटन खाते महत्वाचे होते, त्याद्वारे कोकणातील पर्यटनाचा विकास मला करता आला असता असे ते म्हणाले.

प्रकृतीच्या कारणावरून आपण आताच्या मुख्यमंत्र्यांना आणि  आधीच्या सरकारातील मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेकरवी ज्या खात्याची मागणी केली होती ती त्यांची मागणी मान्य न करता त्यांना बंदरे व खनिकर्म हे खाते देण्यात आले असल्याने ते नाराज असल्याचे समजते.

ह्याआधी मंत्रीपदे न मिळाल्याने शिंदे गटात काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता जे मंत्री झाले आहेत त्यांना अपेक्षित खाती न भेटल्याने त्या मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांची नाराजी एकनाथ शिंदे कशी हाताळतात हे आता पुढील काळच सांगेल.

Loading

Facebook Comments Box

राज्यातील ८४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक

आज दिनांक १५/०८/२०२२ स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात येणारे १) पोलीस शौर्य पथक २) मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पोलीस पथक आणि ३) गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक महाराष्ट पोलीस दलाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील तीन पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याबरोबरच 42 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत. देशभरातील अधिकाऱ्यांना 1082 पोलीस पदक जाहीर झाली असून 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 84 पदक मिळाली आहेत.

उल्लेखनीय सेवेचे पोलीस पदक

अ. क्र. नाव पद आणि ठिकाण
1 श्री. सुनील वसंत कोल्हे सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
2 श्री. प्रदीप परशुराम कन्नलू सहाय्य्क पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश विभाग, ठाणे
3 श्री मनोहर दगडू धनवडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई शहर

पोलीस शौर्य पदक

अ. क्र. नाव आणि पद
1 मनीष कलवानिया, भापोसे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक औरंगाबाद
2 समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक गडचिरोली
3 भाऊसाहेब ढोले , उप पोलीस अधीक्षक गडचिरोली
4  महारुद्र परजाणे , सहायक पोलीस निरीक्षक बीड
5  राजरत्न खैरनार,  सहायक पोलीस निरीक्षक नवी मुंबई
6  राजू कांडो ,  पोलीस नाईक गडचिरोली
7  अविनाश कुमरे, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
8  गोगलु टिम्मा , पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
9 संदीप भांड, सहायक पोलीस निरीक्षक गडचिरोली
10 मोतीराम मडावी , सहायक पोलीस उपनिरीक्षक (द्वितीय बार) गडचिरोली
11 दामोधर चिंतुरी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
12 राजकुमार भडावी ,नाईक् पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
13 सागर मुल्लेवार, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
14 शंकर मडावी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
15 रमेश असाम , नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
16 महेश सयाम , पोलीस कॉन्स्टेबल गोंदिया
17 साईकृपा मिरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
18 रत्नय्या गोरगुंडा, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
19 संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक गडचिरोली
20 मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली
21 दयानंद महाडेश्वर, पोलीस उपनिरीक्षक नवी मुंबई
22 जीवन उसेंडी,  नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
23 राजेंद्र मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
24 विलास पाडा, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
25 मनोज इस्कापे, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
26 मनोज गज्जमवार, पोलीस नाईक गडचिरोली
27 अशोक माज्जी, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
28 देवेंद्र पाखमोडे, पोलीस कॉन्स्टेबल       गडचिरोली
29 हर्षल जाधव, पोलीस उपनिरीक्षक पालघर
30 जगदेव मडावी (मरणोत्तर),हेड कॉन्स्टेबल (मरणोत्तर) गडचिरोली
31 सेवकराम मडावी , हेड कॉन्स्टेबल गडचिरोली
32 सुभाष गोंगाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
33 रोहीत गोंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
34 योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली
35 धनाजी होणमाने , पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर) गडचिरोली
36 दसारु कुरसामी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
37 दीपक विडपी, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
38 सुरज गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
39 किशोर अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोत्तर) गडचिरोली
40 गजानन अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
41 योगेश्वर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली
42 अंकुश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली

गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक

अ. क्र. नाव आणि पद
1 सुभाष निकम, उप पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेघण विभाग, औरंगाबाद
2 आप्पासाहेब शेवाळे , उप पोलीस अधीक्षक , पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा
3 संतोष जोशी , पोलीस निरीक्षक ,वायरलेस, पोलीस आयुक्त कार्यालय,औरंगाबाद
4 भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, नवी मुंबई
5 अशोक भगत , पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, ठाणे
6 नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफॉर्ड मार्केट,मुंबई
7 व्यंकट केंद्रे, पोलीस निरीक्षक, जिन्सी पोलीस स्थानक, औरंगाबाद शहर
8 दीलीप तवरे, सहायक कमांडंट,आय.आर.बी.आय.,जी.आर.-१४,औरंगाबाद
9 श्रीकांत अदाते, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोळ, मुंबई
10 राजेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, फोर्स१, एसआरपीएफ कँप, गोरेगांव मुंबई
11 सुनिल कुवेसकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, भायखडा, मुंबई
12 शंकर गांवकर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सागरी १ पोलीस स्थानक, माहीम,मुंबई
13 देवीदास बंड, आर्मड पोलीस सब इनस्पेक्टर,आयआरबी२,बीआयआरएसआय कँप.गोंदिया
14 क्रिष्णा हिसवणकर, पोलीस उपनिरीक्षक,उप विभागीय पोलीस कार्यालय,उस्मानाबाद
15 प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हापेठ पोलीस स्थानक, जळगाव
16 वाल्मीक मंढारे, पोलीस उपनिरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्थानक, ठाणे शहर
17 सुनिल अंबराते, पोलीस उपनिरीक्षक, कन्हाण पोलीस स्थानक , नागपूर ग्रामीण
18 माणीक गाईकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,नाईक शहर
19 जमीलुदृीन जागीरदार,पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय,सेलु, परभणी
20 विलास जामनेकर,पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, विभागीय पोलीस आयुक्त (डीसीपी)
21 अविनाश अक्कावार, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर
22 जितेंद्र मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर
23 माणीक सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तालुक्का पोलीस स्थानक, जळगाव
24 विजय गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस , चंद्रपूर
25 प्रमोद ढोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली
26 प्रवीण बेझालवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक ,गडचिरोली
27 गुलाम मेहबुब गुलाम हैदर गलेकाटू, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी सेल, लातूर
28 धनराज टाळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बोरीवली पोलीस स्थानक, मुंबई शहर
29 अशोक राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ,गेन्हे शाखा, ठाणे शहर
30 संतोष वाजुरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड
31 भास्कर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा,बुलडाणा
32 प्रदीप चिरमाडे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मोटर ट्रान्सपोर्ट विभाग,जळगाव
33 सुरेश कदम , सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनीट,मुंबई
34 विजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्थानक,जळगाव
35 सुनिल गीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
36 राजेंद्र शिर्के, हेड कॉन्स्टेबल , रायटर/२४२१३,गुन्हे शाखा,युनाईट ९,वांद्रे, मुंबई
37 सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल/१६६, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
38 अशोक भोंडवे, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
39 सुर्यकांत अनांडे, पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय, उस्मानाबाद

Loading

Facebook Comments Box

आता फोनवर ‘हॅलो’ च्या जागी ‘वंदे मातरम’ मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसताच मुनगंटीवारांचा मोठा निर्णय!

आजपासूनमहाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नमस्कार न म्हणता वंदे मातरमने फोनवर संभाषण सुरू करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

 

आज मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नाव सांस्कृतिक खात्यासाठी जाहीर केल्यानंतर त्यांनी हि एक महत्वाची घोषणा केली आहे.
शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. 18 व्या शतकामध्ये दुरध्वनीच्या माध्यमातून सुरूवात हॅलो म्हणून व्हायची. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. हे अभियान ते १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी पर्यंत राबवली जाणार आहे. ह्यासंबंधीचा अधिकृत जीआर ते लवकरच काढणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे. 

 
 

शिंदे सरकारमधील खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे.

 

Facebook Comments Box

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.. जाणून घ्या कोणाला कोणते खाते मिळाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

अपेक्षेप्रमाणे गृह, वित्त , गृहनिर्माण, ऊर्जा हि महत्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती तंत्रज्ञान, नगरविकास, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम इ. खाती आपल्याकडे ठेवली आहेत.

कोणाला कोणते खाते याची सविस्तर माहिती

◾️मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्व. प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

 

◾️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

◾️ राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

◾️ सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

◾️ चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

◾️ डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

◾️ गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

◾️ गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

◾️ दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

◾️ संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

◾️ सुरेश खाडे- कामगार

◾️ संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

◾️ उदय सामंत- उद्योग

◾️ प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

◾️ रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

◾️ अब्दुल सत्तार- कृषी

◾️ दीपक केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा

◾️ अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

◾️ शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

◾️ मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Loading

Facebook Comments Box

फाळणी दु:खद स्मृतीदिनानिमित्‍त प्रदर्शन फाळणीचा इतिहास, वेदना प्रदर्शनातून समजून घ्‍या – जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : देशाची फाळणी ही दु:खद करणारी गोष्‍ट आहे. या फाळणीमुळे स्‍थलांतरण प्राण गमावलेल्‍या आणि विस्‍थापनामुळे अनंत वेदना सहन केलेल्‍या भारतवासियांचे स्‍मरण करु या आणि त्‍यांना श्रध्‍दांजली वाहू या अशा शब्‍दात जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी श्रध्‍दांजली वाहिली.

14 ऑगस्‍ट 2022 या फाळणी दु:खद स्‍मृती दिनानिमित्‍त जिल्‍हा नियोजन समितीच्‍या सभागृहात प्रदर्शन भरविण्‍यात आले. यानिमित्‍त झालेल्‍या कार्यक्रमास मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्‍तात्रय भडकवाड, जिल्‍हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्‍हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, प्रशांत पानवेकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नायर, पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनी या चित्रप्रदर्शनाची सुरुवातीला पाहणी केली. यानंतर जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी म्‍हणाल्‍या, फाळणीवर आधारित अनेक चित्रपट आणि पुस्‍तकांची निर्मिती झालेली आहे. ही चित्रपट पाहिल्‍यानंतर आणि पुस्‍तक वाचल्‍यानंतर फाळणीमध्‍ये भारतवासियांना त्‍यावेळचा क्‍लेष कसा होता, त्‍यांनी काय भोगलय हे आपल्‍याला समजून येते. फाळणीचा इतिहास सर्वांनी विशेषत: विद्यार्थ्‍यांनी समजून घ्‍यावा. यानिमित्‍ताने वेदना भोगलेल्‍या प्राण गमावलेल्‍या भारतवासियांचे स्‍मरण करु आणि श्रध्‍दांजली वाहू. मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नायर आणि पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनीही या वेळी श्रध्‍दांजली वाहिली. प्रास्‍ताविकात निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री. भडकवाड यांनी फाळणीबाबत माहिती दिली. फाळणीच्‍या दरम्‍यान मोठ्या प्रमाणात दंगली झाल्‍या. लाखो लोकांचे स्‍थलांतरण झाले अनेक लोक मृत्‍यू पडले कित्‍येक जखमी झाले कित्‍येकांचे कुपोषणामुळे बळी गेले. रेल्‍वे रुळावर अनेकांचे बळी गेले. अनेकांच्‍या संपत्‍तीच्‍या अतोनात नुकसान झाले. विस्‍थापनामुळे अनंत वेदना सहन केलेल्‍या भारतवासियांना त्‍यांनी श्रध्‍दांजली वाहिली. 

Source and Credit – diosindhudurg

https://twitter.com/InfoSindhudurg/status/1558726438823804928?t=8uPrFSGlPll3lTpEr0n6fQ&s=19

Loading

Facebook Comments Box

.. तर विनायक मेटे यांचा जीव वाचला असता…

आज सकाळी झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अपघातानंतर त्यांना एक तास मदत मिळाली नाही. वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता.

त्याच गाडीत त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितले की अपघात झाल्यावर विनायक मेटे हे त्यांच्याशी बोलले होते. आम्ही तिथून जाणार्‍या वाहनांना हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कोणी गाडी थांबवली नाही. एवढेच नव्हे तर अक्षरशः रस्त्यावरून झोपून पण त्यांनी मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केला.

ह्याबरोबरच 100 ह्या emergency नंबर वर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिथून पण त्यांना मदत मिळाली नाही. अनेकदा फोन करून पण तिथून फोन उचलला गेला नाही.

शेवटी एका वाहनचालकाने गाडी थांबवली. आणि एका तासाने मदत मिळाली. ताबडतोब मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते असे त्यांचे सहकारी म्हणाले.

हे सर्व खूपच निंदनीय म्हणावे लागेल. राज्याचा राजकारणातील एका मोठ्या नेत्याला असे अनुभव आलेत तर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading

Facebook Comments Box

धक्कादायक:शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन

नवी मुंबई :आज सकाळी घडलेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

विनायक मेटे कोण होते 

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.

मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. 

अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य

Loading

Facebook Comments Box

विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे आणि त्यांचा सुरक्षारक्षक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.

सरकारच्या मराठा आरक्षण संबंधित आजच्या सभेच्या उपस्थितीसाठी ते मुंबई येथे येत असताना हा अपघात घडला आहे. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता तो किरकोळ जखमी झाल्याचे समजते आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र  वाहनात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन डोंगर कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.  

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search