IQ टेस्ट – ह्या फोटोमधील ३ वस्तू शोधून काढा.

Image Source: Bright Side
वरील फोटोमध्ये ३ गोष्टी लपलेल्या आहेत. ह्या तीन गोष्टी तुम्ही जर ९ सेकंड मध्ये शोधून दाखल्यात तर तुमचा IQ खूप चांगला आहे असे मानले जाईल.
कोणत्या आहेत ह्या ३ गोष्टी ?
१) स्टार
२) पेन्सिल 
३) पाण्याचा ग्लास

Loading

Facebook Comments Box

जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल केल्यास… माजी खासदार निलेश राणे यांचा इशारा.

   Follow us on        
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील टोलवसुली बाबत माजी  खासदार निलेश राणे यांनी एक विधान केले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना प्रशासन जर जबरदस्तीने टोल सुरू करत असेल तर पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असा इशारा देतानाच, प्रशासनाने आधी जनतेचे प्रश्न, म्हणणे जाणून घ्यावे, ते सोडवावेत आणि मगच टोल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभेचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.
ट्विटर च्या माध्यमातून पण त्यांनी आपली नाराजी  व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामर्गावरील हातिवले टोल नाका येथे म्हणजेच अगदी टोलच्या आजूबाजूला देखील काम पूर्ण झालेले नाही, रायगड जिल्ह्यात देखील काम अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकणाचे काम केवळ 60 टक्केच झाले आहे. त्यामुळे काम अपूर्ण असताना टोल सुरू करणे ही जनतेवर जबरदस्ती आहे. जनतेने एकदा याबाबत निवेदनही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या प्रशासनाने ऐकून घ्यायला हव्यात. टोल ला आमचा विरोध नाही मात्र काम अपूर्ण असताना, जनतेचे प्रश्न नसोडवता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता जर जबरदस्तीने अचानक टोल सुरू करू नये. भविष्यात जनता रस्त्यावर उतरली तर याला कोण जबाबदार? असा प्रश्न देखील निलेश राणे यांनी केला आहे. जनतेच्या मागण्या ऐकून घेऊन मग टोल बाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.

 

Loading

Facebook Comments Box

कोकणरेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाड्या! उद्यापासून आरक्षण चालू..

   Follow us on        

Konkan Railway News :प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर चार हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात पर्यटनाचा हंगाम चालू आहे, तसेच येत्या ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याला येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक ०४.१२.२०२२ रोजी सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर चालू होणार आहे.

खालील गाड्या अतिरिक्त शुल्कासह चालविण्यात येणार आहेत.
1) Train No 01453/01454 LTT – MANGALURU – LTT Special Weekly 
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळरू जंक्शन ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01453
S.N. Station Name TIME Day
1 LOKMANYATILAK T 22:15 1
2 THANE 22:38 1
3 PANVEL 23:40 1
4 ROHA 01:10 2
5 KHED 02:30 2
6 CHIPLUN 02:54 2
7 SANGMESHWAR 03:22 2
8 RATNAGIRI 03:55 2
9 KANKAVALI 05:40 2
10 SINDHUDURG 05:54 2
11 KUDAL 06:06 2
12 SAWANTWADI ROAD 06:28 2
13 THIVIM 07:02 2
14 KARMALI 07:24 2
15 MADGAON 08:45 2
16 KARWAR 09:38 2
17 GOKARNA ROAD 10:12 2
18 KUMTA 10:34 2
19 MURDESHWAR 11:12 2
20 BHATKAL 11:28 2
21 MOOKAMBIKA ROAD 11:42 2
22 KUNDAPURA 13:02 2
23 UDUPI 13:40 2
24 MULKI 14:32 2
25 SURATHKAL 15:02 2
26 MANGALURU JN 17:05 2
ही गाडी 09 डिसेंबर 2022 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान दर शुक्रवारी चालविण्यात येणार आहे.
Train No 01454
S.N. Station Name Time Day
1 MANGALURU JN 18:45 1
2 SURATHKAL 19:40 1
3 MULKI 19:52 1
4 UDUPI 20:14 1
5 KUNDAPURA 21:02 1
6 MOOKAMBIKA ROAD 21:26 1
7 BHATKAL 21:44 1
8 MURDESHWAR 22:00 1
9 KUMTA 22:30 1
10 GOKARNA ROAD 22:52 1
11 KARWAR 23:22 1
12 MADGAON 00:30 2
13 KARMALI 01:02 2
14 THIVIM 01:24 2
15 SAWANTWADI ROAD 01:52 2
16 KUDAL 02:24 2
17 SINDHUDURG 02:36 2
18 KANKAVALI 02:52 2
19 RATNAGIRI 05:55 2
20 SANGMESHWAR 06:52 2
21 CHIPLUN 07:42 2
22 KHED 08:12 2
23 ROHA 12:00 2
24 PANVEL 13:10 2
25 THANE 13:50 2
26 LOKMANYATILAK T 14:25 2
ही गाडी 10 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान दर शनिवारी चालविण्यात येणार आहे.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०3 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 +असे मिळून एकूण  17 डबे
2) Train No 01455/01456 LTT – MADGAON Jn – LTT Special Weekly 
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01455
S.N. Station Name  Time Day
1 LOKMANYATILAK T 22:15 1
2 THANE 22:38 1
3 PANVEL 23:40 1
4 ROHA 01:10 2
5 MANGAON 01:38 2
6 KHED 02:40 2
7 CHIPLUN 03:04 2
8 SANGMESHWAR 03:40 2
9 RATNAGIRI 04:20 2
10 RAJAPUR ROAD 05:14 2
11 VAIBHAVWADI RD 05:30 2
12 KANKAVALI 06:06 2
13 SINDHUDURG 06:24 2
14 KUDAL 06:38 2
15 SAWANTWADI ROAD 07:02 2
16 THIVIM 07:42 2
17 KARMALI 08:06 2
18 MADGAON 10:30 2
ही गाडी 1 जानेवारी 2023 रोजी रविवारी चालविण्यात येणार आहे.
Train No 01456
S.N. Station Name Time
1 MADGAON 11:30
2 KARMALI 12:02
3 THIVIM 12:24
4 SAWANTWADI ROAD 13:12
5 KUDAL 13:36
6 SINDHUDURG 13:50
7 KANKAVALI 14:12
8 VAIBHAVWADI RD 14:38
9 RAJAPUR ROAD 14:54
10 RATNAGIRI 16:30
11 SANGMESHWAR 17:02
12 CHIPLUN 17:52
13 KHED 18:22
14 MANGAON 20:02
15 ROHA 21:20
16 PANVEL 22:30
17 THANE 23:03
18 LOKMANYATILAK T 23:45
ही गाडी 2 जानेवारी 2023 रोजी सोमवारी चालविण्यात येणार आहे.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०3 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 +असे मिळून एकूण  17 डबे

Loading

Facebook Comments Box

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी केल्या जाणार्‍या खर्चावर मर्यादा

Grampanchayat Election 2022– येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चमर्यादा निश्चित केली आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्य संख्येच्या आधारावर प्रचारासाठी खर्चाची मर्यादा २५ हजार ते पावणेदोन लाख रुपयापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा :ग्रामपंचायत निवडणुक – रत्नागिरी जिल्हय़ात तीन दिवस मद्यविक्री बंद

सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी प्रचाराची खर्चमर्यादा २५ हजार ते ५० हजारांच्या मर्यादित आहे. तर सरपंच पदाच्या उमेदवारास ही खर्चमर्यादा ५० हजार ते १.७५ लाख एवढी आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र बॅंकखाते उघडणे अनिवार्य आहे. खर्चाच्या हिशेबात स्पष्टता असणे गरजेचे आहे. निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च उमेदवारांना सादर करावा लागणार आहे.

Loading

Facebook Comments Box

कोंकण रेल्वेमार्गावर अजून एक गाडी LHB कोचसहित धावणार

   Follow us on        
konkan Railway News :कोंकण रेल्वेमार्गावर धावणारी अजून एक गाडी आता आरामदायक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) सहित धावणार आहे. १९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर हि गाडी २० डिसेंबर पासून नव्या लाल, पांढऱ्या रूपासह रुळावर धावताना दिसणार आहे. सध्या हि गाडी IRS डब्यांसहित चालवली जात आहे.
ह्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत पण खालीलप्रमाणे बदल केला आहे.
जनरेटर कार  – ०१ + एसलआर  –  ०१ + सेकंड सीटिंग – ०३  + स्लीपर – ०८ + थ्री टायर एसी – ०६ + टू टायर एसी – २ + पॅन्टरी कार – ०१  असे मिळून एकूण २२ डबे
ह्या गाडीचे मडगाव पर्यंतचे कोकणातील थांबे 
वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थिवीम आणि मडगाव
एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोच ची वैशिष्ट्ये 
LHB Coach
  • एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असतात.
  • मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे गाडीचा वेगही वाढतो.
  • इतर कोचच्या तुलनेत एलएचबी कोचची लांबी ही १.५ मी. जास्त असल्याने त्यात स्लीपर आणि थ्री टायर एसी डब्यात  ८ बर्थ जास्त बसतात तर टू टायर एसी डब्यात ४ बर्थ जास्त बसतात. त्यामुळे अधिक प्रवासी क्षमता.
  • अधिक सुरक्षित- अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाही त्यामुळे कमी हानी होते.
  • बोगींना डिस्कब्रेक असल्याने सुरक्षितता वाढते.
  • आधुनिक स्वरूपाची प्रसाधने.

Loading

Facebook Comments Box

ग्रामपंचायत निवडणुक – रत्नागिरी जिल्हय़ात तीन दिवस मद्यविक्री बंद

   Follow us on        

Grampanchayat Election News : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या दरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रातील दारूविक्री दिवसभर बंद राहणार अशी सुचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. त्यांच्या आदेशानुसार मद्यविक्री दि. १७, १८, २० डिसेंबरला संपूर्ण दिवसभर बंद राहणार आहे.

हेही वाचा : राज्यात तलाठी भरती होणार.. जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या …

जिल्हय़ात एकूण 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मुंबई मद्य निषेध अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी देशी, विदेशी मद्य, माडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होणार आहेत अशा ग्रामपंचायत क्षेत्रांना मात्र हा आदेश लागु होणार नाही आहे. ह्या आदेशाची अवमानता केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४, ५६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

मुंबई ते मडगाव विशेष शुल्कासह एकेरीमार्गी विशेष ट्रेन

संग्रहित फोटो
   Follow us on        
Konkan Railway News: डिसेंबर महिन्यातील पर्यटन हंगाम, कोकणातील जत्रेला जाणाऱ्या कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
ह्या गाडीचे थांबे 
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमळी.
डब्यांची रचना
१५ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण
विशेष शुल्कासह बुकिंग दि. २.१२.२०२२ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Loading

Facebook Comments Box

मुंबई-गोवा महामार्गावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली सुरू..असे असणार वसुलीचे दर

   Follow us on        

Mumbai Goa Highway News :  मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असताना तसेच अनेक भागात काम सुमार झाले असताना शासनाने ओसरगाव येथील टोल नाक्‍यावरून  ह्या महामार्गावरील वाहतुकीसाठी  टोल वसुली सुरू होणार आहे असे जाहीर केले आहे. आज दिनांक १ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्‍कात ५० टक्‍के सवलत तर अवाणिज्‍य वाहनांना महिन्यासाठी ३१५ रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्‍याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली.

से असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर

  • मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९० रुपये
  • मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १४५ रुपये
  • ट्रक आणि बस (२ ॲक्‍सल) : ३०५ रुपये
  • व्यावसायिक वाहने ३ ॲक्‍सलसाठी : ३३५ रुपये
  • मल्‍टी ॲक्‍सल ४ ते ६ ॲक्‍सल वाहनांसाठी : ४८० रुपये.
  • सात किंवा त्‍याहून जास्त ॲक्‍सल वाहनांसाठी : ५८५ रुपये
  • अवाणिज्‍य प्रकारच्या वाहनांसाठी ३१५ रुपये मासिक पास शुल्‍क

वसुलीचा ठेका राजस्थान येथील गणेशगढीया कन्स्ट्रक्‍शन कंपनीला दिला आहे. सिंधुदुर्ग हद्दीवरील खारेपाटण-राजापूर या दरम्‍यानचा हातीवले टोलनाकाही १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. येथील वसुलीचा ठेका सिंधुदुर्गातील गणेश मांजरेकर यांना दिला आहे.

हेही वाचा : जनआक्रोश सभा ! 2023 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण नाही झाले तर…..

ओसरगाव टोल नाक्‍यावर यापूर्वी १ जूनपासून टोल वसुली होणार होती. त्‍यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका दिला होता; मात्र प्रखर राजकीय विरोधामुळे ही कंपनी वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. त्‍यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तीन महिन्यांसाठी नव्याने वसुलीच्या निविदा मागवल्या. यात टोल वसुली करणाऱ्या कंपन्या निश्‍चित झाल्यानंतर आता १ डिसेंबरपासून महामार्गावरील वाहनचालकांना टोल द्यावा लागणार आहे.

हेही वाचा : पर्यटनाचा हंगाम…कोंकणरेल्वे मार्गावरील ८ गाड्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार

 

 

 

Loading

Facebook Comments Box

राज्यात तलाठी भरती होणार.. जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या …

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचा एक शासन निर्णय जाहीर झाला आहे.  

 

   Follow us on        

Mumbai :राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.

श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.

संपूर्ण जिल्हावार भरली जाणारी पदसंख्या पाहण्यासाठी खालील फाईल ओपन करून शासननिर्णय पहावा.

तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).Pdf







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box

पर्यटन संचालनालयामार्फत महाड येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क सहलीचे आयोजन

   Follow us on        
konkan Tourism News :पर्यटन संचालनालयामार्फत “टूरसर्किट द्वारे” दि.3 व 4 तसेच 7 व 8 डिसेंबर, 2022 या कालावधीत कोकणातल्या महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क एकदिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन, नवी मुंबई या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर वर नमूद तारखांना सोडण्यात येतील.
या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य” या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्विकारण्यात येणार आहे. 
दि.3 व 4 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.1 डिसेंबर,22 पर्यंत व दि.7 व 8 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.5 डिसेंबर,22 पर्यंत करणे अनिवार्य आहे. आगाऊ आरक्षण आणि अधिक माहितीसाठी 9930359384/9421051708 या क्रमांकांवर तसेच [email protected] या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search