CBSE बोर्डमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल (सावंतवाडी) चं घवघवीत यश ; पहिल्याच बॅचचा निकाल १०० टक्के !

 

सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. CBSE बोर्डमध्ये SSC च्या पहिल्या बॅचनं १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.

श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या SSC बॅचनं CBSE बोर्डात १०० टक्के निकालासह बाजी मारली आहे. प्रशालेची ही पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करत जिल्ह्यातील टॉप विद्यार्थ्यांच्या यादीत आपलं नाव कोरल आहे.

प्रशालेमध्ये वेदीका विनायक परब हीन ९५.८३ % गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. देवाशीष प्रसाद महाले यान ९५. ६७ % प्राप्त करत द्वितीय तर देवांग राजेश फोंडेकर यान ९३.०० % गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. दिया साईनाथ वेटे या विद्यार्थ्यांनींन ८९.५० % गुण प्राप्त करून उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. इंग्रजी विषयात वेदीका परब, देवाशीष महाले यांनी १०० पैकी ९८ गुण, हिंदी विषयात देवाशीष महाले, देवांग फोंडेकर, दिया वेटे यांनी १०० पैकी ९९ गुण प्राप्त करत विक्रम रचला. गणित विषयात वेदीकान ९२ तर विज्ञान विषयात ९६, सामाजिक शास्त्रमध्ये ९८ तर IT मध्ये ९९ गुण प्राप्त केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्राचार्य व्यंकटेश बक्षी, शिक्षक प्रियांका डिसोझा, संदीप पेडणेकर, प्राची कुडतरकर, श्वेता खानोलकर, दिपीका कदम यांनी मोलाच मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा सौ. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापक समन्वयक सुनेत्रा फाटक यांनी गुणवंत विद्यार्थ्यी, शिक्षकांसह पालकांचे अभिनंदन केले.

Loading

Facebook Comments Box

जबलपुर – कोईम्बत्तूर सुपरफास्ट विशेष गाडी गणेशोत्सवात धावणार – कोकण रेल्वे

 

गणेशोत्सवादरम्यान कोकणमार्गावर २००+ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. त्याबरोबर जबलपुर – कोईम्बत्तूर सुपरफास्ट विशेष गाडी जी समर स्पेशल म्हणुन ह्या मार्गावर चालविण्यात आली होती ती गाडी गणेशोत्सवात चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

 

 

JBP CBE SPECIAL (02198)

दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर शुक्रवारी चालवली जाईल.

 

CBE JBP SPECIAL (02197)

दिनांक 05/08/2022 ते 30/09/2022 दरम्यान ही गाडी दर सोमवारी चालवली जाईल.

 

डब्यांची स्थिती   AC (1A) – 01 + AC (2A) – 02 +  AC (3A) – 06 + Sleepr – 11 + General – 02 + SLR– 2  = Total 24

 

ह्या गाडीचे आरक्षण सुरु झाले असून सर्व आरक्षण तिकीट विंडो तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग – कुडाळ येथे डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्ग : कुडाळ आणि रत्नागिरी येथे फणस प्रक्रिया प्रशिक्षण च्या यशस्वी आयोजनानंतर मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी असलेल्या डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.

22-23-24 जुलै रोजी हे प्रशिक्षण कुडाळ येथील दुर्वांकुर सभागृहात संपन्न होणार आहे.

फळं, फुलं, भाज्या, मसाल्याचे पदार्थ, हंगामी पीके, मासे अशा अनेक वस्तू डिहायड्रेशन पद्धतीने कशा तयार करायच्या याचं सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात दिले जाणार आहे.

तंत्र एक आणि उद्योगाचे मंत्र अनेक असं डिहायड्रेशनचं महत्व असून आंबा, काजू, फणस, डाळिंब, चिकू, कोकम, नारळ, कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, कडिपत्ता, शेवगा, भोपळा अशा अनेक वस्तूंपासून विविध उत्पादने तयार करता येतात.

या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी कृपया 8767473919 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आलेले आहे.

निसर्गसंपन्न असलेलं कोकण नानाविध फळं, फुलं, भाज्या, औषधी वनस्पती, मासे आणि इतर अनेक गोष्टींनी समृद्ध आहे.अशा या वैभवशाली कोकणातील स्थानिक लोकांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करणे, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे, व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, विविध उद्योग संधी कडे त्यांचे लक्ष वेधणे आणि त्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सातत्याने प्रयत्न करत आहे.

Loading

Facebook Comments Box

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप असा दावा करत लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना काल दिनांक 18/07/2022 रोजी एक विनंतीवजा पत्र लिहून पाठवले आहे

दुसऱ्या कुठल्याही गटाला अशी मान्यता न देण्याचं आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे.

तसेच कोणी असा प्रयत्न केल्यास तातडीने कळवण्याचं आणि आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय न घेण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे समजते.

 

 

Loading

Facebook Comments Box

खेकडा – भजी

हवामान खात्याने कितीही बोंबलून सांगितले तरी, जो पर्यंत गरम गरम कांदा भजी खावीशी वाटत नाही तोपर्यंत मान्सूनला आरंभ झाला आहे असे म्हणता येणार नाही.  हे कुठल्या नियमाच्या पुस्तकात लिहीलेले नाही, पण मराठी माणसाचा ठरलेला शिरस्ता. उकाड्याने हैराण करुन सोडल्यावर निसर्ग पावसाचा शिडकावा सुरु करतो, हळूहळू मान्सून स्थिरावतो मग काही दिवस तो मुक्कामाला राहतो. या दरवर्षीच्या पाहुण्याला मग गरमा गरमा कांदा-भजी चा पाहुणचार हा ठरलेलाच. निमित्त पावसाचे पण चोचले मात्र आपल्या जिभेचे आपण पुरवतो.
गरम गरम कांदा भजी सोबत वाफाळता चहा आणि बाहेर बेभान होऊन बरसणारा पाऊस. हा योग जर शनिवार-रविवार वा सुट्टीच्या दिवशी जुळून आला तर मग काही बघायलाच नको. नाही म्हणायला मुंबई सारख्या मेट्रोसिटी मध्ये प्रत्येक पावसाळा एक हक्काची सुट्टी देऊन जातोच. सकाळी लोकल ट्रेन वगैरे दळणवळणांच्या साधनांनी मान टाकली की सुरुवातीला चाकरमानी बीएमसी वा सरकारच्या नावाने बोट मोडणार, पण काही वेळातच हे सगळे विसरुन अचानक मिळालेल्या या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी प्लॅनींग सुरु करणार, हे नेहमीचेच. बाहेर कंबरभर पाण्यातून कुठे चिकण-मटणाचे शॉप सुरु आहे का याची शोध मोहीम फत्ते करुन किलोभर तरी वशाट घरी येतेच. चिकन-मटण वगैर वगैर…. आता यातील ‘वगैरे-वगैरे’ चा अर्थ तुम्हाला कळला असणारच. जे ‘वगैरे वगैरे’ चे शौकिन असतात ते आपली सोय बरोबर करतातच म्हणा.
पावसात भिजणे, चिकन-मटण, ‘वगैरे-वगैरे’ हे ज्याची त्याची आवड त्याप्रमाणे बेत असतील. पण शाकाहारी-मांसाहारी लोकांचा कॉमन प्लॅन म्हणजे कांदा-भजी आणि वाफाळता चहा. नाही म्हणायला घरात बेसण, कांदा, मिरची, तेल हे पदार्थ असतातच, त्यामुळे कांदा-भजी बनायला काही वेळ लागत नाही. यावर्षी तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठलाय पण त्यामुळे कांदा भजीच्या बेतामध्ये काही विघ्न येईल असे काही वाटत नाही. नाही म्हणायला यंदा मान्सूनचे आगमान जरा लांबले आहेच. कदाचित प्रसार माध्यमात तेलाचे दर लवकरच उतरतील या बातमीमुळे मान्सून जरा विलंब करत असावा. पण मान्सूना तू काय तेलाच्या दराची काळजी करु नको रे बाबा, तू कोसळायला लागलास की तेलाचे वाढलेल्या भावाची फिकीर करण्याचा करंटेपणा कुणी करत बसणार नाही. गरम गरम कांदा भजी, सोबत तळलेली मिरची आणि वाफाळता चहा हा फस्सक्लास बेत यंदाही आपला शिरस्ता तोडणार नाही.
गृहीणींनो माफ करा, पण तुम्हीही हे मान्य करालच म्हणा, बाहेर टपरीवर मिळणाऱ्या कांदा भजीची सर काही घरच्या भजीला येत नाही. मुसळधार पावसात कुठेतरी आडोशाला सुरु असणारी टपरी चालू दिसली की आनंद गगनात मावेनासा होतो बघा. तीथे आपल्या सारखे शौकिन आधीच जाऊन पोहचलेले असतात, ओ मावशी… ओ दादा… असा आजर्व केल्यानंतर आणि अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर एक प्लेट हातात विसावते. सोबत हिरवी मिरची, लाल-हीरवी चटणी, कांद्याची फोड आणि इतर ग्राहकांचे धक्के खात डिश कधी फस्त होते ह कळतच नाही. तेलकट हात ढुंगनाला पुसून पेमेंटची कार्यवाही पूर्ण करता करता.. बायको-पोरांची आठवण  होते, मग भजीच्या दोन पुड्या घरीही पोहचतात.
भजी हा बाराही महिने महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात मिळणारा पदार्थ. पावसाळ्यात याचे महात्म्य जरी वाढत असलं तरी एरव्हीही भज्यांचा फडशा पाडणे चालूच असते. मुंबईत फोर्ट भागात युनिव्हर्सिटी भजी फेमस. दिवसभर बटाटा वड्या सोबतच कांदा भजी व बटाटा भजी कढईतून परातीत आणि परातीतून गिऱ्हाईकांच्या प्लेट मध्ये अविश्रांत प्रवास सुरुच असतो. 1996 मध्ये मुंबईत नोकरीनिमित्त स्थाईक झाल्यावर ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून या भजीचा महिमा कळला. आपण ज्या विद्यापिठातून पदवी घेतली ते विद्यापिठ आपल्या ऑफिसच्या जवळच आहे हे कळण्या अगोदर इथली भजी प्रसिध्द असल्याचे कळले. माझे मुंबईतल्या कारकिर्दीतले पहिले ऑफिस फोर्टमध्ये हुतात्मा चौकात. या हुतात्मा चौकातच प्याओच्या शेजारी दोन भजीचे स्टॉल होते. डोक्यावर टोपी, पांढरा सदरा आणि लेंगा असा अगदी टीपिकल मराठी वेष असलेला भजीवाला, ज्याचे नाव जाणून घ्यायचा मी कधीच प्रयत्न केला नाही, पण मुंबईतील सुरुवातीची तब्बल दोन वर्षे माझ्या नाष्ट्याची व्यवस्था करत होता. दिड-दोन रुपयात गरमा गरम भजी, सोबत गोड-तिखट आणि लाल चटणी असा मस्त बेत असायचा. एका प्लेटमध्ये खोबऱ्याचे तुकटेही ठेवलेले असायचेत. एक प्लेट भजी व दोन पाव साठी दोन भजी-पाव पेक्षा जास्त पैसे मोजावे लागता हे मध्यमवर्गीयांचे गणित मलाही माहित असल्याने एक भजीपाव संपला की दुसऱ्याची ऑर्डर द्यायची, दोन्ही भजी-पाव संपवून तीथेच प्याओचे थंडगार पानी पिऊन स्वारी जवळच असलेल्या आपल्या कार्यालयात जाऊन विसावायची. 
शिवडी स्टेशनच्या बाहेर पण मस्त भजी-पाव मिळायचा, कदाचित अजूनही मिळत असेल पण गेली कित्येक वर्षे त्या भागात जाणे झाले नाही. नवी मुंबईत मानसरोवर स्टेशनच्या बाहेर मोटर बाईक पार्किंगच्या बाजूला एक हातगाडी उभी असायची. या ताईंच्या हातच्या भजी-पावाचा मोह मला काही आवरता येत नसे. ‘संजू वजन प्रमाणाच्या बाहेर गेलाहा, आता भजी-पाव वगैर सगळाच बंद’…. असं व्हिटी स्टेशनपासून स्वत:लाच समजावणारा मी, आज त्या गाडीकडे ढुंकूणही बघणार नाही असा दृढ निश्चय करायचो. पण बाईक काढण्यासाठी त्या पार्किंग एरियात घुसताना बटाटा भजीचा सुंगध नाकात पोचायचाच आणि माझा सगळा दृढ निश्चय गळून पडायचा. कधी भजी थंड असेल किंवा संपली असेल तर माझा पडलेला चेहरा बघून त्या ताई माझ्यासाठी खास भजी तळून द्यायच्या. त्यांच्याकडचा वडा-पावही सुंदर असायचा पण मला मोह मात्र भजी-पावचाच. नंतर अस्मादिकांची बदली नवी मुंबईत झाल्याने कारने घर ते ऑफिस आणि परत असा प्रवास सुरु झाला आणि भजीच्या स्टॉलचा संपर्क तुटला. (अर्थात त्यामुळे वजन वाढण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही ही बाब अलहीदा.)
नाही म्हणायला गेल्या वर्षी ऑफिसच्या दौऱ्यावर जात असताना कसाऱ्याला माझ्या एका सहकाऱ्याने मला कांदा भजी चारली होती. स्वाद उत्तम होता पण अंमळ महागच वाटली. भाषेत काय गंमत असते बघा. प्रत्येक प्रांतातल्या भाषेचा गोडवा अवीट असतो. आता हा ‘चारली’ शब्द मला एवढा आवडला की त्याचा उल्लेख इथे करावाच लागला. याच दिवशी मला अजून शब्दाचा अनुभव आला. थोडं विषयांतर होतय पण तुमच्याशी शेअर करायचला नक्की आवडेल. या सहकाऱ्याने अस्मादिकांना त्या दिवशी घरी आग्रहाचे जेवणाचे निमंत्रण दिले. आग्रह काही मोडता येत नव्हता, सहकाऱ्याच्या सौभाग्यवतीने आम्ही घरी पोहचायच्या आत जेवण तयार ठेवले होते. दौरा पुढे कन्टयूनू करायचा असल्याने मला घाई होतीच. त्यांच्या घरी पोहचल्यावर लगेच ताट पुढे आले. आग्रह करुन करुन ताटात जेवण वाढलं जात होत, एवढ्यात एक प्रश्न येऊन थडकला..’साहेब कशी वाटली भाजी?’ अस्मादिक उडालोच, ताटात पुन्हा पुन्हा निरखून पाहू लागलो, नाही माझं काहीच चुकत नव्हते पूर्ण नॉन-व्हेज जेवण असताना, भाजी आवडली का? असा प्रश्न का आला हे मला काही समजेना. पण ‘भाजी’ म्हणजेच ‘चिकन’ हे कळल्यावर मात्र मला महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात असलेल्या भाषेची अजून एक गंमत कळाली.
असो, आपण पुन्हा आपल्या भजी-पुराणाकडे वळूया. भज्यांबद्दल लिहीत असताना अस्मादिकांच्या वेंगुर्ल्यातील भज्यांचा उल्लेख झाला नाही तर तो वाचकांवर अन्यायच होईल. तर, रामेश्वर मंदिराच्या शेजारची रेडकरांकडील बटाटा भजी, आबा कुळकरांकडची भजी, बोक्याच्या हॉटेलातील भजी, केळजीच्या हॉटेलातील भजी, फटू कडची भजी, तृप्ती हॉटेलातील भजी … नावं काही संपतत नाहीत. वेंगुर्ल्याहून मुंबईला स्थायिक होण्यापूर्वी आमच्या घरा शेजारी डेऱ्याचे हॉटेल सुरु झाले होते. मी त्यांच्या हॉटेलात त्यावेळी गेलो होतो ते त्यांच्याकडची पातळ भाजी आणि पाव खायला. पुढे या हॉटेलने  वेंगुर्ल्यात बराच जम बसवला. अलीकडे मी इथे एका बिल्डराकडून फ्लॅट खरेदी केला. तेंव्हा त्या कॉम्लेक्सच्या पत्त्यात ‘डेरे हॉटेलच्या बाजूला असा उल्लेख पाहून’ आता त्या हॉटेलचे वेंगुर्ल्यात काय स्थान असेल याची कल्पना आली असेलच.
मुंबईला स्थायिक झाल्यावर आई हयात असताना जेंव्हा जेंव्हा मी वेंगुर्ल्याला जायचो, तेंव्हा आई या हॉटेलातून मला खाऊ म्हणून भज्याची पुडी आणून द्यायची. पुढे यात माझा चिरंजीव वाटेकरी झाला. मायेने आणलेल्या भजीच्या पुडीचा खाऊ खाल्ला नाही असा महाराष्ट्रीयन तुरळच भेटेल. विषेशत: खेडेगावात आणि छोट्या शहरात, बाजारातून येताना नाक्यावरुन पोरांना भजीची पुडी आणली जायची. पूर्वी पानात बांधून मिळणारी भजी आमच्या लहाणपणीच वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळून दिली जावू लागली. तेलकट झालेला तो पेपर आणि त्यावर गुंडाळलेला दोरा, पूडी हातात मिळाल्यावर पोरं त्यावर तुटून पडायचीत. ‘बाहेरचे खायचं नसतं, मी घरात बनवून देईन तुम्हाला भजी’ असे घरातल्या जाणत्या स्त्रीचे शब्द कानावर पडेपर्यंत हातात फक्त तेलकट कागद आणि दोरा शिल्लक उरायचा. पण त्या भजीच्या पुडीत असलेले प्रेम आणि बाहेरची खायची हौस ही त्यावेळच्या पिढीची एक रम्य आठवण.
कांदा-भजीला खेकडा-भजी हे पडलेले नाव तेवढेच गमतीदार वाटते. असो, हे भजी पुराण जेवढं लिहू तेवढं रंगतच जाणार, पण आता आवरतं घ्यावच लागणार. ते बघा हा लेख वाचता वाचता दादा भजीच्या टपरीवर पोहचले सुध्दा. ताईंच्या डाव्या हातात मोबाईल आणि उजवा हात बेसनाच्या डब्यात पोहचलाय. अरे.. भाऊंनी रुमाल काढून मोबाईलची स्क्रीन पुसायला घेतली… राहूंदे भाऊ…. कळतंय आम्हाला, भजी हा विषयच असा आहे.. तोंडाला पाणी आणणारा. आता अजून तुमचा वेळ घेत नाही, अल्पविराम घेतोय. लवकरच भेटू पुढच्या लेखात, धन्यवाद !
संजय गोविंद घोगळे
    (8655178247)
तुम्ही लिहिलेले लेख आमच्या ह्या सदराखाली प्रकाशित करायच्या असतील तर ९३५६९६८४६२ ह्या नंबरवर Whatsapp करा.

Loading

Facebook Comments Box

महाराष्ट्र आगाराच्या ST बसला भीषण अपघात.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. धार येथून ही बस अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading

Facebook Comments Box

गणेशोत्सव दरम्यान मुंबई-मंगळरू मार्गावर अजून ८ विशेष गाड्या

ह्या आधीच गणेशोत्सवादरम्यान कोकणमार्गावर १९८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यात भर म्हणून रेल्वे प्रशासनने मुंबई ते मंगळरू मार्गावरअजून ८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 18 जुलै रोजी चालू होईल.

 

LTT –  MANGLORE JN.  EXPRESS  (01165)

दिनांक 16/08/2022 ते 06/09/2022 दरम्यान ही गाडी दर मंगळवारी चालवली जाईल. ही गाडी रात्री 00:45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईवरून निघेल ती मंगलोरला त्याच दिवशी संध्याकाळी 19:30 वाजता पोहोचेल.

 

डब्यांची स्थिती   AC (1A) – 01 + AC (2A) – 03 +  AC (3A) – 15 + Generator Van – 2 

 

MANGLORE JN. –  LTT EXPRESS  (01166)

दिनांक 16/08/2022 ते 06/09/2022 दरम्यान ही गाडी दर मंगळवारी चालवली जाईल. ही गाडी रात्री 22:20 वाजता मंगलोरवरून निघेल ती  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला 18:30 वाजता पोहोचेल.

 

डब्यांची स्थिती   AC (1A) – 01 + AC (2A) – 03 +  AC (3A) – 15 + Generator Van – 2 

 

ह्या गाड्या  ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला ,गोकर्णा रोड,कुमता, होन्नावर, मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल आणि ठोकूर ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
Related

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच उभे राहणार – मुख्यमंत्री

सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेला तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल, रुग्णांना उपचारासाठी गोवा येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी सर्व अडचणींवर मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत.

सावंतवाडी आणि तळकोकणातील तालुक्यातील लोकांना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जवळपास नसल्याने गोवा बांभूळी येते जावे लागते. कधी कधी वेळीच उपचार न झाल्याने गंभीर रुग्ण दगावतो. दुसरे म्हणजे अंतर जास्त असल्याने रुग्णांसमवेत असलेल्या नातेवाईकांचे खूप हाल होतात. मागे गोवा सरकारने महाराष्ट्रातील रुग्णावर ह्या हॉस्पिटल मध्ये बंदी घातली होती. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी विनंती करून ही सेवा पुन्हा चालू करायला लावली. ह्या सर्व गोष्टींमुळे सावंतवाडी येथे एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी जोर धरू लागली होती.

 

Loading

Facebook Comments Box

गणेशभक्तांसाठी खुशखबर – ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही

गेल्या वर्षी गणेशोत्सवात ‘मोदी एक्सप्रेस’ नावाने कोकणसाठी विशेष गाडी सोडण्यात आली होती. गेल्या वर्षी कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यावर नारायण राणे यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. या वर्षीही मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे.
हि विशेष गाडी दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीसाठी सुटणार आहे. हि गाडी चिपळूण,रत्नागिरी, कणकवली या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचा सर्व संपूर्ण खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे.
मुंबईतील प्रत्येक मंडलमधून ५० प्रवाशांची नावे नोंदवण्यात येतील. जिल्हाध्यक्षांची चर्चा करून ही ही नावे नोंदवली जातील. नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
RELATED NEWS

Loading

Facebook Comments Box

MEMU ट्रेन म्हणजे काय?

मेमू म्हणजे “मुख्य मार्ग विद्युत बहू एकक”. शहरी व उपनगरी भागांना जोडणाऱ्या सामान्य ईएमयू गाड्यांच्या तुलनेत भारतीय रेल्वेवर, एमईएमयू ही विद्युत बहू एकक (ईएमयू) गाड्या आहेत ज्या भारतात लघु आणि मध्यम-अंतरांच्या मार्गावरचालविल्या जातात. ह्या गाड्या ओव्हरहेड तारांमधून २५ किलोव्होल्ट प्रत्यावर्ती धारा वापरून चालविण्यात येतात.

या गाड्या पूर्व घाट व पश्चिम घाट दरम्यान २०० किमी (१२० मैल) पर्यंत गतीवर धावू शकतात. रेकची जास्तीत जास्त अनुमत गती रुंदमापी रुळांवर १०५ किमी/ता (६५ मैल/तास) आहे. मोटरकोच डीसी कर्षण मोटर वापरतात. २०१७ मध्ये, आयसीएफने १६०० एचपी मेधा डेमू वास्तुकलावर आधारित एलएचबी हायब्रीड एसी-एसी मेमू रेक रवाना केले. हे रेक असंकालिक कर्षण मोटर वापरतात आणि त्यांची कमाल संकल्पित गती ११०किमी / ता आहे. हे निष्कलंक स्टीलचे डब्बे असतात. त्यापैकी दोन दक्षिण मध्य रेल्वेवर कार्यरत आहेत .

इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०-१३० किमी / ता वर धावण्यास सक्षम नवीन मेमू सुरू केले. प्रति युनिट निर्माणाची किंमत २६ कोटी रुपये असून ते २,६१८ प्रवासी वाहवून नेऊ शकतात. या ट्रेनमध्ये तीन फेज कर्षण मोटर आहे आणि २५ किलोवोल्ट करंटवर चालते जी ३५% उर्जा वाचवते. यात जीपीएस- आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि कोचमध्ये घोषणा प्रणाली उपलब्ध आहे. यात डबल लीफ स्लाइडिंग दरवाजे, गँगवे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अ‍ॅल्युमिनियम सामान रॅक आहेत.चालकाच्या केबिनमध्ये एसी असून प्रशिक्षकामध्ये आपत्कालीन संप्रेषणाची सुविधा आहे. या गाड्या उत्तर प्रदेशात २००–३०० किमी (१२०–१९० मैल) अंतर असेलेल्या शहरांमध्ये चालण्यासाठी संकल्पित केलेल्या आह. ही सेवा फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होऊ शकेल.

१९९ ० च्या दशकात भारतीय रेल्वेने १० फूट ८ इंच (३,२५० मिमी) रुंदीचे मेमू यान बांधले. १५ जुलै १९९५ रोजी आसनसोल – आद्रा विभाग आणि २२ जुलै १९९५ रोजी खडगपूर – टाटा विभागात यांची सेवा सुरू झाली. १७ ऑक्टोबर १९९५ रोजी रायपूर – दुर्ग – भाटापारा – रायपूर – बिलासपूर मार्गावर मेमू सेवेचे प्रारंभ झाला. २०१७ मध्ये प्रथम २० डब्ब्यांची मेमू सूरत ते विरार दरम्यान धावले. २०१८ मध्ये, इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०–१३० किमी/ता (६८–८१ मैल/तास) गतीवर धावण्यास सक्षम नवीन मेमूची सुरुवात केली

भारतीय रेल्वे हळूहळू सर्व लोहायंत्राने ओढलेल्या मंद आणि वेगवान प्रवासी आणि अंतर शहरी ट्रेनच्या जागी ईएमयू सेवा सुरू करत आहे. श्रेणीसुधारित केलेल्या गाड्यांना पुन्हा मेमू म्हणून चालविल्या केले जाते.

साभार – विकिपीडिया

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.