रत्नागिरी : कालची बातमी मीडियाकडून चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे. जनतेला घटनास्थळी नेमके काय घडले होते हे सांगण्यासाठी मी हा विडिओ पोस्ट करत आहे असे आज माजी खासदार निलेश राणे हे म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या बोलण्याच्या पूर्ण विडिओ आज ट्विटर वर पोस्ट केला आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप होता कि माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याने शिवी घातली, कदाचित अनावधानाने असा प्रकार घडला असेल त्यामुळे मी माफी मागितली. मी माघार घेतली कारण ती सर्व आपलीच माणसे होती आणि काही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ नये आम्ही थोडे नमते घेतले, कारण काही विपरीत घडले असते तर माझ्या त्या आई बहिणींवर केसेस पडल्या असत्या आणि मला ते नको होते, म्हणून मी हात जोडलेत. एवढेच नाही तर मी त्यांना तुम्ही मला बोलवाल तिथे मी चर्चेसाठी यायला तयार आहे. त्यांचे ते आंदोलन यशश्वी झाले असून पूर्ण देशभर पोहोचले आहे त्यामुळे आता त्यांनी हे आंदोलन थांबवावे ह्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. पण हि सर्व बातमी काहीश्या चुकीच्या पद्धतीने मीडिया वर दाखवली गेली होती त्यामुळे मला हा विडिओ पोस्ट करावा लागला आहे असे ते म्हणाले आहेत.
![]()













