Konkan Railway | ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी हंगामाचे आरक्षण अखेर सुरु; मात्र फेऱ्यांमध्ये कपात

   Follow us on        

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील तीन नियमित गाडया रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत १० जून नंतर रद्द (Train  Cancelled )दाखवत होत्या. रेल्वेने या संदर्भात कोणतेही प्रसिद्ध जाहीर केले नसल्याने असल्यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. एलटीटी मडगाव एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत रद्द दाखवत गेल्या होत्या. काही दिवसानंतरच गणेश चतुर्थीचे आरक्षण सुरु होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या गाड्या आरक्षण प्रणालीत ऍक्टिव्ह दाखवाव्यात अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे आरक्षण या प्रणालीत दाखवले आहे. मात्र पावसाळी हंगामात या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.

अधिक तपशील खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे. 
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे. 
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
या सर्व गाड्यांचे वेळापत्रकही बदलून पावसाळी वेळापत्रकानुसार या गाड्या चावलेण्यात येणार आहेत.
टीप: सदर माहिती अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा ही विनंती 

Loading

Facebook Comments Box

अंबरनाथ – बदलापूरात पुढील दोन दिवस पाण्याचे ‘वांदे’

   Follow us on        

बदलापूर दि. २५ एप्रिल : बदलापुर आणि अंबरनाथ येथील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात उद्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार २६ एप्रिल सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

गेल्याच आठवड्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला होता. त्यात तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उंच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच येत्या शुक्रवारी उल्हास नदी किनारच्या खरवई येथील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथे नवी पाणी उपसा यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्यातील सुधारणा करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहे. त्यासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल.

 

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून विशेष गाडी; एकूण ३६ फेऱ्या

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी  एक खुशखबर आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने TOD (Train on Demand) तत्वावर या कोकण रेल्वे मार्गावर  लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी या दरम्यान एक एसी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
१) ०१०१७/०१०१८ एलटीटी  – थिवी – एलटीटी ट्राय वीकली विशेष. 
०१०१७ लोकमान्य टिळक टर्मिनसहून २६.०४.२०२४ ते ०४.०६.२०२४ पर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री २२:१५ ला सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० ला थिवीला पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत.
०१०१८ थिवीहून २७.०४.२०२४ ते ०५.०६.२०२४ पर्यंत प्रत्येक शनिवार, सोमवार आणि बुधवारी संध्याकाळी १६:३५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ ला लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड
डब्यांची सरंचना : १५ एसी थ्री टायर इकॉनॉमी, २ जनरेटर व्हॅन

 

Loading

Facebook Comments Box

प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे देत आहे फक्त २० रुपयांत जेवण

   Follow us on        
Indian Railway News:आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते. परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेन जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.
उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशनच्या मदतीने जनरल डब्ब्यामध्ये स्वस्त दरामध्ये जेवण आणि नास्ता दिला जाणार आहे. रेल्वेत परवडणारे जेवण 20 रुपयांत असणार आहे. तसेच 50 रुपयांत जेवण मिळणार आहे.
जेवणात काय काय असणार?
सर्वसामान्य डब्यांजवळ रेल्वे स्थानकावर असलेल्या काउंटरवर हे जेवण मिळणार आहे. त्यात
20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या इकोनॉमी जेवणात सात पुऱ्या (175 ग्रॅम), बटाट्याची भाजी (150 ग्रॅम) आणि लोणचे देणार आहे. तर 50 रुपयांत (कॉम्बो पॅक) मिळणाऱ्या जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे. 350 ग्रॅम हे जेवण असणार आहे. सर्वसाधारण प्रवाशांना परवडणाऱ्या या जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे.

Loading

Facebook Comments Box

सावधान: रत्नागिरी जिल्हय़ात बनावट नोटा चलनात; फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्याल?

   Follow us on        

खेड दि. २४ एप्रिल: खेड बाजारपेठेत बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी भरणे येथील पेट्रोल पंपावर 500 रुपयाच्या तीन नोटा आढळून आल्या. मात्र या नोटा कोणाकडून आल्यात हे समजले नाही आहे. अशा अजुन बनावट नोटा चलनात असून पैसे घेताना नोटा व्यवस्थित तपासून न घेतल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. जेव्हा ती नोट दुकानात किंवा बँकेत दिली जाईल तेव्हाच समोराचा जर तुम्हाला म्हणाला तर ती खोटी आहे तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नोटा खऱ्या की खोट्या त्या कशा ओळखाल? 

500 रुपयांच्या नोटा कशा ओळखायच्या याबाबत RBI ने काही खाणाखुणा सांगितल्या आहेत. 21 वेगवेगळ्या गोष्टी पडताळून तुम्ही नोट खरी आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. यामध्ये अगदी छोटं अंतर असतं पण ते कळणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.

2000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही या पायऱ्या फॉलो करू शकता:

वॉटरमार्क पहा: नोट प्रकाशापर्यंत धरून ठेवा आणि टिपेच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा वेगळा वॉटरमार्क तपासा.

सुरक्षा थ्रेड सत्यापित करा: प्रत्येक नोटमध्ये एक सुरक्षा थ्रेड एम्बेड केलेला असतो. नोट प्रकाशापर्यंत धरा आणि सुरक्षा धागा दृश्यमान आणि अखंड असल्याची खात्री करा.

रंग बदलणारी शाई तपासा: नोटांच्या काही भागांमध्ये रंग बदलणारी शाई असते जी झुकल्यावर रंग बदलते. सत्यता सुनिश्चित करण्यासाठी हे वैशिष्ट्य सत्यापित करा.

पोत अनुभवा: अस्सल नोट्समध्ये एक वेगळा पोत असतो जो पृष्ठभागावर तुमची बोटे चालवून जाणवू शकतो.

खालील 21 गोष्टी तुम्हाला बनावट नोट आणि खरी नोट यातील फरक ओळखायला मदत करेल. 

1 मूल्यवर्ग Denomination क्रमांकासह नोंदणी

2 मूल्यवर्ग संख्या असलेली अव्यक्त प्रतिमा

3 देवनागरी मधील मूल्यवर्ग अंक

4 मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र

5 नोटेच्या डाव्या बाजूला ‘RBI’ आणि Rs 2000′ अशी सूक्ष्म अक्षरे

6 देवनागरी, RBI मधील शिलालेख ‘भारत’ आणि कलर शिफ्टसह अंकांसह विंडो सुरक्षा धागा. नोट वाकलेली असताना थ्रेडचा रंग हिरव्या ते निळ्यामध्ये बदलतो

७ गॅरंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉजसह गव्हर्नरची स्वाक्षरी आणि उजवीकडे RBI चिन्ह

८ महात्मा गांधींचे पोर्ट्रेट आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क

9 संख्या पॅनेल ज्यामध्ये वरच्या डाव्या बाजूला आणि खालच्या उजव्या बाजूला लहान ते मोठ्या संख्येपर्यंत वाढत आहेत

10 रुपयाच्या चिन्हासह मूल्यवर्ग अंक, खाली उजवीकडे रंग बदलणारी शाई (हिरवा ते निळा)

11 उजवीकडे अशोक स्तंभाचे प्रतीक

12 उजवीकडे 2000 रु.च्या वरच्या प्रिंटसह क्षैतिज आयत

13 उचललेल्या प्रिंटमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला सात कोनीय ब्लीड रेषा

14 डावीकडे नोट छापण्याचे वर्ष

15 स्लोगनसह स्वच्छ भारत लोगो

16 भाषा पॅनेल मध्यभागी

17 मंगळयानचे आकृतिबंध

18 उजवीकडे देवनागरीमधील मूल्यवर्ग संख्या

19 उजवीकडे 500 रुपये वाढवलेले प्रिंट असलेले वर्तुळ

20 उंचावलेल्या प्रिंटमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला पाच कोनीय ब्लीड रेषा

21 लाल किल्ला: भारतीय ध्वजासह भारतीय वारसास्थळाची प्रतिमा

ही माहिती शक्य असेल तेवढी शेअर करा जेणेकरून अशा बनावट नोटांद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक टाळता येईल.

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | ऐन उन्हाळी हंगामात कोकण रेल्वेच्या ४९ गाडयांना लागणार ‘लेटमार्क’.

   Follow us on        

Konkan Railway News: दक्षिणेकडील शोरनूर जंक्शन दरम्यान ब्रिज क्रमांक 02 (UP) चे रि-गर्डरिंगचे काम चालविण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे.  हे काम दिनांक  19/04/2024 ते 10/05/2024 पर्यंत चालू असणार आहे. या कामामुळे कोकण रेल्वेच्या तब्बल ४९ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. ऐन उन्हाळी हंगामात या गाडयांना लेटमार्क लागणार असल्याने; प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

  1. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 17/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  2. गाडी क्र. 12218 चंदीगड – कोचुवेली 17/04/2024 रोजी सुरू होणारा एक्सप्रेसचा प्रवास पलक्कड विभागावर 145 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  3. गाडी क्र. 22149 एर्नाकुलम जं. – पुणे एक्स्प्रेसचा 19/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागातून 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  4. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 18/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 100 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  5. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 19/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 100 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  6. गाडी क्र. 12218 चंदीगड – कोचुवेली एक्सप्रेसचा 19/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 80 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  7. गाडी क्र. 19578 जामनगर – तिरुनेलवेली एक्स्प्रेसचा 19/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागातून 50 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  8. गाडी क्र. 22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा 22/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागातून 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  9. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 20/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  10. गाडी क्र. 10215 मडगाव जं. – एर्नाकुलम जं एक्सप्रेसचा 21/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 130 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  11. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 21/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  12. गाडी क्र. 12484 अमृतसर – कोचुवेली एक्स्प्रेसचा 21/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागातून 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  13. गाडी क्र. 22149 एर्नाकुलम जं. – पुणे एक्स्प्रेसचा 23/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागात 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  14. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 22/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 100 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  15. गाडी क्र. 22660 योग नगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेसचा 22/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागातून 80 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  16. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 23/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 100 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  17. गाडी क्र. 20932 इंदूर – कोचुवेली एक्स्प्रेसचा 23/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागातून 50 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  18. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 24/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 100 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  19. गाडी क्र. 12218 चंदीगड – कोचुवेली एक्सप्रेसचा 24/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 80 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  20. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 25/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 210 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  21. गाडी क्र. 20910 पोरबंदर कोचुएवली एक्स्प्रेसचा – 25/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 40 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  22. गाडी क्र. 22653 तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा  प्रवास 27/04/2024 रोजी सुरू होणारा तिरुअनंतपुरम मध्य विभागातून 70 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  23. गाडी क्र. 22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा 29/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागातून 65 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  24. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 27/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 210 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  25. गाडी क्र. 10215 मडगाव जं. – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 28/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 175 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  26. गाडी क्र. 19578 जामनगर – तिरुनेलवेली एक्स्प्रेसचा 27/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागातून 50 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  27. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 29/04/2024 रोजी सुरू होणारा  प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 210 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  28. गाडी क्र. 22660 योग नगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेसचा 29/04/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 235 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  29. गाडी क्र. 22655 तिरुअनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा 01/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागावर 65 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  30. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं एक्सप्रेसचा . 01/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 210 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  31. गाडी क्र. 12218 चंदीगड – कोचुवेली एक्सप्रेसचा 01/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर २१५ मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे..
  32. गाडी क्र. 22149 एर्नाकुलम जं. – पुणे एक्स्प्रेसचा 03/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागात 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  33. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा  02/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 100 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  34. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 03/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 100 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  35. गाडी क्र. 12218 चंदीगड – 03/05/2024 रोजी सुरू होणारा कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास पलक्कड विभागावर 80 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  36. गाडी क्र. 22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा 06/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागातून 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  37. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 04/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  38. गाडी क्र. 10215 मडगाव जं. – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 05/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 130 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  39. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा  05/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  40. गाडी क्र. 12484 अमृतसर – कोचुवेली एक्स्प्रेसचा 05/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागातून 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  41. गाडी क्र. 22149 एर्नाकुलम जं. – पुणे एक्स्प्रेसचा 07/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागात 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  42. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 06/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  43. गाडी क्र. 22660 योग नगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेसचा 06/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागातून 145 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  44. गाडी क्र. 22655 तिरुअनंतपुरम सेंट्रल – H. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा 08/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागावर 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  45. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 07/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  46. गाडी क्र. 22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा 09/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागातून 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  47. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा 08/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 150 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  48. गाडी क्र. 12218 चंदीगड – कोचुवेली एक्सप्रेसचा 08/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास कोकण रेल्वे / पलक्कड विभागावर 145 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
  49. गाडी क्र. 22149 एर्नाकुलम जं. – पुणे एक्स्प्रेसचा 10/05/2024 रोजी सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम मध्य विभागातून 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.

Loading

Facebook Comments Box

उदय सामंत व किरण सामंत यांचा राणेंना पाठिंबा.. मात्र शिवसैनिक नाराज, राजीनामा सत्र चालू

रत्नागिरी, दि.१९ एप्रिल: नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली असल्याने शिंदे गटातील काही कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे (Narayan Rane) यांना आपला पाठिंबा जाहीर केला असूनही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
इतकंच नाही तर रत्नागिरी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा सत्र ही चालू केले आहे.  युवा सेनेच्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. याची देखील राजकारणात चर्चा होऊ लागली आहे.त्यामुळे सामंत बंधू आपल्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहावं लागेल.

Loading

Facebook Comments Box

येथे येतो मालदीवचा फील; कोकणातील पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्याला तुम्ही भेट दिलीत का?

Konkan Tourism: मालदीव, थायलंड सारखे देश तेथील पांढऱ्या आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासांठी प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बजेट मध्ये तोच फील आपल्याच देशात मिळवता येईल अशीही बीचेस आपल्या कोकणात आहेत. त्यात अजूनही कित्येक पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये नसलेले कुडाळ मधील निवती  बीचचा समावेश होतो.
या समुद्रकिनाऱ्यावर बसून निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभताना रोजचे ताण तणाव कुठल्याकुठे विरघळून जातात.  किनाऱ्यावरची नारळी-पोफळी आणि सुपारीची झाडं दौलत मिरवत उभी आहेत.  सूर्योदय आणि सूर्यास्त असे सृष्टीतले दोन्ही उत्कट सोहळे अनुभवण्याची उत्तम ठिकाणं म्हणजे निवती समुद्र किनारा. येथे पांढरी रेती आहे. सुमद्राचा तळही दिसेल, इतकं स्वच्छ आणि निळंशार पाणी असा हा समुद्र किनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आणि खाडीच्या अनोख्या संगमातून तयार झालेलं अद्भूत सौंदर्य म्हणजे निवती समुद्र किनारा.
कसे पोहोचायचे:
निवती हे राज्याच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे आणि राष्ट्रीय महामार्गापासून (NH 66) फक्त 20 किमी अंतरावर आहे. कुडाळ येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वरून उतरणे आवश्यक आहे जिथून निवती अंदाजे 20 किमी आहे. मालवण आणि वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या रस्त्यानेही मालवणहून निवतीला जाता येते.
कोल्हापूर ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
कोल्हापूर-गगनबावडा-कणकवली-कुडाळ-निवती
पुणे ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
पुणे – सातारा – उंब्रज (साताऱ्यापासून 35 किमी) – चिपळूण – कणकवली – कुडाळ – निवती
मुंबई ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
मुंबई-पनवेल-पेण-खेड-चिपळूण-कणकवले-कुडाळ-निवती
Enter map content here..

Loading

Facebook Comments Box

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! सीएसएमटी स्थानकावर ३ दिवस मेगाब्लॉक; कोकणरेल्वेच्या दोन एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम

Megablock on Central Railway :छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वे कडून १९,२० आणि २१ च्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक मुळे काही  एक्सप्रेस च्या सेवा दादर स्थानकापर्यंत स्थगित करण्यात येणार आहेत.तसेच या ब्लॉक दरम्यान मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० वेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. सीएसएमटी येथून कासाराकडे जाणारी रात्री १२:१४ वाजताची लोकल शेवटची असेल.
एक्सप्रेस गाड्या दादरपर्यतच
या ब्लॉक मुळे काही गाड्यांची सेवा दादर स्थानापर्यंतच स्थगित करण्यात आली आहे. या गाड्यांत १२०५२ मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२१२० मडगाव सीएसएमटी  तेजस एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाड्या दिनांक  १९,२० आणि २१ एप्रिल रोजी दादरपर्यंच चालविण्यात येणार आहेत.

Loading

Facebook Comments Box

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वृक्षतोड; वनप्रेमींकडून चौकशीची मागणी

   Follow us on        

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीकच्या माभळे येथील शासकीय विश्रामगृहाजवळ वृक्षतोड सुरू आहे. याची वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी येथील वनप्रेमींनी केली आहे.

महामार्गावरील माभळे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वनविभागाकडे पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली तसेच ती झाडे जप्तही केली होती. त्यानंतर पुन्हा झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अवैध असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search