रत्नागिरी कोकण रेल्वेच्या एका स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा वडापावच्या ट्रे वर पाय ठेवून झोपण्याचा प्रकार ताजा असताना येथे एक असाच किळसवाणा प्रकार दुसर्या एका विक्रेत्याकडून घडला आहे. याबाबतचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
चिपळूण स्थानकावर एका विक्रेत्याच्या हातातून भज्यांच्या ट्रे निसटला आणि सर्व भजी जमिनीवर पडली. त्या विक्रेत्याने सर्व भजी पुन्हा त्या ट्रे मधून भरली आणि विकायला पुन्हा निघाला असे त्या विडिओ मध्ये दिसत आहे. एका प्रवाशाने हा विडिओ चित्रित केला आहे.
या प्रकारांमुळे सामान्य लोकांच्या आरोग्याचे या विक्रेत्यांना काहीच देणेघेणे नाही हे समोर येत आहे. प्रवासात लहान मुले अशा खाद्यपदार्थाचा नेहमीच आग्रह धरतात. मात्र अशा प्रकारांमुळे हे पदार्थ मुलांना द्यावेत की न द्यावेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तो विक्रेता खरोखरच ‘ती’ भजी फेकून देणार होता का?
पडलेली भजी भरून झाल्यावर तो विक्रेता तिथून निघाला; मात्र जागरूक प्रवाशांनी त्याला हटकले आणि ती भजी टाकून देणार आहे की नाही ते विचारले. तेव्हा तो विक्रेता हो बोलून पुढे चालायला लागला. मात्र तेथील प्रवाशांनी आरपीएफ कर्मचाऱ्याच्या मदतीने तिथेच जवळ असलेल्या कचराकुंडीत ती भजी फेकायला लावलीत. जर त्या विक्रेत्याला भजी फेकायचीच होती तर ती त्याने तिथेच बाजूला असलेल्या कचराकुंडीत न फेकता पुढे का घेऊन गेला? हा प्रश्न समोर आला आहे.
प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्याचे कौतुक
आपल्या समोर असा अनुचित प्रकार घडताना गप्प न बसता त्या विक्रेत्याला त्याच ठिकाणी जाब विचारला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडून त्याला ताब्यात घेतले. या सर्व घटनेत जागरूकता दाखवल्याबद्दल त्या प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्याचे कौतुक होत आहे.
–Video 👇🏻
Video: कोकण रेल्वेच्या स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; जमिनीवर पडलेली भजी उचलून……
बातमी वाचण्यासाठी लिंक 👇🏻https://t.co/zKXu5ksiie#konkanrailway #chiplun pic.twitter.com/pplCEBXSwW
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) February 16, 2024