Republic Day 2026: महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर; संपूर्ण यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली, २५ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०, अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात.

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी

वीरता पदक (GM)-पोलीस सेवा

१. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

 

२. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

 

३. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

 

४. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

 

५. कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

 

६. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

७. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

८. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

९. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१०. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

११. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१२. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१३. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल

 

१४. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल

 

१५. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल

 

१६. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल

 

१७. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल

 

१८. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल

 

१९. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल

 

२०. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल

 

२१. नरेंद्र दशरथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल

 

२२. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल

 

२३. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

 

२४. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल

 

२५. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल

 

२६. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल

 

२७. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

 

२८. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल

 

२९. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल

 

३०. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

३१. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

१. श्री महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र

 

२. श्री बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र

 

३. श्री सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

४. श्री विठ्ठल खंडुजी कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

सुधारात्मक सेवा

१. श्री विजय बाबाजी परब, सुभेदार

 

२. श्री राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

 

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

१. श्री राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक

 

२. श्री सुधीर कल्ल्या हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक

 

३. श्रीमती शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक

 

४. श्री मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक

 

५. श्री पुरुषोतम नारायण कराड, पोलीस अधीक्षक

 

६. श्रीमती. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

 

७. श्रीमती. नीलम प्रशांत वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक

 

८. श्री अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक (पीए)

 

९. श्री गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक

 

१०. श्री महेश रमेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

 

११. श्री विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

 

१२. श्री समीर नारायण साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त

 

१३. श्री पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक

 

१४. श्री दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक

 

१५. श्रीमती. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक,

 

१६. श्री सुनील शंकर शिंदे, निरीक्षक (PH)

 

१७. श्रीमती. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक (पीए)

 

१८. श्री अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक

 

१९. श्री महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम

 

२०. श्री कैलाश रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम

 

२१. श्री विजय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक

 

२२. श्री भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर

 

२३. श्री नरेंद्र सखाराम राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२४. श्री सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक

 

२५. श्री अफजल खान शहेजादे खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२६.श्री प्रदिप साहेबराव सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२७. श्री सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक

 

२८. श्री प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए)

 

२९. श्री विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक

 

३०. श्री विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक

 

३१. श्री विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक

 

३२. श्री मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक

 

३३. श्री अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक

 

३४. श्री गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक

 

३५. श्री संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक

 

३६. श्री महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर

 

३७. श्री राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक

 

३८. श्री बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक

 

३९. श्री शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक

 

४०. श्री सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

 

अग्निशमन सेवा

१. श्री हरिश्चंद्र वसंत गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

 

२. श्री दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी

 

३. श्री कांचन बंडू पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर

 

४. श्री काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

 

नागरी संरक्षण व होमगार्ड

१. श्री गंगाधर वखाजी वुरकुड, प्लाटून कमांडर

 

२. श्री राजेंद्र मधुकरराव बन्सोड, प्लाटून कमांडर

 

३. श्री नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली, प्लाटून कमांडर

 

सुधारात्मक सेवा

१. श्री अशोक शिवराम करकर, अधीक्षक

 

२. श्री गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक

 

३. श्री राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार

 

४. श्री सुनील भाऊसो लांडे, हवालदार

 

५. श्री प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

Facebook Comments Box

एसटी विश्रामगृहात सापडल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या; प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या चालकांविरोधात परिवहन मंत्र्यांच्या कडक निर्णय

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या चालक आणि इतर कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय न करता त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान, विश्रांतीगृहामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि काही कर्मचाऱ्यांकडून येणारी दुर्गंधी पाहून मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “अशा प्रकारचे कृत्य केवळ शिस्तभंग नसून प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा धोकादायक प्रकार आहे,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले.

​यापुढे एसटी महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः चालकांची, कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ ॲनालायझरद्वारे (Breath Analyzer) चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या चाचणीत दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले जाईल. तसेच, अशा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. परळ बसस्थानकातील अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधांसाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून, प्राप्त अहवालाच्या आधारे दोषींवर बडतर्फीपर्यंतची कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रजासत्ताक दिनानिमित्त चिपळूण-पनवेल दरम्यान धावणार ‘अनारक्षित मेमू विशेष गाडी’

   Follow us on        

चिपळूण: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे प्रशासनाने सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी चिपळूण आणि पनवेल स्थानकांदरम्यान एक दिवसाची ‘अनारक्षित मेमू विशेष गाडी’ (Unreserved MEMU Special) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग (गाडी क्र. ०११६० / ०११५९):

​१. चिपळूण ते पनवेल (गाडी क्र. ०११६०):

ही गाडी २६ जानेवारी रोजी सकाळी ११:०५ वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल. प्रवासादरम्यान विविध स्थानकांवर थांबत ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ०४:१० वाजता पनवेल स्थानकावर पोहोचेल.

​२. पनवेल ते चिपळूण (गाडी क्र. ०११५९):

परतीच्या प्रवासात ही गाडी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ०४:४० वाजता पनवेल स्थानकातून सुटेल आणि रात्री ०९:५५ वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

​प्रमुख थांबे:

​ही मेमू विशेष गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण आणि पनवेल दरम्यानच्या बहुतांश स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील स्थानकांचा समावेश आहे:

​अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमटणे.

​प्रवाशांसाठी आवाहन:

​ही गाडी पूर्णपणे ‘अनारक्षित’ (Unreserved) स्वरूपाची असल्याने, प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येईल. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

Mumbai Local: हार्बर मार्गावर उद्यापासून धावणार १४ एसी लोकल फेऱ्या

   Follow us on        

मुंबई: मुंबईकरांचा आणि विशेषतः नवी मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर पुन्हा एकदा वातानुकूलित (AC) लोकल सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या, म्हणजेच २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हार्बर मार्गावर एकूण १४ एसी लोकल फेऱ्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यामध्ये ७ ‘अप’ आणि ७ ‘डाऊन’ फेऱ्यांचा समावेश असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), वडाळा रोड, वाशी आणि पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान या सेवा चालवण्यात येतील.

​या नवीन वेळापत्रकानुसार, दिवसाची पहिली एसी लोकल पहाटे ४:१५ वाजता वाशीहून वडाळा रोडसाठी सुटेल, तर शेवटची फेरी रात्री ८:०० वाजता CSMT हून पनवेलसाठी रवाना होईल. या सेवा सध्या सुरू असलेल्या साध्या लोकल फेऱ्यांच्या जागीच चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी (Peak Hours) या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्याने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या १४ सेवा केवळ सोमवार ते शनिवार या कालावधीतच एसी म्हणून धावतील; रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या फेऱ्या साध्या लोकल म्हणून चालवण्यात येतील.

​हार्बर मार्गावर यापूर्वी एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद कमी असल्यामुळे काही सेवा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, वाढते शहरीकरण आणि उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता प्रवाशांकडून एसी लोकलची मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रवाशांसाठी सुखद धक्का मानला जात आहे. या फेऱ्यांमुळे पनवेल-मुंबई दरम्यानचा प्रवास आता अधिक थंडगार आणि आरामदायी होणार आहे.

Facebook Comments Box

अभिमानास्पद! केंद्र सरकारच्या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये कोकणातील निर्मनुष्य बेटावरील ध्वजारोहणाला स्थान

   Follow us on        

सिंधुदुर्ग: देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या कामगिरीची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्याने ‘निवती रॉक’ या निर्मनुष्य बेटावर केलेल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा समावेश केंद्र सरकारच्या विशेष ‘कॉफी टेबल बुक’ मध्ये करण्यात आला आहे.

अडथळ्यांची शर्यत आणि जिद्द
निवती किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या बेटावर पोहोचणे अत्यंत कठीण असते. ज्या दिवशी हे ध्वजारोहण करण्यात आले, त्या दिवशी समुद्रात मोठी ओहोटी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत बोटीने प्रवास करून, उभ्या कपारीच्या खडकावर चढून पोलिसांनी राष्ट्रध्वज फडकवला. पंतप्रधान मोदी यांनी निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण करण्याबाबत मांडलेल्या संकल्पनेला अनुसरून ही मोहीम राबवण्यात आली होती.


“हा केवळ निवती पोलिसांचा सन्मान नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. केंद्र सरकारने आमच्या कष्टाची दखल घेतली, याचा खूप आनंद आहे.”
— भीमसेन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निवती पोलीस ठाणे.

या यशामुळे निवती पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook Comments Box

नियतीपुढे जिद्द हरली! दहावीत ९९ टक्के गुण मिळवणारी कोकणची ‘नीट’ टॉपर सिद्धी भिडे हिचे वयाच्या २० व्या वर्षी निधन

 

   Follow us on        

बांदा (सिंधुदुर्ग):
एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करायची जिद्द आणि दुसरीकडे शरीराला ग्रासलेला जीवघेणा आजार, अशा द्वंद्वात अखेर मृत्यूचा विजय झाला. दहावीत ९९ टक्के गुण मिळवून आणि NEET परीक्षेत कोकणात अव्वल येऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे शुक्रवारी कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनाने संपूर्ण बांदा शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


कर्करोगावर मात करत मिळवले होते दैदिप्यमान यश


सिद्धी भिडे हिचा प्रवास कोणत्याही चित्रपटाला शोभेल असा प्रेरणादायी पण तितकाच क्लेशदायक होता. सातवीत असतानाच तिला कर्करोगाचे (Cancer) निदान झाले होते. मात्र, या संकटाने खचून न जाता तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवून सर्वांना थक्क केले होते. त्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या NEET परीक्षेतही तिने कोकण विभागातून प्रथम येत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले होते.


डॉक्टर होऊन सेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण


सिद्धीला स्वतः कॅन्सरचा त्रास होत असतानाही, भविष्यात डॉक्टर होऊन इतरांचे प्राण वाचवायचे होते. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून ती नक्कीच एक उत्तम डॉक्टर झाली असती, अशी भावना तिचे शिक्षक आणि नातेवाईक व्यक्त करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावली आणि वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली.

Facebook Comments Box

“समान मत, समान किंमत!” राजकीय नेत्यांना चिमटा काढणारा कणकवलीतील तो बॅनर लक्ष वेधतोय

   Follow us on    

 

 

कणकवली: निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पडतो, हे काही नवीन नाही. मात्र, याच पैशांच्या वाटपावरून आता मतदारांनी चक्क बॅनरबाजी करत राजकीय नेत्यांना चिमटा काढला आहे. कणकवली तालुक्यातील हळवल येथे लावण्यात आलेला एक बॅनर सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

​काय आहे बॅनरवर?

​हळवल ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळच ग्रामस्थांनी एक मोठा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिले आहे:

​”समान मत, समान किंमत..! शहरातील मतदारांना १५ हजार रू. देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये!”

— ग्रामीण भागातील मतदार

​नेमके प्रकरण काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना १०,००० ते २५,००० रुपयांपर्यंत वाटप झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती. याच चर्चेचा धागा पकडून ग्रामीण भागातील मतदारांनी हा उपरोधिक बॅनर लावला आहे.

​”पैशाची हाव की लोकशाहीवर घाव?” असा यक्षप्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. जर शहरात मताची किंमत एवढी मोठी असेल, तर ग्रामीण भागात भेदभाव का? असा तिरकस सवाल करत मतदारांनी राजकीय व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर उपरोधिक टीका केली आहे.

​सोशल मीडियावर व्हायरल

​या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Facebook Comments Box

जनगणना २०२७: लवकरच पहिल्या टप्प्याची सुरुवात, ‘या’ ३३ प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा

   Follow us on    

 

 

नवी दिल्ली:

देशातील बहुप्रतिक्षित ‘जनगणना २०२७’ बाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ एप्रिल २०२६ पासून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला अधिकृतरीत्या सुरुवात होणार असून, केंद्र सरकारने यासाठी आवश्यक असलेल्या ३३ प्रश्नांची अधिसूचना (Gazette Notification) जारी केली आहे.

​दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया

​भारत सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, जनगणना प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत पार पडणार आहे:

​१. पहिला टप्पा (एप्रिल ते सप्टेंबर २०२६): या टप्प्यात ‘घरयादी’ (House Listing) आणि ‘गृहगणना’ (Housing Census) केली जाईल.

२. दुसरा टप्पा (फेब्रुवारी २०२७): या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना (Population Enumeration) केली जाणार आहे.

​३३ प्रश्नांद्वारे गोळा केली जाणार माहिती

​केंद्र सरकारने जनगणनेसाठी ३३ प्रश्नांची एक यादी तयार केली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश असेल:

​घराची माहिती: घराचा नंबर, भिंती आणि छतासाठी वापरलेले साहित्य, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालयाची उपलब्धता.

​कुटुंबाची माहिती: कुटुंबातील सदस्यांची संख्या, प्रमुखाचे नाव, कुटुंबाकडे असलेली मालमत्ता (रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप, सायकल, कार इ.).

​डिजिटल कनेक्टिव्हिटी: इंटरनेट सुविधा, मोबाईल/स्मार्टफोनची उपलब्धता.

​इतर: स्वयंपाकाचे इंधन आणि संवादासाठी मोबाईल क्रमांक.

​’स्व-गणना’ (Self-Enumeration) चा पर्याय उपलब्ध

​यावेळी जनगणनेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला आहे. प्रगणक (Enumerator) घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिक स्वतःहून आपली माहिती ऑनलाइन नोंदवू शकतील.

​राज्यांना ३० दिवसांची मुदत

​प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या ६ महिन्यांच्या कालावधीत आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कोणताही एक कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

​महत्त्वाची टीप: जनगणनेचे हे काम ‘जनगणना अधिनियम, १९४८’ अंतर्गत केले जात असून, गोळा केलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.

​जनगणना २०२७: ३३ प्रश्नांची यादी

​१. भवन क्रमांक (नगर किंवा स्थानिक प्राधिकरण)

२. जनगणना मकान नंबर

३. घराच्या जमिनीसाठी वापरलेले साहित्य

४. घराच्या भिंतीसाठी वापरलेले साहित्य

५. घराच्या छतासाठी वापरलेले साहित्य

६. घराचा वापर (निवासी/व्यावसायिक/इतर)

७. घराची सद्यस्थिती (चांगली/जीर्ण)

८. कुटुंब क्रमांक

९. कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या

१०. कुटुंब प्रमुखाचे नाव

११. कुटुंब प्रमुखाचे लिंग

१२. जातीचा प्रवर्ग (SC/ST/इतर)

१३. घराच्या मालकीची स्थिती (स्वतःचे/भाड्याचे)

१४. राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांची संख्या

१५. कुटुंबात राहणारी विवाहित जोडपी

१६. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत

१७. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता (घरात/बाहेर)

१८. प्रकाशाचा मुख्य स्रोत (वीज/इतर)

१९. शौचालयाची सुलभता

२०. शौचालयाचा प्रकार

२१. सांडपाण्याची निचरा व्यवस्था

२२. स्नानगृहाची उपलब्धता

२३. स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शन

२४. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन

२५. रेडिओ/ट्रान्झिस्टरची उपलब्धता

२६. टेलिव्हिजन (टीव्ही)

२७. इंटरनेट सुविधा

२८. लॅपटॉप/कॉम्प्युटर

२९. टेलिफोन/मोबाईल/स्मार्टफोन

३०. सायकल/स्कूटर/मोटारसायकल

३१. कार/जीप/व्हॅन

३२. कुटुंबात उपभोगले जाणारे मुख्य धान्य

३३. मोबाईल नंबर (केवळ जनगणना माहितीसाठी)

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘स्लीपर विशेष’ एक्सप्रेस

   Follow us on    

 

 

कोकण रेल्वे: शनिवार-रविवारची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या फेऱ्यांचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:

१. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक (T) स्पेशल

​दिनांक: शनिवार, २४ जानेवारी २०२६.

​वेळ: मडगाव जंक्शनवरून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (T) – मडगाव स्पेशल

​दिनांक: रविवार, २५ जानेवारी २०२६.

​वेळ: लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

​या विशेष गाड्या खालील स्थानकांवर थांबतील:

करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.

​गाडीची रचना (Composition)

​या गाडीला एकूण २० डबे असतील, ज्यामध्ये:

​स्लीपर क्लास (Sleeper): १८ डबे

​एसएलआर (SLR): ०२ डबे

 

Facebook Comments Box

अखेर रेल्वे प्रशासन नरमले! चर्चेला तयार; नेमळेकर यांचे उपोषण स्थगित

२७ जानेवारीला कोकण रेल्वे मुख्यालयात तातडीची विशेष बैठक

   Follow us on    

 

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार व कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोकण रेल्वेचे उप-मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (कमर्शियल मॅनेजर) श्री. दिनेश जी. बोंडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत विशेषतः सावंतवाडी टर्मिनस, कोल्हापूर–सावंतवाडी रेल्वे मार्ग, तसेच संध्याकाळची सावंतवाडीपर्यंत धावणारी अतिरिक्त विशेष रेल्वे या महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

चर्चेदरम्यान उपस्थित सर्व मुद्दे लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आले असून, या विषयांवर कोकण रेल्वेच्या वाणिज्य (कमर्शियल) विभागातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर वाणिज्यिक चर्चा करून कायमस्वरूपी व ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. अभिजीत धुरत, कोकण रेल्वेचे अधिकारी श्री. दिनेश बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने श्री. नेमळेकर यांचे उपोषण स्थगित करण्यात आले.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत पत्राद्वारे महासंघाच्या मागण्या योग्य व विचारार्ह असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून, येत्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search