



सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.
यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.




पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. शिवशाही बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. किंवा कोणीही जखमी झालेलं नाही.
या घटनेमुळे काही वेळ मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ येऊन आग विझवली आहे. मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढतच आहेत.

आजचे पंचांग
- तिथि-पंचमी – 07:33:56 पर्यंत
- नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 17:31:13 पर्यंत
- करण-तैतुल – 07:33:56 पर्यंत, गर – 20:45:12 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-अतिगंड – 25:56:51 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:17
- सूर्यास्त- 18:22
- चन्द्र-राशि-कन्या
- चंद्रोदय- 23:10:00
- चंद्रास्त- 10:43:59
- ऋतु- शिशिर
- १८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.
- १९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
- १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
- १९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
- १९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन ’पुणे महानगरपालिका’ स्थापन झाली.
- १९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन
- १९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम
- १९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.
- १९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
- १९८६: (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
- १९९५: च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड
- १९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची
- १९९६: उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड
- २००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
- २००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
- १७३६: जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (मृत्यू: २५ ऑगस्ट १८१९)
- १८०९: एडगर अॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (मृत्यू: ७ आक्टोबर १८४९)
- १८८६: रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)
- १८९२: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (२१ नोव्हेंबर १९६३)
- १८९८: विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक,
- १९०६: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९४७)
- १९२०: झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस
- १९३६: झिया उर रहमान – बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष्य (मृत्यू: ३० मे १९८१)
- १९४१: मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९६८), साहित्य अकादमी फेलोशिप विजेते (१९७०), त्यांनी ’कुमार’ या टोपणनावाने कविता लेखन तर ’आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे. त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)
- १९६०: रामचंद्र गोपाळ ऊर्फ ’दादासाहेब तोरणे – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक (जन्म: १३ एप्रिल १८९०)
- १९९०: भगवान श्री रजनीश – आध्यात्मिक गुरू (जन्म: ११ डिसेंबर १९३१)
- २०००: मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५), चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. (जन्म: १२ आक्टोबर १९१८)




सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्यांचा या पथकात समावेश आहे.
दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.
या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.
उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.
तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.




Maharashtra Guardian Minister List : राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आले आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? वाचा यादी
क्र. जिल्हा – पालकमंत्रिपद
१ गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल
२ ठाणे, मुंबई शहर -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
३ पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार
४ नागपूर, अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
५ अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
६ नाशिक – गिरीश महाजन
७ वाशिम – हसन मुश्रीफ
८ सांगली- चंद्रकांत पाटील
९ जळगाव – गुलाबराव पाटील
१० यवतमाळ – संजय राठोड
११ मुंबई उपनगर -आशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा
१२ रत्नागिरी – उदय सामंत
१३ धुळे – जयकुमार रावल
१४ जालना – पंकजा मुंडे
१५ नांदेड – अतुल सावे
१६ चंद्रपूर – अशोक ऊईके
१७ सातारा – शंभुराजे देसाई
१८ रायगड – अदिती तटकरे
१९ सिंधुदुर्ग – नितेश राणे
२० लातूर – शिवेंद्रसिंहराजे भोसले
२१ नंदुरबार – माणिकराव कोकाटे
२२ सोलापूर – जयकुमार गोरे
२३ हिंगोली – नरहरी झिरवाळ
२४ भंडारा – संजय सावकारे
२५ छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
२६ धाराशीव – प्रताप सरनाईक
२७ बुलढाणा – मकरंद जाधव
२८ अकोला – आकाश फुंडकर
२९ गोंदिया – बाबासाहेब पाटील
३० कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ
३१ वर्धा – पंकज भोयर
३२ परभणी – मेघना बोर्डीकर
३३ पालघर – गणेश नाईक
मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री, #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री. pic.twitter.com/vS41qTcot4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 18, 2025




मुंबई: प्रशासन सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांतून नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या २६ जानेवारी रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे अशा आशयाची बातमी समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र ही बातमी खरी नसून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
या बातमी नुसार राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्हय़ाचे विभाजन होऊन महाड हा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. २६ जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र या बातमीला कोणताही आधार नसून जुन्या संदर्भाचा वापर करून ही फेक बातमी पसरविण्यात येत आहे.