- World Listening Day
- Nelson Mandela International Day
- ६४ई.पुर्व: रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले फिडल (तुणतुणे) वाजवत असल्याची कथा प्रसिद्ध आहे.
- १८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
- १८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना
- १८७२: ब्रिटन मध्ये निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिनियम लागू करण्यात आला. यापूर्वी खुल्या प्रकारे मतदान केलं जात असे.
- १९१४: महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडले.
- १९२५: अॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
- १९६८: सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना
- १९७६: मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
- १९८०: भारताने ’एस. एल. व्ही. – ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.
- १९९६: ’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.
- १९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- १६३५: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३)
- १८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५)
- १८४८: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५)
- १९०९: भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९८३)
- १९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)
- १९१८: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)
- १९२७: ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२)
- १९३५: जयेन्द्र सरस्वती – ६९ वे शंकराचार्य
- १९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.
- १९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
- १९७२: सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४)
- १९८२: प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती
- १८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)
- १८९२: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)
- १९६९: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२०)
- १९८९: डॉ. गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक (जन्म: ? ? ????)
- १९९४: डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: ? ? ????)
- २००१: पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन – सांगलीच्या राजमाता (जन्म: ? ? ????)
- २००१: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४)
- २०१२: राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि लोकसभा सदस्य (जन्म: २९ डिसेंबर १९४२)
- २०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
- २०१७: सुप्रसिद्ध भारतीय कवी, संस्कारकार, कथाकार, उपन्यासकार आणि सहृदय समीक्षक अजित शंकर चौधरी यांचे निधन.




मुंबई, दि. १७ जुलै: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. २४ जुलै रोजी या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन अर्थात अक्वा लाईन जी कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी धावणार आहे. येत्या २४ जुलैपासून या मेट्रोला सुरुवात होत आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या ३३.५ किमी अंतरावर ही मेट्रो धावणार आहे. यामध्ये एकूण २७ थांबे असणार आहेत. या मेट्रोमुळं उपनगरीय प्रवास तसंच प्रत्यक्ष रस्त्यावरुन धावण्याऐवजी भूमिगत धावणार असल्यानं रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.
दरम्यान, विनोद तावडे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन सुकर बनवण्याची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (अॅक्वा लाईन) २४ जुलैपासून सुरु होत आहे. ही मेट्रो मुंबई शहराच्या वेगाला नवा वेग देईल.
सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे.
आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.
- आंतरराष्ट्रीय न्याय दिन: World Day for International Justice
- World Emoji Day
- १४८९: निजाम खान यांची सिकंदर शाह द्वितीय यांच्या नावाने दिल्लीचे सुल्तान म्हणून घोषित करण्यात आलं.
- १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
- १८१९: ’अॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
- १८४१: अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील.
- १९४७: मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.
- १९५०: देशांतील पहिली विमान दुर्घटना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे घडून आली.
- १९५३: अमेरिकन व्यंग चित्रकार व लेखक वॉल्ट डिज़्नी (Walt Disney) यांनी अमेरिकेतील अॅनाहेम, कॅलिफोर्निया या दोन ठिकाणी ‘डिस्नेलँड’ सुरू केले.
- १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी अॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्नेलँड’ सुरू केले.
- १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
- १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९९३: तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगू थल्ली’ हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान
- १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
- २०००: अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर
- २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.
- १८८९: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०)
- १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)
- १९१८: ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.
- १९१९: स्नेहल भाटकर – संगीतकार (मृत्यू: २९ मे २००७)
- १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)
- १९३०: बाबुराव बागूल – दलित साहित्यिक (मृत्यू: २६ मार्च २००८)
- १९५४: अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर
- १९५९: भारतीय हिंदी आणि मल्याळम चित्रपट अभिनेत्री जरीना वहाब यांचा जन्मदिन.
- १९६९: भारतीय हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांचा जन्मदिन
- १७९०: अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)
- १८३५: मेघालय सम्राट तिरोट सिंग यांचे निधन.
- १९२८: भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या मृणाल गोरे यांचे निधन.
- १९७२: गुजरात राज्यातील प्रसिद्ध राजकारणी आणि ‘अखिल भारतीय किसान सभे’चे नेते, इंदुलाल याज्ञिक यांचे निधन.
- १९९२: काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म: २२ एप्रिल १९१६)
- १९९२: शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४)
- २००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.
- २०१२: मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८)
- २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)
- २०२०: सी.एस. शेषाद्री – भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २९ फेब्रुवारी १९३)


क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग




साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले