Train No. 10105 | डब्यांवर लिहिलेल्या चुकीच्या क्रमांकामुळे चाकरमन्यांची गाडी चुकली

मुंबई :चार महिने अगोदर कसेबसे आरक्षित तिकीट मिळवायचे, नाही मिळाल्यास  दुप्पट तिप्पट भावाने दलालांकडून तिकीट विकत घ्यायचे आणि शेवटी रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे गाडी चुकणाऱ्या प्रवाशांनी आपल्या त्रासाबद्दल नेमकी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न विचारण्याची वेळ या दोन दिवसांत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर यायला लागलीआहे.
रेल्वेच्या अशाच भोंगळ कारभारामुळे काल ४ ते ५ प्रवांशांची गाडी चुकल्याचा प्रकार घडला आहे.  विनोद सुरेशराव मोरे यांच्याकडे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस-ट्रेन क्रमांक १०१०५ या गाडीची कन्फर्म तिकिटे होती. त्या गाडीवरील ट्रेन क्रमांक ठराविक बोगिंवर चुकीचा टाकला आहे. या चुकीमुळे त्यांच्यासहीत सुमारे ४ ते ५ कन्फर्म तिकीट असलेल्या कुटुंबीयांची ही ट्रेन काल १६ तारखेला चुकली.
दिवा – सावंतवाडी गाडीचा गाडीवरील १०१०५ क्रमांक नमूद करून ही चूक सुधारावी. सोबत काल रेल्वे कडूनही या गाडीबाबत ठराविक कालांतराने उद्घोषणा करून प्रवाशांना सूचित करणे गरजेचे होते ते मी अर्धा तिथे उपस्थित असूनही झालेले नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.
रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे अतिरिक्त गाड्या चालवत आहे. मात्र यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. महत्वाच्या स्थानकावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची उद्घोषणा Announcement योग्य प्रकारे केली जात नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाच्या स्थानकावर प्रवासी मदत कक्षाची उभारणी करणे आवश्यक होते. मात्र तशी काहीच सोय न केल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.

Loading

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ एसटी बसला भीषण अपघात; १ ठार १९ जखमी

रायगड: गेले काही दिवस वर्दळीच्या ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. माणगाव जवळ रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता एसटी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर १९ जण जखमी झाले असून सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.
एसटी बस मुंबई राजापूरकडे ( MH 14 BT 2664 ) जाणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही . अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी काही वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.

Loading

Facebook Comments Box

पनवेल रेल्वेस्थानक व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा

Konkan Railway: पनवेल रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक आहे. कोकणात जाणार्‍या पाश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या येथूनच कोकणात जातात. मात्र या रेल्वे स्थानकाच्या भोंगळ कारभारामुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

पनवेल रेल्वे स्थानक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास सहन कराव्या लागलेल्या नरेश नाईक यांनी काल रेल्वे च्या तक्रार निवारण पोर्टल वर एक तक्रार केली आहे.

नरेश नाईक यांच्याकडे मुंबई सेंट्रल येथून सुटणार्‍या विशेष गाडीचे आरक्षण होते. ही गाडी पकडण्यासाठी ते काल दुपारी 3 वाजता पनवेल स्थानकावर आले होते. गाडी वेळेवर पनवेल स्थानकावर आली मात्र गाडीच्या डब्यांचा क्रम बदललेला होता. पनवेल स्थानक प्रशासनाने याबाबत कोणतीच घोषणा announcement केली नाही. त्यामुळे सगळ्याच प्रवाशांचा गोंधळ उडाला. एवढेच नाही तर अवघ्या तीन मिनिटांत ही गाडी निघाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना या गाडीत चढायला भेटले नाही. अनेक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होते. नरेश नाईक यांच्या पत्नी सुद्धा प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडण्यासाठी धावत होत्या. प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने सुदैवाने गाडीतील प्रवाशांनी चैन आणि खेचली आणि गाडी थांबवली गेली.

हा अनुभव नरेश नाईक आणि इतर प्रवाशांसाठी खूपच भयानक ठरला. गाडी पकडल्यावर सुद्धा प्रवाशांना आपआपली सीट गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

पनवेल स्थानकावर अनेक सुविधांची वानवा आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्या 5,6 आणि 7 नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येतात. मात्र येथील इंडिकेटर्स योग्य माहिती पुरविण्यात येत नसल्याने त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. कालच्या घटनेमुळे अपघात होऊन जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Loading

Facebook Comments Box

कोकणातील गणेशभक्तांना उद्यापासून टोलमाफी; इथे मिळणार पास

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 01 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दिनांक 15 सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागानं शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार उद्या 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत गणेशभक्तांना पथकरातून सूट मिळेल.

असे मिळतील पास

टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023′ , ‘कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास दिले जाणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचं नाव असेल. हे पास गणेशभक्तांना पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी व आरटीओ कार्यालयात मिळतील. संबंधित ठिकाणी हे पास पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत याची काळजी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभागानं घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी देखील हाच पास ग्राह्य धरण्यात येईल.

पोलीस व परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना सरकारनं केल्या आहेत.

Loading

Facebook Comments Box

Rain Alert: कोकणात शनिवारी व रविवारी मुसळधार पाऊस

Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज राज्यात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. पुढील चार दिवस म्हणजे दिनांक 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या दिनांक 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 16 आणि 17 या तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 18 तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

आजपासून चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गावाला जायला सुरू झाले आहेत. मुसळधार पाऊस लागल्यास चाकरमान्यांची प्रवास करताना गैरसोय होऊ शकते. खासकरून मुंबई गोवा महामार्गाने जाणार्‍या गाड्यांना रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे प्रवास करणे त्रासदायक ठरू शकते.

Loading

Facebook Comments Box

आता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एसटीचे आरक्षण शक्य होणार

मुंबई :आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एसटी बसचे आरक्षण करता येणे शक्य होणार आहे. एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणालीसंदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सामजंस्य करारावर सह्या केल्या. या करारामुळे आयआरसीटीसी च्या bus.irctc.co.in संकेतस्थळावरुन प्रवाशांना एसटीचे तिकीटदेखील आरक्षित करता येणार आहे.

सध्या आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावरून रेल्वेसेवा, विमानसेवा आणि खाजगी बससेवांची तिकीट आरक्षणाची तसेच हॉटेल बूकिंगची सुविधा उपलब्ध होती. आता या निर्णयामुळे एसटीचे तिकीट प्रवाशांना येथून आरक्षित करता येणार आहे.

Loading

Facebook Comments Box

दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा प्रवास गारेगार होणार; तात्पुरत्या स्वरूपात जोडले जाणार दोन ‘थ्री टायर एसी’ चे डबे

Kokan Railway News : गणेशोत्सवासाठी दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर  ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत महिन्याभरासाठी बदल केला आहे. या गाडीला दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. या बदलामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या 14 वरुन 12 होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार

1)गाडी क्रमांक 50108 मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.

2)गाडी क्रमांक 10105 दिवा – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी – मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.

कोकण विकास समितीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला किमान एक एसी डबा जोडण्यात यावा यासाठी कोकण रेल्वेकडे मागणी केली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे.

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Tourism | राजापूर तालुक्यातील कातळशिल्पे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित

रत्नागिरी : कोकणच्या पर्यटनासंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.  या शिवाय आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे. अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे.
यादीतून बारसूचे नाव वगळले? 
बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.

Loading

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारले जाणार

Mumbai Goa Highway :दिनांक १५ सप्टेंबर पूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल असे आज मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा उद्घाटन आणि वृक्षारोपण प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र

मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९०% काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरु आहे.तो येत्या दोन दिवसांत पूर्ण करून वाहतुक सुरू करून देण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. याठिकाणी चहा-पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलीस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत असे ते म्हणालेत.

कशेडी बोगद्यामुळे वेळेची बचत होणार.

कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

Loading

Facebook Comments Box

मालवण: माकडामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार

मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.

पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search