पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. शिवशाही बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. किंवा कोणीही जखमी झालेलं नाही.
या घटनेमुळे काही वेळ मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ येऊन आग विझवली आहे. मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढतच आहेत.
Ratnagiri bus accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.
रत्नागिरी : गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला.
अपघाताची सविस्तर माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक जीजे 27 टिएफ 6818 हा गोव्याहून नवी मुंबईकडे चाललला होता. त्याला मागून येत असलेल्या कार एमएच 01 एएक्स 9281 ने जोराची धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.
दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.
Mumbai Goa Highway Accident: गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेतएर्टिगा आणि बॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगाचालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागलावॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले
अलिबाग: मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले.
धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्नीशमन दल, कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले. बसमध्ये चालक आणि क्लिनरसह ३४ प्रवासी होते. खापरोबा ट्रॅव्हल्सची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्वे पुलाजवळ आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्हां ड्रायव्हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्याचे दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर आगीचा भडका उडाला.
Road Accident : मुंबई गोवा महामार्गावरील खेड परशुराम घाटात आज पाच वाहनांचा अपघात घडल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. तर या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली. पाच वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरने घरडा बसला धडक दिली. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षणभिंत कोसळल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. मात्र आज दुपारी दोन वाजता चिपळूण शहरातून घरडा कंपनीचे कर्मचारी घेऊन बस कंपनीकडे निघाली होती. परशुराम घाटात ही बस एकेरी मार्गावर आली असताना समोरून गोव्याकडे जाणारा कंटेनर वेगाने येऊन बसवर आदळला. कंटेनरच्या धडकेने बस लावलेल्या गर्डरवर जाऊन आदळली. तर कंटेनरच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आढळल्या.
घरडा कंपनीच्या गाडीत असणारे घरडाचे कर्मचारी या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. किमान पंधरा ते वीस कर्मचारी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. खाजगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलीस महामार्ग यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. परशुराम घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.
नवीन ठिकाणी वाहनाने प्रवास करायचा असल्यास आपण सरार्स पणे गुगल मॅपचा वापर करतो. या आधुनिक सुविधेमुळे निश्चित स्थळी पोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग गुगल मॅप आपल्याला दाखवते आणि आपला प्रवास जलद आणि सोयीचा होतो. मात्र या आधुनिक सुविधेवर १००% विश्वास दाखवणेही जीवघातक ठरू शकते. असे केल्याने उत्तरप्रदेशातील बरेली येथे अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
उत्तरप्रदेशातील बरेली येथे तिघेजण एक लग्नसमारंभ आटोपून घरी जायला निघाले होते. मार्ग समजण्यासाठी त्यांनी गुगल मॅप सुरु केला होता. मात्र या मॅप च्या दिशादर्शकाने त्यांना खल्लपुर-दातागंज येथे एका पुलाकडे जाणारा रस्ता दाखवला. मात्र हा पूल निर्माणाधीन असल्याने अपुरा होता. गाडी वेगाने असल्याने अंतिम क्षणी तिला नियंत्रित करणे शक्य झाले आणि गाडी पुलावरून खाली पडून मोठा अपघात झाला ज्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Bareilly, UP
>3 men attended a wedding
>Used Google Maps on their way back.
>Map directed them to an incomplete bridge.
>The car sped ahead & fell down.
>All three tragically lost their lives. pic.twitter.com/H7SQbkeMX7
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित Retired कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे.
६५ वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक आणि ट्रॅक पुरुष यासारख्या भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. मुदतवाढीच्या पर्यायासह नियुक्त्या दोन वर्षांसाठी राहतील. सर्व रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक या सेवानिवृत्तांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती Fitness आणि गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या रेटिंगच्या आधारे नियुक्त करू शकतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांना निवृत्त होताना असलेले वेतन दिले जाणार आहे मात्र त्यातून त्यांचे मूळ पेन्शन वजा केले जाईल. त्यांना प्रवासासाठी आणि अधिकृत टूरसाठी प्रवास भत्ते देखील मिळतील परंतु अतिरिक्त लाभ किंवा पगार वाढीसाठी ते पात्र नसतील.
वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागात Zones एकूण २५००० कर्मचारी भरती करण्याचे उद्दिष्ट आहे.
रत्नागिरी, दि. २९ सप्टें: गणपतीपुळे येथे समुद्रात आज रविवारी (दि.29) सायंकाळी 5.15 च्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचार्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले. प्रदीप कुमार (30,मुळ रा.ओडीसा) आणि महंमद युसूफ (29,मुळ रा.उत्तराखंड) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर डाकुआ टुकुना (30,रा.वेस्ट बंगाल) याला वाचवण्यात यश आले.
याबाबात सविस्तर वृत्त असे कि जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टचे तीन कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला आले होेते. ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना हे तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले. त्यांनी आरडोओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले परंतु, यातील दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जयगड पोलिसानी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र या तिघांपैकी दोघांचा या दरम्यान मृत्यू झाला.
मालवण: मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे काल रविवारी मध्यरात्री नौका समुद्रात पलटी होऊन तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक मच्छिमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने सुदैवाने बचावला आहे. ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत (53) रा. मोर्वे देवगड हे पोहत किनार्यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
दरम्यान, सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे व्यांगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले.