मुंबई |दि.३०.०५.२०२३ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन व मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले होते. या महोत्सवमध्ये बहुभाषिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काही निवडक लघुपट प्रेक्षकांसाठी दाखविण्यात आले. या विनामूल्य लघुचित्रपट पाहण्याचा आनंद असंख्य मायबाप रसिक प्रेक्षकांनी घेतला. संपूर्ण थिएटर खचाखच भरले होते. महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह देवून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक संतोष रोकडे सर, सुप्रसि्दध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक आरयन देसाई, शिरीष राणे, दिलीप दळवी, सर्वणकर, सांडवे,इ. मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई संतोष रोकडे सरांनी शासकीय योजना तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या उपक्रमांची माहिती दिली. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी चित्रपट आणि लघुपट ई. विषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले.
महोत्सवाचे आयोजक, दिग्दर्शक आरयन देसाई यांनी सर्व मान्यवर व मायबाप रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत नविन उपक्रम म्हणजेच मराठी चित्रपटांचा गौरव सोहळा “मातृभाषा चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा” सुरू करण्याचे जाहीर केले. सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.