Category Archives: महाराष्ट्र

नक्की काय आहे पत्राचाळ घोटाळा – संजय राऊत ह्या मध्ये कसे अडकले… जाणून घ्या ईथे.

मुंबई :संजय राऊतांच्या अटकेमुळे पत्रा चाळ जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नेमकं काय आहे पत्रा चाळ प्रकरण आणि संजय राऊतांचं नावं ह्यामध्ये कसं आलं? सविस्तर जाणून घ्या ईथे..

.

पत्राचाळ प्रकरण

गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी 12 वर्षापूर्वी येथील रहिवासी, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन आणि म्हाडा यांच्या मध्ये एक करार केला झाला होता. करारानुसार चाळीने व्यापलेली एकूण जमिनीचे 3 समान भाग केले जाणार होते. एका भागामध्ये रहिवाशांना सर्वात प्रथम 672 फ्लॅट बांधुन देण्याचे आणि म्हाडाला त्याच्या जागेत अशी सर्व मिळून 3000 पेक्षा अधिक घरे बांधुन गुरू आशिष कन्स्ट्रक्शने देणे असे ठरले गेले. ह्या मोबदल्यात गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला उरलेली 13 एकर जमीन मिळणार होती.

गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचं नंतर समोर आलं. गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

या प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत यांना अटक केलेली. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे एक संचालक होते.

मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW (आर्थिक गुन्हे शाखा) ने अटक केली होती, तर सारंग वाधवान अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला होता

फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

ईडीनं या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीनं नोंदवला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि पत्राचाळ

प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचं नावही समोर आले होतं. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. या कर्जाच्या रकमेतून राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले होते.

ईडीतील सूत्रांच्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते, तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.

या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.

Loading

संजय राऊत यांनी ईडीला सहकार्य करावे नाहीतर पुढची मुलाखत जेलर सोबतच होईल……भाजप नेते – निलेश राणे 

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील ‘मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास  प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे.
संजय राऊत यांनी ईडीला सहकार्य करावे नाहीतर त्यांची पुढील मुलाखत जेलर सोबतच होईल असे भाजप नेते निलेश राणे ट्विटर वर बोलले आहेत. संजय राऊत ह्यांनी ईडी ला सहकार्य केले नसल्याने ईडीने त्यांचा घरी जाऊन त्यांची चौकशी चालू केली आहे असे ते म्हणाले. 

Loading

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला – राज्यपालांची सारवा सारव

काल राजस्थानी समजाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानावर संपूर्ण राज्याने आपली नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्यातून गुजराती आणि मारवाडी गेलेत तर मुंबई मध्ये पैसा राहणार नाही असे ते म्हणाले होते.

राज्यपालांनी ह्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी होऊ लागली होती. आज दुपारी राज्यपालांनी ट्विटरवर ह्या संबंधी एक ट्विट टाकले आहे. ते म्हणाले की…

 

मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.

मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.

पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो.

Loading

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तर १२ वाजता सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

Loading

उद्धव ठाकरेंचा पुतण्या निहार ठाकरे एकनाथ शिंदेंच्या गटात सामील

मुंबई:  उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे निहार ठाकरे  एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे  यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कितपत बदलणार, हे पाहावे लागेल.

 

बाळासाहेब ठाकरे यांना तीन चिरंजीव आहेत. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचं 20 एप्रिल 1996 रोजी लोणावळा इथे एका मोटार अपघातात निधन झालं होतं. बिंदूमाधव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे हे आहेत. ते खरंतर व्यावसायिक आहेत. त्यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. पण ते आता राजकारणात जम बसवणार आहेत. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. निहार हे बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू मानले जातात. त्यामुळे बाळासाहेबांचे नातू निहार हे त्यांच्यासारखे राजकारणात हुकमी एक्के म्हणून नावाजले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Loading

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप असा दावा करत लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना काल दिनांक 18/07/2022 रोजी एक विनंतीवजा पत्र लिहून पाठवले आहे

दुसऱ्या कुठल्याही गटाला अशी मान्यता न देण्याचं आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे.

तसेच कोणी असा प्रयत्न केल्यास तातडीने कळवण्याचं आणि आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय न घेण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे समजते.

 

 

Loading

महाराष्ट्र आगाराच्या ST बसला भीषण अपघात.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. धार येथून ही बस अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading

आधी मुंबईतील लोकल ट्रेन्स सुधारा आणि मग बुलेटट्रेन आणा – खासदार सुप्रिया सुळे.

बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही पण त्याआधी मुंबईतील लोकल ट्रेनचे जे प्रश्न आहेत ते सोडवा. मुंबईची लाईफ लाइन समजली जाणारी मुंबई लोकलट्रेनची अवस्था खूप केविलवाणी आहे त्याकडे आधी लक्ष द्या, तिकडे निधी पुरवा असे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे.

शासनाकडील निधी मुंबई लोकल ट्रेन, प्लॅटफॉर्म, स्टेशने आणि शौचालये सुधारण्यासाठी वापरण्यात यावा अशी मी मागणी करत आहे. सामान्य मुंबईकर तुमच्या कडे बुलेट ट्रेन ची मागणी करत नाही आहे. मग जे आधी मागत आहेत ते आधी जनतेला द्या असे त्या पुढे म्हणाल्या.

मुंबईमधून बर्‍याच गोष्टी दुसर्‍या राज्यात नेण्याचा प्रयत्न केला जात आहेत असे त्या म्हणाल्या आणि ह्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे

Loading

शिंदेच्या सरकारात पेट्रोल डिझेल स्वस्त ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सरकार इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या विचारात आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतह्या बद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बैठकीनंतर व्हॅट कपातीबाबत  हि घोषणा करण्याची शक्यता आहे. 
जर हि कपात झाली तर पेट्रोल आणि डिझेल कमीत कमी 5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साहजिकच सर्व माहिती आपल्याला त्या घोषणेनंतरच समजेल.

Loading

शिवसेनेच्या १५ आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भावनिक पत्र.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी शिवसेनेत अजूनपर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या १५ आमदारांना एक विशेष पत्र पाठवले आहे. खरतर हे आभारदर्शी भावनिक पत्र आहे. कोणत्याही धमक्यांना न घाबरता किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शिवसेनेसोबत राहून तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे पाईक आहेत हे दाखवून दिले आहे. तुमच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटला आणि शिवसेनेचे बळ वाढले आहे असे ते या पत्रामध्ये म्हणाले आहेत.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search