Category Archives: सिंधुदुर्ग

सावंतवाडी: आता रेल रोको शिवाय पर्याय शिल्लक नाही..!!  – रेल्वे प्रवासी संघटनेचा एकमुखी निर्धार.

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दिनांक १४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना पत्र मोहीम आदींचा आढावा घेण्यात आला त्याच बरोबर काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित केले गेले. त्यात प्रामुख्याने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला, त्यानंतर सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस साठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी योग्य तो पाठपुरावा करावा त्यासाठी संघटनेकडून त्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्या संदर्भात चर्चा झाली, सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, नागपूर – मडगाव एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आदी गाड्यांना येत्या १५ दिवसात थांबा मिळावा, तसेच आजच्या घडीला कोल्हापूर – संकेश्वर – बेळगाव असा रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू आहे, काही महिन्यात त्या रेल्वे मार्गाचे काम देखील सुरू होईल त्यामुळे सावंतवाडी ते संकेश्र्वर असा रेल्वे मार्ग होण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा जेणे करून कोकणातून बेळगाव आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळेल,

आदी ठराव घेण्यात आले. या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण नाही झाल्या तर २६ जानेवारी २०२५ ला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले. त्याच बरोबर गाडी क्रमांक ०११५१/५२ मुंबई – करमळी विशेष गाडीचा सावंतवाडी थांब्यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री नितेश राणे आणि कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री शैलेश बापट यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात मेल मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव मिहिर मठकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विनोद नाईक, सौ सायली दुभाषी, नंदू तारी,सुभाष शिरसाट , तेजस पोयेकर,स्वप्नील नाईक, रामकृष्ण मुंज, विहंग, भूषण, सागर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी जनता उपस्थित होते.

“राणेंना संपवता संपवता…..” नितेश राणे यांच्या शपथविधीनंतर निलेश राणे यांची ती पोस्ट चर्चेत

   Follow us on        

नागपुर:महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा आजच पार पाडला. अपेक्षेप्रमाणे कणकवली मतदारसंघातील भाजपचे आमदार यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक पोस्ट ‘एक्स’ माध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे ती पोस्ट?    

तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.

राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…

आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.

जय महाराष्ट्र!

मालवण: ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती करणारे शिल्पकार उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

   Follow us on        
सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हा पुतळा साकारणार आहेत. राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया हा पुतळा कसा असेल.
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकोट किल्ल्यावर लवकरच 60 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे.  विशेष म्हणजे यावेळी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती करणाऱ्या  प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स या कंपनीद्वारे हा पुतळा तयार केला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
याआधी डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं.. मात्र अवघ्या 8 महिन्यात ऑगस्ट 2024 मध्ये हा पुतळा वादळात कोसळला. यानंतर पुतळ्याच्या दर्जावरुन चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. मात्र यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना सर्व खबरदारी घेतली जाणाराय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं कंत्राट प्रसिद्ध शिल्पकार राम सुतारांना देण्यात आलंय. हा पुतळा 60 फूट उंच असेल. नवीन पुतळा ब्राँझ धातूचा असले. त्यावर 8 मिमी जाडीचं क्लॅडिंग असेल.  तेव्हा छत्रपतींच्या कीर्तीला साजेल असा भव्या पुतळा भविष्यात राजकोट किल्ल्यावर थाटात उभा दिसेल यात शंका नाही.

सिंधुदुर्ग: भराडीदेवीने कौल दिला; आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली

   Follow us on        

सिंधुदुर्ग:कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Jatra). दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.

आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आंबोली-दोडामार्ग पट्ट्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व अधोरेखित; आतापर्यंतच्या विक्रमी संख्येची नोंद

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर वाघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे.
वनविभाग, सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारी ते मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्गमध्ये आठ वाघांचे अस्तित्व वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. हे वाघ सावंतवाडी तालुक्यातील आंबोली दोडामार्ग पट्ट्यात आढळून आले आहेत.
वनशक्ती संस्थेने मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असून तो भाग संरक्षित करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिकेला दाखल केली आहे. दीर्घकाळ यावर सुनावणी सुरु आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याचे वन शक्तीने वेळोवेळी उच्च न्यायालयात सांगितले आहे. आता भागात विक्रमी नोंद झाल्याने या झाल्याने या मागणीला बळ मिळाले आहे.

कोकणातलो ह्यो उच्चशिक्षित चेहरो, आमका विधानपरिषदेत होयो!

“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी, उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावाचे नामनिर्देशन व शिक्कामोर्तब करण्यासाठी ६७३ पानांचा प्रस्ताव सादर.

   Follow us on        

मुंबई: कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र, प्रशासकीय स्वराज्य घडविण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक चळवळ राबवून अविरतपणे ज्ञानदान करणारे, प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा व्याख्याते, उच्चविद्याविभूषित, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांची *समाजसेवा, कला व शिक्षण या क्षेत्रात* उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी *“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने, श्री. सचिन यशवंत रेडकर, अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे यांनी राज्यपाल कार्यालयास दिनांक १९/११/२०२४ रोजी निवेदनासोबत शोधप्रबंध स्वरूपातील दस्तावेजांप्रमाणे भाग I, II, III, IV स्वरूपात ६७३ पानांचा प्रस्ताव सादर केला.* या प्रस्तावासोबत महाराष्ट्र व कोकणातील सर्वच घटकातील इच्छुक सामाजिक संस्था/मंडळांनी राज्यपालांना संबोधित केलेले शिफारस सह पाठिंबा पत्र सुद्धा संलग्न केले आहेत अशी माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेतील कलम 171 (5) खंड (3) च्या उपखंड (ई) अंतर्गत राज्यपालांनी नामनिर्देशित केले जाणारे सदस्य खालीलप्रमाणे अशा बाबींच्या संदर्भात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल, म्हणजे: साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा असे नमूद आहे. कार्यकारी प्रमुख या नात्याने माननीय राज्यपाल आपल्या स्वविवेकाधीन (डिस्क्रेशनरी) अधिकारांचा वापर करून, सदर प्रस्तावातील संलग्न दस्तावेजांचे अवलोकन करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन, कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमधील इच्छुक पक्ष सुद्धा आपल्या माध्यमातून, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, उच्चशिक्षित व्यक्तिच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा व विधानपरिषदेत सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी नवीन मंत्रिमंडळात नक्कीच चर्चेद्वारे शिफारस करून नामनिर्देशन यादीत नाव समाविष्ट करतील असा आम्हाला व समस्त कोकणवासियांना, हितचिंतकांना एक मतदार व सुजाण नागरिक स्वरूपात आत्मविश्वास आहे, उच्चशिक्षित तरूण व्यक्तींनी विधानपरिषदेत येणे व सत्ताधारी पक्षांनी अशा व्यक्तींना संधी देणे ही लोकशाही च्या अनुषंगाने काळाची गरज आहे, तरच समाजात आमुलाग्र बदल घडू शकतील असे मत “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर यांनी व्यक्त केले.

चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार?

   Follow us on        

सिंधुदुर्ग : चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारखेपासून बंद होणार आहे.

ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.

दरम्यान, चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ओंकार लाड; वैभववाडीचा ‘संदेश जिमन’

   Follow us on        
सिंधुदुर्ग: समाज माध्यमांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला संदेश संबंधित यंत्रणेकडे पोहोचवून इच्छित परिणाम  साधता येतो. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना केवळ फेसबुकच्या  माध्यमातून जनजागरण करून संगमेश्वर या रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबे मिळवून देऊन पत्रकार संदेश जिमन यांनी ही गोष्ट दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी स्थानकावरील प्रश्नांसाठी सुद्धा ओंकार लाड या नावाच्या तरुणाने नेहमीच आवाज उठवला आहे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्याने या स्थानकावरील गैरसोयींवर यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी स्थानकावर पुरेशी प्रवासी संख्या असताना सुद्धा पादचारी नाही होता. याकडे ओंकार ने वेळोवेळी X च्या माध्यमातून इथे पादचारी पूल व्हावा अशी मागणी केली होती. त्याचा या प्रयत्नाला अखेर यश आले असून येथे एक पादचारी मंजूर करण्यात आला असून कालच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मूळ गाव वैभववाडी-नापणे असलेला ओंकार सध्या मुंबईमध्ये आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच शिक्षण पूर्ण करता करता तो नामांकित बिग ४ मध्ये नोकरी सुद्धा करत आहे. मुंबईमध्ये सध्या तो आई बाबा समवेत वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे असो व मुंबई लोकल, ज्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या त्या गोष्टी तो X च्या माध्यमातून शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रूळ ओलांडावे लागत आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींचे खूप हाल होतात. पुरेशी प्रवासी संख्या असूनही प्रशासन इथे साधा एक पादचारी पूल का बांधत नाही हा प्रश्न त्याने उठवायला सुरवात केली. येथील आमदार नितेश राणे यांच्या x वरील पोस्ट वर कंमेंट करून किंवा संबंधित यंत्रणेला टॅग करून त्याने जनजागरण केले. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले असून येथे एक पादचारी पूल मंजूर झाला आहे.
वैभववाडी स्थानकावर या पुलाव्यतिरिक्त अजून कित्येक प्रश्न आहेत. या स्थानकावर अजून गाडयांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच येथे PRS तिकीट बुकिंग सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. या गोष्टींसाठी मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवीन असे ओंकार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला

सावंतवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस कै. जयानंद मठकर यांचे नाव

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडीकरांसाठी एक अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोलगाव सावंतवाडीस, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, सिंधुदुर्गातील कामगार चळवळीचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय जयानंद शिवराम मठकर यांचे नाव देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याचा शासन निर्णय जाहीर केला असून माजी आमदार ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर यांनी कोकण रेल्वेसाठी लढा दिला. कोकणातील सामाजिक आणि विकासात्मक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांचे नाव आज सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याने ही समस्त सावंतवाडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मठकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२९ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईत झाले. मालवणच्या टोपीवाला स्मारक शाळेतही ते काही काळ शिक्षणासाठी होते. त्यांनी १९४२ मध्ये समाजवादी पक्षाच्या विचाराने प्रभावित होऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उडी घेतली.

त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार आणि गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचले. त्यासाठी आंदोलने, संघर्ष केले. ज्येष्ठ समाजवादी नेते बॅ. नाथ पै, मधु दंडवते, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांच्या बरोबर त्यांनी काम केले.

मठकर यांनी राजकीय, सामाजिक, ग्रंथालय, सहकार, कामगार, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कामगार आणि ग्रंथालय चळवळीत विशेष कार्य केले. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वनखात्यातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.

कामगार क्षेत्राबरोबरच तयांनी ग्रंथालय चळवळीसाठीही कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात अनेक ग्रंथालये उभी राहिली. गोवामुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. तेरेखोल किल्ल्यावर पाठवण्यात आलेल्या सत्याग्रहींच्या एका तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते.

पत्रकारितेतील त्यांचे योगदानही मोठे होते. १९५३ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नवशक्ती, लोकमान्य, केसरी आदी वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम केले होते.

Breaking: निलेश राणे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभेचा थेट मुकाबला महायुती व महाविकास आघाडीमध्येच होणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनुसार ज्यांचा ज्या मतदारसंघात आमदार ती जागा त्याच पक्षाला सोडली जाणार आहे. त्यानुसार कुडाळ मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. येथून निलेश राणे इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांनी दावा केल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करु शकतात.

तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते भाजपाच्या की शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर ही निव़डणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search