Category Archives: अपघात




कुडाळ:वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेथर (15, रा. निवती) जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाट तिठा (माऊली मंदिर नजीक) येथे घडली. मोटारसायकलस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली. मनस्वी मोटारसायकलच्या मागे बसून जात होती. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटारसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान निवती व पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच बेदरकार डंपर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी लावून ठरली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा. निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघातप्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर (रा.हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.




Railway Accident: ओडिशामधील बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घातल्याची माहिती समोर आली आहे. बालासोर जिल्ह्यातील सबीरा पोलीस ठाण्याजवळ ही ट्रेन रुळांवरून उतरल्याचे सांगण्यात येत आहे. रुळावरून उरल्यावर ही ट्रेन एका विजेच्या खांबावर आदळली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाहीत.
दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ही ट्रेन नेमकी कशी काय रुळांवरून उतरली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल.
दरम्यान, न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळांवरून उतरल्यानंतर ट्रेनमधील प्रवासी बाहेर आले. त्यामुळे अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे काही अधिकारी आणि पोलीस अपघातस्थळी पोहोचले. त्यानंतर घसरलेल्या ट्रेनला रुळावर आणून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.




सिंधुदुर्ग: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री 1 वा.च्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. सुदैवाने रुग्णाला तात्काळ बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला.
गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रुग्णांना अन्य एका रुग्णवाहिकेने उपचारासाठी बांबोळीकडे नेण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका ही दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला -वजराठ येथील एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. मात्र, तो रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर चालत बाहेर आला. नेमकी कशामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतला हे समजू शकलेले नाही.




Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.
ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर झाली. ही घटना, रात्री ९:५५ वाजता घडली. खरंतर, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.”
Video | धक्कादायक! धावत्या एसटी बसचे पुढील चाक निखळले; मोठा अनर्थ होता होता टळला – Kokanai
सविस्तर वृत्त#Staccident https://t.co/yEnyi55xXw pic.twitter.com/tRAUbv2z8l— Kokanai Digital News Channel (@kokanai21) February 2, 2025
[edsanimate_start entry_animation_type= "fadeIn" entry_delay= "0" entry_duration= "1" entry_timing= "linear" exit_animation_type= "" exit_delay= "" exit_duration= "" exit_timing= "" animation_repeat= "infinite" keep= "yes" animate_on= "load" scroll_offset= "" custom_css_class= ""]





Mahakumbh Stampede Prayagraj : कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानापूर्वी म्हणजेच मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या त्रिवेणी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 14 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत, आखाडा परिषदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. पण तरीही नदीच्या काठावर अजूनही लोकांची तुफान गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगमावर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. साधू आणि संत लोकांना संगम परिसरात न जाण्याचं आवाहन करत आहेत.
13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज म्हणजेच बुधवारी मौनी अमावस्येला 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील गर्दी कमी ठेवण्याचं मोठं आवाहन यंत्रणांसमोर असणार आहे.




पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. शिवशाही बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. किंवा कोणीही जखमी झालेलं नाही.
या घटनेमुळे काही वेळ मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ येऊन आग विझवली आहे. मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढतच आहेत.




Ratnagiri bus accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.




रत्नागिरी : गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला.
अपघाताची सविस्तर माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक जीजे 27 टिएफ 6818 हा गोव्याहून नवी मुंबईकडे चाललला होता. त्याला मागून येत असलेल्या कार एमएच 01 एएक्स 9281 ने जोराची धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.
दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.