मुंबई – आता जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई च्या ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) विभागाने आपली विशेष टीम सक्रिय केली आहे. ही विशेष टीम ह्या झोनच्या महत्त्वाच्या भागांत गस्त घालणार आहे. तसेच एक नियंत्रण विभाग बनविण्यात आला आहे. ह्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी एक हॉटलाइन नंबर जारी करण्यात आला आहे, तसेच whatsapp चाटद्वारे आणि ईमेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कशी कराल तक्रार?
एखादा टॅक्सी ड्रायवर जवळचे भाडे नाकारत असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
9076201010 ह्या नंबर वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता. ह्या वेळा व्यतिरिक्त जर तक्रार करायची असेल तर whatsapp चाट, टेक्स्ट मेसेज द्वारे किंवा ईमेल द्वारे आपली तक्रार नोंदविता येईल. त्यासाठी [email protected] हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. अशा तक्रारी इंस्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याकडून हाताळल्या जातील.
ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी या उपक्रमामुळे नक्किच टॅक्सी चालकांच्या मनमानीवर आळा बसेल. जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार मुंबईत सर्रास घडत आहेत. अगदी अर्जंट जायचे आहे अशी गयावया करूनही टॅक्सी चालक तयार होत नव्हते.
या प्रकारचा उपक्रम मुंबईच्या इतर विभागात राबविण्यात यावा अशी अपेक्षा आहे.
फॅाक्सकॅान-वेदांताच्या सेमिकंडकटर बनवण्याचा प्रकल्पाच्या जागा निवडीसाठी कंपनीने बनवलेला अहवाल समोर आला आहे. ह्या अहवालात गुजरात मधील ढोलेरा आणि पुण्यातील तळेगाव ह्या दोन्ही जागांची तुलना
गुजरातमधील ढोलेरापेक्षा तळेगाव हे योग्य ठिकाण होतं असे या अहवालानुसार दिसत आहे. ह्या अहवालात नमूद केलेल्या 6 मुद्द्यांपैकी 4 मुद्दे गुजरात राज्याला ह्या प्रकल्पासाठी प्रतिकूल दाखवतात तर तळेगाव साठी सर्व मुद्दे अनुकूल दाखवत आहेत.
ह्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन सरकारने 39 हजार कोटी रुपयांची सुट दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटी रुपयांची सुट दिली आहे.
मविआ सरकारच्या सूत्रांनुसार ह्या प्रकल्पाला खालील सुट दिली जाणार होती.
तळेगाव येथील सुमारे 400 एकर जागा सरकारतर्फे मोफत दिली जाणार होती.
700 एकर जागा 75% दराने दिली जाणार होती.
1200 मेगावॅट चा अखंडित वीज पुरवठा 20 वर्षासाठी 3 रुपये प्रति युनिट दराने देण्यात येणार होता.
विजेच्या दरात दहा वर्षासाठी 7.5% सुट देण्यात येणार होती.
5% स्टॅम्प डय़ुटी मध्ये सवलत दिली जाणार होती.
पाणीपट्टी मध्ये 337 कोटी रुपयांची सुट दिली जाणार होती.
घनकचरा प्रक्रियेसाठी 812 कोटी रुपयांची सुट दिली जाणार होती
ही सर्व परिस्थिती पाहता कंपनीने हा प्रकल्प गुजरात का नेला ह्याबाबत एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे : ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यासाठी करण्यात येणार्या हालचालींवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी खालील शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे
महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना भेटून केली.
वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे.महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे.यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल.
हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सामंजस्य करार (एमओयू) करणार आहेत, असं कळतंय. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे.
गरबा दांडिया उत्सवास रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी विनंती मुंबई मागठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे. त्यांनी त्या आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
इतर राज्यात म्हणजे गुजरात, राजस्थान मध्ये दांडिया साठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात अशी परवानगी मिळावी असे त्यांचे म्हणणे आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यावर दहीहंडी आणि गणेशोत्सवांवर असलेले अनेक निर्बंध हटविल्यामुळे कोरोना मारामारीच्या दोन वर्षानंतर अतिशय उत्साहात हे सण साजरे केले गेले. त्यामुळे आताचे सरकार गरबा उत्सवास रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देवून भाविकांचा उत्साह वाढवतील अशी त्यांनी आशा केली आहे.
अंतोदय / प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांचे उत्त्पन्न जास्त आहे त्यांनी ह्या योजनेतून बाहेर पडा असे आवाहनवजा इशारा देण्यात आला आहे, त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ हि अंतिम तारीख दिली आहे. ह्या लाभार्थ्यांनी दिनांक ३१/०८/२०२२ पूर्वी ह्या योजनेतून बाहेर पडा GIVE IT UP फॉर्म स्वइच्छेने भरून देणे गरजेचे आहे. हा अर्ज भरून तो तहसीलदार, पुरवठा निरक्षण अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक ह्यांच्याकडे जमा करायचा आहे.
सदरचा फॉर्म दिनांक ३१.०८.२०२२ भरून देणार नाहीत अशा लाभार्थी बाबत दिनांक ०१.०९.२०२२ पासून तलाठी व मंडल अधिकारी शहनिशा करून अपात्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम वसूल करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो असे जाहीर करण्यात आले आहे.
खालील लाभार्थ्यांना हा अर्ज भरणे गजरेचे आहे असे पत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
१.शासकीय नोकर, निमशासकीय नोकर,
२. व्यावसायिक, किराणादुकानदार,
३. पेन्शन धारक,
४. ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी,
५. मोठ मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे,
६. साखर कारखान्यात Permenant असणारे कामगार.
७. आयकर भरणारे
८. पक्के (स्लॅपचे) घर असणारे .
९. चार चाकी वाहन (घरगुती किंवा व्यायसायिक) धारक
१०. घरात एअर कंडिशनर (AC ) असणारे
११. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून ५९,००० हजारापेक्षा जास्त असल्यास.
मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पाश्चिम रेल्वे प्रशासनाने AC आणि Non-AC फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबरपासून 20 AC लोकल्स आणि 10 Non-AC लोकल्स ह्या मार्गावर वाढविण्यात येतील.
सध्या चर्चगेट ते डहाणू ह्या मार्गावर एकूण 1375 लोकल्स फेर्या चालविण्यात येत आहेत त्यामधे 48 फेर्या AC लोकल्स च्या आहेत. ह्या मार्गावर सुमारे 30 लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात त्यामधे सुमारे 1 लाख प्रवासी AC लोकल्सने प्रवास करतात. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात AC लोकल्सने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या 25% वाढली आहे. मध्य उपनगरीय रेल्वेशी तुलना करता ह्या मार्गावर AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या मार्गावर 20 AC लोकल्स वाढवायच्या निर्णय घेतला आहे.
ह्या सर्व वाढिव सेवांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या 10 सेवा AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात येत आहे. त्या १० सेवा २५.०८.२०२२ पासून आधी पूर्वीप्रमाणे Non AC स्वरुपात चालविण्यात येतील. AC सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकनानंतर कळविण्यात येईल असे आज मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
मागील आठवडय़ात मध्य रेल्वेच्या 10 गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्या गेल्या होत्या. ह्या निर्णयाचा प्रवाशांकडून विरोध झाला होता. कळवा आणि बदलापुरात आंदोलने पण करण्यात आली होती. सोशल मीडियावर पण ह्या संदर्भात विरोध दर्शवला गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पण विधी मंडळात ह्या विरुद्ध आवाज उठवला होता. ह्या गाड्या पुन्हा सामान्य स्वरुपात चालविण्यात याव्यात म्हणुन प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी निवेदने दिली. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
राज्यात शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या आपल्याला खूप दुःख होत आहे. तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला अस्मानी संकटातून, सावकारी दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा आशयाचे भावनिक आवाहन त्यांनी आज एका पत्राद्वारे केले आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खाली वाचा त्यांचाच शब्दात.
महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत, जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभा महाराष्ट्र देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचं असेल तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.
परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातील काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवून आत्त्महत्येचा मार्ग पत्करतात.. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषन्न होऊन जातं….वाटतं, कि आपल्याच घरातील कुणी आपण गमावलंय…..
लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे…..तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही आहे. तुम्ही आमची संपत्ती आहात, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना नेहमी म्हणायचे कि, ”रडायचं नाही लढायचं”
शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका….आत्महत्या करू नका…मी तुमच्यासारखा रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आस्मानी संकटातून, या सावकारी दृष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश सामावलेले असते……
मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा…जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेंकाना….
चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधुयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया….
सरकारद्वारे रास्त दराने दिले जाणारे रेशनकार्ड वरील धान्य घेणारी व्यक्ती खरोखर गरजू आहे का, त्याचे उपन्न त्या कसोटी मध्ये बसत आहे का नाही ह्याची पडताळणी पुढच्या महिन्यात होणार आहे. उत्पन्न वाढलेल्या धारकाचे रेशनवरील धान्य ह्या पडताळणीनंतर बंद करण्यात येणार आहे.
कमी उत्त्पन्न गटामध्ये मोडत असलेली गरीब जनता उपाशी राहू नये म्हणून सरकराद्वारे गरीब कुटुंबाना स्वस्त दरात रेशन दिले जाते. मात्र काही लोकांचे उत्पन्न वाढले तरी त्यांचे ह्या सुविधेमध्ये नाव असल्याने त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. काही लोक हेच धान्य त्यांना मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विकून ह्या सुविधेचा गैरवापर करत आहेत. काही लोक तर चक्क जनावरांना हे धान्य खायला घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
ह्या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व प्रत्येक रेशनधारकांची धान्य निरीक्षकांमार्फत पडताळणी होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. खोट्या माहितीद्वारे कमी उत्पन्न दाखवून जर कोणी ह्या सुविधेचा दुरुपयोग केला असेल तर त्यांच्याकडून मागील धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे.
ठाणे : तुम्हाला AC लोकल्स वाढवायच्या असतिल तर खुशाल वाढवा, पण त्यासाठी आमच्या रेग्युलर लोकल बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका असे सामान्य लोकल प्रवाशांचे म्हणने आहे. आधीच मध्य रेल्वेच्या 56 रेग्युलर गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केलेल्या होत्या आणि ह्या आठवड्यात आजून 10 सामान्य गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला त्यामुळे आज कळवा येथे AC लोकल्स थांबवून प्रवाशांनी आंदोलन केले.
सव्वा आठची कळवा कारशेड मधून सुटणारी ठाणे- सीएसमटी लोकल आहे. जी पूर्वी साधी होती. त्यामुळे कळव्यातील अनेक प्रवासी या गाडीतून कारशेडने प्रवास करत होते. आता ही लोकल एसी केल्याने प्रवाशांना लोकल मिळाली नाही. त्यामुळे कारशेडजवळ सुमारे पाऊण तास लोकल थांबवून ठेवली होती.
संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. मात्र त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना तिथून हटवलं. यानंतर लोकल वाहतूक पूर्ववत केली गेली. याशिवाय, रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना ताब्यात देखील घेतले आहे.
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांची ट्विट
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून सामान्य लोकल्स AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्याचा विरोध केला आहे.
ए.सी लोकल रिकाम्या धावत असताना त्यांच्या फेऱ्या वाढवण्याची व इमारती मधील रहिवासी घरे पाडण्याची रेल्वे ला गरज काय? ज्या साध्या लोकल आहेत त्यांची संख्या वाढवा, फेऱ्या वाढवा, डब्बे तरी वाढवा तेवढेही होत नसेल तर फलाटाची उंची वाढवा काय बरोबर ना फुटपट्टी वाले ?#कळवा_स्थानक_आंदोलनpic.twitter.com/tnuxczvTuq