Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हय़ात धावणार ‘पिंक ऑटोरिक्षा’; पुढील महिन्यापासून शुभारंभ…

 

सिंधुदुर्ग :महिलांना रोजगाराच्या व आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणण्यासाठी  सिंधुदुर्ग बँकेने ‘अबोली ऑटोरिक्षा’ ही महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याची घोषणा मंगळवारी आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केली. या योजनेसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीचा व्याजदरात अर्थसहाय्य, प्रशिक्षणासह बॅच परमिट चा खर्च करणार असल्याची ही माहिती आमदार नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या नाविन्यपूर्ण योजनेची  माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळशेकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.पिंक ऑटो रिक्षा म्हणून रेल्वे स्थानके जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये अशी रिक्षा सेवा सुरू व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेने ही योजना हाती घेतली आहे.

 आमदार नितेश राणे यांचे आवाहन

जिल्ह्यात रोजगाराला चालना मिळावी तसेच आता येत असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाबरोबरच सुरू झालेल्या विमानसेवा जिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ यासाठी या विकासाला सहाय्य करणारी सेवा जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेऊन यशस्वी करावी व या योजनेत जिल्ह्यातील महिला व तरुणीनी पुढाकार घ्यावा व या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

जिल्हा बँकेकडून या योजनेसाठी नऊ टक्के सवलतीचा व्याजदर आकारण्यात येणार आहे. एकूण किमतीच्या 85% कर्जपुरवठा जिल्हा बँक करणार आहे.

पाहिल्या पाच महिला रिक्षाचालकांना विशेष सवलत 

कोणत्याही क्रांतीची सुरवात करताना कोणीतरी सुरवात करणे महत्त्वाचे असते. हीच सुरवात करण्यासाठी नितेश राणे यांनी पहिल्या पाच अर्जदारांसाठी स्वतः काही सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलती पुढीलप्रमाणे असतील. 

उर्वरित पंधरा टक्के कर्ज पुरवठा (Down Payment) स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. 

ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचा तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच परमिटचा खर्च देखील ते करणार आहेत.

पहिल्या पाच महिलांना जागतिक महिला दिनाच्या 8 मार्च रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात पिंक रिक्षांचे वितरण लाभार्थी महिलांना होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

महिला अधिकारी नमिता खेडेकर यांची नियुक्ती.
जिल्ह्यातील महिलांच्या या योजनेसाठी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील नमिता खेडेकर यांचे खास नियुक्ती करण्यात आली असून इच्छुक महिला व युवतीने या पिंक ऑटो रिक्षा अबोली योजनेसाठी नोंदनों णी करावी व जिल्ह्याच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले आहे. संपर्कासाठी 9421149421 हा श्रीमती नमिता खेडेकर यांचा मोबाईल नंबर ही जाहीर करण्यात आला 

Loading

धक्कादायक: कणकवली सावडाव येथे ६ शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न….

सिंधुदुर्ग:कणकवली तालुक्यातील सावडाव येथे आज एक धक्कादायक प्रकार घडला. सावडाव येथील ६ मुलांचे जवळ जवळ अपहरण झाले होते. सुदैवाने मुलांनी दाखविलेल्या हुशारीमुळे आणि प्रसंगावधानामुळे अपहरणकर्त्यांचा डाव उधळला गेला.

याबाबत सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे. सावडाव येथील सहावीत शिकणाऱ्या ५ मुली आणि तिसरीत शिकणारा एक मुलगा शाळेच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात चालत असताना एका निर्जन ठिकाणी एक ओमनी/इको कार त्यांच्या जवळ थांबली आणि त्यातून दोघा इसमांनी उतरून मुलांना चाकूचा धाक दाखवून गाडीत बसण्यास भाग पाडले आणि गाडी जंगलाच्या दिशेने सुसाट वेगाने सोडली. गाडीच्या काचा बंद केल्या तसेच रस्त्यात एका ठिकाणी या मुलांची दप्तरे बाहेर टाकून देण्यात आली. काही अंतर कापल्यावर रस्ता चुकल्याचे  त्यांच्या लक्षात आले म्हणुन त्यांनी गाडी थांबवली आणि फोन करण्यासाठी ते दोघे गाडीतून उतरले. मुलांनी ही संधी साधून गाडीचा दरवाजा उघडून गावाच्या दिशेने पळ काढला आणि झाला प्रकार ग्रामस्थांना आणि शिक्षकांना सांगितला. ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार कणकवली पोलिसांना कळवला आणि पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. अपहरणकर्त्यांचा माग घेण्यासाठी श्वानपथकालापण पाचारण करण्यात आले आहे.

अघोरी प्रकारासाठी अपहरण?
गाडीत बसल्यावर एका इसमाने त्या मुलांच्या डोक्याला लाल कुंकू लावले त्यामुळे मुलांचे अपहरण काही अघोरी प्रकारासाठी केले जात होते कि काय असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

Loading

मालवणात जप्त करण्यात आलेली व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) म्हणजे नक्की काय?

सिंधुदुर्ग: तळाशील मालवण येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवण पोलिसांनी कार्यवाही करून व्हेल मासाउलटी सदृश 27 तुकडे जप्त केले आहेत. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एच व्ही पेडणेकर व सुशांत पवार यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कार्यवाही केली आहे. पंचनामा, जबाब नोंदनों तसेच वन विभागाच्या ताब्यात २७ तुकडे देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मालवण पोलिसांनी सांगितले. सापडलेले तुकडे व्हेल मासा उलटी आहे की नाहीत याचीही तपासणी होणार आहे.

व्हेल माश्याच्या उलटीला एवढे महत्व का?

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.

उलटी कशी बनते

शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते

उलटी कशी ओळखतात?
स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते.

बंदी का?
या उलटीची किंमत जास्त असल्याने लोक व्हेल माशाला पकडून त्याच्या पोटातून त्याची विष्ठा काढण्याचा प्रयत्न करतील अशी सरकारला भीती वाटते आणि त्यामुळे त्या माशाची जात नष्ट होण्याची भीती वाटते.

Loading

कुडाळ तालुक्यात मद्यधुंद डंपर चालकाने ५ महिलांना उडवले; अपघातात १ महिला ठार.

कुडाळ : कुडाळ मार्गाने चौके परिसरात येणाऱ्या डंपर चालकाने काळसे होबळीचा माळ येथे काल गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता पादचारी महिलांना भीषण धडक दिली.या अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर- काळसे- बौध्दवाडी येथील महिला डंपर अंगावरुन गेल्याने जागीच मृत्यूमुखी पडली तर इतर चार महिलांपैकी दोघींना गंभीर दुखापत झाली आहे.तर दोघी जखमी झाल्या आहेत.

याबाबत सविस्तर बातमी – गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळवरुन चौकेच्या दिशेने येणारा डंपर MH 46 -F0827 या डंपर चालकाने काळसे होबळीचामाळ येथे कामावरुन घरी परतत असणाऱ्या काळसे बौद्धवाडीतील पाच महिलाना मागून
धडक दिली या अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) या महीलेच्या अंगावरुन डंपर गेल्याने जागीच गतप्राण झाली.तर समिक्षा सुभाष काळसेकर,रुक्मिणी विठोबा काळसेकर,अनिता चंद्रकांत काळसेकर,प्रद्ज्ञा दिपक काळसेकर यांना गंभीर दुखावत झाली.अपघातची माहिती मिळताच काळसे पोलीस पाटिल प्रभू यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलाना रुग्णवाहिनेने जिल्हा रुग्णालयात नेले. चौकशीअंती डंपरचालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे.

मालवण पोलिस निरीक्षक श्री विजय यादव, उपनिरीक्षक श्री.झांजृर्णे यांच्या सह कट्टा-मालवण येथील पोलीसपथक घटनास्थळी दाखल झाले. डंपर चालकास त्यांनी ताब्यात घेतले आहे. .

Loading

कुणकेश्वर जत्रेस मुख्यमंत्री उपस्थित राहणार

सिंधुदुर्ग : श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेच्या प्रथम पूजेसाठी यावर्षी प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासित केल्यामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि प्रशासनाच्या समन्वयाने नियोजन सुरू असल्याची माहिती श्री देव कुणकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

कुणकेश्वर यात्रा यंदा १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यानिमित्ताने देवस्थानच्यावतीने पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी श्री देव कुणकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, अभय पेडणेकर यांच्यासह अन्य विश्‍वस्त उपस्थित होते.

कुणकेश्वर मंदिर हे पांडवकालीन पुरातन मंदिर असून याठिकाणी स्वयंभू पिंड आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्‍वर येथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते. श्री देव कुणकेश्‍वराचे स्थान इ.स. अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचा आख्यायिका आहे.

Loading

आंबोली येथील खूनप्रकरणी आणखीन ५ संशयितांना अटक

सिंधुदुर्ग : आंबोली येथील सुशांत खिल्लारे खूनप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन ५ संशयितांना अटक केली असून विशेष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी दि.१३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

 नव्याने अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीत आबासो उर्फ अभय बाबासो पाटील (वय-३८ रा. वाळवा, सांगली),प्रवीण विजय बळीवंत (वय-२४, रा. वाळवा, सांगली),स्वानंद भारत पाटील (वय-३१, रा.इस्लामपूर, सांगली),राहुल बाळासाहेब पाटील(वय- ३१, रा.वाळवा,सांगली), राहुल कमलाकर माने( वय-२३,रा.कराड,सातारा) यांचा समावेश आहे.

वीटभट्टी व्यवसायासाठी कामगार पुरविणार असल्याचे सांगून सुशांत खिल्लारे याने भाऊसो माने याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते.मात्र,त्याने कामगार पुरवले नव्हते.तसेच घेतलेले पैसे देण्यास ही तो टाळाटाळ करीत होता.याचा राग येऊन सुशांत याला पंढरपूर येथून पुढे कराड येथे आणून भाउसो माने व तुषार पवार यांनी मारहाण केली होती.यात सुशांत याचा मृत्यू झाला होता.त्यानंतर मृतदेह आंबोली येथे दरीत टाकताना भाऊसो याचा तोल गेल्याने सुशांत यांच्या मृतदेहाबरोबर तोही दरीत कोसळला होता.त्यात त्याचाही मृत्यू झाला होता.

संबंधित बातमी आंबोलीत घातपाताची विचित्र घटना… मृतदेहाची विल्हेवाट लावताना एकाचा मृत्यू

Loading

कुणकेश्वर जत्रेसाठी एसटीच्या १७ फेब्रुवारीला विशेष फेऱ्या

मुंबई :दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर दिनांक १८ फेब्रुवारीला होणाऱ्या प्रसिद्ध जत्रेसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथून संध्याकाळी ६ वाजता एक विशेष बस सुटणार आहे. ही गाईड सायन – पनवेल मार्गे चालवण्यात येणार आहे. तसेच कल्याण-विठ्ठलवाडी येथून त्याच दिवशी ६.३० ला एक गाडी या जत्रेसाठी सोडण्यात येणार आहे.

दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षॉंनी कुणकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.

Loading

वेंगुर्ला येथे साकारलेला कोकणातील पहिला झुलता पूल ठरतो आहे पर्यटकांसाठी आकर्षण….

सिंधुदुर्ग :कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा आणि मांडवी खाडी यांच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच  हे झुलते पूल (Sea Link ) पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटक येथे सेल्फि, फोटोग्राफी आणि प्रि-वेडींग फोटोशूट साठी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.

या पुलामुळे समुद्र किनार्‍यावर जाणे सोपे होणार आहे. याआधी ईथे जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर वळसा घालावा लागत होता. पुलामुळे आता अवघ्या 5 मिनिटांत समुद्रकिनारी जाणे आता शक्य होणार आहे.

तत्कालीन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी केसरकर यांच्या ‘समृद्ध कोकण’ या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याचे काम बरीच वर्षे रखडले होते. त्यावरून अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यावर वारंवार टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्याचे मंत्री शालेय मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणून हा पूल पूर्णत्वास नेला आहे. अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलते पूल असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. वेंगुर्ल्यात आल्यानंतर झुलत्या पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह पर्यटकांना होत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने गतिमान विकास होत असून यात हा पूल मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.

 

(Also Read>आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…)

Loading

आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…

   Follow us on        

सिंधुदुर्ग:  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिरपरिसरात मोबाईल नेटवर्क ची समस्या येत होती. ह्या परिसरात कोणत्याच मोबाइल कंपनीचे नेटवर्क पकडत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. ह्या समस्येवर आता उपाय योजना करण्यात आली आहे.

(Also Read > सिंधुदुर्ग जिल्हा हवाईमार्गाने हैद्राबाद व म्हैसूर शहरांशी जोडला जाणार.. जाणून घ्या वेळापत्रक आणि प्रवासभाडे )

या परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मालवण तालुक्या तील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावक-यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचाही समावेश असतो. पंरतू, आंगणेवाडी परिसरात गेलीअनेक वर्षे मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, त्यांचा हिरेमोड होत असे. त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल जत्रेच्या दरम्यान उपलब्ध राहणार आहेत.

या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

 

Loading

आंबोलीत घातपाताची विचित्र घटना… मृतदेहाची विल्हेवाट लावताना एकाचा मृत्यू

 

सिंधुदुर्ग : एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीत आलेल्या व्यक्तिचा त्या मृतदेहासोबत दरीत पडून मृत्यू झाल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की कराड येथील एका विट व्यावसायिकाने एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला  व्यावसायिकाने एका मित्राच्या मदतीने मारहाण केली. या मारहाणी दरम्यान त्या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो व्यावसायिक आणि त्याचा मित्राने सरळ आंबोली गाठली आणि मृतदेह एका खोल दरीत टाकायचे ठरवले. पण तो मृतदेह दरीत टाकताना त्या व्यावसायिकाचा पाय घसरला आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  व्यावसायिकचा मित्र आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही मृतदेह पण सापडले आहेत. मारहाणी दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमूळे न होता हार्ट अ‍ॅटॅक मुळे झाला असल्याचेही त्याने सांगितले. नेमकी घटना काय आहे ह्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search