समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
Follow us on
चिपळूण दि. २४ जुलै: निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम यांच्यासोबत आज कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची विविध मागण्यांसाठी आज भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संतोष कुमार झा यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे वचन दिले असल्याचे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता येथे काही 9 गाड्यांना थांबा मिळावा अशी आमची मागणी होती. आमदार निकाम सर यांच्यामुळे या बैठकीचा योग जुळून आला असून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या वतीने मी त्यांचे तसेच श्री झा साहेबांचे आभार मानतो. संगमेश्वरला लवकरच किमान 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळेल अशी आशा आज निर्माण झाली आहे. या प्रसंगी आमदार आदरणीय शेखर सर, ग्रुपच्या वतीने श्री दीपक पवार, संतोष पाटणे, समीर सप्रे, अशोक मुंडेकर, सुशांत फेपडे आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.
संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची दाट शक्यता
▪️1) 110099/11000 LTT मडगांव LTT
▪️2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस
▪️3)20909/20910 कोचिंवेल्ली पोरबंदर एक्सप्रेस
समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
पत्रकार संदेश जिमन यांनी समाज माध्यमातून नेहेमीच संगमेश्वर, चिपळूण येथील रेल्वे प्रवाशांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मागच्या वर्षी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळवून दिला होता. त्यांच्या कार्याचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते आणि प्रवासी संघटनेंकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनाकडे पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम वापर कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सोयींसाठी आमदार शेखर निकम नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. रेल्वे प्रश्नासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात एक उत्तम नेतृत्व लाभले असल्याची जनतेची भावना आहे.
Konkan Railway News: पावसाळ्यात संपूर्ण कोकण मार्ग धोकादायक बनतो; धोक्याच्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या धोका असतोच शिवाय अन्य विपरीत गोष्टी घडण्याची भीतीही जास्त असते. अशा वेळी या मार्गावरील चालणाऱ्या गाड्यांच्या चालकांना नेहमीच सावध आणि तत्पर राहावे लागते. लोको पायलटने दाखवलेल्या सावधानतेमुळे असाच एक अपघत होता होता टळला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेसचा मोठा अपघात लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे टळला. बारकुर आणि उडुपी विभागादरम्यान येत असताना, या गाडीचे लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटने ट्रॅकवर पडलेले एक मोठे झाड पहिले आणि तत्परतेने आपत्कालीन ब्रेक लावला आणि गाडी थांबवून हा अपघात टाळला.
यावेळी लोको पायलट म्हणून श्री पुरुषोत्तम आणि सहाय्यक लोको पायलट श्री मंजुनाथ नाईक कर्तव्यावर होते. त्यांच्या सतर्कतेची आणि समयसूचकतेची दखल घेऊनकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी प्रत्येक चालक दलातील (Crew) सदस्यांसाठी प्रत्येकी 15,000 रुपये रोख बक्षीस जाहीर करून त्यांचा सन्मान केला.
Proposal for Special Trains:कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्यरेल्वेने गणपती विशेष गाड्यांची यादी जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही आपली गणपती विशेष गाड्यांची यादी तयार केली असून ती कोकण रेल्वे, मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वेला मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीला या विभागांकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघे काही मिनिटातच फुल झाल्याने तिकिटे न मिळालेल्या प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळवण्याची अजून एक संधी भेटणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांची यादी
महत्वाची सूचना:ही यादी अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे विभागांकडून आलेल्या बदलाप्रमाणे त्यात बदल केला जाऊ शकतो
१) ०९००१/०९००२ मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९००१ विशेष मुंबई सेंट्रल येथून मंगळवार दिनांक ०३,१० आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता ठोकूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९००२ विशेष ठोकूर येथून बुधवार दिनांक ०४,११ आणि १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०५ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – १७.४०)
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
२) ०९००९/०९०१० मुंबई सेंट्रल-सावंतवाडी-मुंबई सेंट्रल (आठवड्याचे ६ दिवस) विशेष (एकूण २६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९००९ विशेष मुंबई सेंट्रल येथून दिनांक ०२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत मंगळवार वगळता दररोज दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०२:३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१० विशेष सावंतवाडी येथून दिनांक ०३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत बुधवार वगळता दररोज पहाटे ०५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेन्ट्रल येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
३) ०९०१५ /०९०१६ वांद्रे (T) – कुडाळ – वांद्रे (T) साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९०१५ विशेष वांद्रे टर्मिनस Bandra येथून गुरुवार दिनांक ०५ ,१२ आणि १९ सप्टेंबर रोजी दुपारी १४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.४० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१६ विशेष कुडाळ येथून शुक्रवार दिनांक ०६,१३ आणि २० सप्टेंबर रोजी सकाळी ०६.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: सेकंड सीटिंग – २०, एसएलआर – ०१ ब्रेकव्हॅन – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
४) ०९०१८/०९०१७ उधना – मडगाव – उधना (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९०१८ विशेष उधना येथून शुक्रवार दिनांक ०६,१३ आणि २० सप्टेंबर रोजी दुपारी १५,२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०९.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – २०.२०)
गाडी क्रमांक ०९०१७ विशेष मडगाव येथून शनिवारदिनांक ०७,१४, २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता उधना येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
५) ०९०२०/ ०९०१९ उधना – मडगाव – उधना द्विसाप्ताहिक विशेष भाड्यावर विशेष ट्रेन(एकूण १० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९०२० विशेष उधना येथून शनिवार आणि बुधवार दिनांक ०४,०७,११,१४,१८ सप्टेंबर रोजी दुपारी १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – २०.२०)
गाडी क्रमांक ०९०१९ विशेष मडगाव येथून रविवार आणि शुक्रवार दिनांक ०५,०८,१२,१५,१९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता उधना येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
६) ०९४१२/०९४११ अहमदाबाद – कुडाळ – अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७.२०)
गाडी क्रमांक ०९४११ विशेष कुडाळ येथून बुधवार दिनांक ०४,११,१८ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
७) ०९१५०/०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९१५० विशेष विश्वामित्री येथून सोमवार दिनांक ०२,०९,१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७:५०)
गाडी क्रमांक ०९१४९ विशेष कुडाळ येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १ वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
८) ०९४२४/०९४२३ अहमदाबाद – मंगुळुरु -अहमदाबाद साप्ताहिक टीओडी विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४२४ विशेष अहमदाबाद येथून शुक्रवार दिनांक ०६,१३,२० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९.४० वाजता मंगुळुरु येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – ००:४५)
गाडी क्रमांक ०९४२३ विशेष मंगुळुरु येथून शनिवार दिनांक ०७,१४,२१ सप्टेंबर रोजी रात्री २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – पहाटे ०६.००)
थांबे: गेरातपुर,नाडियाद, आनंद, वडोदरा, भारूच, सुरत, वापी, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा,रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि दक्षिणेकडील राज्यातील थांबे.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
चिपळूण:जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना एकूण ७०८ वह्यांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, सरस्वती फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सुधाकरराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर यांनी श्री. सुधाकरराव कदम यांचा विशेष सन्मान केला. त्याचप्रमाणे बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.नंदकुमार राणे साहेब आणि न्यासाचे चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री.नारायण चव्हाण साहेब यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गवार वह्यांचे वितरण करण्यात आले. सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजितराव कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकरराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे सर यांनी केले.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा : श्री.यशवंत जडयार*
Follow us on
मुंबई दि. २० जुलै:अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची एल्गार सभा रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वा. सोशल सरव्हिसलिग हायस्कूल दामोदर हॉलच्या बाजूला परळ मुंबई येथे समिती अध्यक्ष श्री.शेखर बागवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
समितीच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांपासून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे, रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे व त्याला प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देणे,नियोजित वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस व दिवा चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्या मिळत नसल्याने यापुर्वीही परळ येथील प्रा.मधू दंडवते जन्मशताब्दी उत्सव व सावंतवाडी रोड स्टेशन येथील टर्मिनससाठी केलेले उपोषणातून समितीने मोठे शक्ती प्रदर्शन केलेले आहे,यासाठी ही एल्गार सभा खूप महत्वाची आहे.
गणेशउत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण,याला मुंबईतून लाखो चाकरमनी कोकणातील आपल्या गावी जातात, त्यासाठी त्यांना पुरेशा कोकण रेल्वेच्या रेल्वे मिळवून देण्यासाठी ही सभा समस्त कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाची असल्याचे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले.
कित्येकदा कोकण रेल्वेमार्गावरून गणेशउत्सवासाठी सोडलेल्या जादा गणपती स्पेशल एक्सप्रेसचे तिकीट बुकींग पहिल्या तीन मिनीटामध्येच फुल होते,याच्याने खरा लाभार्थी असलेला कोकणी माणूस तिकीटापासून वंचितच राहतो,चाकरमन्यांचा रेल्वे प्रशासनाला प्रश्न आहे की,रेल्वेच्या दलालांचे बुकींग कसे होते?मग सर्वसामान्य कोकणी माणसाला गणपतीचे तिकीट का मिळत नाही?
लोकसभेची निवडणूक समोर ठेवून कोकणातील अनेक नेत्यांनी समितीला आश्वासने दिली होती त्याचे पुढे काय झाले? यासाठी ही एल्गार सभा निर्णायक ठरणार आहे,अन्यथा विधानसभेची निवडणूक फक्त पुढील तीनच महिन्यांवर आलेली आहे.
समितीच्या ह्या एल्गार सभेला मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,मिरा भाईदर,वसई विरार,बोईसर पालघर,भांडूप,ठाणे दिवा,कल्याण डोंबीवली,बदलापूर परिसरातील कोकण वासियांनी मोठया संस्थेने सहभागी व्हावे असे आवाहन सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी केले आहे.
Special Train for Ganesh Chaturthi: कोकणात गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना मध्यरेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई- रत्नागिरी, मुंबई-कुडाळ, मुंबई – सावंतवाडी तसेच दिवा – चिपळूण या विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक २१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता रेल्वे च्या आरक्षण खिडक्यांवर तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर सुरू होणार आहे.
१) मुंबई सीएसएमटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-
०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
०११५२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
२) मुंबई सीएसएमटी -रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)
०११५३ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
३) एलटीटी -कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-
०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
४) एलटीटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-
०११७१ स्पेशल एलटीटी मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २२:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
5) दिवा- चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)
०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.
०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
७) एलटीटी -कुडाळ स्पेशल (६सेवा)-
०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आले नसून बऱ्याच गाड्या उशिराने धावत आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक १७ जुलै रोजीची मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२) पूर्णतः रद्द करण्यात आली आहे तर आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्सप्रेस जी संध्याhttps://kokanai.in/wp-admin/edit.phpकाळी १६:४५ वाजता सुटणार होती ती १७ जुलैला ००:५० वाजता म्हणजे आज मध्यरात्री सोडण्यात येणार आहे.
सावंतवाडी, दि. १५ जुलै :काल नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांत कित्येक प्रवासी अडकून पडले होते. १२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते, अशातच कोकण रेल्वे प्रवासी संघटना त्यांच्या मदतीला आली.
कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावंतवाडी स्थानकावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. लगेचच त्यांनी कोकण रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याला फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मधे पाणी भरायला लावले. लगेच अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. आणि सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले, त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन जेमतेम रक्कम १०,००० रुपये जमा झाले.या रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी ६०० पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स (१ लिटर), बिस्किटे, आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावर जाऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केले, त्यावेळी प्रवाशांना धीर देण्यात आला, संघटनेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, खजिनदार विहंग गोठोसकर,राज पवार आदी उपस्थित होते.
Konkan Railway on Track: कोकण रेल्वे ठप्प झाल्याने कालपासून कोकण रेल्वेमार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे आलेला मातीचा भराव दूर करण्यात आला असून रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने आताच दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मार्ग वाहतूक सुरु करण्यासाठी योग्य असल्याचे सर्टिफिकेट Track Fit Certificate (TFC) आज ४:३० वाजता जारी करण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Track Fit Certificate (TFC) issued at 16:30hrs for Km 79/4-6 between Diwankhavati – Vinhere section of Ratnagiri region. @RailMinIndia
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर झालेल्या भुरस्सलनामुळे बंद झालेली वाहतूक अजून पर्यन्त पूर्वपदावर आली नसून. अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द, पुनर्नियोजित आणि पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे. या मार्गातील अडथळा संपूर्णपणे दूर करण्यासाठी अजून किमान ३ तास लागतील असे कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईच्या दिशेने राज्य परिवहनच्या मदतीने सावंतवाडी, चिपळूण, रत्नागिरी आदी स्थानकावरून बसेस सोडल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “वंदे भारत” एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१९ लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
खालील गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असून रत्नागिरी ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 22120 मडगाव जं. – मुंबई CSMT “तेजस” एक्स्प्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 11004 सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास खेड स्थानकाकडे संपविण्यात आला असून तो खेड – दिवा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आला.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. – मुंबई CSMT “मांडवी” एक्सप्रेसचा प्रवास चिपळूण स्थानकावर संपविण्यात आला असून तो चिपळूण – मुंबई CSMT दरम्यान अंशतः रद्द करण्यात आला आहे.
उशिरा प्रस्थान करणाऱ्या गाड्या
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२४१३ मडगाव जं. – H. निजामुद्दीन “राजधानी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ८ वाजता न सुटता संध्याकाळी १६:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १११०० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ११:३० वाजता न सुटता संध्याकाळी १८:३० मडगाव स्थानकावरून
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत दुपारी १२:०० वाजता न सुटता संध्याकाळी ०८:०० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १७:५५ वाजता न सुटता रात्री २२:३० वाजता सावंतवाडी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 00847 हटिया – मडगाव “भारत गौरव” FTR विशेष प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 20909 कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२९७७ एर्नाकुलम जं. – अजमेर जं. प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
रत्नागिरी दि. १५ जुलै, 08:00AM:कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर आलेल्या मातीच्या भल्या मोठ्या भरावामुळे कोकण रेल्वेचे ठप्प झालेली वाहतूक अजूनही पूर्वपदावर आली नाही आहे. रेल्वे मार्गावरील अडथळा हटवण्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसून मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या रद्द, पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १२ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३३५ गांधीधाम- नगरकोइल जं. एक्स्प्रेसआता विन्हेरे येथून मागे फिरवण्यात आली असून ती कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन मार्गे वळवली जाईल.
दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२२८४ – एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२७४२ – वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र.१६३४५ – नेत्रावती एक्स्प्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र ०९०५७ – मंगळुरु. विशेष भाडे उन्हाळी विशेष ट्रेन
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२४३२ – तिरुवनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्स्प्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१८ – मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जं.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ११००३ दादर – सावंतवाडी रोड “तुतारी” एक्स्प्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी” एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी मांडवी
एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई CSMT एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ५०१०८ मडगाव – सावंतवाडी रोड
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस