Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे पूर्व रेल्वेच्या सहकार्याने एक वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे. या गाडीच्या दोन्ही दिशेने एकूण ६ फेर्या सोडण्यात येतील. ही गाडी विशेष प्रवासी भाडे आकारून चालविण्यात येणार आहे.
Train No. 09424 / 09423 Ahmedabad – Mangaluru Jn – Ahmedabad Weekly Special on Special Fare :
ही गाडी अहमदाबाद ते मंगळुरू स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train No. 09424 Ahmedabad – Mangaluru Jn Weekly Special on Special Fare :
दिनांक ०९/०६/२०२३, १६/०६/२०२३, २३/०६/२०२३ शुक्रवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल ती दुसर्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरू या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 09423 Mangaluru Jn – Ahmedabad Weekly Special on Special Fare :
दिनांक १०/०६/२०२३, १७/०६/२०२३, २४/०६/२०२३ शनिवारी ही गाडी मंगळुरू या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल ती तिसर्या दिवशी रात्री १:१५ वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल
गणेश नवघरे | मुबंई गोवा महामार्गाची जनआक्रोश समितीच्यावतीने निरीक्षण व सर्व्हे शनिवार दिनांक ३ जुन रोजी करण्यात आले.केद्रींयमंञी नितीन गडकरी यांच्या म्हणन्यानुसार ३१ मे पर्यंत एक मार्गीका तर डिसेंबर २०२३ पर्यंत संपुर्ण महामार्ग पूर्ण केला जाईल असे आश्वासन दिले होते.परंतु महामार्गावर तसे काहीही पहायला मिळले नाही असे जनआक्रोष टीमचे म्हणने आहे. या पहाणी दौऱ्यासाठी NHAI चे अधिकारी तसेच जे. एन. म्हात्रे व कल्यान टोलवेचे ठेकेदार यांना सोबत घेऊन पळस्पे ते ईंदापुर असा पहाणी दौरा जनआक्रोश टीमचे सचिव रुपेश दर्गे व त्यांचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
या रस्त्याच्याबाबत विचारणा करत असताना अधिकारी माञ ऊत्तर देण्यास टाळाटाळ करताना दिसुन येत आहेत असे माणगाव सचिव रमेशभाई ढेबे म्हणाले.
जनआक्रोश समितीकडून श्री.रुपेश दर्गे, श्री.अजय यादव,श्री.गणेश नवघरे,श्री.संजय जंगम,श्री. अनिल जोशी,श्री.अशोक देवरुखकर काका,श्री. रवींद्र पवार, श्री.संजय सावंत,श्री.अतुल चव्हाण,श्री.राज गुजर,श्री. निलेश घाग(CA),श्री. प्रकाश पालांडे,श्री.सचिन मुनगेकर, श्री.रमेशभाई ढेबे,श्री.सुधीर सापळे,श्री.रवींद्र सांगळे उपस्थित होते.
Konkan Railway News |कोकण पट्टय़ातील डोंगराळ भाग आणि मोठ्या प्रमाणात पडणार पाऊस यामुळे कोकण रेल्वे मार्ग अत्यंत धोक्याचा बनतो. या कालावधीत अपघात टाळण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणार्या गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येते,तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सावधगिरी साठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.यावर्षीही मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून सुरक्षितच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या आहेत. गस्तीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नऊ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पुलांसाठी पूर चेतावणी देणारी यंत्रणा व चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत.
कोकण रेल्वेने ७४० किमी मार्गावर नियोजित सुरक्षा कामे पूर्ण केली आहेत. पाण्याच्या नाल्यांची साफसफाई आणि कलमांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर भू-सुरक्षा कार्ये राबवण्यात आल्याने, खड्डा पडण्याच्या आणि माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवणे सुनिश्चित झाले आहे.
रेल्वे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जाव्यात यासाठी कोकण रेल्वे विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्सून पेट्रोलिंग करण्यात येते. पावसाळ्यात सुमारे ८४६ कर्मचारी कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालणार आहेत. असुरक्षित ठिकाणे ओळखून चोवीस तास गस्त घातली जाणार असून, वॉचमन तैनात करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली सेल्फ प्रोपेल्ड एआरएमव्हीएस (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) सज्ज ठेवण्यात आली आहे. वेर्णा येथे एआरटी (अपघात निवारण ट्रेन) सज्ज ठेवण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय / स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन प्रदान करण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्ड ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत. तसेच कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर २५ वॅटचे व्हिएचएफ बेस स्टेशन आहे. हे ट्रेन क्रू तसेच ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर यांच्यात वायरलेस संप्रेषण सक्षम करते. कोकण रेल्वे मार्गावर इमर्जन्सी कम्युनिकेशन (ईएमसी) सॉकेट्स सरासरी १ किमी अंतरावर प्रदान करण्यात आले आहेत. ज्यामुळे गस्तीवर, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. १ आपत्कालीन संपर्कासाठी एआरएमव्हीमध्ये सॅटेलाइट फोन संपर्क प्रदान करण्यात आला आहे.
सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल पैलू आता एलईडीने बदलले आहेत. ९ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी या प्रदेशात पावसाची नोंद होईल आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकारी सतर्क करतील. पुलांसाठी पूर चेतावणी देणारी यंत्रणा ३ ठिकाणी प्रदान करण्यात आली आहे, उदा. काली नदी (माणगाव-वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर-सापे वामणे दरम्यान), वाशिष्ठी नदी (चिपळूण-कामठे दरम्यान) आणि पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करेल. चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत. उदा. पानवल मार्ग (रत्नागिरी-निवसर दरम्यान), मांडोवी पूल (थिवी-करमळी दरम्यान), झुआरी पूल (करमळी-वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर-मानकी दरम्यान) वाऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आले आहेत.
या मार्गावर डोंगरकड्यांतून बोगदे तयार केले असून पुलांची संख्याही जास्त असल्याने वेगमर्यादा घालून गाड्या चालवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाकडून रोहा ते वीर ११० किमी प्रतितास, वीर ते कणकवली ७५ किमी प्रतितास, कणकवली ते उडपी ९० किमी प्रतितास, उडपी ते ठोकूर ११० किमी प्रतितास या वेगाने गाड्या चालणार आहेत.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. याशिवाय डोंगरकड्यांतून जाणार्या गाड्यांच्या वेगावरही निर्बंध येणार असल्याने प्रवासाच्या कालावधीत वाढ होईल.
Cyclone Alert |अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने देशाच्या किनारपट्टीसह इतर भागातही धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असं नाव देण्यात आलं आहे.
ताज्या माहितीनुसार हा कमी दाबाचा पट्टा गोव्यापासून 920km किमी अंतरावर दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात असून उत्त्तर दिशेने सरकत आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात तसेच महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील काही भागात चक्रिवादळाची शक्यता आहे.
मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे.
Depression has formed over southeast Arabian Sea and lay centered at 0530 IST near Lat 11.3 and Lon 66.0 about 920km WSW of Goa, 1120km SSW of Mumbai. Likely to move nearly northwards and intensify into a CS during next 24 hours. pic.twitter.com/GDEGgwtrcT
— India Meteorological Department (@Indiametdept) June 6, 2023
National Bulletin No 1: दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात Depression. ~1120km दक्षिण-द/पश्चिम मुंबई पासून 920km पश्चिम-द/प. गोवा 1160km दक्षिण पोरबंदर & 1520km द. कराची
पुढच्या 24 तासात उत्त्तर दिशेने सरकणार,🌀चक्रिवादळाची शक्यता,पुर्वमध्य अरबी समुद्रात व दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात IMD pic.twitter.com/GZC3a2HB3e
सिंधुदुर्ग | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण.
सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी.
सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण.
दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ.
दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण.
दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.
दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं.
4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
या गाडीच्या डब्यांची संरचना जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे असणार आहे. विस्टाडोम – 01+ एसी चेअर कार – 03 + सेकंड सीटिंग – 10 + एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 असे मिळून एकूण 16 एलएचबी डब्यांसहित ही गाडी चालविण्यात येणार आहे.
Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले आणि सुमार काम याविरोधात विविध उपक्रमातून आवाज उठवणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने जनजागृती करण्यासाठी एक विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावर महामार्गाच्या रखडलेल्या कामा विरोधात जनजागृती करणारे घोषणा फलक लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावले गेले आहेत.
”पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावण्यात येत आहेत.झोपेचा सोंग घेऊन झोपलेल्याना आमच्या कोकणकरांच्या समस्या कळाव्यात व जास्तीत जास्त कोकणकर या आंदोलनात जोडले जावेत व स्थानिक जनतेपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वाना विनंती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील बॅनर आपल्या विभागात फोटोसहित लावले तर एक सहकार्य मिळेल.” असे समितीचे सचिव रुपेश दर्गे म्हणाले आहेत.
या अभियानाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून जनजागृती होवून अधिक चांगला परिणाम मिळणार आहे त्यामुळे दुसर्या टप्प्यात या अभियानाचे मुंबईत ठाणे व नवी मुंबई पालघर जिल्हा येथे ही नियोजन करण्याचे समितीने ठरवले आहे. जे प्रतिनिधी स्व-योगदानाने हे बॅनर आपल्या परिसरांत लावु इच्छित असतील त्यांना आपले नाव व फोटोसकट आपल्या घोषणाफलक लावु शकतात. त्यासाठी 8652505542 संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग – जन्मोजन्मी हाच पती मिळावा, त्याच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचे व्रत करते. पण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून कुडाळमध्ये काही पुरुषांनी सुद्धा हे व्रत करून वडाला फेऱ्या मारल्या आहेत. यंदाचं नाही तर गेली १४ वर्ष वट पोर्णिमेला ते व्रत करत आहेत.
महिलांच्या बरोबरीने या पुरुषांनी वटवृक्षला फेऱ्या मारून आपल्या पत्नीप्रती आपली निष्ठा, आपलं प्रेम जपले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ संजय निगुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १४ वर्षांपूर्वी हि परंपरा सुरु केली. कुडाळमध्ये श्री गवळदेव मंदिराकडे असलेल्या वटवृक्षाची पूजा करून त्याला फेऱ्या मारून हे व्रत पुरुषमंडळी सुद्धा करत आहेत. ही सर्व मंडळी आज सकाळी गवळदेव मंदिर इथं जमली. देवाला श्रीफळ ठेवून सांगणं करण्यात आले. त्यांनतर ब्राह्मणाच्या उपस्थितीत वटवृक्षाची पूजा करून त्याला सात फेरे मारण्यात आले. आपल्या पत्नीप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पुरुषाने हे व्रत करावे असे आवाहन यावेळी करण्यातआले.
पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाक आहेत. दोघेही समान आहेत. पत्नी जर आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, सौख्यासाठी हे व्रत करते तर आपल्या पत्नीचा सन्मान राखावा यासाठी महिलांप्रमाणे पुरुषांनी सुरु ठेवलेले व्रत खूप चांगले असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग | वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ येथे थांबा मिळाला नसल्याने कुडाळवासिय प्रवासी नाराज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एका स्थानकावर थांबा मिळणार हे निश्चित झाल्यापासून ते स्थानक कोणते असणार याबाबत प्रवाशांना मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
साहजिकच तो थांबा या जिल्हय़ात मध्यवर्ती भागातील कुडाळ या स्थानकावर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या गाडीला अखेर कणकवली या स्थानकांवर थांबा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते.
कुडाळवासियांची नाराजी दूर करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ ऐवजी कणकवली येथे थांबा का देण्यात आला याचे स्पष्टीकरण माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करून काल केले आहे. त्यांच्या मते ”मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते. त्यामुळे या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे.”
माझे काही सहकारी वंदे भारत ट्रेन जी ३ जून पासून कोकणात धावणार आहे त्या ट्रेनला कुडाळ स्टेशनसाठी थांबा मिळाला नाही याबद्दल निराश झाले पण आपल्याला मी सांगू इच्छितो मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका…
त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील काही मोजक्या खालीलप्रमाणे…
मागील २ टर्म कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) आमदार/खासदार निवडून आले आहेत. याचा राग मनात ठेवून राणे परिवाराने कुडाळला डावलले असल्याचा आरोप काहींनी केला आहे.
येथील आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ स्थानकाकडे दुर्लक्ष झाले असून अपग्रेडेशनचे काम झाले नसल्याने थांबा मिळाला नसल्याचा आरोप काहींनी केला आहे.
सावंतवाडी स्थानकावर सर्व अपग्रेडेशन झाले आहे, एवढेच नव्हे तर या स्थानकाला टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. असे असूनही सावंतवाडी स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा का देण्यात आला नाही असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.
Mumbai-Goa Highway |परशुराम घाटातील चौपदरीकरण करण्यासाठी केले जात असलेले डोंगर कटाईचे काम अजून अपूर्ण आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक पावसाळ्यात हे काम चालू असेपर्यंत धोकादायक बनून येथे दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही अशी भीती व्यक्त केली आहे.
डोंगर कटाईचे काम चालू असल्याने येथील काही भाग धोकादायक बनून पहिल्या पावसात केव्हाही दरड कोसळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदार कंपनीस येथील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काम जलद गतीने होण्यासाठी मध्ये घाट काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र डोंगर कटाई करताना मध्येच कठीण कातळ लागले होते. पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीमुळे सुरक्षिततेच्या कारणाने या कातळ भागात सुरुंग लावण्याची परवानगी पण नाकारली गेली होती. यामुळे कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे दिलेल्या अवधीत हे काम पूर्ण झाले नाही.
पावसाळ्यात काम चालू असताना सावधानता म्हणुन कंत्राटदार कंपनीला योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना देण्यात येतील. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यातही वाहनधारकांसह प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच घाटातून प्रवास करावा लागणार आहे असे दिसत आहे.