Category Archives: कोकण
Konkan Railway News | उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रशांसाठी एक रेल्वेकडून महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचा फायदा होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित समोर दिलेल्या तारखांना चालविण्यात येतील.
| गाडी क्र./नाव | अतिरिक्त डबे | दिनांक |
|---|---|---|
| 22908 Hapa - Madgaon Express | 01- Sleeper | २४/०५/२३ बुधवार |
| 22907 Madgaon Jn. - Hapa Express | 01- Sleeper | २६/०५/२०२३ शुक्रवार |
| 20910 Porbandar - Kochuveli Express | 01- Sleeper | २५/०५/२०२३ गुरुवार |
| 20909 Kochuveli - Porbandar Express | 01- Sleeper | २८/०५/२०२३ रविवार |
| 12431 Thiruvananthapuram Central - H. Nizamuddin “Rajdhani” Express | 01 - Three Tier AC | २३/०५/२०२३ मंगळवार |
| 12432 H. Nizamuddin - Thiruvananthapuram Central - “Rajdhani” Express | 01 - Three Tier AC | २८/०५/२०२३ रविवार |
सिंधुदुर्ग – येत्या ०१ जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टोल नाक्याला स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जर ओसरगाव येथे टोल वसुली करणार असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी केलेल्या MH07 वाहनांना टोलमुक्ती मिळावी अशी सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीची भूमिका आहे. मात्र जर हा टोल नाका खारेपाटण किंवा बांदा या ठिकाणी शिफ्ट केल्यास आपला त्याला कोणताही विरोध नसेल अथवा टोल मुक्तीची मागणी नसेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१ जूनला ओसरगाव टोल नाका सुरू झाल्यास टोलमुक्ती समितीतर्फे लाक्षणीय आंदोलन छेडले जाईल. असा इशारा टोलमुक्ती कृती सिमतीचेअध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. टोलमुक्ती कृती सिमती तर्फे कणकवली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
Vande Bharat Express : चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे जून पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली. या रेल्वेचा शुभारंभ मडगावहून होईल व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील, अशीही माहिती मिळाली आहे.
सिंधुदुर्ग | शाम जोशी :कोकण रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक सावंतवाडी हा राज्यातील शेवटचा थांबा आहे. या स्थानकास टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हा दर्जा फक्त नावापुरताच दिला की काय असा प्रश्न वारंवार पडत आहे.
कोकणातील ईतर स्थानकांशी तुलना करता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा, सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना येथे क्वचितच थांबा आहे. खूप प्रयत्न करून कसाबसा जनशताब्दी या गाडीला येथे थांबा मिळविण्यात यश आले आहे. एक दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबे देण्यात आले होते. मात्र त्या गाड्यांची या स्थानकावर येण्याची वेळ खूपच गैरसोयीची होती. कमी प्रतिसाद म्हणुन त्या गाड्यांचे येथील थांबे काढून टाकले, मात्र त्याबदल्यात अजून दुसऱ्या कोणत्या गाडीला येथे थांबे दिले गेले नाही आहेत.
अलीकडेच वंदे भारत या गाडीची चाचणी घेतली असता टर्मिनस असूनही तिला या स्थानकावर थांबविण्यात आले नाही. यावरून या गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्याची आशा कमी झाल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यातील प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतो. त्याचबरोबर आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर आणि ईतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सोयीचे आहे. या स्थानकावर वंदे भारत आणि तेजस या सारख्या गाड्यांना थांबा दिल्यास येथील पर्यटनाचा विकास होईल. मुंबई गोवा महामार्ग येथून फक्त २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे,त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करून देवून रस्ते वाहतुकीची समस्या सुटल्यास त्याचा फायदा येतील नागरिकांना तसेच येथे भेट देणार्या पर्यटकांना होणार आहे.
रत्नागिरी | चिपळूण तालुक्यातील कळमुंडीमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान एक दुर्घटना घडली आहे. कोकणात शर्यतीदरम्यान एक उधळलेला बैल 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेल्याचा प्रकार घडला आहे. चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

















