Category Archives: कोकण
सिंधुदुर्ग :महिलांना रोजगाराच्या व आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणण्यासाठी सिंधुदुर्ग बँकेने ‘अबोली ऑटोरिक्षा’ ही महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याची घोषणा मंगळवारी आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केली. या योजनेसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीचा व्याजदरात अर्थसहाय्य, प्रशिक्षणासह बॅच परमिट चा खर्च करणार असल्याची ही माहिती आमदार नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या नाविन्यपूर्ण योजनेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळशेकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.पिंक ऑटो रिक्षा म्हणून रेल्वे स्थानके जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये अशी रिक्षा सेवा सुरू व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेने ही योजना हाती घेतली आहे.
आमदार नितेश राणे यांचे आवाहन
जिल्ह्यात रोजगाराला चालना मिळावी तसेच आता येत असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाबरोबरच सुरू झालेल्या विमानसेवा जिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ यासाठी या विकासाला सहाय्य करणारी सेवा जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेऊन यशस्वी करावी व या योजनेत जिल्ह्यातील महिला व तरुणीनी पुढाकार घ्यावा व या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
जिल्हा बँकेकडून या योजनेसाठी नऊ टक्के सवलतीचा व्याजदर आकारण्यात येणार आहे. एकूण किमतीच्या 85% कर्जपुरवठा जिल्हा बँक करणार आहे.
पाहिल्या पाच महिला रिक्षाचालकांना विशेष सवलत
कोणत्याही क्रांतीची सुरवात करताना कोणीतरी सुरवात करणे महत्त्वाचे असते. हीच सुरवात करण्यासाठी नितेश राणे यांनी पहिल्या पाच अर्जदारांसाठी स्वतः काही सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलती पुढीलप्रमाणे असतील.
उर्वरित पंधरा टक्के कर्ज पुरवठा (Down Payment) स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत.
ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचा तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच परमिटचा खर्च देखील ते करणार आहेत.
पहिल्या पाच महिलांना जागतिक महिला दिनाच्या 8 मार्च रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात पिंक रिक्षांचे वितरण लाभार्थी महिलांना होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
महिला अधिकारी नमिता खेडेकर यांची नियुक्ती.
जिल्ह्यातील महिलांच्या या योजनेसाठी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील नमिता खेडेकर यांचे खास नियुक्ती करण्यात आली असून इच्छुक महिला व युवतीने या पिंक ऑटो रिक्षा अबोली योजनेसाठी नोंदनों णी करावी व जिल्ह्याच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले आहे. संपर्कासाठी 9421149421 हा श्रीमती नमिता खेडेकर यांचा मोबाईल नंबर ही जाहीर करण्यात आला
रत्नागिरी | चिपळूण येथे यांचा यंत्र वाशिष्टी नदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशन ची सामग्री दाखल झाली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा ची जबाबदारी नाम फाउंडेशनने स्वीकारली आहे. शासनाने गाळ उपसण्यासाठी लागणारा इंधन पुरवठ्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार सध्या दोन पोकलेन दाखल झाले आहेत .वाशिष्टीने देखील गाळ उपशासाठी गतवर्षी एकूण तीन टप्पे करण्यात आले होते त्यानुसार काही प्रमाणात गाळ काढला गेला अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे शिल्लक असल्याचे बचाव समितीचे म्हणणे आहे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम अतिशय संत गतीने होत असल्याचे निदर्शनास येतात चिपळूण बचाव समिती पुन्हा आक्रमक झाली होती
२२ जुलै २०२१ रोजी चिपळूणात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले.प्रत्येक क्षेत्राला या पुराचा जबरदस्त असा फटका बसला.या महापुराची कारणमीमांसा झाली तेव्हा धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेले भरमसाठ पाणी तसेच चिपळूणमधील वाशिष्ठी व शिव या दोन नद्यामध्ये साठलेला भयंकर गाळ अशी दोन प्रमुख कारणे समोर आली.त्यासाठी चिपळूण बचाव समितीने पुढाकार घेत प्रथम नद्यांमधील गाळ काढण्याची मागणी शासनाकडे केली.प्रथम दुर्लक्ष झाल्याने बचाव समितीने थेट उपोषणाचे हत्यार उपसले आणि त्याला एका जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले आहे.
सिंधुदुर्ग:कणकवली तालुक्यातील सावडाव येथे आज एक धक्कादायक प्रकार घडला. सावडाव येथील ६ मुलांचे जवळ जवळ अपहरण झाले होते. सुदैवाने मुलांनी दाखविलेल्या हुशारीमुळे आणि प्रसंगावधानामुळे अपहरणकर्त्यांचा डाव उधळला गेला.
याबाबत सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे. सावडाव येथील सहावीत शिकणाऱ्या ५ मुली आणि तिसरीत शिकणारा एक मुलगा शाळेच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात चालत असताना एका निर्जन ठिकाणी एक ओमनी/इको कार त्यांच्या जवळ थांबली आणि त्यातून दोघा इसमांनी उतरून मुलांना चाकूचा धाक दाखवून गाडीत बसण्यास भाग पाडले आणि गाडी जंगलाच्या दिशेने सुसाट वेगाने सोडली. गाडीच्या काचा बंद केल्या तसेच रस्त्यात एका ठिकाणी या मुलांची दप्तरे बाहेर टाकून देण्यात आली. काही अंतर कापल्यावर रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणुन त्यांनी गाडी थांबवली आणि फोन करण्यासाठी ते दोघे गाडीतून उतरले. मुलांनी ही संधी साधून गाडीचा दरवाजा उघडून गावाच्या दिशेने पळ काढला आणि झाला प्रकार ग्रामस्थांना आणि शिक्षकांना सांगितला. ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार कणकवली पोलिसांना कळवला आणि पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. अपहरणकर्त्यांचा माग घेण्यासाठी श्वानपथकालापण पाचारण करण्यात आले आहे.
अघोरी प्रकारासाठी अपहरण?
गाडीत बसल्यावर एका इसमाने त्या मुलांच्या डोक्याला लाल कुंकू लावले त्यामुळे मुलांचे अपहरण काही अघोरी प्रकारासाठी केले जात होते कि काय असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी:राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खुनातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचे तो वापरात असलेल्या मोबाईल सेवा कंपनीकडे कॉल डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा कोणा कोणाशी संपर्क होते त्याचा उलगडा होणार आहे.
वारीसे यांचा खून हा पूर्वनियोजित व प्लॅन करून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार घटनेच्या दिवशी पंढरीनाथ हा कुणाकुणाच्या संपर्कात होता. याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच या आरोपीच्या संपर्कात मोठे नेते आणि अधिकारी असल्याचे आरोप पण होत आहेत. पंढरीनाथ याच्या कॉल डिटेल्स मुळे पोलिसांना आरोपी सोबत या खुनात कोण कोण सामील आहेत याचा तपास लावणे सोपे होईल.
दरम्यान आरोपी पंढरीनाथ यानेही खुनाची कबुली पोलिसांजवळ दिली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अखेर पोलिसांकडून पंढरीनाथ याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13-02-2023 17:00 PM |
- वैभववाडी : येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
- महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे त्या मयत तरुणाचे नाव आहे.
- मी माझ्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे. असे चिठ्ठीत लिहून ठेवले
- घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस अभिजित मोरे, सुरज पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
- तरुणाचा मृतदेह पोलीसानी शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे.
- अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.
13-02-2023 12:00 AM |
इंडियन आयडॉल च्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याद्वारे आयोजित
- कणकवली:छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली भाजप ऑफिस समोरील कणकवली पर्यटन महोत्सव च्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
- या निमित्ताने इंडियन आयडॉल च्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा देखील या ठिकाणी होणार आहे.
- यासोबत १९ ते २१ फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी सूक्ष्म, लघु व मध्यम या केंद्रीय उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजनांचे स्टॉ ल देखील लावले
जाणार आहेत. - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवलेजात असून या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे…
मुंबई : लोकमान्य टिळक स्टेशन येथील ७ नंबरच्या रेल्वे वॉशिंग पिट लाईनच्या दुरुस्तीसाठी मध्यरेल्वे एक ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ दरम्यान ३५ दिवसांसाठी असेल. या ब्लॉक मुळे कोंकणरेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्या पनवेल पर्यंत चालविण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
16346 – तिरुअनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावर संपेल.
16345 – लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१२:४५) सुरू होईल.
12620 – मंगळूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ पनवेल स्थानकावर संपेल.
12619 –लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१६:२२) सुरू होईल.
(हेही वाचा >शिगमोत्सवासाठी कोंकणरेल्वेची चेअर कार विशेष गाडी…आरक्षण १४ फेब्रुवारी पासून सुरु…)

KR News 12/02/23 2:45 PM : :दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकणरेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगला एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडून तिला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
सध्या हातात आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
गाडीचे नाव | स्थानक | वेळ | विलंब |
NGP-MAO SPECIAL | KADAVAI | 14:36 | 05:10 |
MRDW-YPR EXP SPL | KUNDAPURA | 14:35 | 00:00 |
CSMT-MAO MANDOVI EXPRESS | SGMSHVR | 14:28 | 01:52 |
MAO-CSMT MANDOVI EXPRESS | BHOKE | 14:32 | 00:00 |
DIVA SWV EXPRESS | BHOKE | 14:34 | 00:35 |
SWV DIVA PASS | SAVARDE | 14:40 | 01:40 |
PUNE-ERS POORNA EXPRESS | ANKOLA | 14:28 | 00:00 |
MAO-LTT EXP | VERNA | 14:22 | 01:21 |
NZM-ERS MANGALA LKSDP EXP | KUDAL | 14:35 | 00:31 |
KCVL-SGNR EXP | ADAVALI | 14:36 | 00:00 |
LTT-TVC NETRAVATI EXP | INDAPUR | 14:40 | 00:08 |
MAO-NZM RAJDHANI EXPRESS | SGMSHVR | 14:28 | 00:09 |
Updated on 14:45

KR News 12/02/23 1:10 PM : दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्याने २ तासापासून गाडी उभी आहे त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या अन्य गाड्याच्या वेळापत्रकावर परिमाण झाला आहे. नवीन इंजिन आणून वाहतुक पूर्ववत करण्यासाठी कोंकण रेल्वेचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
(Also Read > वारिसे प्रकरण आणि संतापलेला ‘रानमाणूस’ )
सध्या हातात आलेल्या माहितीनुसार मडगावच्या दिशेने जाणाऱ्या खालील गाड्या उशिराने धावत आहेत…
10103 – मांडवी एक्सप्रेस – करंजाडी येथे आहे
10105 – सावंतवाडी दिवा एक्सप्रेस – अंजनी स्थानकावर उभी आहे
रत्नागिरी: शुक्रवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान डिझेलची तस्करी करणारी बाेट सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून हर्णै- गुहागर दरम्यानच्या समुद्रात पकडली.आयएनडी/एमएच/७/एमएम/२८५१ (साेन्याची जेजुरी) असे कारवाई केलेल्या बाेटीचे नाव असून, बाेटीच्या मालकाचे नाव कळू शकलेले नाही. या बाेटीवरून सुमारे २४ हजार रुपयांचा डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे
मागील महिन्यात दिवसांत ५० मेट्रिक टन डिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरीतील सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला हाेता. हर्णै-गुहागर समुद्रात ४/५ नाॅटीकल माईलमध्ये दुपारी १:३० वाजता डिझेल भरून नेणारी बाेट अधिकाऱ्यांना दिसली. या बाेटीत तस्करीचे डिझेल असल्याच्या संशयावरून ही बाेट पकडून दाभोळ बंदरामध्ये आणण्यात आली.
या बाेटीची तपासणी केली असता बाेटीवर चार खलाशी असल्याचे पुढे आले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता रात्री समुद्रात माेठ्या व्हेसलमधून डिझेल बाेटीत उतरून घेतल्याचे सांगितले. बाेटीची तपासणी केली असता बाेटीमध्ये एकूण १७ वेगवेगळे भाग आहेत. त्यातील दाेन भाग रिकामे असून, उर्वरित १५ भागांमध्ये डिझेलचा साठा सापडला. हा साठा सुमारे २४ हजारांचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. ही बाेट नेमकी काेठून आली याचा तपास सुरू आहे. रत्नागिरी सीमा शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अमित नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.