Category Archives: कोकण

नागपूर- मडगाव विशेष गाडीला डिसेंबर ३१ पर्यंत मुदत वाढ

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी आता 31 डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

 

ह्या गाडीच्या वेळा पत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीसे बदलही करण्यात आलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल.

 

मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल.

 

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

ह्या गाडीला 2 Tier AC – 01,  3 Tier AC – 04,  Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत. 

एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

 

ह्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण 23/10/2022 पासून रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मुंबै जिल्हा बँकेच्या समन्वयातून कोकणचा विकास- मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर

सिंधुदुर्ग: आज महाराष्ट्र भाजपचे आमदार,मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ओरस येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पुषपगुच्छ त्यांचे  देऊन स्वागत केले. 
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मुंबै जिल्हा बँकेच्या समन्वयातून कोकणचा विकास,युवकांना रोजगार व पर्यटन या विषयांवर एकत्रित काम करण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आमदार, भाजपा सचिव प्रमोद जठार, संचालक बाबा परब आदी उपस्थित होते.

Loading

राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र, म्हणाले “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे पत्र आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 
काय लिहिले आहे या पत्रात?
“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मोठी नोकरभरती.

सिंधुदुर्ग: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त वैद्यकीय अधिकारी आणि इतर असे एकूण १५ पदांच्या  ८५ जागा  कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ओक्टोम्बर २०२२ आहे.  इच्छुक उमेदवारांनी दिनांक १४/१०/२०२२ ते २७/१०/२०२२ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ ह्या वेळेत ह्या बातमीसोबत जोडलेल्या जाहिरातीतील अर्ज भरून सीआरयु कक्ष(टपाल शाखा) मुख्य प्रशाकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM , SINDHUDURG ), व पदाच्या नावाचे स्पष्ट उल्लेख करून सादर करावेत. 
ह्या पदांसाठी पात्रता,अटी,वेतनश्रेणी आणि इतर माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करावी.
   Click here to download>>>>>>>>>>    जाहिरात आणि अर्ज  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

राणेंविरुद्ध टीका भास्कर जाधवांच्या अंगलट अंगलट, ‘ह्या’ कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल.

सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.  

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली.

काय म्हणाले होते भास्कर जाधव? 

नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं होते.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावरील ‘ह्या’ दोन गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार.

रत्नागिरी : खास दिवाळीसाठी या आधी काही विशेष गाड्या  कोकण रेल्वेमार्गावर  सोडल्या आहेत. आता प्रवासी संख्या वाढल्याने कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या हापा -मडगाव (22908/22907) तसेच पोरबंदर कोचुवेली (20910/20909) या दोन नियमित एक्स्प्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे. यातील हापा-मडगाव गाडीला दि. 19 ऑक्टोबरच्या फेरीपासून तर पोरबंदर – कोचुवेली या गाडीच्या दि. 20 ऑक्टोबर 2022 पासून अतिरिक्त डबा जोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

दसर्‍या दिवाळीपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांव्यतिरिक्त फेस्टीवल स्पेशल गाड्यांच्या फेर्‍या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर, सुरत, उधना तसेच मुंबईतून देखील कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी रेल्वेच्या अतिरिक्त गाड्या करण्यात आल्या आहे. 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Loading

ग्रामपंचायत निवडणुक : दीपक केसरकर यांना धक्का..

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात एकूण चार  ग्रामपंचायतीचे निकाल आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात भाजपने जोर लावल्याचे दिसून आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील. झरे दोन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपा पक्षाच्या श्रुती विठ्ठल देसाई तर पाटये पूर्नवसन येथे भाजपचे प्रविण पांडुरंग गवस सरपंचपदी विजयी झाले आहेत. भाजपने दोन्ही ग्रामपंचायतवर झेंडा फडकवल्यानंतर जल्लोष केला.

 देवगड तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत वर भाजप झेंडा फडकवला आहे. पडवणे ग्रामपंचायत वर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने झेंडा फडकविला आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिल्ह्यात आमदार मंत्री असताना एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही.

राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालं ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल आहे

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

गोव्यात दारू महाग होणार….

गोवा : राज्य सरकारने बिअर वरच्या उत्पादन शुल्क करामध्ये (Excise Duty) वाढ करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात बिअर च्या किमती वाढणार आहेत. हि वाढ प्रति बल्क लिटर मागे १० ते १२ रुपये असेल. इतर मद्यावरच्या उत्पादन शुल्कात सध्यातरी कोणताही बदल करण्यात येणार नाही असे सरकारने म्हंटले आहे.

गोवा हे एक पर्यटन राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. इथे पूर्ण जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनाला चालना देण्याचा एक भाग म्हणून गोवा सरकारने राज्यात मद्यावर इतर राज्यापेक्षा कमीत कमी कर लावले आहेत त्यामुळे इथे मद्य  जवळ जवळ ५०% कमी  किंमतीत  भेटते.

पण ह्या सर्वच फायदा सीमेलगत राज्यातील काही तस्कर घेत असल्याचे प्रकार वाढत चालले होते. हल्लीच महाराष्ट्राच्या नवीन सरकारने अशा तस्करीला आळा घालण्यासाठी अशा तस्करांना कडक कारवाई करण्यासाठी ‘मोक्का’ या कायद्यानुसार कारवाई करता येईल यासंबधी विचार करत असल्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्र सरकारच्या हा निर्णयाच्या धर्तीवर गोवा सरकार किंमतील फरक कमी करण्यासाठी पाऊले उचलत आहे.

ह्याआधी नॉर्मल बिअर जिला ३० रुपये उत्पादन शुल्क कर होता तो आता ४२ रुपये प्रति बल्क लिटर झाला आहे. स्ट्रॉग बिअर चा उप्तादन शुल्क आता ६० रुपये करण्यात आले आहे, ह्या आधी हे शुल्क ५० रुपये एवढे होते.

 

  

 

 

Loading

दिवाळी दरम्यान कोकणरेल्वे मार्गावरील ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार.

रत्नागिरी:दिवाळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या काही काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

खालील गाड्या आता 4 अतिरिक्त AC3 कोच सहित चालविण्यात येणार आहे. ह्या आधी ह्या गाड्या आधी 12 डब्यां सहित चालविण्यात येत होत्या त्या आता 16 कोचसहित खालील कालावधीसाठी चालविण्यात येणार आहेत.

Train no. 11099 Ex. Lokmanya Tilak (T) दि

नांक 15/10/2022 ते 29/10/2022 प्रत्येक शनिवारी. 

 

Train no. 11100 Ex. Madgaon Jn.  

दिनांक 16/10/2022 ते 30/10/2022 प्रत्येक रविवारी. 

Train no 11085 Ex. Lokmanya Tilak (T) 

दिनांक 17/10/2022 ते 31/10/2022 प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी. 

Train no. 11086 Ex. Madgaon Jn.

दिनांक 18/10/2022 to 01/11/2022 प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी 

 

Related : दिवाळीसाठी कोकणरेल्वेची विशेष गाडी… आरक्षण 14 ऑक्टोबर पासून…







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Loading

दिवाळीसाठी कोकणरेल्वेची विशेष गाडी… आरक्षण 14 ऑक्टोबर पासून…

रत्नागिरी : दिवाळीसाठी सुरत ते करमाळी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडीची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी दि. 25 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही गाडी स्पेशल फेअरसह चालवली जाणार आहे.पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने कोकण रेल्वेने या गाडीचे नियोजन केले आहे.

Train no. 09193 Surat – Karmali Weekly

ही गाडी दि. 25 ऑक्टोबर रोजी सुरत येथून सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटून दुसर्‍या दिवशी गोव्यात करमाळीला ती दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचेल.

Train no. 09194 Karmali – Surat Weekly

परतीच्या प्रवासात ही गाडी (01994) करमाळीहून दि. 26 रोजी दुपारी 2.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता ती सुरतला पोहचेल.

ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल 

वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.

डब्यांची स्थिती

एकूण सतरा डब्यांची या गाडीची कोच रचना वातानुकूलित चेअरकार 1, सेकंड सीटींग 14, एसएलआर 2 अशी असणार आहे.

आरक्षण

ह्या गाड्यांची बूकिंग दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्व तिकीट खिडक्यांवर आणि IRCTC ह्या वेबसाईटवर चालू होणार आहे.

RELATED : दिवाळी दरम्यान कोकणरेल्वे मार्गावरील ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search