Category Archives: कोकण

मुंबई-गोवा महामार्ग जन आक्रोश समिती आयोजित शिस्तबद्ध दुचाकी रॅली; येथे फोटो पहा

Janaakrosh Committee’s bike Rally:  दिनांक ७ मे २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता कामोठे टोल नाका ते खारपाडा टोल नाका दुचाकी (बाईक) रॅलीचे आयोजन मुंबई गोवा जन आक्रोश समिती तर्फे करण्यात आले होते . मुंबई गोवा महामार्गाचे काम १२ वर्षे रखडलेले असून मंत्रीमहोद यांची आश्वासने , न्यायालयाचे आदेश याना प्रशासनाने हरताळ फासला आहे . या दिरंगाई आणि ढिसाळपणामुळे अपघातात ३००० पेक्षा जास्त कोकणकर मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण कायमचे जायबंदी झालेले आहेत . या निषेधार्थ काढलेल्या या दुचाकी रॅलीला कोकणकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिस्तबद्धपणे यशस्वीरित्या पार पडला.

रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून दुपारी ४.०० वाजता झाली . वाहतूक उपायुक्त यांनी रॅलीच्या सूचना दिल्यानंतर समितीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नागरिक श्री. देवरुखकर काका यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून Flag off करण्यात आले . वाहतूक पोलिसांच्या आणि समितीच्या पायलट व्हॅन रॅलीचा मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने जाऊन खारपाडा टोलनाका येथे रॅली ची सांगता झाली .

खारपाडा टोल येथे हॉटेल वैष्णवीच्या पटांगणात रॅलीची समारोप सभा झाली .

या सभेला संबोधित करताना समितीचे पनवेल विभागाचे प्रमुख डॉ. अमित चव्हाण यांनी रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा कोकणावरील अन्याय असून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समितीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कुठल्याही अपघातग्रस्ता साठी पहिला 1 तास अत्यंत महत्वाचा असतो,वैद्यकीय भाषेत त्याला “गोल्डन अवर”(golden hour) असे म्हणतात ,या वेळेत जर पेशंट वर योग्य उपचार झाले तर ,मेंदूतील रक्तस्त्राव वैगरे कारण मुळे होणारे मृत्यू चे प्रमाण कमी होते. दुर्दैवाने अगदी पोलादपूर -महाड पासून पनवेल पर्यंत कुठंही अद्यावत ट्रॅमा सेंटर(trauma centre) नाही , त्यात च रस्त्या ची अवस्था बिकट,त्यामुळे पेशंट वेळेवर डॉक्टर पर्यंत पोहचत नाही व मृत्यू चे प्रमाण वाढते.१२ वर्षात या महामार्गावर सुमारे ३३०० लोक मृत्युमुखी पडले आणि १०,००० पेक्षा जास्त लोकांना कायम चे अपंगत्व आले. महामार्ग वर आद्यवत ट्रामा सेंटर असावे ही एक जनाअक्रोश समिती ची प्रमुख मागणी आहे,तसेच रस्त्यावरील खड्ड्यामूळे अगदी तरुण लोकांना स्लिप डिस्क सारखे मणक्यांचे आजर बाळवत आहेत त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे . कोकणावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवण्यासाठीच मी या समितीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम करत आहे आणि यापुढेही करत राहीन असे सांगितले . खारपाडा येथील सक्रिय कार्यकर्ते संतोष ठाकूर हे देखील या रॅलीमध्ये आपल्या दुचाकीस्वारांच्या समूहाला घेऊन सामील झाले होते . याबाबतीत आपले विचार मांडताना श्री. संतोष ठाकूर यांनी यापुढे मुंबई गोवा महामार्गाच्या निमित्ताने झालेला अन्याय सहन केला जाणार नाही आणि समितीच्या पुढच्या प्रत्येक आंदोलनात माझे किमान ५०० कार्यकर्ते घेऊन सहभागी होईन असे जाहीर केले . कोकण विकास युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजय यादव यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश समिती या महामार्गासाठी जे काही आंदोलन करत आहे ते कौतुकास्पद आहे आणि सर्व कोकणकरांनी स्वतःहून यात लाखोंच्या संख्येने सामील व्हायला हवे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच सर्व कोकणकरांनी यापुढे सामील व्हावे असं आवाहन केलं . महामार्गाचे काम पूर्ण न होण्यास कंत्राटदाराबरोबरच अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांना जाब न विचारणारे त्यांच्यावर अंकुश न ठेवणारे राजकीय नेतृत्व जबाबदार आहेत . राजकीय नेत्यांना आपण निवडून देतो आणि म्हणूनच त्यांच्यावर या कामासाठी दबाव ठेवण्याची जबाबदारी अप्लाय सर्वांची आहे . अलिबाग न्यायालयात वकिली करणारे अॅडव्होकेट अजय उपाध्ये हे देखील आपले विचार मांडताना म्हणाले की , मी 2016 पासून महामार्ग संदर्भात अलिबाग न्यायालयात मी लढा देत आहे ज्यावेळेस शासनाच्या वतीने एक अहवाल येतोय की मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः प्रवासासाठी योग्य आहे व कोणते खड्डे नाहीत परंतु प्रत्यक्षात आपण कोकण करांनी पाहिले तर महामार्गाला रस्ताच नाही अशी अवस्था आहे यासाठी समस्त कोकणकर अराजकीय अजेंडा घेऊन जे काही करत आहेत त्याला आमचा पूर्णता पाठिंबा राहून आम्ही समस्त कोकणकरांसोबत तीव्र आंदोलनात सामील होऊ.

समितीचे सचिव श्री . रुपेश दर्गे यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश आंदोलन ही सर्वसामान्य कोकणकरांची एक समिती म्हणून महामार्गासाठी काम करीत आहे.कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता किंवा कोणत्याही राजकीय अजेंडा न घेता महामार्गासाठी लढत आहेत. जर शासन, प्रशासन व ठेकेदार यांनी दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत एक मार्गी काम पूर्ण न केल्यास शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांचे आशीर्वाद घेऊन आम्ही समस्त कोकणकर आणि समस्त कोकणातील सर्व संघटना एकत्रित निर्णय घेऊन एकाच दिवशी एकाच वेळेस संपूर्ण कोकणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे जाहीर केले.

खारपाडा गावकज सरपंच श्री . दयानंद भगत यांनी महामार्गाच्या लगतच्या सर्व गावात ग्रामपंचायतीत जनजागृती केल्यास त्यासाठी समितीला सर्व सहकार्य करू आणि समितीच्या यापुढील उपक्रमात आम्ही सर्व सहभागी होऊन पाठिंबा देऊ असे जाहीर केले.

सभेच्या समारोपाच्या वेळी समितीचे कार्याध्यक्ष Adv. सुभाष सुर्वे यांनी मागील १३ वर्षे महामार्गाचे काम रखडले याला जबाबदार कोण ? कोकणाचा विकास त्यामुळे रखडला त्या जबाबदार कोण ? अपघातात ३३०० लोकांचा मृत्यू आणि ११००० लोक अपंग झाले त्याला जबाबदार कोण ? महाराष्ट्रात इतर ठिकाणी अपघात झाला तर त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि महामार्गावरील अपघातात मृत्यू पडले त्यांना भरपाई दिली जात नाही याला जबाबदार कोण ? हजारो झाडांची कत्तल झाली आणि नवीन झाडे लावली गेली नाहीत याला जबाबदार कोण ? कंत्राटदार काम अर्धवट टाकून पळून गेले त्यांना नोकर्यादेश द्यायला जबाबदार कोण ? रस्ता आता होईल तेव्हा होईल पण या सगळ्यांना जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचं खटला दाखल करण्यात यावा व त्यासाठी चौकशी समिती नेमून जबाबदार कोण हे निश्चित करण्यात यावे . समितीची पुढची वाटचाल करताना पळस्पे ते झाराप या महामार्गावरील सर्व ग्रामपंचायतीमधून जन-जागृती करून या सामाजिक जनचळवळीला सर्वसमावेशक व्यापक स्वरूप येईल आणि त्यातून मग पुढचा लढा आखण्यात येईल असे जाहीर केले.

मुंबई गोवा जन आक्रोश समितीतर्फे या बाईक रॅलीचे चांगल्या पद्धतीने नियोजन अन् आयोजन करण्यात आले. या रॅलीला सहकार्य करणाऱ्या वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांचे जाहीर आभार मानण्यात आले . या रॅलीच्या आयोजनासाठी समितीचे कार्याध्यक्ष ॲड. सुभाष सुर्वे सचिव रुपेश दर्गे, ॲड. संदीप विचारे, डॉ. अमित चव्हाण, श्री. संजय सावंत , सी. ए. संदेश चव्हाण , सौ. सोनल सुर्वे व इतर मान्यवरांनी रांत्रदिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम समितीच्या सदस्यांना सोबत घेऊन यशस्वी केला.

 

 

 

 

 

कोंकण रेल्वेमार्गावर गुरुवारी धावणार वन वे विशेष गाडी

Konkan Railway News: दिनांक ११ मे २०२३ रोजी कोंकण रेल्वे मार्गावर इंदोर ते मंगळुरु दरम्यान एक एकमार्गी स्पेशल One Way गाडी चालविण्यात येणार आहे. ही गाडी वेस्टर्न रेल्वेच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे. 

Train no. 09302 Indore – Mangaluru Jn. One Way Special:

ही गाडी दिनांक ११ मे रोजी (गुरुवार) सकाळी ११:१५ वाजता इंदोर या स्थानकावरून सुटेल ती मंगुळुरु स्थानकावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १६:१५ वाजता पोहचेल. 
या गाडीचे मडगाव स्थानकापर्यंतचे कोकणातील थांबे
पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा , रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, थिवीम, करमाळी, मडगाव
डब्यांची संरचना
एसएलआर – 02  + स्लीपर – 18 + थ्री टायर एसी – 01 असे मिळून एकूण २१  डबे

Block "ad1" not found

[email-subscribers-form id=”2″]

मुंबई – गोवा महामार्गावर एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात; २३ प्रवासी जखमी, १ गंभीर

Mumba Goa Highway Accident – मुंबई – गोवा महामार्गावर डंपर आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. महाडजवळ एसटी बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या डंपरमध्ये  भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये एसटी बस मधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 
हा अपघात आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड नातेखिंडजवळ हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई महाबळेश्वर बस आणि डंपर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. एसटी बस मुंबई दिशेकडून महाडकडे येत असताना आणि डंपर महाड दिशेकडून जात असताना दोघांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातामध्ये एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून डंपर चालक देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत.या अपघतामध्ये ST बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे. घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.

बारसूचा सडा आज शांतच; मात्र प्रकल्प विरोधकांनी बाहेर काढले उपोषणाचे हत्यार

Barsu Refinery Protest – समर्थक आणि विरोधक नेत्यांच्या सभा, मोर्चा या मुळे बारसूतील वातावरण पुन्हा तापणार असा अंदाज बांधला जात होता मात्र आज बारसू सड्यावर आंदोलक फारसे फिरकलेले नसल्याने बारसू परिसराचा सडा शांत राहिलेला होता. दरम्यान गेल्या सुमारे १२ते१३ दिवसांपासून सुरु असलेले माती परीक्षणाचे काम आजही सुरु होते. या परिसरात मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

मात्र दुसरीकडे गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ आज सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरु असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांनी केला. त्या विरोधात गोवळ येथील श्री नवलादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे.त्या विरोधात आता गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. सुमारे २००-३०० स्थानिक प्रकल्प विरोधक उपोषणस्थळी उपस्थित आहे.

जुन्या आठवणी | रत्नागिरी आगाराची ‘भक्ती दर्शन’ पर्यटन विशेष बससेवा

Old Memories MSRTC – सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या ‘भक्ती दर्शन’ या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते. आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला ‘भक्ती दर्शन’ असे ब्रँडिंग करून ही बस पर्यटकांना मार्लेश्वर, कृष्णेश्वर मंदिर, संभाजी स्मारक समाधी, परशुराम मंदिर, चिपळूण, डेरवण येथील प्रति शिवसृष्टी आणि थिबा पॉईंट येथील अरबी समुद्रातील नयनरम्य सुर्यास्ताचे दर्शन घडवत असे.

सकाळी ८ ते संध्याकाळी साडे ६ पर्यंत, एवढी सर्व प्रेक्षणीय स्थळे अगदी माफक दरात दाखवल्यामुळे, वेळ न मिळणाऱ्या मुंबईकरांना आपल्या गावी आल्यावर या बसचा प्रवास म्हणजे फार मोठी पर्वणीच होती. संगीताचा आस्वाद घेत प्रवास घेत करणे, चालक/वाहकांचे सौजन्यपूर्ण वर्तन तसेच प्रवासात मिळणारी वृत्तपत्रे यावर प्रवासी बेहद खुश होता. कालांतराने महाराष्ट्रात अश्या अनेक दर्शन फेऱ्यांचे एसटीने नियोजन केले आणि या फेऱ्यांना प्रवाश्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.

आज पर्यटनाच्या व्याख्या बदलल्या असून, अनेक नवनवीन ठिकाणांची भर यात पडत आहे, तसेच पर्यटकांची संख्या देखील प्रचंड वाढली असून, एसटीने पुन्हा एकदा पर्यटनाची संधी पाहता याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

बाहेर फिरायला आलेला व्यक्ती हा प्रवासी भूमिकेत नसून, तो पर्यटक भूमिकेत असल्याने यासाठी नेमकं आपल्याला काय काय करावे लागेल, नियोजन कसे करावे लागेल, यासाठी एसटीने एक स्वतंत्र विभाग तयार केला, तर एसटीच्या आर्थिक स्रोतात अधिकची भर पडून, प्रवाश्यांना देखील किफायतशीर पर्यटनाचा आनंद घेता येईल, यात तिळमात्र शंका वाटत नाही.

लेखक – रोहित धेंडे. 

 

Block "ad1" not found

[email-subscribers-form id=”2″]

निर्बंध हटणार; २ दिवसांनंतर परशुराम घाटातील वाहतुक नियमित होणार…

Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटातील  चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी मागील काही दिवसांपासून निर्बंध आणण्यात आले होते. चौपदरीकरणा अंतर्गत घाटात तयार करण्यात आलेल्या मार्गिकेच्या भरावाचे बहुतांश काम पूर्ण झाल्यामुळे हा घाट नियमित वाहतुकीसाठी 11 मे पासून खुला करण्यात येणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परशुराम घाटातील अवघड वळणावरील काम वाहतूक सुरू असताना पूर्ण करणे कठीण जाऊ लागल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी 25 एप्रिल ते 10 मे 2023 या कालावधीसाठी अंशतः बंद करण्यात आला होता. या कालावधीत दुपारी बारा ते पाच यावेळी हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. वाहतूक बंदी असलेल्या कालावधीत महामार्गावरील वाहतूक खेड तालुक्यामधील चिरणी -लोटे मार्गे वळवण्यात आली होती.

[email-subscribers-form id=”2″]

प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग; आशा पुन्हा पल्लवित

कोल्हापूर – प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासंबंधी एक महतवाची बातमी आहे. या मार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली. लल्लन हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 
१०७ किलोमीटरच्या या मार्गाचे याआधीही सर्वेक्षण झाले आहे. आता या मार्गाचे अंतर २८ किलोमीटर ने वाढणार आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी घाट असल्याने उतार जास्त आहेत. हे उतार कमी करण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे लालवाणी यांनी सांगितले. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे, स्वप्नील नीला, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओस्वाल उपस्थित होते. 
२०१५ मध्ये नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जे. पी. इंजिनियरिंग कंपनीला देण्यात आले. या कंपनीने गुगल मॅपचा आधार घेत अतिशय खडतर असलेल्या या मार्गाचे सर्वेक्षण अवघ्या काही महिन्यांत पूर्ण केले. मंत्री श्री. प्रभू २०१६ मध्ये यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची घोषणा करीत १०७ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात ३ हजार २०० कोटीची घोषणा केली.एवढेच नाही तर अर्थसंकल्पात २५० कोटीची तरतूद देखील केली होती. रेल्वेमंत्री प्रभू असल्यामुळे त्या कामाला गती मिळेल आणि मार्गाला मूर्तस्वरूप येईल, अशी धारणा सर्वसामान्यांची होती; मात्र अवघ्या काही महिन्यांत श्री. प्रभू यांना काही कारणास्तव केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि त्याचबरोबर वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या प्रकियेलाच खीळ बसली. प्रकल्पाच्या घोषणेनंतर आता तब्बल सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या सात वर्षांत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग पूर्णत्वास जाईल, अशी कोणतीही हालचाल सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू नाही. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग एक स्वप्नच ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र ललवाणी यांच्या वक्तव्याने  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांच्या या मार्गाबद्दलच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.  

कोकणात सापडले कातळसड्यावर असणारे जगातील पहिले अशनी विवर…

सिंधुदुर्ग –  तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोलीपासुन अवघ्या दहा कि. मी.अंतरावर असलेल्या चौकुळ या गावी  सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर सापडले आहे. सिंधुदुर्गातीलच नव्हे तर सर्व भारतीय भूवैज्ञानिक व पर्यटकांना उत्साह देणारे संशोधन नुकतेच झाले असुन याबाबत अधिक अभ्यास चालू आहे. या संशोधनास सर्व अभ्यासाअंती दुजोरा भेटल्यास कोकणातील पर्यटनाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे आणि  चौकुळ या गावाला आता ‘जागतिक भूवैज्ञानिक स्थळ’ म्हणून ओळखले जाणार आहे.
शिरूर(पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॕ.अतुल जेठे व प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी या येथील खमदादेव पठारावर भेट दिली असता पश्चिम घाटातील या पठारावर सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर नजेरेला पडले.
डॉ. अतुल जेठे
या संदर्भात डाॕ. अतुल जेठे यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –
” चौकुळ येथील आज असलेल्या खमदादेव मंदिरापासुन पूर्वेकडे सुमारे ५००मीटर अंतरावर सुमारे पन्नास हजारहून अधिक वर्षापूर्वीआकाशातून एक पेटता अशनी येऊन येथील जांभ्या खडकाच्या कठीण पठारावर कोसळला व त्यामुळे वर्तुळाकार आकाराचे विवर तयार झाले. आज या विवरात काळसर -पिवळट रंगाची माती व त्यावर पावसाळ्यात उगवणारे गवत यांचे अस्तित्व आहे.पावसाळ्यात सर्वात जास्त म्हणजे ७२०से. मी. पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या या विवराच्या ईशान्य दिशेकडून विवरातील पाणी वाहून जाते. या विवराचा पूर्व
-पश्चिम व्यास सुमारे १८०मीटर तर उत्तर-दक्षिण सुमारे २२० मीटर असुन विवराचा परिघ सुमारे ५२५ मीटर आहे.या विवराचा अधिक अभ्यास व संशोधन करण्यासाठी डाॕ. जेठे पावसाळ्यात पुन्हा भेट देणार आहेत.
या स्थळाला शासनाने ‘अति संवेदनाशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून संक्षित करावे अशी मागणी डाॕ. जेठे यांनी केली आहे.
भौगोलिक स्थान
या विवराचे पृथ्वीवरील भौगोलिक स्थान १५ अंश ५२ मिनिटे व ३९.५ सेकंद उत्तर अक्षवृत्त ते ७४अंश १ मिनिट ५४.५ सेकंद पूर रेखावृत्त असे आहे. समुद्र सपाटीपासुन हा भाग सुमारे ६३० मीटर उंचीवर आहे. घटप्रभा व कृष्णा या नद्यांच्या जोडणारी’ देवाची न्हय’ही नदी पूर्वेकडून पावसाळ्यात वहाते. भारतातीलच नव्हे; तर जगातील जांभ्या खडकावरील,(Laterite Rock) कातळसड्यावरील हे एकमेव विवर ठरण्याची शक्यता डाॕ.अतुल जेठे यांनी वर्तवली. असुन याला शास्त्रीय परिभाषेत ‘सिम्पल बाऊल क्रेटर’ म्हणजेच ‘साधे वर्तृळाकृती विवर’असे म्हणतात. आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस या भागात पडत असल्याने वातावरणातून अतिगतिमान अशनीचा आघात झाल्यावर वर उसळून आलेली कड (Ejecta- Blanket) मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी.
नामकरण-‘रजतकृष्ण’विवर
 या विवरावर दोन दिवस संशोधन केल्यावर आपल्या या शोधून काढलेल्या विवराला ‘ राजतकृष्ण Crater’ म्हणजेत ‘रजतकृष्ण विवर असे नाव डॉ.जेठे यांनी दिले आहे. २००९ पासुन भारतातील विविध विवरांचा भूशास्रीय अभ्यास करताना मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या इस्रो (IIRS) डेहराडून (उत्तरा खंड)या जागतिक पातळीवर संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भूशास्र विभागाचे प्रमुख रजत चटर्जी यांचे शुभनाव व आपले सहकारी मित्र मराठी विभागात अध्यापन करणारे मालवणी बोली साहित्य व संस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक मार्गदर्शक डाॕ. बाळकृष्ण लळीत यांच्या नावातील ‘कृष्ण’ यावरून चौकुळ येथील विवराचे ‘ रजतकृष्ण विवर’असे नामकरण या दोन्हींच्या  (गुरू आणि मित्र) यांच्या सन्मानार्थ केल्याचे डाॕ. अतुल जेठे यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी २०११साली शोधलेल्या लोणार जवळील विवराला ‘गगन विवर’असे नामकरण केले होते. या संशोधना दरम्यान चौकूळ येथील समाजसेविका मा.सौ. सुषमाताई गावडे,अनिल गावडे,प्रताप गावडे.मा.सरपंच गुलाबराव गावडे तसेच सरपंच श्री.सुरेश शेटवे डाॕ.सुश्रुत लळीत तसेत अन्य चौकुळ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या शोधकार्याचे चां ता. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. के. सी. मोहिते व संस्था सचिव मा.श्री. नंदकुमार निकम यांनी डाॕ.अतुल जेठे यांचे अभिनंदन केले आहे.

आंबोली घाटात लघुशंकेसाठी उतरलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा दरीत पडून मृत्यू….

आंबोली: गोव्यावरून कर्नाटक राज्यात जात असताना आंबोली येथे लघुशंकेसाठी उतरलेल्या छत्तीसगड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दरीत कोसळल्याने आंबोली येथेजागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मिथिलेश पॅकेरा हे छत्तीसगड पोलीस तुकडी बरोबर कर्नाटक होत असलेल्या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी कर्नाटकात आले होते. दरम्यान काही काल सुट्टी असल्याने त्याने आणि त्याच्या इतर ४ मित्रांनी गोवा फिरायला जाण्याचा बेत आखला. तेथून परत येत असताना त्यांनी गाडी आंबोली येथे मुख्य धबधब्याच्या काही अंतरावर लघुशंकेसाठी गाडी थांबवली. मिथिलेश यांना काळोखात तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने ते दरीत कोसळले. ही घटना घडताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित आंबोली पोलीस स्टेशन ला कॉन्टॅक्ट केला आणि मदत मागवली. आंबोली रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर आणि मायकल डिसोझा आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरीत उतरून बचावकार्य सुरु केले, मात्र परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस हवालदार दत्ता देसाई आदी सहका-यांनी त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. याबाबत उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..    

आपल्या जमिनी हेच आपले अस्तित्व; त्या विकून आपले अस्तित्व गमावू नका – राज ठाकरे

रत्नागिरी | प्रतिनिधी – राज ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरी येथे सभा होती. बारसू रिफायनरी वरून जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण राज्यात वातावरण तापले असताना राज ठाकरे या संबधी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्या पूर्ण भाषणात त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचे स्पष्ट झाले.

जमीन म्हणजे अस्तित्व; आपले अस्तित्व सांभाळा
भूमिपुत्राकडून मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या जमिनींबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. जमीन असेल तर आपले अस्तित्व आहे; एकदा का जमीन गेली कि आपले कोकणातील अस्तिव संपले. पूर्वीपासून हेच सूत्र चालू आहे. भूगोल आणि इतिहास यांचा खूप मोठा संबंध आहे. ज्यांनी जमिनी (राज्य) पादाक्रांत केले त्यांनी इतिहास घडवला. मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडा रोवला होता. पण कोकणात खूप वाईट चित्र पाहावयास मिळते.जमिनी कवडीमोलाने विकल्या जातात, या जमिनी परप्रांतीय विकत घेऊन आपले राज्य निर्माण करत आहेत. काही दिवसांनी कोकणची भाषा आणि संस्कृती पण बदललेली असेल. कारण इथल्या स्थानिकांचे येथे अस्तित्वच नसेल. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी या सभेत केले.

कोकणी जनतेला नेहमी गृहीत धरले जाते.
कोकणातील राजकारणात बदल दिसत नाही. नेहमी तेच तेच उमेदवार आणि पक्ष निवडून येताना दिसतात. भले त्यांनी येथील जनतेचे कल्याण करो व ना करो. त्यामुळे येथील राजकारणी येथील प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होतो पण मुंबई गोवा महामार्ग गेली १६ वर्ष रखडला आहे. यावरून येथील राजकारण्यांची उदासीनता दिसून येते. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी कोकणवासीयांची या गोष्टी लक्षात घेऊनच नवा बदल घडवून आणला पाहिजे असे ते म्हणालेत,

कोकणचे लोक प्रतिभावंत
महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या एकूण ८ भारतरत्न पुरस्कारापैकी ६ पुरस्कार कोकणातील लोकांना मिळाले आहे. कोकणात प्रतिभावंत लोक आहेत त्यांच्याकडून जमिनी विकून आपलेच नुकसान करून घेण्याची वृत्तीची अपेक्षा नाही असे ते पुढे म्हणाले.

कोकणातील पर्यटन
कोकणात पर्यटनाला भरपूर वाव आहे, केरळ आणि कोकण या दोन्ही भागातील निसर्गात समानता आहे. केरळ राज्याचा विकासाचा कणा पर्यटन होऊ शकते तर कोकणात पर्यटन सोडून अशा प्रकल्पाची काय गरज आहे? कोकणातील पर्यटनाचा विकास केला तर ते पूर्ण महाराष्ट्र पोसू शकते एवढा त्याला वाव आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कातळशिल्प आणि प्रकल्प
बारसू येथे कातळशिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही कातळशिल्पाची नोंदणी युनिस्को ने केली आहे . या कातळशिल्पावर पुढे युनिस्को संशोधन पण करणार आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्याठिकाणी कातळशिल्पे आहेत त्या ठिकाणच्या ३ किलोमीटर परिघाच्या भागात कोणतीही विकासकामे किंवा प्रकल्प उभारला जाऊ शकत नाही मग रिफायनरी प्रकल्प कसा काय उभारला जात आहे असा प्रश्न त्यांनी केला.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search