Category Archives: कोकण
मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.
या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.
अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.
PRS Downtime : रेल्वेच्या संकेतस्थळावरून आज रेल्वे प्रवासासाठी तिकिट आरक्षित करण्याचा तुमचा बेत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (Railway PRS system) पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वे आता आपल्या टिकिट सिस्टिम आणि ट्रेन क्रमांक अपग्रेड करण्यासाठी तांत्रिक बदल करणार आहे. त्यासाठी तिकिट आरक्षण यंत्रणा आज रात्री ठीक ११:४५ ते उद्या पहाटे ०४:४५ वाजेपर्यंत बंद असणार आहे. या मध्य रेल्वे, पाश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि पाश्चि मध्य रेल्वेचे प्रवासी तिकीट आरक्षण, टिकिट रद्द करणे, रेल्वेबाबतची चौकशी आदी सेवाही बंद असणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या बाबतची माहिती ट्विटर X वर पोस्ट केली आहे.
DOWNTIME OF PASSENGER RESERVATION SYSTEM (PRS)
for PNR compression from 23.45 hrs of 28.3.2024 to 4.45 hrs on 29.3.2024 over Central Railway, Western Railway, Konkan Railway & West Central Railway.During this time, Internet Booking of Tickets for Trains, Refund, Touch Screen,… pic.twitter.com/xikh5IoEAo
— Central Railway (@Central_Railway) March 28, 2024
ठाणे, दि. २८: ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट रुंदीकरणाच्या कामामुळे येथून जाणार्या काही गाड्यांचे सध्या असलेले फलाट Platform बदलण्यात आले आहेत. फलाट क्रमांक पाचवर येणार्या गाड्या सात नंबर फलाटावर वळविण्यात आल्या आहेत.
या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस (10103)ठाणे स्थानकातून आज दिनांक 28 मार्च 2024 पासून 06 एप्रिल 2024 पर्यत फलाट क्रमांक(05) पाच ऐवजी सात (07)वरून सोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघ (रजि.) तर्फे देण्यात आली आहे. ठाण्यातील प्रवाशांनी या बदलाची दखल घेऊन आपला त्रास टाळावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
गोवा: रेल्वे प्रशासन एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर आणि जनरल डब्यांच्या संख्येत कपात करून त्याजागी एसी डबे जोडून सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक त्रासदायक बनवत आहे असा आरोप केला जात आहे. मात्र एका गाडीच्या एसी डब्यांत कपात करून त्या जागी सामान्य आणि सेकंड स्लीपर डबे जोडून मार्गावर प्रवास करणार्या सामान्य प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. गाडी क्रमांक 12779 / 12780 वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा सुपरफास्ट एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत हा बदल करण्यात आला आहे. एक दोन नाही तर एसीच्या एकूण सहा डब्यांचे रूपांतर सेकंड स्लीपरच्या चार आणि सामान्य श्रेणी General च्या एकूण दोन डब्यांत कायमस्वरूपा साठी करण्यात आले आहे.
दिनांक 16 जून 2024 पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.
आताची संरचना
फर्स्ट एसी – 01 + टू टायर एसी – 02 + थ्री टायर एसी – 04 + ईको. थ्री टायर एसी – 04 + स्लीपर – 02 + सामान्य – 02 + पॅन्टरी कार – 01+ पार्सल व्हॅन – 02 + जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण LHB 20 डबे
सुधारित संरचना
फर्स्ट एसी – 01 + टू टायर एसी – 01 + थ्री टायर एसी – 01 + ईको. थ्री टायर एसी – 02 + स्लीपर – 06 + सामान्य – 04 + पॅन्टरी कार – 01+ पार्सल व्हॅन – 02 + जनरेटर कार – 01 + एसलआर – 01असे मिळून एकूण LHB 20 डबे
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरून जुन्या आयआरएस IRS रेकसह धावणाऱी एक गाडी आता आरामदायक मानल्या जाणार्या आधुनिक प्रणालीच्या एलएचबी Linke Hofmann Busch (LHB) coaches रेकसह धावणार आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 20910 / 20909 पोरबंदर – कोचुवेल्ली – पोरबंदर साप्ताहिक एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह धावणार आहे.
गाडी क्रमांक 20910 पोरबंदर – कोचुवेल्ली एक्सप्रेस दि. 28 मार्च 2023 च्या फेरीपासून तर गाडी क्रमांक 20909 कोचुवेल्ली – पोरबंदर दिनांक 31 मार्चच्या फेरीपासून एलएचबी रेक सह धावणार आहे.
ही गाडी सध्या 23 डब्यांसहित चालविण्यात येत आहे. मात्र तिचे LHB रेक मध्ये रुपांतर करताना तिचा एक सेकंड स्लीपर डबा कमी करण्यात आला असून ती 9 स्लीपर डब्यांऐवजी 8 स्लीपर डब्यांसहित धावणार आहे.
सावंतवाडी:सध्याच्या सोशल नेटवर्किंग युगात जनजागृती करण्यासाठी किंवा आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करून अपेक्षित परिणाम मिळवता येतात. अगदी जवळचे कोकणातील उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर फेसबूक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटवर बनविण्यात आलेले Sawantwadi Railway Station – Terminus हे पेज.
सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि कोकण रेल्वे संबधीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, जनजागृती करून समस्यां सोडविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यात यावा या हेतूने या पेजची निर्मिती करण्यात आली. कोकण रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी हे पेज बनवले आहे. या पेज द्वारे त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिहीर मठकर, विहंग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर,तेजस पोयेकर ईत्यादींनी पोस्ट, लाईव्ह च्या माध्यमातून वेळोवेळी अनेक कोकण रेल्वे संबधी अनेक समस्या येथे मांडून जनजागृती केली आहे.
दोन दिवसांपूर्वी या पेजवर या कार्यकर्त्यांनी फलक मोहीम राबवून काही फोटो पोस्ट केले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून तिच्यावर दृश्ये views, लाईक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. “कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा आशयाची फलक मोहीम ”कोकणवाचवा” आणि ”SaveKokanRailway” या hashtag सहित कार्यकर्त्यांनी राबवून ते फोटो या पेज वर पोस्ट केले होते.
आम्हाला अजून पाठिंबा दर्शविण्यासाठी आमच्या ह्या चळवळीत सामील व्हा.या पेज ला फॉलो करून आमच्या सोबत जोडले जा ही तुम्हा सर्वांना विनंती. आवाहन या पोस्ट मध्ये करण्यात आले आहे
#Save Konkan Railway..
#Merge Konkan Railway With Indian Railways.
#Sawantwadi Terminus@followers
Posted by Sawantwadi Railway Station-Terminus on Friday 22 March 2024