सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आशादायक असलेल्या पाणबुडी प्रकल्पासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे गेले काही वर्ष रखडलेला वेंगुर्ले निवती समुद्रातील प्रस्ताविक पाणबुडी प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. सन २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले निवती रॉक जवळ समुद्रात पाणबुडी प्रकल्प होणार होता.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता आला असता, समुद्रातील अंतरंगात असलेला खजिना यामुळे न्याहाळत सफर झाली असती. आता केंद्र सरकारने निधी दिला असल्याने पर्यटन प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. साधारण वीस ते पंचवीस व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन समुद्राखालील अंतरंग बसून न्याहाळू शकतात. कोकणात सर्वात जास्त कोरल्स, रंगबिरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग दिसणारे अनोखे विश्व हे फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असून हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निवती समुद्रात होणार आहेमहाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकणातील या प्रकल्पाला ४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारने तशी घोषणाही केली. परंतु पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. समुद्र किनारी पर्यटन स्थळे विकसित झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात, म्हणून पाणबुडी प्रकल्पाला महत्त्व आले आहे.
Road Accident : मुंबई गोवा महामार्गावरील खेड परशुराम घाटात आज पाच वाहनांचा अपघात घडल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. तर या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली. पाच वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरने घरडा बसला धडक दिली. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षणभिंत कोसळल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. मात्र आज दुपारी दोन वाजता चिपळूण शहरातून घरडा कंपनीचे कर्मचारी घेऊन बस कंपनीकडे निघाली होती. परशुराम घाटात ही बस एकेरी मार्गावर आली असताना समोरून गोव्याकडे जाणारा कंटेनर वेगाने येऊन बसवर आदळला. कंटेनरच्या धडकेने बस लावलेल्या गर्डरवर जाऊन आदळली. तर कंटेनरच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आढळल्या.
घरडा कंपनीच्या गाडीत असणारे घरडाचे कर्मचारी या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. किमान पंधरा ते वीस कर्मचारी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. खाजगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलीस महामार्ग यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. परशुराम घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.
Konkan Railway: कर्नाटक येथील खासदार श्रीनिवास पुजारी यांनी लोकसभेत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे हा मुद्दा उचलून धरला असतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी देखील हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी २९ नोव्हेंबर रोजी हा मुद्दा पुन्हा राज्यसभेत उपस्थित केला होता.
गेले काही महिने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती,महाराष्ट्र या कोकणातील २५ प्रवासी संघटनेच्या शिखर समितीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे आणि रोहा ते सावंतवाडी पर्यंतचा भाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, त्यासंदर्भात समितीने संबंधित लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष आणि इमेल मोहीमेद्वारे लक्ष वेधले होते, त्याला अनुसरून समितीने दिलेल्या निवेदनात मांडलेले मुद्दे खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करून रेल्वे मंत्र्यांकडून लेखी उत्तर प्राप्त केले आहे. प्रवासी समितीचा तसेच कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल कोकणवासीयांतर्फे प्रवासी समितीने खासदार पाटील यांचे आभार मानले.
खासदार पाटील यांचा प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यापूर्वी त्याचे १००% समभाग केंद्र शासनाच्या हाती येणे आवश्यक आहे. आजच्या घडीला केवळ गोवा शासनाने कोकण रेल्वे महामंडळातील त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन करण्यास संमती दिल्याचे सांगितले.
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील रेल्वे विकास, अमृत भारत स्थानक योजना, एक स्थानक एक उत्पादन योजना, रेल्वे मार्गाची क्षमतावृद्धी आणि आधुनिकीकरण, फलाट व इतर यंत्रणांचा कायापालट याकरिता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे आवश्यक आहे. तसेच राज्याच्या राजधानी मुंबईशी सुलभ संपर्कासाठी ज्या रेल्वे विभागाअंतर्गत मुंबई त्याच रेल्वे विभागात संपूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हेही यावेत ही समितीची भूमिका आहे असे समितीचे सचिव श्री अक्षय महापदी यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेवरील बरीच विकासकामे निधीअभावी रखडली आहेत, त्यात प्रामुख्याने सावंतवाडी टर्मिनस हा विषय बरीच वर्षे रखडला आहे. आजच्या घडीला महामंडळ या मार्गाचे दुपदरीकरण करण्यास असमर्थ आहे त्यातच विविध राज्यांच्या हिस्सेदारीमुळे रेल्वे मंत्रालय किंवा संबंधित राज्य शासन निधी देण्यास हात आखडता घेत आहेत. त्यामुळे केवळ राज्यशासनांनी समभाग हस्तांतरित केल्यावर विलीनीकरण करण्याची भूमिका केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने न घेता ही प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी राज्य शासनाचे समभाग केंद्र शासनाकडे हस्तांतरित करताना राज्य शासनांनी गुंतवलेला निधी त्यांना परत कोण आणि कसा देणार किंवा देणार नाही याबाबत निर्णय होणे आवश्यक आहे. यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व राज्य शासनांचे समभाग विकत घेणे हा सोयीस्कर पर्याय आहे. तरी, याबाबत पुढील निर्णय जलदगतीने होण्यासाठी आपले असेच सहकार्य अपेक्षित आहे, असे समितीकडून दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांचे आभार व्यक्त करताना कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे काळाची गरज आहे ते लवकरात लवकर होणे हे सर्वांच्या हिताचे आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल असे मत समितीला संलग्न असलेली कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले.
KONKAN RAILWAY: मध्य रेल्वेच्या हद्दीत ठाणे तसेच दिवा रेल्वे स्थानकादरम्यान टीडब्लूएस पाईंट बदलण्याच्या कामासाठी घेणात येणार्या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस दोन दिवसांसाठी निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे.
गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसचा दिनांक 22/11/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त होईल.
गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसचा दिनांक 24/11/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल स्थानकावरून तिच्या पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेवर सुरु होईल.
“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी, उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावाचे नामनिर्देशन व शिक्कामोर्तब करण्यासाठी ६७३ पानांचा प्रस्ताव सादर.
Follow us on
मुंबई: कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र, प्रशासकीय स्वराज्य घडविण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक चळवळ राबवून अविरतपणे ज्ञानदान करणारे, प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा व्याख्याते, उच्चविद्याविभूषित, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांची *समाजसेवा, कला व शिक्षण या क्षेत्रात* उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी *“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने, श्री. सचिन यशवंत रेडकर, अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे यांनी राज्यपाल कार्यालयास दिनांक १९/११/२०२४ रोजी निवेदनासोबत शोधप्रबंध स्वरूपातील दस्तावेजांप्रमाणे भाग I, II, III, IV स्वरूपात ६७३ पानांचा प्रस्ताव सादर केला.* या प्रस्तावासोबत महाराष्ट्र व कोकणातील सर्वच घटकातील इच्छुक सामाजिक संस्था/मंडळांनी राज्यपालांना संबोधित केलेले शिफारस सह पाठिंबा पत्र सुद्धा संलग्न केले आहेत अशी माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम 171 (5) खंड (3) च्या उपखंड (ई) अंतर्गत राज्यपालांनी नामनिर्देशित केले जाणारे सदस्य खालीलप्रमाणे अशा बाबींच्या संदर्भात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल, म्हणजे: साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा असे नमूद आहे. कार्यकारी प्रमुख या नात्याने माननीय राज्यपाल आपल्या स्वविवेकाधीन (डिस्क्रेशनरी) अधिकारांचा वापर करून, सदर प्रस्तावातील संलग्न दस्तावेजांचे अवलोकन करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन, कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमधील इच्छुक पक्ष सुद्धा आपल्या माध्यमातून, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, उच्चशिक्षित व्यक्तिच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा व विधानपरिषदेत सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी नवीन मंत्रिमंडळात नक्कीच चर्चेद्वारे शिफारस करून नामनिर्देशन यादीत नाव समाविष्ट करतील असा आम्हाला व समस्त कोकणवासियांना, हितचिंतकांना एक मतदार व सुजाण नागरिक स्वरूपात आत्मविश्वास आहे, उच्चशिक्षित तरूण व्यक्तींनी विधानपरिषदेत येणे व सत्ताधारी पक्षांनी अशा व्यक्तींना संधी देणे ही लोकशाही च्या अनुषंगाने काळाची गरज आहे, तरच समाजात आमुलाग्र बदल घडू शकतील असे मत “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर यांनी व्यक्त केले.
Konkan Railway News: कोकण रेल्वेवरील कारवार- हारवाड विभागादरम्यान पायाभूत बांधकामासाठी २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. कारवार – हारवाड विभागादरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान आणि १ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते दुपारी ४.३० दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
२१ नोव्हेंबरच्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक ०९००५७ उधना – मंगळुरू रेल्वेगाडी आणि १ डिसेंबरच्या ब्लाॅकमुळे गाडी क्रमांक ११०९७ पुणे – एर्नाकुलम एक्स्प्रेस मडगाव – कारवार स्थानकादरम्यान सुमारे २ तास थांबवण्यात येणार आहे. तर, २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०६६०१ मडगाव – मंगळुरू रेल्वेगाडी मडगाववरून दुपारी २.१० वाजता सुटण्याऐवजी दुपारी ३.१० वाजता सुटेल. त्यामुळे या रेल्वेगाडीला एक तास विलंब होईल.
Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतेक गाड्या आता आधूनिक एलएचबी स्वरूपात रूपांतरित झाल्याने कोकण रेल्वे विभागात अनेक रेल्वे गाड्यांचा कमाल अनुज्ञेय वेग MPS आता ताशी १२० किलोमीटरवर प्रति तास करण्यात आला आहे. दिनांक ११ नोव्हेंबर पासून रोहा ते ठोकूर या कोकण रेल्वेच्या क्षेत्रात हा बदल अमलांत आणला गेला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ४५ गाड्यांची कमाल अनुज्ञेय वेग मर्यादा १२० किलोमीटरवर प्रतितास वर आणली गेली आहे. यापूर्वी बिगर पावसाळी वेळापत्रकात फक्त तेजस, जनशताब्दी, राजधानी आणि वंदे भारत या गाड्यांचीच कमाल अनुज्ञेय वेगमर्यादा १२० किमी प्रतितास इतकी होती. तर इतर गाड्यांची कमाल अनुज्ञेय वेगमर्यादा ११० किमी प्रति तास होती.
गाड्यांचा वेग वाढल्याने काय होणार…
– प्रवाशांसाठी अधिक जलद प्रवासाची सोय
– प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार
– गाड्यांचा वक्तशीरपणा वाढण्यास मदत
– गाड्यांची संख्या वाढविता येणे शक्य
– प्रवास वेगवान झाल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढणार
45 trains at 120kmph on Konkan Railway! Increase in the Maximum Permissible Speed (MPS) to 120 km/h for trains with LHB coaches running on the Roha (ROHA) Thokur (TOK) Roha (ROHA) section over Konkan Railway with immediate effect, subject to the observance of all permanent speed… pic.twitter.com/9ghhaVJiXq
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक १२१३३/१२१३४ सीएसएमटी – मंगुळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी दिनांक ०१ मार्च २०२५ पासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२१३३ सीएसएमटी – मंगुळुरु एक्सप्रेस दिनांक ०१ मार्च २०२५ च्या फेरीपासून तर गाडी क्रमांक १२१३४ मंगुळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस दिनांक ०३ मार्च २०२५ च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी १७ डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती १६ एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे.
डब्यांच्या संरचनेत मोठा बदल
या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल केला असून या गाडीच्या २ स्लीपर कोचेसचे जनरल डब्यांत करण्यात आले आहे. त्यामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या आता ४ झाली आहे तर स्लीपर कोचेसची संख्या ७ वरुन ५ करण्यात आली आहे. थ्री टायर एसी डब्यांची संख्या ४ वरून ३ तर टू टायर एसी डब्यांची संख्या १ वरून २ करण्यात आली आहे.
ठाणे:मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी कोकण रेल्वेची अवस्था झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. आरक्षित डब्यांतून प्रतीक्षा तिकीट धारकांना प्रवासावर प्रतिबंध घालण्यात आल्याने ही गर्दी भयंकर वाढली आहे. मडगाव येथून मुंबईसाठी सकाळी सुटणारी मांडवी एक्सप्रेस सिएसएमटी येथे पोचल्यावर कोकणकन्या एक्सप्रेस बनते. या गाडीच्या जनरल डब्यांत जागा मिळविण्यासाठी दादर, ठाणे आणि पनवेल स्थानकाहून डाऊन करणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
या गाडीतून उतरणार्या प्रवाशांची संख्या, डाऊन करणार्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि या गाडीला या स्थानकांवर गाडी थांबण्याचा कमी अवधी या सर्वांमुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
ठाण्यात आज एक दुर्घटना होता होता टळली
ठाणे स्थानकावर आज एक दुर्घटना होता होता टळली. मांडवी एक्सप्रेस ठाण्यात आल्यावर डाऊन करणार्या प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यामुळे उतरणार्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीस सामोरे जावे लागले. ठाणे स्थानकावर आठ नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी थांबल्यास पनवेलच्या दिशेने फलाट आणि गाडीच्या फुटबोर्ड दरम्यान खूप मोठे अंतर होते. त्यामुळे उतरणार्या प्रवाशांना या गर्दीमुळे अंदाज आला नाही. त्यामुळे गाडीतून उतरताना एक प्रवासी चक्क खाली रूळावर गेला. काहींच्या बॅगा ही खाली गेल्या. सुदैवाने एकदम मागचा डबा असल्याने तत्परतेने गार्डला पाचारण करण्यात आले आणि त्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अलीकडेच बांद्रा येथे गाडी पकडताना प्रवाशांची चेंगराचेंगरी होऊन काही प्रवासी गंभीर झाले होते. त्यातील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान काही दिवसांनी मृत्यू झाला. त्यामुळे सध्या रेल्वे प्रशासन अशा घटना टाळण्यासाठी जनरल डब्यांजवळ रेल्वे पोलीस तैनात ठेवण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने ठाण्यातील या घटनेची गंभीर दखल घेऊन येथे रेल्वे पोलीस तैनात ठेवण्याची गरज आहे.
ठाणे : कोकणकन्या एक्सप्रेससाठी डाऊन करणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ… दुर्घटना होण्याची शक्यता…
ठाणे :कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यांतून डाऊन करणार्या प्रवासांच्या संख्येत वाढ….दुर्घटना होण्याची शक्यता.. @Central_Railway@KonkanRailway@RailMinIndia
Video Credit – Kokanai
अवघ्या ५/१० हजारासाठी आपली मते विकू नका. या वेळी मतदान करताना कोकणातील पुढील पिढीचा विचार करूनच मतदान करा. आतापर्यन्त तळकोकणात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली असून येथे मोठया प्रमाणात जंगलतोड झाली आहे. हे असेच चालू राहिल्यास कोकण यापुढे कोकण राहणार नाही. तुमची गावे नष्ट होतील, वायनाड सारख्या दुर्घटना घडतील. हे सर्व टाळण्यासाठी यावेळी सुज्ञपणे मतदान करण्याचे आवाहन कोकणातील ‘रानमाणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद गावडे याने व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शाश्वत कोकणच्या दृष्टीने काही धोरणात्मक बाबी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट कराव्यात तसेच कोकणातील सुज्ञ मतदारांनी याची मागणी करावी आणि शाश्वत कोकण परिषदेच्या उद्धिष्टांस समर्थन देणाऱ्या उमेदवारांनाच कोकणातून प्रतिनिधित्व देऊन कोकणच्या उज्वल व शाश्वत भविष्याला दिशा द्यावी या हेतूने कोकण परिषदेने “कोकणी जनतेचा जाहीरनामा” प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यात दिलेल्या मुद्द्यांचा समावेश जो उमेदवार आपल्या जाहीरनाम्यात करेल अशा उमेदवारांनाच मत द्या आणि कोकण वाचावा असे त्याने आवाहन केले आहे.
कोकणातील सर्व स्तरीय जनतेच्या मुंबई , वसई , सावंतवाडी , चिपळूण , चिंचणी(पालघर) व पेण येथील झालेल्या परिषदांच्या विचारमंथनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या निसर्ग व संस्कृती यांच्या शाश्वत अस्तित्त्वासाठी कुठली धोरणे अंमलात आणावी , कुठले प्रकल्प पाहिजेत – कुठले नको याची स्पष्ट दिशा दर्शविणारा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात प्रस्तावित न करणे , ग्रीनफिल्ड व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे , सिडको व एम एस आर डी सी यांना कोकण किनारपट्टी भागातून नियोजनाचा अधिकार देणारे अध्यादेश रद्द करणे , जंगलतोड बंदी , दोडामार्ग तालुक्याचे संरक्षण , जांभ्याच्या सड्यावरील जैव विविधतेचे संरक्षण, अवैध एल इ डी , परसिनेट मासेमारीवर कृती अशा मागण्यांना धोरणात्मक निर्णयात सामील करण्याचे म्हंटले आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय , विद्यापीठ , अंगणवाडी -आशा वर्कर्स यांना वाढीव अनुदान, कातळशिल्प संरक्षण, बोली भाषेचे जतन , स्वयं रोजगारावर भर , कृषी प्रक्रिया केंद्रे, कोकण रेल्वेचे थांबे वाढवणे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात कोकणी जनतेने अजून भर घालावी अशी अपेक्षा आहेच तरीही हा जाहीरनामा राजकीय पक्ष , उमेदवार , कार्यकर्ते आणि कोकणातील सर्वच जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे. शाश्वत कोकण परिषदचे समन्वयक सत्यजीत चव्हाण व शशी सोनावणे यांचेद्वारा प्रस्तुतचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.