Category Archives: कोकण
Goa News: देशात नव्याने आढळलेला कोविडचा जेएन व्हेरिएंट गोव्यातही पोहोचला आहे. गोव्यात आतापर्यंत ह्या व्हायरसचे १९ बाधित आढळल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.
गोव्यात कोविड चाचण्यांबरोबरच जीनोम सिक्वेन्सिंगही सुरू करण्यात आल्यामुळे कोविडची प्रकरणे वाढल्यानंतर पुन्हा एकदा जिनोमिंग सिक्वेस्सिंगसाठीही सेम्पल्स पाठविणे सुरू केले होते. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील जिनोमिंग विभागाने आरोग्य संचानलालयाला पाठविलेल्या अहवालानुसार जेएन १ चे १९ बाधित सापडले आहेत. यामुळे खळबळही माजली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविडच्या केसेस वाढू लागल्याची वस्तुस्थिती मान्य करतानाच लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले. लोकांनी केवळ काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणे स्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना आवश्यक सूचना केल्या असून या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री विशवजित राणे सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यानी बैठकीत केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या सूचनांची माहती दिली. तूर्त कोणतीही मार्गदर्शिका केंद्राने जारी केली नसल्याचे राणे यांनी सांगितले परंतु खबरदारी घेणे आणि आरोग्य यंत्रणे सज्ज ठेवणे याकडे लक्ष दिल्याचे सांगितले.
Konkan Railway News :कोकण रेल्वेमार्गावर गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, एका नोव्हेंबर महिन्यात २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोकणकन्या, मांडवी, दिवा-सावंतवाडी, तुतारी यासारख्या गाड्या दररोज हाऊसफुल्ल असतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेकजणं फुकट प्रवास करतात. यामध्ये कोकण रेल्वेचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पथके निश्चित केली आहेत. काहीवेळा अर्धे तिकिट काढून पुढे प्रवास केला जातो. काहीजण जनरल तिकिट काढून आरक्षित डब्यामधून प्रवास करतात. काहीवेळा तर आरक्षित डब्यातील तिकीटच न काढता प्रवास केला जातो.
विनातिकीट प्रवास करताना कोणी प्रवास सापडला तर त्या त्या परिस्थिनुसार दंडाची रक्कम आकारली जाते. नोव्हेंबर महिन्यात गाड्यांची गर्दी लक्षात घेऊन केलेल्या तपासणीमध्ये ७ हजार १३ जणांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रवाशांना तिकिटाच्या तिप्पट रक्कमही भरणा करावी लागली आहे. भविष्यातही संपूर्ण मार्गावर या पद्धतीने तिकीट तपासणी मोहीम तिव्रतेने राबवण्यात येणार आहे.
Konkan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वेतील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ‘वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी’ ya पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीकरिता हजर राहू शकतात. या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीची तारखा डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ महिन्यातील आहेत. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या
पदाचे नाव – वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी.
वयोमर्यादा – ३५ ते ५५ वर्षादरम्यान
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
एकूण पदसंख्या – या भरती अंतर्गत एकून ३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.
मुलाखतीची तारीख – १४, १८, २०, २२, २६, २८, ३० डिसेंबर २०२३ आणि ०१, ०४, ०५, ०८ जानेवारी २०२४
अधिकृत वेबसाईट –
https://konkanrailway.com/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1NJMLNX7IBMDNuWxxqw09MNiyQ-PhWieS/view
कोकण रेल्वेवरील प्रलंबीत मागण्यांसाठी एकवटले चाकरमनी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुंबईत नवीन कार्यकारणी जाहीर
मुंबई : गेली २५ वर्षे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या अनेक मागण्यांमध्ये प्रामूख्याने सावंतवाडीला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा.मधू दंडवते यांचे नाव देणे,कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करणे,वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,कोकण रेल्वे वरील गर्दी कमी करण्यासाठी दादर चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे,मुंबई रत्नागिरी इंटरसिटी एक्स.सुरू करणे, तर सर्व सुपर फास्ट एक्सप्रेस पुणे मिरज मार्गे मडगावल्या वळवाव्यात अन्यथा त्यांचे रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे जास्तीचे थांबे दयावेत,आणि कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेचे थांबे वाढवावे ह्या मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही त्या मिळत नसल्याने मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,वसई विरार,डहाणू,ठाणे,कल्याण, डोबींवली,बदलापूर,सावंतवाडी,लांजा,चिपळूण येथील कोकण रेल्वेवर काम करणाऱ्या २२ प्रवासी संघटना / संस्था एकवटल्या असून त्यांनी परळ मुंबई येथे एल्गार सभेचे आयोजन करून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई ची स्थापना केली.
नवीन कार्यकारिणी :
नवीन कार्यकारणीत अध्यक्ष : श्री.शांताराम नाईक, प्रमूख कार्यवाहक :श्री.राजू कांबळे,उपाध्यक्ष : श्री. तानाजी परब, उपाध्यक्ष : श्री.दिपक चव्हाण,उपाध्यक्ष : श्री.अक्षय महापदी, सचिव : श्री.यशवंत जड्यार,सहसचिव : श्री.दर्शन कासले,कोषाध्यक्ष : श्री.मिहीर मठकर,उपकोषाध्यक्ष : श्री.राजाराम कुंडेकर,उपकोषाध्यक्ष : श्री.नितीन जाधव,अं. हि. त. : श्री.समीर भोंगे,अं. हि. त. : श्री.मनीष दाभोळकर,सल्लागार : श्री.सुनील उत्तेकर,सल्लागार : श्री.सुभाष लाड,सल्लागार : श्री.श्रीकांत सावंत,सल्लागार : श्री.सुरेद्र नेमळेकर,सल्लागार : श्री.परेश गुरव,कायदेविषयक सल्लागार : ॲड. श्री.संजय गांगनाईक,कायदेविषयक सल्लागार : अँड.श्री.नंदन वेंगुर्लेकर,कायदेविषयक सल्लागार : अँड.सौ.योगिता सावंत, संपर्क प्रमुख : श्री.सागर तळवडेकर,सहसंपर्क प्रमुख : श्री.अभिषेक शिंदे,कार्यकारणी सदस्य : श्री.मिलिंद रावराणे,कार्यकारणी सदस्य : श्री. रमेश सावंत,कार्यकारणी सदस्य : सौ.संगिता पालव यांची नियुक्ती करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात श्री.शांताराम नाईक यांनी आवाहन केले की वरील आमच्या प्रमूख मागण्यापैकी किमान ५ मागण्या २६ जाने.२०२४ पर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाने मान्य कराव्यात अन्यथा कोकण रेल्वेवर रेलरोको करून वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडीच्या पुढे जाऊ देणार नाही असे सांगितले.तर सभेचे सुत्रसंचलन श्री.राजू कांबळे व श्री.यशवंत जडयार यांनी केले.