Category Archives: कोकण
आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.
"…'या' एसटी बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा" असे आवाहन करणाऱ्या 'त्या' बस चालकाचे निलंबन – Kokanai https://t.co/qyAqHBqZMH#kokanaiLiveNews#msrtc#Ratnagiri pic.twitter.com/vrkhFshHy0
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) August 26, 2023
- सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही
- सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही
- प्रीमियम /वंदेभारत या गाड्या सावंतवाडीसाठी नाहीत
पनवेल | सागर तळवडेकर : कोकणात रेल्वे यावी यासाठी बापजाद्यांनी राखून ठेवण्यात आलेल्या आपल्या जमिनींचा त्याग करून कोकणवासीयांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. मात्र येथील अनेक स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही, प्रवासी संख्या असूनही अनेक गाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही आहे. एवढे कमी होते म्हणुन की काय आता तर रेल्वे अधिकारी चक्क संतापजनक वक्तव्ये करताना दिसत आहेत.
सावंतवाडी स्थानकात अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि येथील टर्मिनसचे रेंगाळलेले काम पूर्ण करावे यासाठी काल दिनांक २४ ऑगस्ट ला ठरल्या प्रमाणे मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली.
सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे, येथील स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न असताना देखील येथे गाड्या मात्र हाताचा बोटं मोजण्या इतक्याच थांबत आहेत.सध्या कोकण रेल्वे मार्गावर ४४ गाड्या धावतात त्यापैकी सावंतवाडी स्थानकात एकूण ५ दैनिक आणि ४ साप्ताहिक अश्या ९ गाड्या थांबतात.तसेच सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४.४ करोड एवढे आहे आणि आता पुढच्याच महिन्यात गणपती चतुर्थी असल्याने दुसऱ्या तिमाहीत देखील हा आकडा वाढण्याची दाट शक्यता देखील आहे असे असून ही सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांचे अधिकचे पर्याय उपलब्ध नाहीत. अलीकडेच संगमेश्वर आणि खेड ला अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला, हे सर्व लक्षात घेता रेल्वे अभ्यासक मिहिर मठकर आणि कोंकण रेल्वे समन्वयक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ रेल्वे अभ्यासक सुरेंद्र नेमळेकर यांनी नियोजन करून श्री सिन्हा यांची भेट घेतली आणि विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून श्री सिन्हा यांना निवेदन देण्यात आले.
सावंतवाडी टर्मिनस चे उर्वरित टप्पा २ चे काम पूर्ण करणे आणि येथील स्थानकाचा विकास केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे इत्यादी मागणया यावेळी करण्यात आल्या, येथील स्थानकात प्रवाशांची वर्दळ पाहता मंगलोर,मत्स्यगंधा,वंदे भारत,मंगला,नेत्रावती,गोवा संपर्क क्रांती,एलटीटी दुरोंतो,मरूसागर,त्रिवेंद्रम निजामुद्दीन आदी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा तसेच कोरोना काळात थांबा काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव या गाड्यांचा थांबा तत्काळ चालू करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाला अनुसरून बोलताना श्री सिन्हा हे सावंतवाडीकरांचा मागण्यांबद्दल अनुत्सुकच दिसले, त्यांनी सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही असे सांगितले, सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही तसेच प्रीमिअम गाड्या ह्या सावंतवाडी साठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे राजधानी तर नाहीच पण नव्याने चालू झालेली वंदे भारतचा थांबा देखील येथे मिळण्याचा आशा धूसर झाल्यात.टर्मिनस संदर्भात श्री सिन्हा यांना विचारले असता सावंतवाडी टर्मिनस करिता कोंकण रेल्वे कडे निधीची तरतूद नाही असे स्पष्ट केले त्यामुळे तमाम कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा सावंतवाडी टर्मिनस चे भविष्य हे अंधातरीतच आहे असे दिसते. अलीकडेच अनेक प्रवासी संघटना आणि संस्था यांनी या संदर्भात निवेदने सादर केली होती परंतु रेल्वे प्रशासन याची दखल घेत नसल्याची खंत मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी मांडली.
गणेश चतुर्थी ही वीस दिवसांवर येऊन ठेपली असता सोडलेल्या जादाच्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंतच आणि पुढे मडगाव आणि दक्षिणेकडील आहेत त्यामुळे यावर्षी तरी निदान अजुन गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडे होत आहे. सध्यातरी सोडलेल्या गाड्या ह्या अपुऱ्या आहेत अजुन गाड्या सोडून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोंकण रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेली तोंडी उत्तरे ही अपेक्षित नसून याबाबत लवकरच सावंतवाडीकरांना घेऊन भूमिका जाहीर करू असे मिहिर मठकर यांनी सांगितले.दिलेल्या निवेदनात मिहिर मठकर, सुरेंद्र नेमळेकर आणि सागर तळवडेकर यांनी सह्या केल्या होत्या.
मुंबई: मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे , १२ वर्षे का रखडले काम ? जर ४ वर्षात समृद्धी महामार्गाचे काम होते मग कोकणच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही ? निधीची कमतरता नसताना का रखडला ? या आणि अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून )मंत्री यांच्याकडून या विषया बाबत माहिती जाणून घेण्यासाठी एक खुले चर्चा सत्र येत्या रविवारी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले आहे.
गेली १२ वर्षे मुंबई गोवा महामार्ग वगळता कोणत्याही महामार्गावर अपघात झाला तर त्याची शासन दरबारी तात्काळ दखल घेतली जाते,तातडीने मदत जाहीर केली जाते; मात्र कोकणच्या अपघातग्रस्तांवर अन्याय का? या सर्वांना जबाबदार असलेल्या अधिकारी, राजकारणी,लोकप्रतिनिधी यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करीत नाही ? मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्या शिवाय टोल आकारणी सुरु करू नका! अशी मागणी असताना टोल सुरु झाले. या व अशा अनेक विषयांवर विविध संघटनांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांवर आंदोलने केली गेली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून गेल्या एक वर्षात रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची आठ वेळा पाहणी करून विषयाचा गांभीर्याने अभ्यास केला आहे. या कामातील असंख्य अडचणी हुडकून काढल्यामुळेच आता मुंबई गोवा महामार्ग कामाला गती आली असून पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी आपली नावे नोंदविण्यासाठीश्री. जयवंत दरेकर(९८२१५६२५७७) श्री. काका कदम(७५०६२५४४४५) श्री. अक्षय महापदी (८०९७१६७९८७) श्री.राजू मुलुख(८४५१०९७१३६) श्री उदय सुर्वे(७६६६९६५००५) यांच्याशी संपर्क करावा. अशी विशेष सूचनाही केली आहे.
श्रेणी | सध्याची संरचना | सुधारित संरचना |
---|---|---|
टू टियर एसी | 2 | 2 |
थ्री टायर एसी | 6 | - |
इकॉनॉमी थ्री टायर एसी | - | 6 |
स्लीपर | 9 | 8 |
जनरल | 3 | 3 |
जनरेटर कार | - | 1 |
एसएलआर | 2 | 1 |
पेन्ट्री कार | 1 | 1 |
एकूण | 23 | 22 |
सिंधुदुर्ग: हागणदारी मुक्त अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यानं बाजी मारली आहे. राज्यातल्या 351 तालुक्यामध्ये सर्वप्रथम स्वच्छतेतील पंचतारांकित मानांकन मिळवणारा कुडाळ हा पहिला तालुका ठरला आहे. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारी मुक्त अभियानात संपूर्ण राज्यात सर्वात प्रथम संपूर्णपणे हागणदारी मुक्त झाला आहे. श्रावण महोत्सवात स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी ही घोषणा केली.
कुडाळ पंचायत समिती आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचा सांगता समारंभ काल संपन्न झाला. तसेच यावेळी श्रावणमेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या श्रावण महोत्सवाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी कुडाळ तालुक्यातल्या ६० गावांमधली माती दिल्लीला पाठवण्यात येणाऱ्या कलशात एकत्र करुन तो कलश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला.
Konkan Railway News : रेल्वे बोर्डाने या आधी जाहीर केल्याप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्या आजपासून रोहा स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार खालील वेळात या गाड्या या स्थानकावर थांबणार आहेत.
१) रोहा स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा
16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express हि एक्सप्रेस आज दिनांक २५/०८/२०२३ पासून रोहा स्थानकावर थांबणार आहे. रोहा स्थानकावर या गाडीची वेळ दुपारी २ वाजता आहे.
२) रोहा स्थानकावर दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला थांबा
10105 Diva – Sawantwadi Express ही गाडी आज दिनांक २५/०८/२०२३ पासून रोहा स्थानकावर थांबणार आहे. रोहा स्थानकावर या गाडीची वेळ सकाळी ९ वाजता आहे.
परतीच्या प्रवासात 10106 Sawantwadi – Diva Express ही गाडी आज दिनांक २५/०८/२०२३ पासून रोहा स्थानकावर थांबणार आहे. रोहा स्थानकावर या गाडीची वेळ सकाळी संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटे अशी असणार आहे.
हा थांबा ५ मिनिटांसाठी असणार आहे.