Category Archives: कोकण
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळबांबर्डे येथील अभ्यासक गौतम कदम आणि केरळमधील अभ्यासकांनी जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.चीन, मलेशियामध्ये झालेल्या नोंदीनंतर भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद सिंधुदुर्गात झाली आहे. ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम या दोन संशोधकांनी गेली दोन वर्षापासून या कोळीवर संशोधन केलं आहे. ‘जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.
‘स्पारबांबॅरस सिंधुदुर्ग’ या नावाने या ‘जम्पिंग स्पायडर’ कोळीचं नामकरण करण्यात आलं आहे. या नावाने आता जगभरात या कोळीची ओळख होणार आहे. स्पारबांबॅरस हे नाव हा कोळी बांबूच्या झाडावर याचा अधिवास असल्याने तस नामकरण करण्यात आले आहे. हा कोळी ज्या ठिकाणी जाळ बनवतो त्याचं ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या कीटकांचा भक्ष करतात. भारतात जवळपास 2000 कोळ्याचे प्रजाती सापडतात. तर जगभरात 51,000 कोळ्यांचे प्रजाती सापडतात. जम्पिंग स्पायडरच्या 300 प्रजाती भारतात आढळतात.
Konkan Railway News :मध्यरेल्वेच्या काही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेऊन काही गाड्यांच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एकूण 10 एक्सप्रेस गाड्यांमध्ये एकुण 34 (सर्व 10 गाड्यांचे मिळून) डबे कायमस्वरुपी वाढविण्यात येणार आहेत.
या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्या नागपूर-मडगाव-नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीला एक थ्री टायर एसी आणि एक जनरल असे दोन अतिरिक्त डबे कायमस्वरूपासाठी जोडण्यात येणार आहेत.
Nagpur – Madgaon Jn Special (Bi-Weekly) 01139 या गाडीला दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून तर
Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01140 या गाडीला दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून हे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
या गाडीच्या डब्यांची सुधारित संरचना
2 Tier AC – 01, 3 Tier AC – 05, Sleeper – 11, General – 05, SLR-02 =एकूण 24 आयसिएफ कोच.
मध्य रेल्वे खालील १० एक्सप्रेस मध्ये १२/१०/२३ पासुन पुढे एकुण ३४ डब्बे कायमस्वरुपी
वाढवत आहे…१) २२१३९ पुणे अजनी एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
२) २२१४० अजनी पुणे एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
३) २२१४१ पुणे नागपूर एक्सप्रेस-… pic.twitter.com/ggfWyv4BNB— Central Railway (@Central_Railway) October 10, 2023
सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सिंधुदुर्ग :एसटीच्या अस्तित्वात चालकासोबतच वाचकाचा (कंडक्टर) चा वाटा पण महत्त्वाचा मानला जातो. वाहकाची वागणूक जर विनम्र आणि सोज्वळ असेल तर प्रवासी एसटीला प्राधान्य देतो. त्यामुळे वाहकाने गर्दी आणि कामाच्या ताणला न कंटाळता अगदी प्रवाशांबरोबर चांगले वागणे गरजेचे आहे.
कित्येक वेळा एसटीच्या प्रवासात खूप चांगले अनुभव वाहकांकडून प्रवाशांना येत असतात. असाच एक अनुभव पुणे ते विजयदुर्ग या मार्गावर गणेश चतुर्थीदरम्यान प्रवास करणार्या एका प्रवाशाला आला. वाहकाच्या प्रवाशांना दिल्या गेलेल्या चांगल्या वागणुकीमुळे भारावून गेलेल्या या प्रवाशाने विजयदुर्ग आगाराला चक्क पत्र लिहून त्या वाहकाचे कौतुक केले आहे.
गाडी मध्ये गर्दी असूनही वाहक शिरसाट यांचा व्यवहार खूपच चांगला आणि प्रवाशांना मदत करणारा होता. अशा वाहकांमुळे एसटीची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्याने या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या पत्रास एसटीचा गौरव मानून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर प्रसिद्ध केले आहे.
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे..! pic.twitter.com/KAE86pvl1J
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) October 6, 2023