Category Archives: कोकण

सणासुदीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर विशेष फेर्‍या; आरक्षण १८ ऑगस्ट पासून सुरू

Konkan Railway News:  दक्षिणेकडील राज्यात साजरा होणारा ओणम सण, वार्षिक वेलांकनी महोत्सव आणि या महिन्यात महाराष्ट्र राज्यात साजरे होणार्‍या सणांच्या निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दि. 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण ६ फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण 18 ऑगस्ट रोजी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि आरक्षण तिकीट खिडक्यांवर चालू होणार आहे.

Train No. 06071 / 06072 Nagercoil – Panvel – Nagercoil Special (Weekly):
Train No. 06071  Nagercoil – Panvel  Special (Weekly):
ही गाडी मंगळवार दिनांक 22/08/2023, 29/08/2023 आणि 06/09/2023 या दिवशी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या वेळेला दिवशी 10 वाजून 45 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल.
Train No. 06072  Panvel – Nagercoil Special (Weekly):
ही गाडी गुरुवार दिनांक 24/08/2023, 31/08/2023 आणि 07/09/2023 या दिवशी पनवेल येथून ही गाडी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि नागरकोईल ला ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोहचेल.
पनवेल मडगाव दरम्यान ही विशेष गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच थिवीला थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
 2 Tier AC – 01 Coaches, 3 Tier AC – 05 Coaches,  Sleeper – 11 Coaches, General – 02 Coaches, SLR – 02,  असे मिळून एकूण 21 डबे

Loading

बांदा दाणोली मार्गावर कारला अपघात

सावंतवाडी: बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील अवघड वळणावर चालकाला अचानक डुलकी लागल्याने कारला अपघात झाला, सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पुण्यातून गोव्याला गेलेले पर्यटक परत पुण्यासाठी जाण्यासाठी निघाले असताना  बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील अवघड वळणावर चालकाला डुलकी लागल्याने कार (MH 14 KS7291) रस्त्याच्या बाजूला जावून झाडीत कलंडली. आज सकाळी 11.30वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने ही गाडी काढण्यात आली आहे.

Loading

”मडुरा स्थानकाचे रुपांतर ‘हॉल्ट स्टेशन’ मध्ये करावे अन्यथा”…मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा

सिंधुदुर्ग : मडुरे स्थानकावर काही गाड्यांना थांबा द्यावा तसेच मडुरा स्थानकाचे रुपांतर “हॉल्ट स्टेशन” मध्ये करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा लेखी इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे.

सावंतवाडी स्थानका नंतर मडुरा हे स्थानक लागते. मात्र या स्थानकाकडे प्रशासनाने अनेक वर्ष दुर्लक्ष केले आहे. या स्थानकावर फक्त दिवा पॅसेंजर ही गाडी थांबत असून बाकी हे स्थानक फक्त नावालाच आहे. कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस,तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्या जादा गाड्या सोडल्या जातात त्यांना मडुरा स्थानकात थांबा मिळणेसाठी गेली अनेक वर्ष आम्ही सर्व स्थानिक निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटुन कोकण रेल्वे प्रशासनाकडे थांबा देणेसाठी वारंवार मागणी करीत आहोत मात्र आपल्या मागण्यांना नेहमी प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात आहे, त्यामुळे आता उपोषण हाच पर्याय उपलब्ध असल्याने हे उपोषण करण्यात येत असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले.

Loading

Mumbai Goa Highway | “सरकारकडे रस्ता पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत, एक दोन रुपये तरी द्या” म्हणत आंदोलकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

Mumbai Goa Highway News: महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव जाऊ नये या उद्देशाने खड्डे भरण्यासाठी तसेच शासनाला व निद्रस्त असलेल्या प्रशासनाल जागे करण्यासाठी आज मुंबई गोवा महामार्गावर ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान, सोबती संस्था व पेण पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर आज रविवारी (ता.१३) रोजी वाशी नाका येथे ‘भीक मागो’ आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा देत सहभाग नोंदविला.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांकडून भीक मागून सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी वर्गाने शासानाबद्दल असणारा रोष गांधीगीरी करीत व्यक्त केला. भीक दो भीक दो महामार्गासाठी भीक दो अशी घोषणा देत आणि रस्त्यासाठी एक दोन रुपये तरी द्या अशी विनंती करत मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तसेच महामार्ग पुर्ण करण्यासाठी भिकेचे दान मागण्यात आले.
या आंदोलनात सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो मावळे, सोबती संस्थेचे बापू साहेब नेने, ॲड. मंगेश नेने, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, पेण पत्रकार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील, उपतालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदिश ठाकुर, तालुका समन्वयक दिलिप पाटील, शिवदूत रविंद्रनाथ पाटील, जिवन पाटील, प्रवीण पाटील, कांचन थळे, चेतन मोकल, राकेश मोकल, राहुल पाटील, वसंत म्हात्रे, विनोद म्हात्रे, प्रदीप वर्तक, सोबती संस्थेचे सदस्य आणि विविध सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. भीक मागून जमा झालेलु रक्कम नॅशनल हायवे कार्यालयांत जमा करण्यात येणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी जाहीर केले.

Loading

आंबोली | मंत्री येण्याअगोदरच ग्रामस्थांनी केले धबधब्याचे उदघाटन; नेमका प्रकार काय?

आंबोली |काल आंबोली येथील ‘बाहुबली’ या धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मंत्री दीपक केसरकर आणि इतर पाहुणे मंडळी  येण्याच्या अगोदरच पारपोली येथील ग्रामस्थांनी या धबधब्याचे उदघाटन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक,इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक यांच्याशी संवाद साधला आता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हा धबधबा आंबोली गावच्या हद्दीत न येत पारपोली या गावच्या हद्दीत येत असून सुद्धा उदघाटनपत्रिकेवर पारपोली गावचे किंवा या गावच्या सरपंचाचे नाव कुठेही नमूद केले नाही आहे किंवा उदघाटनाचे आमंत्रण दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पारपोली ग्रामपंचायतीने उदघाटनाला शुभेच्छा देणारा बॅनर आंबोलीकरांनी फाडून टाकण्याचा निंदनीय प्रकार पण घडला आहे. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या विषयात आंबोली ग्रामपंचायच्या बाजूने असून हा पारपोली ग्रामस्थांवर अन्याय करताना दिसत आहेत. मतांच्या राजकारणामुळे परपोली गावावर अन्याय होत आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आहे. धबधबा आमच्या गावाच्या हद्दीत येत असून त्याची संगोपनाची जबाबदारी आणि इतर हक्क आमच्या गावचे असायला पाहिजेत. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू विशेष गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये बदल

Konkan Railway News: कोकणरेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा बदल केला गेला असून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे काण्यात आले आहे.
अतिरिक्त थांबे 
०११५३/०११५४ दिवा रत्नागिरी दिवा संपूर्ण अनारक्षित गणपती विशेष मेमू वीर ते खेड ह्या ५१ किलोमीटर अंतरात कुठेही थांबत नसल्याने या गाडीला किमान दोन वाढीव थांबे देण्याची मागणी कोकण विकास समितीने तसेच इतर संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार या गाडीला करंजाडी आणि अंजनी या दोन स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटांचे थांबे देण्यात आले आहेत.
०११५३ दिवा रत्नागिरी मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सकाळी १०:४० असून अंजनी स्थानकावरची वेळ ११:४५ आहे.
०११५४ रत्नागिरी दिवा मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सायंकाळी  १८:३० असून अंजनी स्थानकावरची वेळ १७:३२ आहे.
हा बदल या गाडीच्या सुरवातीपासून म्हणजे १३/०९/२०२३ पासून अमलात आणला जाणार आहे.
वेळापत्रकात बदल 
०११५६ चिपळूण दिवा मेमू या गाडीच्या चार स्थानकांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी
  • चिपळूण या स्थानकावर १३:१० वाजता (पूर्वीची वेळ १३:००),
  • अंजनी स्थानकावर १३:२६ (पूर्वीची वेळ १३:१५),
  • खेड स्थानकावर १३:३९ (पूर्वीची वेळ १३:३१)
  • कळंबणी बुद्रुक १३:४७ (पूर्वीची वेळ १३:४३)
या वेळेस या स्थानकांवर येणार आहे. हा बदल दिनांक १४ सप्टेंबर २०२३ पासून अमलांत आणला जाणार आहे.

Loading

Mumbai Goa Highway | सहनशील कोकणवासियांना अजून किती त्रास देणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल…..

मुंबई: अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविषयी शिवसेना (UBT) नेते आणि विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली नाराजी ट्विटरमध्ये व्यक्त केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत …..
गणेशोत्सव जवळ आलाय, कोकणचा चाकरमानी बांधव कोकणात जायला निघणार आणि रस्त्यांची अवस्था मात्र चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी! प्रवास सुखकर होणं अशक्य!
पालकमंत्री पदासाठी आपापासात भांडत बसलेल्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही? पाठीशी असलेली महाशक्तीही मदतीला येत नाही? अश्या भामट्यांना कोकणी माणूस इंगा दाखवणार!

Loading

आंबोली येथील अजून चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले

आंबोली बाहुबली धबधबा
आंबोली: आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध राज्यांसह विदेशातील पर्यटकही भेट देणार आहेत. विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी या निमित्ताने केले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता यावी, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे यासाठी वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास पर्यटकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद प्रेरणादायी आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे
यावेळी आंबोली येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बाहुबली धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक यांच्या हस्ते करण्यात आले. आंबोलीतील पर्यटन वाढावे, यासाठी तब्बल पाच नव्या धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती आले असून त्यापैकी चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुशांत पानवेकर आदींसह शिवसेना व भाजपचे विविध पदाधिकारी, पर्यटक उपस्थित होते.

Loading

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागण्याची आशा पल्लवित

Railway News : मागच्या ७ वर्षांपासून रखडलेल्या वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत तीन हजार ४११ कोटी १७ लाखांच्या खर्चास शिफारस देण्यात आली आहे. त्यामुळे वैभववाडी -कोल्हापूर या १०७ किलोमीटरचा रेल्वेमार्गाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
पीएम गतीशक्ती अंतर्गत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. याचा मुख्य उद्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग हा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कच्चा, पक्का अशा दोन्ही प्रकारचे शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूकीसाठी मदत होणार असल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक होते.
कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. शिवाय कोकणातील मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
काय आहे ‘पीएम गति शक्ती’ योजना ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी ओक्टोम्बर २०२१ रोजी  ‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू केली. मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. सरकारच्या मते, ही योजना भारताच्या पायाभूत सुविधांसाठी गेम चेंजर ठरेल. सरकार या कार्यक्रमात 107 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकारने म्हटले की, गती शक्ती योजना ही मंत्रालयाच्या सर्व विद्यमान आणि नियोजित उपक्रमांचा समावेश असलेला एक मास्टर प्लॅन आहे. यामध्ये आर्थिक क्षेत्र आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. सरकारच्या मते, यामुळे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये प्रादेशिक आणि क्षेत्रीय असंतुलन दूर करण्यास मदत होईल. यासह मुख्य क्षेत्रांच्या जलद वाढीसह रोजगार निर्माण होईल. सरकारचे सर्व पायाभूत प्रकल्प गती शक्ती योजनेत समाकलित केले जातील. सरकारच्या मते, या योजनेमुळे पायाभूत सुविधांच्या विकासातील सर्व अडथळे दूर होतील.

Loading

चाकरमान्यांसाठी खुशखबर | यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार ‘भाजपा एक्सप्रेस’

सिंधुदुर्ग :चाकरमान्यांना भारतीय जनता पक्षाकडून एक खुशखबर आहे. सालाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी, “भाजपा एक्सप्रेस” हि रेल्वेगाडी पक्षातर्फे चालविण्यात येणार आहे.

ही गाडी दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून कुडाळ – मालवण साठी सोडण्यात येईल. इच्छुक कोकणवासीयांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत (सोमवार ते शनिवार) कार्यालयात येवून आपली सीट बुक करावी असे आवाहन भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटर द्वारे केले आहे.

बुकिंग साठी संपर्क –
+९१- ८६५७ ६७६४०४
+९१- ८६५७ ६७६४०५

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search